Submitted by रीया on 4 November, 2012 - 06:01
मला डेटावेअरहाऊसिंगबद्दल माहिती हवी आहे. अगदी बेसिक पासून सर्वच!
नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे, कोणती पुस्तके, वेबसाईट्स रेफेर करावी ईत्यादी.
नव्या प्रोजेक्ट मध्ये डेटावेअरहाऊसिंगवर काम असून माझं या बाबत ज्ञान अगदी शुन्य आहे.
काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट टाळता येणार नाही.
प्लिज गाईड करा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नव्या प्रोजेक्ट मध्ये
नव्या प्रोजेक्ट मध्ये डेटावेअरहाऊसिंगवर काम असून माझं या बाबत ज्ञान अगदी शुन्य आहे.>>>>>
तरीही काम असाईन केलं गेलं ? तुम्हीही स्विकारलंत ?
तुम्हाला कोर्स करण्याची गरज आहे असं वाटतं. गूगल सर्च दिल्यावर माहिती मिळाली नाही का ?
गुगल कर.. अगदी भरपूर माहिती
गुगल कर.. अगदी भरपूर माहिती उपलब्ध आहे.. आधीचे जावा वगैरे वरचे प्रोजेक्ट्स असतील तर हे सुरुवातीला बोर वाटेल.. डेटा वेअरहाऊसिंगकडे वेगळ्या चष्म्यातून पहावं लागतं तरच ते आवडतं.
Riya… I am surprised….तु
Riya… I am surprised….तु यासाठी वेगळा धागा काढलास???
आपल्यासाठी गुगल म्हणजे जादुची पोतडी आहे ... अपचन होईल इतक मटेरियल अॅव्हेलेबल आहे नेट वर
गुगल वर शोधल्यास अनेक साईट्स
गुगल वर शोधल्यास अनेक साईट्स मिळतील. उदा. 1keydata , स्लाईडशेअर वरील काही डॉक्युमेंट्स
Kimball ची पुस्तके वाचल्यास निश्चितच उपयोग होईल. मी तर म्हणेन असाईनमेंट चालु होण्याच्या अगोदर संपुर्ण वाचुन काढाच.
प्रोजेक्टमधे तुमचा काय रोल आहे त्यावर इतर संदर्भ सुचवता येईल.
The Data Warehouse Lifecycle Toolkit
The Data Warehouse Toolkit: The Complete Guide to Dimensional Modeling
शुभेच्छा!
चचा येस तरी असाईन केलं आणि
चचा
येस तरी असाईन केलं
आणि आम्हाला ऑप्शन नसतो स्विकारावचं लागतं
पराग आधी जावाच होतं माझं बॅकग्राऊंड, त्यामुळे अजुन टेंशन आलय मला
गूगल वर सर्च वैगेरे चालूच आहे.
इथुन काही नवी आणि सोप्पी माहिती मिळतेय का ते पहाण्यासाठी हा धागा
कुठुन कशी मदत मिळेल सांगता येत नाही ना शागं
आणि तसही मी इथे जरा जास्तच पडिक असते म्हणुन मुद्दामून खास.. स्वतःसाठीच!
महागुरू खुप खुप आभार! पुस्तकाच्या सजेशन बद्दल तर खुप सारे धन्स
मला लायब्रेरीत इतकी पुस्तक दिसतायेत की कुठुन सुरू करू तेच कळत नाहीये.
हेच गूगलचं! इतकं काही दिसतंय की काय वाचू तेच कळत नाहीये.
अनुभवी माणसाची मदत झाली तर चांगलच ना!
म्हणुन हा खटाटोप!
प्रोजेक्टवर काम सुरू होईला अजून २ महिने लागतील बहुदा..
त्यामुळे प्रॉपर वेळ ही देता येईल अभ्यासाला!
तोपर्यंत लोक्स मला मदत करत रहा
प्लिज
तुमचा काय रोल असणार आहे?
तुमचा काय रोल असणार आहे?
