Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सलाद, स्टर फ्राय, फ्राईड
सलाद, स्टर फ्राय, फ्राईड राईस, सिझलर्स !
>>झुकिनी, ब्रोकोली, मशरुम्स,
>>झुकिनी, ब्रोकोली, मशरुम्स, लाल-पिवळ्या, हिरव्या ढब्बु मिरच्या, स्वीट कॉर्न्स असं सगळं वापरून काय करता येई>><<
ऑमलेट.
सर्व डब्बू मिरचीची चटणी, कॉर्नचे सलाड, मशरूम्स सूप्स, ब्रोकोलीची पुलाव व डेसर्ट म्हणून झुकिनी केक, असे सर्व वेगवेगळे मेनो करता येतील. (एकाच दिवशी करायचे असेल तर नाहीतर एकच भेसळ करून ऑमलेट आहेच...).
एवढ्या भाज्या एकदम का आणल्या?
मला घरात एवढ्या भाज्या बघून्च स्ट्रेस आला असता.
अल्पना, ह्या कृतीने व्हेज
अल्पना, ह्या कृतीने व्हेज क्रंची कर. स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प!!
झंपी २-३ दिवसाच्या भाज्या
झंपी २-३ दिवसाच्या भाज्या एकत्र घेतल्या की इतक्या तरी होतातच. (झुकिनी आणि ब्रोकोली त्या भाजीवाल्याने आग्रह करुन घ्यायला लावली खरंतर)
स्टर फ्राय चाच ऑप्शन सुचला होता मला फक्त.
मंजू त्या क्रंची मध्ये झुकिनी बरी लागेल तळल्यावर?
प्लीज अर्जंट मदत हवी आहे. आठ
प्लीज अर्जंट मदत हवी आहे.
आठ दिवसाच्या बाळंतिणीला जेवण पाठवायचे आहे. साधारण २ दिवसतरी पुरेल इतके.
सध्या इथे बर्फ पडतो आहे. आणि ती कांदा, लसूण, आले, चिकन, अंडी खात नाही. मासे चालतात.
तर काय काय करून देता येईल?
मी पराठे, खिचडी, एखादी दाल विचार करतेय. पण अजून पौष्टिक काय देता येईल?
झुकिनी साधारण अर्धा सेमी
झुकिनी साधारण अर्धा सेमी कापून चवीप्रमाणे हळद, मीठ लावयचे. लगेचच तव्यात झाकण ठेऊन शॅलो फ्राय करणे.
झुकिनी खिसून मीठ-हळद लावून ठेवणे. १५-२० मि.नी पाणी सुटल्यावर बसेल तितकी कणिक आणि तांदळाचे पीठ, ओवा, जीरे, वाटल्यास कोथिंबीर, मिरची वाटून घालून लगेचच पराठे लाटणे. पीठ भिजवून ठेवले तर अजून पाणी सुटते आणि लाटायला त्रास होतो.
सुरणाची, गवारीची, लाल
सुरणाची, गवारीची, लाल भोपळ्याची भाजी मिरी घालून. शिरा, खीर चांगले पर्याय आहेत. बोंबलाचि मिरवणी देतात पण दूधाच्या पदार्थासोबत नको. पालेभाज्या, सूप, चालेल. टोमॅटो सार, टोमॅटो राईस चालेल. दुधीची भाजी / खीर चालेल. गाजरहलवा चालेल. ग्लेझ्ड कॅरेट्स चालतील.
चिऊ, मुगडाळीची खिचडी, टोमॅटो
चिऊ, मुगडाळीची खिचडी, टोमॅटो सूप (सूपचे दोन तीन प्रकार), भेंडीच्या काचर्या, मेथीचे अथवा पालक पराठे अथवा परतलेली भाजी, साधा वरण भात, फुलके (पण हे गार नाही खाता येणार).
शिरा, उप्पीट, इडली हे पण चालू शकेल. खीरीमधे रव्याची/शेवयाची/तांदळाची खीर चालू शकेल. दलियाचा सांजापण देता येऊ शकेल.
{हे सर्व पदार्थ दोन दिवस पुरवायचे असल्यास शिरा-उप्पीट वगैरेचे कोरडे मिश्नण करून पाठव्ता येइल. आयत्यावेळेला मायक्र्वेव्हमधे गरम गरम बनवून खाता येइल)
अल्पना, हो, चांगली लागेल.
