मायबोलीच्या वाचकांची संख्या ११ लाखावर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीवर येणार्‍या वाचकांची संख्या एका वर्षात ११ लाख (११, ४३, १२४) इतकी झाली आहे.
मायबोलीने नेहमीच "आधी केले, मग सांगितले" हे धोरण आखून घेतले आहे. गेल्या वर्षातही आपण १० लाखावर मजल गाठली होती, पण हा केवळ योगायोग नाही याची यावर्षीही खात्री करून घेतल्यावर हे जाहीर करतो आहोत.

या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor). त्या व्यक्तीच्या भेटींची संख्या ( Visits) प्रत्येक भेटीबरोबर वाढते. मायबोलीच्या वाचकांनी गेल्या १ वर्षात मायबोलीला
३२, १०, ९८४ इतक्या वेळा भेट दिली.

या संख्येत मायबोलीकर आणि मायबोलीवर येणारे अतिथी या दोघांचाही समावेश आहे.

Nov-2012-yearly-maayboli.jpg

तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद !

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मायबोलीचे हार्दिक अभिनंदन !!!
आजकाल कोणी मराठी वाचत नाही ,मराठी जगेल की मरेल यासारख्या मध्ये मध्ये चालू असणार्या
चर्चांना हे उत्तर आहे.तुम्ही एखादा दर्जेदार प्लॅटफॉर्म द्या - लोकांना व्यक्त व्हायला आवडतं,लिहायला/ वाचायला/ शेअर करायला आवडतं .
मायबोलीला असेच यश मिळो हीच ईच्छा.

माननीय प्रशासक,

दणदणीत आकडा गाठल्याबद्दल आपले आणि माबोकरांचे अभिनंदन! Happy

एक प्रश्न आहे : unique visitor म्हणजे इथे दिलेत तसे का? तसं असल्यास तिथे दोन प्रकारचे व्हिझिटर्स सांगितलेत. त्यापैकी कुठले धरायचे?

आ.न.,
-गा.पै.

Pages