Submitted by रेव्यु on 6 November, 2012 - 03:46
आम्ही नेपाळच्या ट्रिपवर आमच्या आपण जात आहोत्-सहकुटुंब
पोखरा, जोमसोम्.मुक्तिनाथ्,लुंबिनी व काठमांडू असा ९ दिवसांचा प्लॅन आहे.
येथे पहाण्याजोग्या विशेष जागा स्थळानुसार सांगाल का? तसेच शाकाहारी खादाडी, विशेष खरेदी इ' बद्दलचे माहिती मिळेल का?
तारखा आहेत ९ ते १९ नोव्हेंबर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कधी गेलो नाहिये अजुन तरी.
कधी गेलो नाहिये अजुन तरी.
त्यामुळे जागा ठावूक नाहीत. पण मोमो नक्की हाणा.. 
मी बर्याच वर्षांपूर्वी गेलो
मी बर्याच वर्षांपूर्वी गेलो होतो. पोखरावरून एक प्लेनराईड होती जी तुम्हाला हिमालयातील शिखरांवरून फिरवून आणते. अजूनही ती असेल तर नक्की करा. महाग असेल पण आयुष्यात एकदा नक्की घ्यावा असा अनुभव आहे तो.
या सिझनमधे नेपाळ? भरपुर
या सिझनमधे नेपाळ?
भरपुर थंडी असेल अशी मनाची आणि गरम कपड्यांची तयारी करुन जा. लहान मुलं आणि वृद्ध असतील तर खरंच काळजी घ्या. आम्ही एकच दिवस घराबाहेर जाताना हिटर ऑन करुन जायला विसरलो होतो तेव्हा बेड थंङगार आणि ओले लागत होते. बाहेरही थंडीने चिक्कार त्रास व्हायचा. माझं माहेर काही वर्षांसाठी नेपाळ होतं, पण माझं लग्न झाल्यामुळे मला खुप नाही रहाता आलं. मी पण टुरिस्टसारखीच जायचे आणि १-२ आठवडे राहुन यायचे. गरीब देश आहे मात्र निसर्ग फार श्रीमंत आहे. वेकेशनसाठी खुप सुंदर ठिकाण.
* काठमांडु ते पोखरा बाय रोड ( ते ही स्वतःच्या गाडीने जाणं म्हणजे a journey through heaven).
* पोखरा - टिपिकल टुरिस्ट प्लेस. ट्रेकिंगचं शॉपिंग करायला ट्रेकर्सची खुप गर्दी असते. फॉरिनर्सने खचाखच भरलेलं असतं.
*मनकामना देवी मंदिर ( काठमांडु ते पोखरा रोडवर एका पहाडावर आहे. केबल कारने जावं लागतं. खाली मस्त नदी आहे. अॅमेझिंग स्पॉट.)
* सारंगपुर ( सनराइझ बघणं एक महान अनुभव असतो. )
*भक्तपुर ( तेच देवआनंदच्या सिनेमामधलं फेमस). लाकडाचं कोरीव काम केलेल्या वस्तु इतक्या महान सुंदर असतात. शॉपिंगसाठी वेळ आणि मजबुत बॅगमधे भरपुर जागा या दोन्हीची सोय करुनच जायचं. तिथली घरं पहाणं आणि त्यांचे फोटोज यासाठी वेगळा वेळ हवा. बाकी गंदगी आणि गर्दी आपल्यासारखीच.
* नागरकोट ( उंचावर त्यामुळे प्रचंड थंडी असते. त्यात तुम्ही नोवेंबर मधे जाताहात. अगदी भरपुर गरम कपडे न्यायलाच हवेत.)
*लुंबिनी - गौतम बुद्धाचं जन्मस्थान
* स्वस्त आणि युरोपियन मार्केटच्या प्रॉडक्टसाठी भाट-भाटिनी मॉल ( काठमांडु). एकुणात नेपाळमधे इंडियन रुपी थोडा तरी वरचढ त्यामुळे शॉपिंगला मजा यायची. त्यात इथले कपडे, कॉस्मेटिक्स परदेशातुन आलेले असतात त्यामुळे चांगली क्वालिटी आणि कम दाम.
