मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.
सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.
अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.
त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.
वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.
आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.
रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!
रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html
लम्बु को बीच मे मत लाओ.>>>
लम्बु को बीच मे मत लाओ.>>> झकासा, धन्यवाद
लंडन मध्ये वाढलेली मुलगी खूपच
लंडन मध्ये वाढलेली मुलगी खूपच अंधश्रधाळू दाखवलीय...
अंधश्रद्धाळू असणे हा मनाचा कमकुवतपणा. ठिकाणाचे काय घेऊन बसलाय त्यात? लंडनच्या बाजुच्याच आयरलँडमधल्या अंधश्रद्धाळूंमुळे प्रत्यक्षातल्या एका बाईचा जीव गेला.
(No subject)
अभिजीत........अति करतोय असे
अभिजीत........अति करतोय असे नाही वाटत..?
.
.
मी फोटो टाकले तर सलमान लाजेने.... आत्महत्या करेल.... :हाहा:.
.
.
भाउबीज ला कतरीना सलमान ला ओवाळायला गेलेली म्हणे...
पार आडवे केले. अग्ग बाबो!
पार आडवे केले.
अग्ग बाबो! धागा पार डबल शेंचुरीकडे चाल्ला का काय? ( हे वाक्य गाढवाचे लग्न या चित्रपटातील मकरंद अनासपुरेच्या आवाजात ऐकावे).:फिदी:
अमिताभला इथे आणुच नका. टिल्ल्या ( शेरुक) अमिताभच्या शारीरीक काय अभिनयाच्या पण उंचीला पोहोचु शकणार नाही.:फिदी:
अमिताभ माज करतो हे म्हणणेच अती हास्यास्पद आहे. नाहीतर केबिसी ला परत त्यालाच बोलावण्याची गरज भासलीच नसती. विद्या विनयेन शोभते. मान्य करा अथवा नका करु, पण अमिताभ ऑल टाईम ग्रेट होता आणी राहीलच. काही वर्षापूर्वीच शेरुख भाव कुठल्याश्या शुटिंगला परदेशात जाताना सहारावर थांबले होते. त्याच वेळी अमिताभ दुसरे काम संपवुन मुंबईत परतला. त्याला तिथे ( सहारा एअरपोर्ट ) बघायला गर्दी लोटली. तुमचे शेरुक भावला तिथ कुणी भाव बी नाय दिला.:अरेरे:
ऑलंपीक ज्योत साठी सुद्धा अमिताभलाच बोलावले. तवा अमिताभचा माज काढु नगा. जेणो काम तेणो थाय, दुजा करे सो गोता खाय. ( कश्शाला डॉन चा रिमेक काढला? फुसकी लवंगी मिर्ची).:खोखो:
टुनटुनजी , एखाद्या विषयातली
टुनटुनजी ,
एखाद्या विषयातली काहीही माहिती नसतना उगाच एखाद्याच्या एखाद्या वाक्याचा कारण नसताना विपर्यास करून काड्या टाकू नका हो . धार्मिक आणी सामाजिक बीबी भरलेत माबो वर , तिकडे गरज आहे तुमची
सही...हाणलीत........ . .केदार
सही...हाणलीत........
.
.केदार.....
.
.
अव केदार भाव जरा आधीची वाक्ये
अव केदार भाव जरा आधीची वाक्ये वाचायचे कष्ट घ्या की जरा. अमिताभ माज करतो असे एका शेरुक पंख्याने इथेच म्हंटले आहे, त्या वाक्याला उद्देशुन माझी ही पोस्ट आहे, तुम्हाला खूप त्रास होतोय का?:फिदी:
आग जास्तच भडकली वाट्टँ.:फिदी: कैलास जीवन असेल तर लावावे. नाहीतर बरनॉल आहेच.
