Submitted by अ. अ. जोशी on 5 November, 2012 - 09:35
जे कधीच नव्हते माझे, आले कळल्यावरती
बघ, झालो होतो सर्वांचा मी जळल्यावरती
हे जीवन म्हणजे नुसती शोभा नाही काही
हे कळेल केंव्हा? सारी गात्रे गळल्यावरती ?
दु:ख कुणाला होते तर होतो आनंद कुणा
बघ, ताव मारला जातो वड्यांस तळल्यावरती
वंशज एकदिलाने वावरले समोर माझ्या
अन वाटे पडले पाय जरासे वळल्यावरती
कुणी एवढे दु:ख कशाला सहन करावे ? का?
समजेल तुलाही 'अजय' स्वतःला छळल्यावरती
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहीलीये!
छान लिहीलीये!
छान आहे. >>बघ, ताव मारला जातो
छान आहे.
>>बघ, ताव मारला जातो वड्यांस तळल्यावरती
धन्यवाद! महेश, आता वडा कुठला
धन्यवाद!
महेश,
आता वडा कुठला विचारू नकोस...