* कॅसिनोज ( एकदा अनुभव घ्यायला जायला हरकत नाही. नेटिव्जना इथे बंदी आहे. फक्त टुरिस्टस जावु शकतात. :))
* जेवणाचं एखादं सरदारजी किंवा गुज्जुभाईचं ठिकाण सापडलं तरच नाहीतर हाल. तेव्हा तरी होते. आम्ही दुरच्या ठिकाणी जाताना घरुन टिफीन्स नेत होतो किंवा मोमोज आणि बेकरी प्रॉड्क्टस वर जगत होतो. जेवणाला टिपिकल सरसोंच्या तेलाचा वास असतो.
*बाकी हाथीबन, बोटॅनिकल गार्डन, जवळपासची म्युझियम्स बघण्यासारखी आहेतच.
माधव + १. एक हेलिकॉप्टर राइड
माधव + १. एक हेलिकॉप्टर राइड असते. मी एकदा उशीर झाल्यामुळे आणि एकदा मेडिकल रिझनमुळे मिस केली होती. पैसे भरपुर, पण जन्मभराचा सुंदर अनुभव असतो.
अहो नेपाळ ला कुठे जाता आहात
अहो नेपाळ ला कुठे जाता आहात आत्ता. हाल होतील.
काठमांडु अजीबात बघण्या सारखे नाही. अतिशय बकाल आहे.
पण जाता च आहात तर विमानातुन everest शिखर दाखवतात ते बघा.
कधी गेलो नाहिये अजुन तरी
कधी गेलो नाहिये अजुन तरी >>>>>>>>सेना तिथे समुद्र नाही आहे......तु कसा जाणार मग
उदय.. मी फिरायलाही जातो..
उदय.. मी फिरायलाही जातो..
मनी.. मस्त माहिती. नोंद घेउन
मनी.. मस्त माहिती. नोंद घेउन ठेवली आहे.
मनिमाऊ, मस्त माहिती... सहलीला
मनिमाऊ, मस्त माहिती... सहलीला जाताय... या बीबीवर पण ठेवायला हवी.
मनी माऊ फार मस्त माहिती.
मनी माऊ फार मस्त माहिती. थ>न्डीला घाबरत नाही कारण २२ वर्षे हिमाचलमध्ये काढलीत, एव्हरेस्ट फ्लाईट करणार आहे, बरोबर वृध्द नाहीत तसेच आम्ही एका मित्राच्या घरी उतरत आहोत. काठमान्डूला दिवस आहे. जोम्सोम -मुक्तिनाथ मुळीच टूरीस्ट् प्लेस नाही असे ऐकले.पोखरा -जोमसोम देखील विमानाने जात आहोत्.मनीमाऊ आणखी माहिती द्याल का? अथवा वि पू मध्ये कळवा
मनीमाऊ मस्त माहिती. >>कारण २२
मनीमाऊ मस्त माहिती.
>>कारण २२ वर्षे हिमाचलमध्ये काढलीत >> वॉव! लकी!
मनिमाऊ... मस्त माहिती. नेपाळ
मनिमाऊ... मस्त माहिती.
नेपाळ मधे एन्ट्री करायला इंडियन्स ना व्हिसा लागत नाही हे माहिती आहे. पण पासपोर्ट आवश्यक आहे का? की भारतिय नागरीकत्वाचा फोटो असलेला कुठलाही पुरावा चालतो? (ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, वोटर कार्ड इ.)
ड्रायव्हिंग लायसन्स आनि वोटर
ड्रायव्हिंग लायसन्स आनि वोटर कार्ड चालते.
पॅन कार्ड चालनार नाहि.
हो शागं, बरोबर. विजा &
हो शागं, बरोबर. विजा & पासपोर्टचीही आवश्यकता नाही. पण Govt. फोटो आयडी हवा. (ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, वोटर कार्ड इ.)
व्हिसा लागत नसल्याने भारतीयांना नेपाळमधे इझी अॅक्सेस आहे. त्या संदर्भात कळालेली माहिती -
मी कसिनोजला ज्या काही भेटी दिल्या, तेव्हाचं निरिक्षण असं कि तो हॉल जेवढे फॉरिनर्स तेवढेच, किंवा जास्तच (श्रीमंत फॅशनेबल) भारतीयांनीच भरलेला असतो. नेपाळी जनतेला तिथे प्रवेश बंदी होती ( कि अजुनही आहे ?)