काहीही माहित नाही अजुन केटी
काहीही माहित नाही
अजुन केटी मिळालेली नाही
पण केटी घेताना सगळेच शब्द जार्गन्स वाटू नयेत इतकी माहिती तरी माझ्या जवळ हवीच ना
माझा रोल या वीकेंड पर्यंत कळेल मला..
इंटरनेटवर बरीच माहिती आहे.
इंटरनेटवर बरीच माहिती आहे. स्लाईडशेअर वरील काही प्रेझेंटेशन पासुन सुरुवात करा.
ओके! धन्स महागुरू
ओके!
धन्स महागुरू
शा.गं. ती डेटावेअर हाऊसमधले
शा.गं. ती डेटावेअर हाऊसमधले दादा लोकं शोधतेय...;)
रिया गुड लक
उप्स..ड्बल पोस्ट
उप्स..ड्बल पोस्ट
रिया... वेलकम टू
रिया... वेलकम टू डेटावेअरहाऊसिंग..
वरती तुला पुस्तकं सुचवलेली आहेतच.. तुझा नक्की काय रोल आहे त्यानुसार अजून काही गोष्टी सुचवता येतील.. तू प्रत्यक्ष डेटावर काम करणार आहेस.. की कुठले टूल वापरून डेटा मायग्रेशन करणार आहेस.
रीयुडे काय काय करतेस गं या
रीयुडे
काय काय करतेस गं या इवडुशा वयात ? तुला समजलं कि मलाही सांग
वेक्स मदत कर की जरा..नुसता
वेक्स
मदत कर की जरा..नुसता टिपी नको
हिम्स बर झालं तू पण सापडलास!
मला अद्याप काही डिटेल्स कळाले नाहियेत.
वरची पुस्तक बरिच हेल्पफुल वाटतायेत
आता वाचायला सुरुवात केलीये
कुठल्याश्या टूलवरचं काम असावं मला...
बाकीचं कळेल हळूहळू
तुम्ही लोक्स मदत करत रहा प्लिज (
अबोली
क्या करे पापी पेट का सवाल है
करावचं लागतं
अगं रिया मला त्यातलं काही कळत
अगं रिया मला त्यातलं काही कळत असतं तर ही काय सांगायची गोष्ट होती का? मी स्वत:च मेल केली असती तुला..
कुठलं टूल ते स्पेसिफिकली सांग मग निदान इकडे कुणी असेल तर काही माहिती मिळवता येईल.
informatica वाली एक माहिती आहे मला.. आणि तू फ्रंटएंडवर काम केल्यावर डेटावेअरहाऊसिंगवरही केलेस की झालं तुझी आय टीतली प्रदक्षिणा पूर्ण..लगेच रिझ्युमे बनवून पाठवून दे तुला इथेच बोलवून घ्यायला सांगते..
informatica वाली एक माहिती
informatica वाली एक माहिती आहे मला..
>>>
तू तो बडे काम की निकली वेक्स
हेच ते !
असलच काही तरी लिहिलय माझ्या पीएसपी वर
तुला इथेच बोलवून घ्यायला सांगते..
>>
अजून दोन वर्ष भारत सोडत नाही मी
कंपनी मला सोडणार नाही यू नो
इन्फोर्मेटिका हे सर्वात सोपे
इन्फोर्मेटिका हे सर्वात सोपे टूल आहे... इन्स्टाल करून घे आणि हेल्प बघ.... मस्त आहे... स्टेप बाय स्टेप सोदारहरण माहीती दिली आहे... कोणती वर्जन आहे? ९ जरा क्लिश्ट आहे ८ असेल तर काळजी नको.
डेटावेअरहौसिंग साठी बेसिक माहिती घे आधी... सोअर्स, टार्गेट, इटील... नंतर डेटा मोडेलिंग मधले प्रकार.. स्टार्/स्नोफ्लेक वगैरे. इटील मधे बरेच डेटा प्रोसेसिंग कव्हर होते... त्यातच लूकप, रोउटर, डेटा क्लिन्सिन्ग वगैरे कळेल.
