काल लग्नाचा वाढदिवस होता म्हटलं नवर्यासाठी काहीतरी स्पेशल करुया. पाईनॅपल केक तर तयार झाला होता. साथ में कुछ झणझणीत मंगता था. थोडी पुस्तकं चाळली. खालच्या दुकानातून चिकन घेऊन आले. वेगळं काय करावं हा विचार होताच. पण म्हटलं, आधी मॅरीनेशन तर करुन ठेवूया मग बघू पुढचं पुढे.
लग्गेच कृती सुरु केली. पुस्तकातली रेसीपी आणि माझी अक्कल ह्याचा छानसा(?) मेळ साधून सुपरहीट चिकन तयार झालं. अतिशय चविष्ट दिसणारं आणि लागणारं चिकन करायला अगदीच सोप्पंय.
साहित्य : मॅरिनेशन साठी
१ किलो चिकन,
३ टेबल स्पून टोमॅटो केचप,
लिंबाचा रस (साधारण २ लिंबांचा रस)(इकडे मोठी लिंबं रसदार मिळतात. त्यामुळे मी एकच घेतलं.)
२ टी स्पून लाल तिखट
मीठ
साहित्य : ग्रेव्हीसाठी
प्रत्येकी २ टी स्पून आलं, लसूण पेस्ट,
२ टेबल स्पून टोमॅटो प्युरी,
३ कांदे अगदी बारीक चिरुन,
२ अंडी फेटून,
१ टी स्पून हळद
२ टेबल स्पून हिरव्या मिर्च्या अगदी बारीक चिरुन,
१ टी स्पून बादशहा (किंवा कुठलाही) चिकन मसाला
तेल,
मीठ.
कृती :
चिकन स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळवून टाका.
मॅरीनेशन चं सगळं साहित्य एकत्र करुन चिकन ला चोळून ठेवा. साधारण २ तास झाकून ठेवा.
एका कढईत ३ टेबल स्पून तेल तापत ठेवा आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या.
कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो प्युरी घाला.
तेल सुटायला लागलं की त्यात आलं, लसूण पेस्ट घाला.
थोडं परतून नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या घाला.
मग त्यात हळद आणि चिकन मसाला घाला.
थोडं परतवून त्यात चिकनचे मॅरीनेट केलेले तुकडे घाला.
सगळं मिश्रण मस्तपैकी परतवून झाकण ठेवा.
साधारण १५ मिनिटात चिकन शिजत आल्यानंतर त्यात १ कप पाणी घाला.
पुन्हा झाकण ठेवा आणि चिकन पूर्ण शिजवा.
झाकण उघडल्यावर मस्त रसरशीत चिकन तयार
पण थांबा पिक्चर अभी बाकी है ..
फेटलेली २ अंडी त्यात घाला. मस्तपैकी ढवळा.
गरम असल्यामुळे अंडी लगेच शिजतील. छान ढवळल्यामुळे अंडी एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील.
रश्श्याचं टेक्स्चर पूर्ण बदलेल पण घाबरु नका.
झाकण ठेवा ….आणखी एक वाफ काढा.
आता चिकन जालफ्रेझी एकदम तय्यार
एका छानशा भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. तोंडाला पाणी नक्कीच सुटणार
मस्त आहे रेसिपी --- पण आता
मस्त आहे रेसिपी --- पण आता एका प्रश्नाची उत्तरे तयार ठेवायची.. यात चिकन ऐवजी काय वापरता येईल !
छान रेसिपी लवादिहाशु
छान रेसिपी
लवादिहाशु
यम्मी दिसतय!
यम्मी दिसतय!
मस्त दिसतेय , नक्किच चविष्ट
मस्त दिसतेय , नक्किच चविष्ट असणार
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
सर्वप्रथम, वाढदिवसाबद्दल
सर्वप्रथम,
वाढदिवसाबद्दल अभिनंदन!..
"जालफ्रेझी" चा नेमका अर्थ काय...?
बाकी त्यातले चिकन वगळून ऊरलेले ईकडे पाठवा..
जयश्री... सुर्रेख रंगामुळे
जयश्री... सुर्रेख रंगामुळे भलतीच अॅपिटायझिंग दिस्तीये डिश....
आपल्याला तर बाबा हीच हवी... नो चेंज
जबराट..... ह्या रविवारी घरी
जबराट..... ह्या रविवारी घरी बनावे अशी तजवीज करण्यात येईल.
लग्नाच्या वाढदिवसाच्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मस्त रेसीपी.
ह्या रविवारी घरी बनावे अशी तजवीज करण्यात येईल. >> मी पण विचार केला होता पण या रवीवारी संकष्टी आहे. सो नेक्स्ट सन्डे.
दिनेशदा सोया चंक किंवा मश्रूम्स वापरून केले तर...