आई मुंबईहुन नेपाळ एअरपोर्टवर उतरली. तिला एक वेल ड्रेस्ड, डिसेंट दिसणारी आणि बोलणारी बाई भेटली. तिने सांगितलं कि तिची मनीपर्स हरवली आहे आणि तिला तिकिट काढुन दिलं तर ती पैसे परत पाठवेल. तिने नेपाळ ट्रीपबद्दल काही कारणाने घरी कळवलं नसल्यामुळे तिला घरुन पैसे मागवता येत नाहीत. एक तर आईचं ह्रुदय ;), त्यात भारताबाहेर भेटलेल्या अडचणीत सापडलेल्या भारतीयाचा कळवळा, तीही स्त्री आणि तिची पर्सनॅलिटी हे बघुन आईने इनोसंटली तिकीट घेवुन दिलं. ती फसलीही नाही. तिला ते पुर्ण पैसे परत मिळाले. तेव्हा आम्हाला आमच्या एअरपोर्टवरच्या फॅमिली फ्रेंड - अंकलने सांगितलं कि कदाचित ही बाई जेन्युइन प्रॉब्लेम मधे असेल किंवा मग टिपिकल विकेंड गॅम्बलर असेल. त्यांच्याकडुन कळालेल्या माहितीप्रमाणे - आपल्याकडुन बरेच भारतीय लोक गॅम्बलिंगसाठी नेपाळला जातात. तिथे प्रत्येक विकेंडला कॅसिनोज मधे पडिक असणारे काही भारतीय आहेत. त्यांचं व्यसन इतकं टोकाचं असतं कि ते स्वतःचं परत येण्याचं तिकिट किंवा तेवढे पैसे ओळखीच्या एअरपोर्ट अधिकार्याकडे ठेवुन जातात. म्हणजे हरल्यावर कमीत कमी भारतात जाण्याची तरी सोय असावी.
नोट - एअरपोर्टवरची भारतीय गॅम्बलर्सची माहिती बडबड्या अंकलकडुन ऐकली आहे. खखोदेजा:)
रेव्यु, तुम्ही एवढी वर्षं
रेव्यु, तुम्ही एवढी वर्षं हिमाचलमधे राहिलात? लकी ! मीपण आता त्याच्याच जवळपास ट्रीपला जाते आहे
मला माहित असलेली बरीच माहिती दिली आहे. माझं घर जरी असलं तरी मी टुरिस्ट म्हणुनच जायचे, त्यामुळे फार नकाशे पत्ते नाही सांगता येणार.
तुम्हाला काही स्पेसिफिक विचारायचं असेल तर मी घरी विचारुन सांगेन.
प्रसादने लिहिल्याप्रमाणे काठमांडु बघण्यासारखे नसेल, पण आजुबाजुला चिक्कार बघण्यासारख्या गोष्टी आहेत. गरीब देश आहे, पण निसर्ग खुप सुंदर आहे. कांठमांडु-पोखरा रोडवरच्या काही स्पॉटसला गेलं कि कळतं कि हिमालयात विरक्ती का येते आणि साधु-संन्यासी सगळे मोह सोडुन हिमालयात कसे रहातात? तिथेच राहुन जावंसं वाटतं.
-
-
संपूर्ण वृत्तांत २ ३ भागात
संपूर्ण वृत्तांत २ ३ भागात देत आहे
,
,
रेव्युजी. कशी झाली ट्रीप?
रेव्युजी. कशी झाली ट्रीप?
तारखा चुकीच्या आल्या
तारखा चुकीच्या आल्या अहेत्-दुर्लक्ष करावे
..
..
भारी फोटो आहेत, तुमच्या
भारी फोटो आहेत, तुमच्या ट्रिपमधल्या काही अनुभवांबद्दलही वाचायला आवडेलच.
आणखी फोटो व मजकूर रात्री टाकत
आणखी फोटो व मजकूर रात्री टाकत आहे
यातले एव्हरेस्ट कुठले - ते
यातले एव्हरेस्ट कुठले - ते अगदी ठळकपणे सांगा बरं.....
