मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.
सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.
अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.
त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.
वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.
आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.
रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!
रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html
अचुक परिक्षण ... गाणी तर
अचुक परिक्षण ...:हाहा:
गाणी तर अजिबात झेपली नाहीत मला!!
गजनी + माय नेम ईज खान यांचे
गजनी + माय नेम ईज खान यांचे कॉम्बो स्टोरी आहे.
म. टा. तील परीक्षण वाचून
म. टा. तील परीक्षण वाचून सकाळीच उद्यासाठी टिकिट बुक केलीत. आता वाटते पैसे वाया जातील.
चित्रपटात शाहरुख असल्याने
चित्रपटात शाहरुख असल्याने रिव्हु वाचल्याशिवय जाय्चे नाही असे आधीच ठरवले होते. सगळीकडचे रिव्यु वाचल्यावर जायची गरज नाही हे पक्के झाले.
वर उदयन काय मुद्दा मांडू पाहताहेत हे कळले नाही. चित्रपटातला हिरो देशप्रेमी दाखवलाय म्हणुन चित्रपटाला गर्दी करायची आणि देशद्रोही असेल तर तिकडे फिरकायचे नाही असे काहीतरी म्हणताहेत का ते?
कथा देशद्रोह्याची असेल आणि ती चांगली मांडली असेल तर चित्रपट मी तरी पाहायला जाईन. तेच देशप्रेमी चित्रपटात शाहरुख 'मला बघा आणि फुले वाहा" भाव चेह-यावर ठेऊन वावरत असेल तर मी तरी जाणार नाही.
मला जरी शाहरुख अजिबात आवडत नसला तरी त्याचे स्वदेस आणि चक दे.. हे दोन्ही चित्रपट आणि त्यातला शाहरुख मला खुप आवडले, दोन्ही मी टिवीवर अनेकदा पाहिले. शाहरुखने त्याचा तो 'मला बघा आणि फुले वाहा" भाव बाजुला ठेऊन काम केलेय दोघांमध्ये आणि अक्षरक्ष सोने केलेय दोन्ही भुमिकांचे.
रच्याकने एकात तो देशप्रेमी आहे आणि दुस-यात देशद्रोहाचा ठपका असलेला....
पिंकी, तिकीटं बूक केलीत ना.
पिंकी, तिकीटं बूक केलीत ना. मग बिनधास्त जाऊन बघून या. आल्यावर इथे मनसोक्त शिव्या घालत परीक्षण लिहा. चित्रपट आवडला तरीदेखील लिहा. चित्र्पट पाहताना पैसा वसूल होत नाही, आपलाआपण तो वसूल करावा लागतो
तिकिटं काढलीत तर मस्तपैकी
तिकिटं काढलीत तर मस्तपैकी लेहचा निसर्ग पाहा आणि नयनसौख्य मिळवा... नाहीतरी छायाचित्रण सुंदर आहे असे लिहिलेय रसप यांनी..
यश चोप्रा आपल्या चित्रपटातली नायिका जास्तितजास्त सुंदर कशी दिसेल याची पुर्ण काळजी घेतात, त्यांची नायिका एकदातरी पांढरे कपडे घालुन एकदर चांदण्यात नाहीतर पावसात भिजते. इथे तर दोनदोन सुंद-या आहेत, त्यामुळे वेळ अगदी मस्त जाईल, काळजी नका करु.
>> कौतुक शिरोडकर | 14
>>
कौतुक शिरोडकर | 14 November, 2012 - 12:01 नवीन
एवढं लिहूनच्या लिहून वर रेटींगमधे एक 'स्टार' दिल्याबद्दल रसप यांचा जाहीर णिशेद !
<<
अहो, नीट पहा.
तो निगेटिव्ह स्टार आहे.
रेटिंग - *
दक्षिणा, >> याला नार्सिझम असं
दक्षिणा,
>> याला नार्सिझम असं म्हणतात
ते नार्सिसिझम आहे. चूभूदेघे!
पण श्यारूक करतो त्याला सेल्फ इमेज नर्सिझम (self image nursism) म्हणता येईल!
आ.न.,
-गा.पै.