शुभेच्छांबद्दल खूप खूप
शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद
योग, "जालफ्रेझी" चा अर्थ माहिती नाही रे. खरं तर "चिकन जालफ्रेझी" ह्या रेसिपी मधे थोडीशी माझी अक्कल वापरुन केलंय तर ह्या पदार्थाचं नाव बदलायला हवं होतं
तुम्ही लोक सुचवा एखादं झणझणीत नाव
चिकन वगळून ........ नको रे...... सब मजा किरकिरा हो जायेगा
विपा....... हो ज्ज्जाने दो
जालफ्रेजी हा शब्द 'झाल फ्राय
जालफ्रेजी हा शब्द 'झाल फ्राय जी' म्हणजे 'साहेब, तिखट फ्राय' याचा अपभ्रंश आहे.
हायला, जाल फ्रेजीचा हा अर्थ
हायला, जाल फ्रेजीचा हा अर्थ आहे मला काहीतरी चायनीज डिश असणार वाटले होते
हायला, जाल फ्रेजीचा हा अर्थ
हायला, जाल फ्रेजीचा हा अर्थ आहे मला काहीतरी चायनीज डिश असणार वाटले होते
जाल्फ्रेझी ही एक प्रकारचा
जाल्फ्रेझी ही एक प्रकारचा रस्सा असुन मांसाचे पदार्थ दाट बनविण्यासाठी याचं प्रयोजन केले जाते. पंजाबी लोकं ह्यात मांस शिजल्यानंतर हिरव्या मिरच्या कच्च्या कापुन टाकतात त्या योगे ही भाजी फिक्की ते अति जहाल होते.
म्हणुन कदाचित तिला चिकन जहाल फ्रेझी म्हणत असावेत.
बादवे- केरळात चिकन मसाला म्हणुन एक जवळपास कोरडी भाजी मिळते त्यात अंड फेटुन टाकलेले असते. व्हेज फ्राईड राइस/चिकन फ्राइड राइस आणी तो चिकन मसाला काय लागतात म्हणुन सांगु.
>>ह्या रेसिपी मधे थोडीशी माझी
>>ह्या रेसिपी मधे थोडीशी माझी अक्कल वापरुन केलंय तर ह्या पदार्थाचं नाव बदलायला हवं होतं
चिकन जयुफ्रेझी
दिनेशदा,
बनवलत की पाठवा ईकडे..
जालफ्रेजी हा शब्द 'झाल फ्राय
जालफ्रेजी हा शब्द 'झाल फ्राय जी' म्हणजे 'साहेब, तिखट फ्राय' याचा अपभ्रंश आहे.
एकदा मुंबईत व्हेज जालफ्रेझी मागवलेलं ते तर सोया सॉसमधे न्हाऊन आलं होतं.
<<< खरं की काय? मग ते हाटिलातून मिळणारे जालफ्रेझी एवढे मिळमिळीत का बनवतात बरे?
रेसिपी मस्त.
यात चिकन ऐवजी काय वापरता येईल
यात चिकन ऐवजी काय वापरता येईल !>>> दिनेशभौ पनिर वापरा चौकोनी लांबट तुकडे. मस्त होईल.
अंड्याने वैसपणा येत नाही का?
अंड्याने वैसपणा येत नाही का? म्हणजे अंड्याचा वास येत नाही का?
यात चिकन ऐवजी काय वापरता
यात चिकन ऐवजी काय वापरता येईल
<<
एग करी चांगली लागेल अशी.
फोटो फारच मस्त आलाय!
फोटो फारच मस्त आलाय!
मॅरीनेशन साठी टोमॅटो केचप चा वापर मी पहिल्यांदाच ऐकला ..
मस्त रेसीपी. फोटो जाम तोंपासु
मस्त रेसीपी. फोटो जाम तोंपासु आहे.
लवकरच करण्यात येईल.
तुम्ही बोनलेस चिकन वापरलं आहे का?
धन्यवाद लोक्स झालं फ्राय
धन्यवाद लोक्स
झालं फ्राय जी........ हे खरंच की गंमत ???
अंड्याचा वास अजिबात नाही येत. म्हणजे चिकनच्या वासामधे अंड्याचा वास मिसळून असा मस्त खमंग वास घरभर दरवळत राहतो
चिकन बोनलेस नाहीये..... !!
फोटोतलं चिकन कातिल दिसतंय.
फोटोतलं चिकन कातिल दिसतंय. लवकरच करुन बघण्यात येईल
फोटोतलं चिकन कातिल दिसतंय<<<
फोटोतलं चिकन कातिल दिसतंय<<< हो ना.. बिचारं कातिल झालं आणि आपण लाळ टपकावतोय

एकदम खतरा फोटो, सोपी
एकदम खतरा फोटो, सोपी रेसिपी!
ओरीजिनल जालफ्रेजीची रेसिपी नसल्यामुळे याला 'झोलफ्रेजी' म्हणता येईल. काहीही म्हणा, नावात काय आहे, दिसतेय तर लै चविष्ट!
लाजो "झोलफ्रेजी" .....
लाजो
"झोलफ्रेजी" ..... मजेदार
वा रेसिपी छान आहे. उशीराने
वा रेसिपी छान आहे.
उशीराने लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा..
मस्त झालय ते. इथे पाठवा.
ज्यांना शाकाहारी हवय त्यांनी चिकन ऐवजी सोया टाकुन बघा काही मजा येते का..
जागू, सेनापती.......धन्यु
जागू, सेनापती.......धन्यु
Pages