माझी काळजी नका करु तसे मला सामाजीक आणी पौराणिक बाफांवर जेव्हा जावेसे वाटेल तेव्हा मी जाईनच. मला त्याचा प्रवासखर्च पण नको कुणाकडुन.:फिदी:
यशराज फिल्म्सच्या अलिकडच्या
यशराज फिल्म्सच्या अलिकडच्या ब-याच चित्रपटात विस्कळीतपणा जाणवतो. वीरझारा या चित्रपटाचा विषय उत्तम होता. पण मेजरने पाकिस्तानी कन्येच्या प्रेमात पडण्याचं नाट्य कृत्रिम वाटलं. शाहरूखच्या अभिनयात कृत्रिमता आहेच, पण दिग्दर्शक आपल्या कौशल्याने त्यावर मात करत नाही हे मुहब्बते आणि के३जी मधे पण ठळक झालं होतं. के३जी मधे बाप बेट्याचे संबंध स्पष्ट होत नाहीत. मात्र दोघेही श्वासनलिकेद्वारे मोठे मोठे श्वास घेताना माईकमधे त्याचा ध्वनी येईल याची काळजी घेऊन भावनात्मक होऊ पाहतात ते सगळे प्रसंग टेलरमेड पण बेगडी झालेले आहेत. अशा ठिगळाठिगळांनी हा चित्रपट बनलेला आहे. मुहब्बते मधे तर गुरुकुल कि परंपरा हा शब्द कानी पडला कि हसूच येतं. अगदीच तकलादू आणि बेगडी संघर्ष असल्याने त्यावरचे इमले ढासळणारच. एक था टायगर सुरुवात उत्तम करतो. मात्र मध्यंतराच्या आसपास अतिशय संथ आणि कंटाळवाणा होत जातो. खूप काही चांगला नसताना जाहीरात, सलमान खान आणि ३००० च्या वर शोज या जोरावर सव्वाशे कोटी जमवून टायगर पसारही झाला. याउलट कहानीचं झालं. सुरुवातीला संथ ओपनिंग घेऊन नंतर माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर अनेक आठवडे हा चित्रपट चालला.
याच यशजींनी सिलसिला, चांदनी, लम्हे, दीवार, त्रिशूल, कभी कभी असे थेटरातून बाहेर पडल्यावरही रेंगाळणारे चित्रपट दिलेले आहेत.
के३जी धर्मा प्रॉडक्शन्सची आहे
के३जी धर्मा प्रॉडक्शन्सची आहे हो. दि:केजे
हो हो. करण जोहरचा आहे के३जी.
हो हो. करण जोहरचा आहे के३जी.
टुनटुनजी , पहिल्या
टुनटुनजी ,
पहिल्या प्रतिसादापासून मी ही चर्चा वाचतोय . तुम्हीच कशाला तरी काहीतरी बोलून नंतर पळून जाताय .
मधे तुम्ही अकारण शाहरूख पे़क्षा सलमान चांगला माणूस म्हणून मोठी पोस्ट टाकली , त्याला मी उत्तर दिल .त्यानंतर अकारण हा बीबी भरकटला ,
तुम्ही शाहरूख ने काय काम केल आहे हे विचारल त्याला उदयन यानी उत्तर दिल , तर त्याला तुमच काही उत्तर नाही .
आणी आता कुठल्या तरी वाक्यावरून अमिताभ ची बाजू घेऊन भांडताय . जस काही शाहरूख च अमिताभ ला काही म्हणालाय .
स्वप्नात तरी कुणी शाहरूखची तुलना अमिताभ शी करेल का ? माझ्या वरच्या पोस्ट्मधेही मी एके ठिकाणी अस म्हटलयच .
आणी काळजी करू नका , अस्ल्या फुटकळ गोष्टींच टेन्शन घ्यायची मला सवय नाहीये
मझ्या मते ज्याला जो आवडतो
मझ्या मते ज्याला जो आवडतो त्याचे सिनेमे त्यानी पाहावेत, आणि स्वताच्या पैश्याने पाहून मग आपलीमते ठरवावीत
तसे ही आपल्याकडे कलाकारांचे वय वाढले/लग्न झाले की आवडणारे कलाकार आवडेनासे होतात.
मला माधुरी आजही आवडते आणि ती म्हातारी झालीतरी आवडणारच हिरो मध्ये काय ठेवलंय
अमिताभ यांचा उल्लेख फक्त
अमिताभ यांचा उल्लेख फक्त नावापूरताच केला होता... जो तुमच्या सारख्यांनी विपर्यास केला...
.
.
आता विषय आलाच आहे तेव्हा सांगतो....:)
.
.
अमिताभ यांच्या पडत्या काळात..जेव्हा काम कोणीच देत नव्हते... तेव्हा...अमिताभ स्वत: यश चोप्रा यांच्या कडे काम मागण्यासाठी गेले.....