अद्भुतरम्य नेपाळ माझ्या
अद्भुतरम्य नेपाळ
माझ्या मन:पटलात नेपाळचे चित्र हे फ़ार थोड्या रेघांनी काढले गेले होते. काठमांडू म्हणजे गिचमिड अन घाणेरड्या रेषा अन त्याव्यतिरिक्त काही प्रश्नचिह्ने व पर्वतराईंच्या रेषा असे काही तरी ते चित्र होते. या मुळे शिशिर (माझा तिथला मराठी मित्र) बर्यायच दिवसांपासून बोलावत होता अन माझ्या मनात त्याला भेटण्याची उत्सुकता, त्याने बनवलेल्या नवीन वाईन्स चाखणे आणि एकंदरीत अकरा वर्षांनंतर पुनर्मिलनाचा आनंद अनुभवणे एवढाच हेतू होता. शिशिरची व माझी जुनी मैत्री, तो आणि मी एकत्र उत्तरांचलमध्ये होतो. आवडीनिवडी सारख्या होत्या. तो तेव्हा सैन्यात खूप मोठ्या हुद्द्यावरील डॊक्टर होता. सुविद्य पत्नी आणि लाघवी मुलगी यांच्याशी आमच्या तारा उत्तम जुळल्या होत्या. उत्स्फुर्त भेटी, डोंगरात हिंडणे, एकत्र मराठी सण साजरे करणे अशा केलेल्या अनेक गोष्टींची पोतडी त्याला इतक्या कालावधीनंतर भेटल्यावर उघडणार होती.

शिशिर पोखर्या ला सैन्यातून स्वेच्छानिवृत्तीनंतर मणिपाल मेडिकल कलेज(कॉलेज नव्हे) मध्ये /नेपाळीत ऑ नाही – मायक्रोबायॉलोजी विभागात प्राध्यापक व हेड अफ द डिपार्टमेंट आहे.त्याने मला जो कार्यक्रम पाठवला होता तो मिनी स्कर्टच्या वाह्यात व्याख्येसारखा होता, लॉंग इनफ टू कव्हर द ऑब्जेक्ट एन्ड शॉर्ट इनफ टू अरौज द क्युरियॉसिटी असा तो होता.तो म्ह्णजे- काठमांडू ते पोखरा सीनिक ड्राईव्ह , किंवा पोखरामध्ये सान्स्कृतिक सायंकाळ , पोखरा ते जोमसोम विमानाने अशा प्रकारचा होता. त्यामुळे कार्यक्रमावरून तरी आपल्याला वेगळे असे काय पहावयास मिळणार आहे हे बासनातच होते.
बरे मी नेटवर सर्च केले तर तिथे गिर्यारोहण करण्यांची झुम्बड होती. त्यांना ती माउंटन गेअर पोखर्यातहून न्यावे लागते एवढे कळले. याशिवाय अन्नपूर्णा सर्किटची सुरुवात तेथूनच होते हे देखील कळले. पण माझ्या सारख्या १०० किलोच्या ऐवजाला त्या माहितीचा फारसा फायदा नव्हता. त्या वाटेवर मी तरी ट्रेकिंग वा पर्वतारोहणाची मोहिम, जी तरुणपणी सुध्दा कधी घेण्याचा विचार केला नव्हता –तो साठीनंतर घेण्याचा तर मुळीच बेत नव्हता. आणि म्हणून शिशिर व कुटुंबियांना भेटणे व एकत्र दिवाळी साजरी करणे ही सर्वात प्रेक्षणीय घटना गृहित धरून आम्ही नेपाळला जाण्याचे ठरवले.
आठ नव्हेंबरला दुपारी ३ वाजता काठमाण्डूच्या विमातळावर उतरलो.आपल्याला विमानतळाच्या सरळ बाहेर पडता येईल या गोड गैरसमजाला पहिला झटका बसला. विमानातून उतरल्यावर , ’वेल्कम टू द लॅंड ऑफ़ टॉलेस्ट माऊन्टन अॅवन्ड शॉर्टेस्ट मॅन ऑन अर्थ” अशा पाटीने स्वागत झाले आणि त्याबरोबरच “इन नेपाळ थिंग्ज डू हॅपन बट दे डू अॅ ट देर ओन पेस,गेट युज्ड टू इट” असा इशारा देणार्या आणि नंतर पदोपदी प्रचिती आणून देणार्या“ पाट्याही वाचण्यात आल्या.
काठमान्डू विमानतळ एका बसक्या इमारतीत वसले आहे. बराच सावळागोंधळ आहे पण त्रासदायक नाही, जाचक नाही.
इमिग्रेशन व कस्टमचा सावळागोंधळ उरकेपर्यंत तास गेला आणि बाहेर पडलो. बाहेर अधिकारी – आडनावाचा ड्रायव्हर सेंट्रो घेवून उभा होता. सदैव सुहास्य करणारा आणि मदत करायला तत्पर असा हा इसम पाहून खूप छान वाटले.