अल्पना, हो, चांगली लागेल. खरंतर सॉसमुळे चव कळणारच नाही
धन्यवाद दिनेशदा आणि नंदिनी.
धन्यवाद दिनेशदा आणि नंदिनी.
इथे बोंबिल मिळत नाहित पण जे मिळतात त्याचे बनवून बघते. पण मिरवणी कशी करायची?
ती माझ्यापासून तासाच्या अंतरावर राहते. तेव्हा गरम देणे शक्यच नाही. आज रात्री किंवा उद्या सकाळी करणार आणि शनि-रविचे देणार. मग रवि रात्री करून सोमवारचे. नवर्याचे ऑफिस तिथून जवळ आहे तेव्हा बाकी दिवस असंच रात्री/पहाटे करून सकाळी देता येईल.
मिरवणी जागूने लिहिली होती..
मिरवणी जागूने लिहिली होती.. पण बाकिच्या माश्यांची कदाचित चांगली लागणार नाही. तेव्हा सध्या शाकाहारीच द्या. मिरचीच्या जागी मिरपूड वापरा एवढेच.
लेमन राईस पण चालेल. गाजराचा भात पण चालेल ( अगदीच सोपा. गाजराचा किस करुन भाताबरोवर शिजवा.)
थंडही खाता येतील असे पराठे द्या. पालेभाजी + केळे घाला पिठात म्हणजे थंड झाल्यावर देखील, कडक होणार नाहीत.
चिऊ लाल भोपळ्या ऐवजी दूधीची
चिऊ लाल भोपळ्या ऐवजी दूधीची भाजी दे. दूधी पचायला हलका पडेल.
दिनेशजी लाल भोपळा थोडा वातुळ असतो. त्यामानाने दुधी बरा.
दूधीचे रायते पण चालेल. वेगवेगळी सूप्स ( नंदिनीने सुचवलीय तसे) तसेच मेथी / पालक परोठे किंवा भाजी. आणी बरोबर मिरे+ ताजे खोबर्याची चटणी चालतेच.
खिरींमध्ये दूधीची पण खीर चालेल किंवा हलवा पण. कारण दूधी खूप पौष्टीक असतो.
बाकी दिनेशजींनी सुचवले आहेच.
अल्पना, काय लकी ! मस्त मस्त
अल्पना, काय लकी ! मस्त मस्त सलाड्स बनवुन खा.
आभार टुनटुन.. सारक म्हणून
आभार टुनटुन.. सारक म्हणून सुचवले होते.
खरे तर खसखस पण चांगलीच, पण भारताच्या बाहेर खसखशीचे नाव घेताना पण, विचार करावा लागतो.
धन्यवाद टुनटुन. इथे खरंतर
धन्यवाद टुनटुन.
इथे खरंतर दुधी मिळणे सोपे. लाल भोपळा नेहमी नाही मिळत.
खसखसपण चालते का? ती बंगाली आहे. त्यामुळे खसखस अगदी पळेल.
मीरे + खोबर्याची चटणी म्हणजे नेहमीच्या चटणीत मिरचीऐवजी मीरे ना? की अजून काही?
दिनेशजी खसखस तर अगदी उत्तम.
दिनेशजी खसखस तर अगदी उत्तम. कारण बाळासाठी भरपूर दूध यावे म्हणून खसखशीची खीर देतात आपल्या कडे. पण खरच भारताबाहेर मात्र विचार करावा लागेल. आणी आपल्याकडे डॉक्टर/ दवाखाने केव्हाही मदतीसाठी असतात. भारताबाहेर मात्र ते जाम डोकेदुखी ठरते.:अरेरे:
लाल भोपळ्यात लोह आणी अ जीवनसत्व चांगले असल्याने खरे तरे ते खूपच उपयोगी. पण पहिले तीन महिने त्या बाळाला तसे आईच्या आहारावर अवलंबुन रहायला लागते, त्यामुळे वातुळ पदार्थांनी gases होतात म्हणून म्हंटले.
पण मेथी फोडणीला टाकुन कधी तरी हरकत नाही खायला.
अगं चिऊ मिर्ची नाही मिरीच
अगं चिऊ मिर्ची नाही मिरीच आपली मसाल्यातली. मिरी+ खोबरे ( सुके पण चालेल) +मीठ अशी चटणी माझ्या सासुबाई द्यायच्या मला.