.
तिथे गेल्यावर ...शाहरूख आणि यशजी यांनी सल्लामसलत करून "मोहोब्बते" मधला रोल त्यांना दिला...जो ाआधी अमरिश पुरी यांना दिलेला....;)
.
हे स्वत: अमिताभ बच्चन यांनी सांगीतले आहे..... :हाहा:.....
केदार मी सलमान साठी कुठलिही
केदार मी सलमान साठी कुठलिही मोठी पोस्ट टाकली नाही आणी उदयन यांनी पण मला उद्देशुन काही लिहीलेले नाही किंवा मी पण उदयन यांचे नाव घेऊन काही लिहीलेले नाही, तर मग मी कुठे आणी कशी पळुन जाणार?
म्हणूनच म्हणते की आधीची वाक्ये नीट वाचा. कुठलाही कलाकार हिट व्हायला लागला की आधी त्याची तुलना अमिताभ, राजेश खन्ना वगैरेंशी व्हायला लागते, जे अनाकलनीय आहे. पण ते होतेच आणी होणार, त्याला तुम्ही आम्ही रोखु शकत नाही. शाहरुख असो की सलमान की अमिर यांची तुलना आपाअपसात आणी मिडियात होणारच.
त्यामुळे इथे माबोवर काय किंवा पेपरमध्ये काय, तुम्हाला लोकांच्या प्रतीक्रिया या चांगल्या वाईट पद्धतीच्या बघायला मिळणारच. मी जर इथे शाहरुखच्या विरोधात बोलतेय, तेव्हा मला ही कल्पना होतीच की त्याच्या बाजूने पण मते ऐकायला मिळतील.
माझ्या आधीच्या काही वाक्यातच मी म्हटलय की सलमानने जे गुन्हे केलेत् त्याबद्दल त्याला शिक्षा जरुर करा. नाहीतर बड्यांची पोरे म्हणून चुकीचे पायंडे पडतील.
माझ्या नजरेतुन शाहरुख कायमचा उतरला त्याला कारण त्याचे पाकी प्रेम.
क्रिकेटच्या एका स्पर्धेकरता हा हिरो हिरवा ड्रेस घालुन आणी हिरवा चांद ताराचा झेंडा घेऊन शारजा स्टेडियममध्ये हातवारे करत होता, पाकला सपोर्टकरता. पाकींच्या विरोधात कुणी परदेशी टीम होती.
माझे हे वरचे वाक्य इथे बाफाला धरुन नाही हे मलाही माहीत आहे, पण असे हे लोक चित्रपटात देशप्रेमाचे ढोंग करुन वर असे वागत असतील तर डोक्यात नाही जाणार नाहीतर काय?
माझी ही शेवटची पोस्ट. सुरुवात मीच केली होती एका वाक्याने , ती ही गंमतीत, पण त्याचे असे परीणाम होतील असे खरच वाटले नव्हते.
टुनटुन | 16 November, 2012 -
टुनटुन | 16 November, 2012 - 19:50
सस्मित आणी इतर अनुमोदक धन्यवाद. खरे तर शाहरुख विषयी इतकी नाराजी आधी नव्हती, जी आता निर्माण झालीय. कष्टाने असेल पण मिळालेले यश आणी प्रचंड पैसा याची हवा त्याच्या डोक्यात आणी नसानसात जी भिनलीय, ती आता जाहीरपणे दिसते. स्वतला श्रेष्ठ आणी इतराना तो कायम तुच्छ समजतो हे अनेकवेळा दिसलेय. त्यात तो क्रिकेटचा किस्सा पण आहेच.
सुरुवातीला तर ऋतिक रोशनची सुद्धा त्याने बरीच हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला होता. ( आठवा पेप्सीची जाहीरात). आणी सन ऑफ सरदार ज्या चित्रपट गृहात लागलाय, तिथेच मुद्दाम आपला जतहैजा लावण्याची दादागिरी.
सलमान आणी अमिरची जी सामाजीक बांधिलकी आहे, तशी शाहरुखची किती आहे हे कृपया शाहरुख पंख्यांनी इथे सांगावे ( माझा थोडा तरी गैरसमज दूर होईल, कारण एखादे वेळेस आपण दुसरी चांगली बाजू पण बघितलेली नसते. ). सिनेमात जर आपण प्रेमळ, न्यायी, धाडसी हिरोचे काम करतोय, तर मग प्रत्यक्ष आयुष्यात असे उर्मट आणी उद्धट आहोत हे पण शाहरुख ने मान्य करावे.