अरे हो! दिल्ली ते काठमांडू प्रवासात विमानातून हिमालयाच्या शिखरांचे दर्शन झाले. केवढी मोठी श्रेणी आहे ही. डोळ्याचे पारणे फिटले. त्याचे काही फोटो.
(No subject)
(No subject)
काठमांडू प्रथमदर्शनी
काठमांडू प्रथमदर्शनी कोणत्याही प्रकारची शिस्त नसलेले, स्वत:ची ओळख हरवून बसलेल्या अन आधुनिकतेच्या आणिमिडियाच्या मार्यामखाली आपले शिर गमावून बसलेल्या कोणत्याही महानगरासारखे होते. बेशिस्त रहदारी, जागोजागी खाचखळगे असलेले रस्ते, कचर्यारचे ढीग अन सिनेमाची, नवीन बांधण्यात येणार्याि उत्तुंग इमारतींची जाहिरात करणारी होर्डिंग्ज यानी मला भांबावून टाकले. पण दूरवर अन उंचावर हिमशिखरे दिसत होती अन साद घालत होती. आणखी एक जाणवण्यासारखी बाब म्हणजे असंख्य दुकाने मास विकत होती आणि दुसरे म्हणजे चहाच्या, किराण्याच्या अन जेवणाच्या टपर्या वर देखील दारू विक्रीला ठेवली होती. आमचा सारथी या जनकल्लोळात वाहन पुढे दामटत होता आणि बरोबर तोंडाचा पट्टा ही चालू होता. इंग्रजी आणि हिंदी बरेच चांगला बोलत होता. वाटेत लागणार्याु स्थळांची माहिती देत होता. अन वाटेतील अनेकांना शिव्याची लाखोली देखील वाहत होता
पंचवीस एक किलोमीटर्सचा प्रवास
ह्ळू हळू संध्याकाळ होवू लागली अन थंडी वाढू लागली.खिडकीच्या काचा वर गेल्या. बाजूचे पहाड गूढ दिसू लागले. डोंगराच्या उतरंडीवर असलेल्या घरांत दिवे मिणमिणत होते. मधेच लहान गावे लागायची. रस्त्यावर दिवे कुठेच नव्हते. आणि घरात सुध्दा अगदी झिरो पॉवरचे दिवे त्यामुळे अशी एक उदासी वाटत होती पण मग मनात वाटले हा माझ्या शहरीपणाचा प्रभाव आहे. मंद प्रकाश, संथ जीवनशैली आणि मुंगीच्या पावलाने पुढे जाणारा वेळ हा एका बड्या ख्यालासारखा असतो , त्याची सवय व्हावी लागते. झगझगाटाची सवय असलेले आपण याची लज्जत अनुभवू शकत नाही.दिवाळी आणखी तीन चार दिवसांवर असल्याने आकाशात चंद्र नव्हता आणि तारे लुकलुकायला सुरुवात झाली होती. मधेच नेपाळी गाण्यांचे सूर बासरीवरून ऐकायला यायचे.वाटेत एका टपरीवजा हॉटेलात थांबून चहा घेतला- उत्तम चहा आणि मग एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, दुकानदार मोठ्या अगत्याने विचारपूस करत होता पण त्याच्या वागणूकीत लाचारी नव्हती. ते दुकान त्याच्या घरातच होते अन आधी लिहिल्याप्रमाणे दारूच्या बाटल्या सुध्दा बिस्किटे, चिप्स, चॉकलेटे याबरोबर सजवल्या होत्या. माझ्या ससंपूर्ण वास्तव्यात ही अगत्याची भावना व आत्मसन्मान व बरोबरीची जाणीव मला फार भावली –आवडली.
असो – आता पोखरा जवळ येवू लागले. तसतसा शिशिर अन कुटुंबियांना भेटण्याचा अधीरपणा वाढत होता. गावात प्रवेश झाला पण गाव जवळ जवळ अंधारातच होते. दुकानात कुठेही झगझगाट नाही, एखादा बल्ब हवा तेवढाच प्रकाश द्यायचा व त्यात व्यवहार चालले होते . बाकी सर्व काही शांत शांत.