जागु सुचवेल तिला वेळ होईल तेव्हा.
खसखस मिळत असेल, तर नक्कीच.
खसखस मिळत असेल, तर नक्कीच. खीर करता येईल ( खिरीतले दूध क्वचित फाटते पण तरी पिता येते. ) भाजीत वाटून घालता येईल.
चिऊ, मूगडाळ + दुधीचे सूप हाही
चिऊ, मूगडाळ + दुधीचे सूप हाही एक चांगला पर्याय आहे. टोमॅटो सार/ रस्समही चालू शकेल बहुतेक. साजूक तुपातला रव्याचा शिरा (गोड आवडत असल्यास) किंवा खीर, दलिया, मुगाची कोरडी उसळ, मेथी/पालक/कोथिंबीर पराठे, तिळाची चटणी/ जवसाची चटणी / कोरडी पूड चटणी, लिंबाचे गोड लोणचे, मु डा खि चे कोरडे मिश्रण हेही आहेच. तोंडल्याची परतून भाजी, घेवडा/ गवार/ फ्लॉवरची परतलेली भाजी देता येईल. मुगाची डाळ शिजवून तिचे वरण, खिमटीचे साहित्य कोरडे भाजून ते मिश्रण (जे फक्त गरम पाण्यात शिजवले की झाले!) असेही देता येईल.
सॅलड चिरून पॅकबंद करून एकेका जेवणाच्या सर्विंगच्या हिशेबाने देता येईल.
कणीक तुपावर कोरडी भाजून त्यात भाजलेले खोबरे काप, खारीक तुकडे, मनुका, बदाम काप, पीठीसाखर घालून देता येईल. कोरडे किंवा कोमट/गरम दुधात घालून चांगले लागते.
अल्पना, भाज्या + अंडी घालुन
अल्पना, भाज्या + अंडी घालुन व्हेजी केक / फ्रिटाटा / स्पगेटी केक बनव
चिऊ, तुम्ही मैत्रिणीसाठी
चिऊ,
तुम्ही मैत्रिणीसाठी इतकं करताय त्याबद्दल तुमचे कौतुक.
मेथ्या भिजवून थोडेसे मोड काढून एक माप मेथी, दोन माप तांदूळ असे कूकरमधे शिजवायचे. मग ते मिश्रण अर्धा कप, अर्धा कप दूध, केशर / वेलची / गूळ ( साखरेपेक्षा गूळ प्रेफरेबल) घालून गरम करायचे. अशी एकेक कप खीर सकाळ संध्याकाळ द्यावी बाळंतिणीला.
बदाम भिजवून खायला सांगावे.
चालत असल्यास/ आवडत असल्यास खोबर्याचे वाटण असलेले प्रकार पण देऊ शकता.
प्रत्येक जेवणात फळभाजी, पालेभाजी, मूग डाळ / मसूर डाळ , चालत असल्यास तूर डाळ असे असावे.
काकडी / गाजर/ इथले बारके मुळे फार स्ट्राँग वासाचे नसतात तर ते / टॉमेटो असे कच्चे पदार्थ पण थोडे थोडे असावेत.
हे सर्व करताना तिच्या नवर्याला, इतर मुले असतील तर त्यांना आवडतील असे पदार्थ पण मधनं मधनं देऊ शकता.
काहीतरी अत्यंत सोपी गोडाची
काहीतरी अत्यंत सोपी गोडाची रेस्पी सुचवा.
खिरी आणि लापश्यांचा सुपर कंटाळा आलाय.
विविध वड्या आणि लाडू मी आजतागायत कधी केलेले नाहीत. पण ते बिघडण्याबद्दल य वेळा ऐकलंय. तेव्हा ते नको.
मा वे बिघडलेला आहे त्यामुळे त्यात होऊ शकेल असे नको.
आता सुचवा...
नीधप, हाताशी काय काय आहे ?
नीधप, हाताशी काय काय आहे ?
बहुतेक सगळी पिठे,
बहुतेक सगळी पिठे, ड्रायफ्रूटस, स्वादाचे पदार्थ (वेलदोडा, दालचिनी, केशर) हे आहे.
तांदूळ, डाळी आहेत.
दूध, दही सकाळी आणता येईल.
ताजी फळे सकाळी आणता येतील.
नारळ सकाळी आणता येईल.