सलमानच्या काय चुका आहेत ते पण मला माहीत आहे आणी अमिरचे पण दुसरे लग्न जरा खटकलेच. पण तरीही हे दोघे त्यामानाने प्रचंड लोकप्रिय आहेत. सलमान ही काही कमी तापट नाहीये. पण शाहरुखला जर त्याच्यासमोर ठेवले तर लोक ( चित्रपट सोडुन) सलमानचेच पारडे जड ठेवतील.
आज आपण मराठी चित्रपट बघीतले तर श्वास ने जी नवी संजीवनी मराठी चित्रपट सृष्टीला दिली आणी जे नवीन उत्तम विषय हाताळले गेले ( उदा. देऊळ ) तसे हिंदीमध्ये फार कमी व्हायला लागलेय. तेच तेच अतिरेकी हल्ले, प्रेमप्रकरणे वगैरे. एखादाच बर्फीसारखा वेगळा विषय हाताळला जातो.
शाहरुख त्या राज आणी डरच्या भुमिकेतुन बाहेरच येत नाहीये. आपण अमिताभनंतर दुसरे किंवा आपण च बादशहा हा गोड गैरसमज त्याचा ज्यावेळी दूर होईल, तेव्हाच तो अमिताभ ( पा आणी इतर) अनुपम खेर (सारांश) नसिरुद्दीन शहा ( आक्रोश, स्पर्श ) कमल हसन ( पुष्पक आणी इतर बरेच ) अशा भूमिका करु शकेल.
>> टुनटुनजी ,माफ करा . या वरच्या वाकयातील टुनटुन आपण नसाल तर माझ्या गैरसमजातून मी तसे लिहिले होते .
टूनटून जी... . . जे दिसते तेच
टूनटून जी...
.
.
जे दिसते तेच खर हे मानू नका... वै. सल्ला... असेल ही बहूदा... असो...
.
.
एक उदा. देतो...
.
विश्वचषक जिंकल्यावर.. शाहरूख ने झेंडा उलटा लावून मिरवणूक काढलेली...सगळ्या पेपर मधे फोटो आले.. गुन्हा देखील दाखल झाला...
.
पण नेमके काय घडल..?
.
जेव्हा कळले झेंडा उलटा लागला घाईघाईत...त्याने लगेच काढून सुलटा केला...
.
त्याच्या या क्रूतीचे फोटो मात्र पत्रकारांनी छापले नाहीत... माझ्याकडे आहे ते फोटो...
.
.
बोला... आता... या पत्रकाराला तुम्ही काय म्हणाल.. ?
.
दोष कुणाचा...?
शाहरूख च्या फक्त दिलवाले
शाहरूख च्या फक्त दिलवाले दुल्हनिया चे कलेक्शन...एकाबाजूला आणि सलमान च्या सगळ्याच चित्रपटांचे कलेक्सन दुसर्याबाजूला....:हाहा:
पेप्सी आणि कोकचे युद्ध
पेप्सी आणि कोकचे युद्ध जगजाहीर आहे. ती अॅड ज्याने डिझाइन केली त्याने(तो शाहरूख नव्हे) ते लक्षात ठेवून केली. हृतिकला कमीपणा देण्यासाठी शारूखने डिझाइन करून घेतली हे विधान जामच विनोदी आहे.
आणी सन ऑफ सरदार ज्या चित्रपट गृहात लागलाय, तिथेच मुद्दाम आपला जतहैजा लावण्याची दादागिरी.<<<
हे डिस्ट्रीब्युटर्स, प्रॉडक्शन हाउसेस यांच्यातले युद्ध असते. एकाच दिवशी सिनेमा रिलीज होत असेल तर ही मारामारी चालतेच. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले तर एक आधी लागलाय आणि दुसरा मुद्दाम तिथे लावला हे म्हणणे हा पण विनोद.
मुळात चित्रपटाचे परिक्षण असताना त्या चित्रपटाच्या स्टारापेक्षा इतर स्टारमंडळी माणूस म्हणून लहान वा महान आहेत याचे दाखले देणे या इतके हास्यास्पद काही नाही.