शेवटी ७-३० वाजता घरी पोहोचलो. शिशिर, मंजू जी आणि मोनीशा वाटच पहात होते. मोठ्या आनंदात गप्पा रंगल्या.जीवाभावाचे मित्र इतक्या दिवसांनी भेटत होतो. रात्रीचे १२ केव्हा वाजले कळलेच नाही. जाड रजईत गुरफटून घेत झोपी गेलो अन जाग आली ती खोलीत प्रवेश करणार्यां सोनेरी किरणांनी.कॉफी झाली अन मग गच्चीवर गेलो अन जे हिमालयाचे दर्शन झाले ते वर्णावयास माझ्याकडे शब्द नाहीत. गच्चीवरून मत्स्येपुच्च –म्हणजे माशाचे शेपूट असलेली शिखरे दिसत होती. लगेच बाजूच्या घरातील बाईंनी अगत्याने आमची विचारपूस केली- खूप छान वाटले ( अशी सवय नाही हल्ली !) मग खाली आलो अन बाग पाहिली
जिवलगांबरोबरचे सुखावणारे क्षण
नाष्टा झाला अन सकाळी अकराच्या सुमारास इंटरनॅशनल माऊंटन म्युजियम पहायला गेलो. फारच उद्बोधक आणि सुंदर असे हे म्य़ुजियम आहे. गिर्यारोहणासाठी लागणारी सर्व औजारे, पोषाख , आजवरचा इतिहास, निराशेचे क्षण, मानवी जातीची दुर्दम्य इच्छा शक्ती यांचे हे म्युजियम हे यथार्थ चित्रण आहे. यात एव्हरेस्टच्या वाटेवर केलेल्या स्वच्छता मोहिमेत जमा झालेला कचरा, फाटलेले तंबू, प्राणवायूचे मुखवटे आणि छोटेछोटे स्टोव्ह एक वेगळी कहाणी सांगून जातात. बर्फाने गोठून गळू लागलेली बोटे पण तरीही गिर्यारोहण चालू ठेवलेल्या संख्य गिर्यारोहकांची चित्रे अन कहाण्या ऐकल्यावर नतमस्तक झालो नाही तरच नवल
एकंदरीत हे खूप उद्बोधक आणि खूप संशोधनानंतर प्रस्थापित केलेले म्य़ुजियम आहे.
झुलता पूल
दुपारी घरी पोहोचलो अन पोटपूजा झाली. डुलकी मारली आणि पोखरा येथील झुलता पूल पहायला गेलो. तसे पाहू गेलो तर या पूलांचे नाविन्य आपल्या सारख्या पठारी प्रदेशातील लोकांनाच आहे. असे पूल तर नेपाळी लोकांना-किंबहुना सर्वच पहाडी लोकांना सवयीचे आणि नित्याच्या गरजेचे. विस्तिर्ण पात्रे आणि दोन्ही बाजूस वसलेल्या डोंगरांमुळे प्रत्येक खेड्यास पक्क्या पुलाने जोडणे ही खूप खर्चाची बाब आहे व अशक्य ही आहे. पण जेव्हा कुणी आजारी असते वा आपत्काल असतो तेव्हा या पूलावरून सर्व रहदारी आणि रोग्याला पाठीवरून नेणे ही एकच शक्यता उरते. या भागात राहाणार्याी लोकांच्या समस्या पाहिले की वाईट वाटते पण मग त्यांचा सदोदित हसतमुख स्वभाव पाहिला की मात्र आपण अंतर्मुख होतो.
हा पूल एक टुरिस्ट आकर्षण बनला आहे.
पोखरा विमानतळावरून एव्हरेस्ट माउंटेन फ़्लाईट अशी विमानेसुध्दा उडतात.
पोखरा विमानतळ
हा भाग सोडला तर विमान एकदा आकाशात स्वार झाले की निसर्गाची, पर्वतांची आणि जमिनीवरील दृष्ये दिसतात ती पाहिल्यावर डोळे निवतात आणि निसर्गाच्या मनमोहकपणाचा, सौंदर्याचा, विक्राळपणाचा अन अनेक छटांचा जो कॅनव्हास दिसतो त्यापुढे आपण किती नगण्य आहोत ते कळते. जर आपली सीट कॉकपीट्च्या मागेच असेल ( माझी होती) तर मग आणखीनच चित्तथरारक दृष्ये दिसतात.
रेव्यु, छान लिहिताय. स्वतंत्र
रेव्यु, छान लिहिताय. स्वतंत्र बाफवर सलगपणे लिहा ना प्लीज.
Pages