नंदिनीजी , ते मी उदाहरण
नंदिनीजी , ते मी उदाहरण म्हणून दिले होते त्यात तुम्हाला सलमान बद्दल काही वाटले असेल तर ते चुकीचे आहे , पण तरीही खरोखरचा टायगर आणी त्यातला टायगर यात जमीन अस्मानाचा फरक आहेच की
आणी शाहरूख खान च्या चुकांबद्दल बोलू नये असही मी म्हणत नाही , त्याच्या लिमिटेशन्स मान्य आहेतच . मला स्वतःलाही "राज" फारसा आवडत नाहीच , मला तो आवडला डर , कभि हां , बाजीगर मधेच . नंतर स्वदेस , वीर झारा , चक दे मधे . अॅक्शन हा त्याचा प्रांत नाहीच हेही तितकच खर . पण मी स्वतः काल जब तक पाहिला , त्यात त्याचा बर्याच दिवसानी Honest Effort आवडला इतकच .
मी पुन्हा तेच म्हणतोय , या चित्रपटात त्याने बकवास अभिनय केलाय , तो चित्रापट रद्द्ड आहे अस म्हणण १००% बरोबर आहे . पण यात सारूख आहे , मग तो रद्दडच आहे हे मला पटत नाही एवढच .
बघणार नव्हतोच.. पण परिक्षण
बघणार नव्हतोच.. पण परिक्षण छान लिहिले आहे. बॉम्ब डिफ्युझल कशाशी खातात यावर हर्ट लॉकर बघावा.
चित्रपटात शाहरुख असल्याने
चित्रपटात शाहरुख असल्याने रिव्हु वाचल्याशिवय जाय्चे नाही असे आधीच ठरवले होते. सगळीकडचे रिव्यु वाचल्यावर जायची गरज नाही हे पक्के झाले.>>>>>साधना +१
गापै, आरसा आहे का
गापै,
आरसा आहे का तुमच्याकडे?
हे वाक्य वाचा तुमचे :
>>पण श्यारूक करतो त्याला सेल्फ इमेज नर्सिझम (self image nursism) म्हणता येईल! हाहा<<
लोकांच्या चुका काढायच्या नादात मराठीत नार्सिसिझम अन विन्ग्रजीत 'नर्सिझम' केलं आहे तुम्ही. दोन चुका
उगा आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला अशी म्हण आठवली
इब्लिस, एका रेघेत आडवं केलंत.
इब्लिस, एका रेघेत आडवं केलंत.
फारच भारी परिक्षण!
फारच भारी परिक्षण!
कौतुक ते गापै आहेत. मला
कौतुक
ते गापै आहेत. मला नर्सिझम्च म्हणायचं होतं. he is nursing his image इ. म्हणतील लवकरच
(पैलवान लोकं आरशासमोर हुबं र्हाऊन मुक्या घंटा का हलवतात हो? पूर्वी मुद्गलं फिरवताना आरसे न्हवते म्हणे)
टीप : मुकी घंटा = डम्ब बेल.
इब्लिस, माझा प्रतिसाद '-' या
इब्लिस, माझा प्रतिसाद '-' या रेघेबद्दल होता.
हाट तिच्या! असो. धन्यवाद
हाट तिच्या! असो. धन्यवाद कौतुकभाऊ! कायेना, आम्हाला जळीस्थळीकाष्टीपाषाणी फकस्त पैल्वान दिस्तात;)
जबरी परीक्षण! एकदम भारी
जबरी परीक्षण! एकदम भारी लिहीले आहे
>>फक्त शाहरूख आहे म्ह्णून नाव
>>फक्त शाहरूख आहे म्ह्णून नाव ठेवू नयेत<<
मी तसं करत नाही हो खरंच. कुठलाच आकस नाही.
रसप, ..मग सिनेमात शारुख म्येला म्हणून १ स्टार दिलाय त्याचं कांय?????
हा पिक्चर काढल्याबद्दल त्या सगळ्या टीमचे आभार ... त्यामुळे आम्हांला रसप यांचे फटकेबाझ परीक्षण वाचायला मिळाले.
स्वदेस आणि चक दे सोडून त्याचा
स्वदेस आणि चक दे सोडून त्याचा एखाद दुसरा सिनेमा पाहिलाय. हा पाहण्याची गरज नाही हे लक्षात आणून दिल्याबद्दल लेखकाचे आभार. वेळ वाचवलात.
हाहाहा जबरदस्त परीक्षण !
हाहाहा जबरदस्त परीक्षण ! बकरयाच्या (शारुक) चित्रपटाचे एवढे मार्मिक परीक्षण लिहिण्यासाठी तो तुम्हाला बघावा लागला याच दु:ख वाटतय :)....