माजच म्हणायचा तर लायकी नसतानाही माज करणारे या इंडस्ट्रीत ठायीठायी सापडतील. स्टारमंडळींचं काय घेऊन बसलात...
माझ्या नजरेतुन शाहरुख कायमचा
माझ्या नजरेतुन शाहरुख कायमचा उतरला त्याला कारण त्याचे पाकी प्रेम.
क्रिकेटच्या एका स्पर्धेकरता हा हिरो हिरवा ड्रेस घालुन आणी हिरवा चांद ताराचा झेंडा घेऊन शारजा स्टेडियममध्ये हातवारे करत होता, पाकला सपोर्टकरता. पाकींच्या विरोधात कुणी परदेशी टीम होती.
>>>>> मंदारने पण एका बाफवर हेच लिहीले होते.
आबासाहेब हे मंदार जोशीने नाही
आबासाहेब हे मंदार जोशीने नाही तर मीच लिहीले होते.
केदार ते पण मीच लिहीलेय,
केदार ते पण मीच लिहीलेय, गैरसमज कशाला? आणी काय वाईट लिहीले? जो अभिनेता अमिताभ आणी दिलीपकुमार यांना आदर्श मानतो, त्याने किमान स्वतचे पुढचे चित्रपट तरी त्या लायकीचे येतील असे बघायला हरकत नाही, नाही का?
आता पुढच्या पोस्टला उत्तर दिले नाही तर ती पळपुट समजा नाहीतरे काहीही वाटेल ते.
उदयन मी तुमच्या पोस्टस मनावर घेतलेल्या नाहीत. आणी तसेही मला खरच कुणाविषती वैयक्तीक आकस नाहीच. सर्वसामान्य पंख्यांमध्ये हे वाद होणारच्.:स्मितः
आबासाहेब हे मंदार जोशीने नाही
आबासाहेब हे मंदार जोशीने नाही तर मीच लिहीले होते.
>>> या नाही दुसर्या एका बाफवर. मला नक्की आठवतयं त्यानेच लिहिल होत.
जाऊ देत माझा मत मांडण्याच मूड
जाऊ देत माझा मत मांडण्याच मूड गेला या असल्या पोस्टी पाहून!
असो!
बाफ बराच भरकटलाय. मुळ मुद्दा
बाफ बराच भरकटलाय.
मुळ मुद्दा शाहरुख विरुद्ध सलमान हा नाहिये, तर जाहैतोजहै या सिनेमाचे परिक्षण हा आहे.
असो,
परिक्षण आवडले.
अमिताभला इथे आणुच नका.
अमिताभला इथे आणुच नका. टिल्ल्या ( शेरुक) अमिताभच्या शारीरीक काय अभिनयाच्या पण उंचीला पोहोचु शकणार नाही.<<
टुनटुन,
जोरदार अनुमोदन.
+ हे :
अमिताभला इथे आणुच नका. टिल्ल्या ( शेरुक) अमिताभच्या शारीरीक काय अभिनयाच्या चपलेच्या पण उंचीला पोहोचु शकणार नाही.
अरेरे.. (वरच्य पोस्टी
अरेरे.. (वरच्य पोस्टी वाचून..)
>>>
अंधश्रद्धाळू असणे हा मनाचा कमकुवतपणा. ठिकाणाचे काय घेऊन बसलाय त्या>>>><<<
साधनाताई, अहो ते उपहासाने लिवले होते... तुम्ही पण ना...
बाकी चालू द्या..
परिक्षण उत्तम. आवडले. बाकि
परिक्षण उत्तम. आवडले.
बाकि शाहरुख बद्दल काहि बोलुन मी माझी जिभ का विटाळु ? (किंवा लेखणी का विटाळु ?) त्याची तेवढीहि लायकी नाहि.
अहो मी तरी कुठे रागाने
अहो मी तरी कुठे रागाने लिहिलेय?
चूक सर्वस्वी रसप यांची आहे.
चूक सर्वस्वी रसप यांची आहे. त्यांनी 'ताण' लिहीलं म्हणून जो तो आपापल्या परीने ताणण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यामुळे काहींना फारच ताण आलेला दिसतोय.
बायदवे, अजून एक शुक्रवार गेला. यावेळेस तुम्ही सिनेमाला नाही गेलात ?
Pages