उद्याला करायचंय. पण प्रचंड साफसफाई आणि बाकी कामाच्या रामरगाड्यात करायचंय त्यामुळे टेन्शन फ्री रेसिपी हवीये.
दुसरं म्हणजे तुमच्या विपुत एक प्रश्न विचारलाय. दोदोल संदर्भाने. माडाचा गूळ अगदी थोडा आहे माझ्याकडे. पार्ल्यात कलकत्त्याचा पाम जॅगरी विथ जिंजर मिळतोय. साधा गूळ आहेच. तर असे विविध गूळ घालून मेकशिफ्ट दोदोल करू का?
डीज्जेचा आंब्याचा शिरा करुन
डीज्जेचा आंब्याचा शिरा करुन पहा. नाहीतर बिन मा वे ची म ब
बर्फी झेपेल का मला? मी अजून
बर्फी झेपेल का मला? मी अजून रेस्पी पण वाचली नाहीये.
आंब्याचा शिरा जमेल. नॉर्मल शिरा उत्तम होतो माझा. आंब्याची एक बॉटल आणते फक्त.
सायोची म ब शोधून वाचली. ती
सायोची म ब शोधून वाचली. ती मावे रेस्पी आहे. माझा मावे बिघडलाय.
कष्टर्ड करुन त्यात आधी
कष्टर्ड करुन त्यात आधी ड्रायफ्रूट्स आणि मग उद्या ताजी फळे. ढवळायला पेशंस हवा, बाकी काही बिघडत नाही.
दही दूध घालून रव्याचा केक. फुगला तर केक म्हणायचा नाही फुगला तर मस्कती हलवा म्हणायचा.
मिश्रण तासभर भिजवून ठेवायचे आणि मग मंद आचेवर ठेवायचे. त्यापूर्वी मिश्रणाची चव बघायची. छान गोड लागायला हवे. ढवळावे वगैरे लागत नाही, सहसा बिघडत नाही.
मालपुवे. ( कणीक + बेसन ) आता करुन ठेवता येतील. उद्या त्यावर क्रिम / बासुंदी / रबडी यापैकी एक ओतायचे. मुळात मालपुवा म्हणजेच बिघडलेली जिलेबी असल्याने, आणखी बिघडत नाही.
विपुचे उत्तर दिलेय. ( नाताळ आलाच कि )
अल्पना, ढब्बू मिरच्या मोठ्या
अल्पना, ढब्बू मिरच्या मोठ्या असतील तर आतल्या बिया वगैरे काढून त्यात खूस्खूस भरून शॅलो फ्राय करून छान लागेल, बेक करता आलं तर उत्तमच. वर किसलेलं चिझ पण घालता येइल.
खूसखूस नसेल तर दलिया / फ्राइड राइस पण मस्त लागतो.
मश्रूम मोठे असतील तर त्यातलं देठ काढून टाकायचं,
१ / २ टोस्ट १ लसणाची पाकळी, मीठ, मिरची असं सगळं मिक्सरम्धून काधायचं आणि हे त्या मश्रूम मधे भरायचं भरताना थोडा सोय सॉस आणि वरून चिझ घालून ग्रिल / बेक करायच; फार छान लागतं गरम गरम.
झुकिनीच्या भजी/पकोडे छान होतात. ओवा घायचा
धन्यवाद अरुंधती आणि मेधा.
धन्यवाद अरुंधती आणि मेधा.
मेधा, कौतुकाने मूठभर मांस चढले. हे खरंच काही विशेष नाहीये. उलट तिला आदल्या रात्री केलेले द्यावे लागणार, अगदी ताजे नाही देता येणार याचीच खंत वाटतेय. ती मेथीची खीर फार आवडली. पण मला वाटतंय अजून ८ दिवसानी दिलेली चांगली. तोपर्यंत बाळाची भूक वाढेल. बाकी आहाराच्या सूचना अमूल्य आहेत.
अरुंधती, मूगडाळ + दुधीचे सूप कसे करायचे? कणीक तूपावर भाजताना प्रमाण काय घ्यायचे? बाकी सगळे पदार्थ नुसते मिसळायचे ना? इथे खारिक मिळत नाही. त्याच्या ऐवजी खजूर घातला तर चालेल का? तोपण भाजून घालावा का? सिरप घातले तर? खूप प्रश्न विचारते आहे पण नवीन काही करताना कृतीप्रमाणे केलं की जमतं.
Pages