असो आपल्याला सल्लुचे सिनेमे आवडतात.....काही अति शहाणपणा नाही....ओव्हर अॅक्टींग नाही, सेल्फप्रोक्लेम नंबर १ पणा नाही, शारुकसारखा हिरोईनशी अंगलटपणा नाही.....ओव्हर रोमँटीकपणा काही नाही....फक्त स्टाईल, पंचलाईन डयलॉग्स आणि टीपीकल बॉलीवुड मसाला आणि अॅक्शन, प्युअर एंटरटेन्मेंट बस्स.........निदान पैसा तरी वसुल होतो.......
काल मी माझ्या आयुष्यातील
काल मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचुक केली.....
पैसे देउन 'जब तक है जान' बघितला... या चुकीबद्दल क्षमा काय?.....
या चुकीबद्दल क्षमा
या चुकीबद्दल क्षमा काय?.....>>> क्षमा नाही रे गिरी 'प्रायश्चित्त' म्हण. आता प्रायश्चित्त म्हणून तूही परिक्षण लिही
मला शहारुख पेक्षा आमिर आणि सलमान आवडतात. आमिर अॅक्टिंगसाठी आणि सलमान लुक्स आणि बिन्धास्त वावरासाठी.
अश्विनी.. अजुनही कालच्या
अश्विनी.. अजुनही कालच्या 'आफ्टरशॉक' मधुन बाहेर पडलेलो नाही... परिक्षण काय लिहीणार, कप्पाळ....:-(
त्यापेक्षा इकडे दिवाळी गटगला
त्यापेक्षा इकडे दिवाळी गटगला यायचे कष्ट परवडले असते तुला
पण यात सारूख आहे , मग तो
पण यात सारूख आहे , मग तो रद्दडच आहे हे मला पटत नाही एवढच .<< ही वेळ खरंच त्याने स्वतःवर आणली आहे हे माझे मत. कुछ कुछ होता है, दिल तो पागल है नंतर त्याने खरंच थोड्या वयाला साजेल अशा भूमिका जास्त केल्या असत्या आणि त्याच भूमिकांबद्दल बोलत राहिला असता तर कदाचित असं कुणी म्हटलं नसतं. (उदा. स्वदेस, चकदे) शाहरूख म्हटलं की डोळ्यासमोर "राज" येतो हे खरंच त्याचं दुर्दैव. असो.
हा चित्र्पट लवकरच सोनी अथवा सेट मॅक्सवर येइल तेव्हा पाहण्यात येइल. आमच्या गावामधे हा सिनेमा रीलीज झालेला नाही.
शेवटी शाहरूखला कोण मिळणार
शेवटी शाहरूखला कोण मिळणार यावर मी बहिणीशी (पिच्चर बघायला न जाताच) पैज लावली होती. हरलो ती पैज!
आनंदयात्री, मग आज भाउबीजेचा
आनंदयात्री, मग आज भाउबीजेचा चांगलाच चुना लागणार तुला... भाऊबीज (ही हक्काची आणि प्रेमाची) + पैज (हा पायावर धोंडा).
चला आता फिल्मफेअर पुरस्कारावर
चला आता फिल्मफेअर पुरस्कारावर या चित्रपटाचे शिक्कामोर्तब झाले (दिवाळी/डिसेंबरअखेर दरम्यान शाहरुखचा/करण जोहरचा एखादा चित्रपट येणार आणि फिल्मफेअर पुरस्कार घेऊन जाणार हे आता समीकरणच झालंय. )
Best Actor - शाहरूख खान
Best Actress - कतरीना कैफ
Best Actor in supporting role (Female) - अनुष्का शर्मा
Best Director - यश चोप्रा
Best Music Director - ए.आर.रहमान
Best Lyricist - गुलजार
कारण .........................................कारण आपण मूर्ख आहोत.:फिदी:
(रच्याकने, हा चित्रपट खास "यश चोप्रांचा" आहे म्हणुन बघणार होतो, पण आता नाही. :-))
जिप्सी, काळजी कशाला? दबंगसाठी
जिप्सी, काळजी कशाला? दबंगसाठी सलमान्ला अॅवॉर्ड द्यायच्या आधी "स्पेशल अॅक्टर्स अॅवॉर्ड" असे पारितोषिक शाहरूखला माय नेम इज खानसाठी दिलंच होतं की...
Pages