कोणता डेटाबेस आहे तो माहित होईल तेव्हा त्याचे ही बेसिक्स जाणून घे.
मला तुमचे बॉस, तो प्रॉजेक्ट,
मला तुमचे बॉस, तो प्रॉजेक्ट, कंपनी व एंड कस्टमर( असल्यास) यांची काळजी वाट्ते. तुमची पात्रता नाही हे क्लिअर केले तर एच आर करेक्ट रिसोर्स अॅलोकेट करू शकेल. सी द बिग पिक्चर.
मामी आयटी मध्ये हेच चालतं.
मामी आयटी मध्ये हेच चालतं. बिलेबिलिटी वाढवण्यासाठी लोक क्रॉस ट्रेन करून किंवा कधी कधी तसेच असाईन करतात. याला दोन कारणं असतात एक तर ट्रेनिज भरपूर असतील तर त्यांना काम द्यायचे म्हणून, किंवा रिक्वायर्ड स्किलचा माणून मार्केटमधून हायर करून तो जॉइन होईपर्यंत बिलेबिलिटी जाऊ नये म्हणून तात्पुरतं अॅलोकेशन.
मला तुमचे बॉस, तो प्रॉजेक्ट,
मला तुमचे बॉस, तो प्रॉजेक्ट, कंपनी व एंड कस्टमर( असल्यास) यांची काळजी वाट्ते. >>>> +१
प्रत्येक कंपनीत, मग ती मॅन्युफॅक्चरींग असो, आयटी असो, बिपीओ असो, नेहमी अनुभवी उमेदवारालाच प्राधान्य दिले जाते. हे वरील वाचुन जरा आश्चर्यच वाटले.
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा सर्विस इंड्स्ट्रीत नाही चालणार असे नगाला नग. किंवा कामचलाऊ धोरण.
बिग मॅक ऐवजी मॅक आलू टिक्की दिली तर? तुम्ही घ्याल का? एंड कस्ट मर जो पैसे भरून
प्रॉजेक्ट देतो आहे त्याचे नुकसान होणार हे दिसत आहे. त्यामुळे जीव हळहळतो. आयटीत असे कसे चालते तुम्ही चालवून घेता म्हणून चालते. पक्की देशी अॅटिट्यूड आहे. मशीन मध्ये प्रॉडक्ट मध्ये सर्विस मध्ये कमी एक्सिक्युशन का चालवून घ्यायचे? आपण पैसे भरतो. १००% पर्फॉरमन्स मस्ट आहे.
आमा तुमची पात्रता नाही हे
आमा
तुमची पात्रता नाही हे क्लिअर केले तर एच आर करेक्ट रिसोर्स अॅलोकेट करू शकेल. >>>
हे आधीच माहित आहे टिमला..माझी टिम १० जणांची आहे आणि उरलेले ९ जण एक्सपर्ट आहेत त्यामुळे बॉसला परवडत असेल एक कच्चा रिसोर्स सांभाळण.
आणि मला आधी ट्रेनिंग (केटी) मिळेल पण त्यात अगदीच आडाणीपणा नको दिसायला म्हणुन मी तयारी करतेय.
तुम्ही म्हणताय ते कितीही बरोबर असलं तरी या हिशोबाने मग फ्रेशर्सला कामालाच ठेवायला नको की
अस कस चालेल?
आम्ही अजुनही स्टुड्ण्ट्सच आहोत. त्यामुळे आम्हाला जितकं जास्त नवं ज्ञान देता येईल तितका प्रयत्न करणं हेच सध्या माझ्या बॉसच काम असावं
दक्षू किमान वर्षासाठी बिलेबिलिटी आहे. तात्पुरत अलोकेशन वाटत नाहीये हे
अमित थँक्स !
मी मदत लागल्यास तुमच्याशी संपर्क साधल्यास चालेल का?
>>तुम्ही म्हणताय ते कितीही
>>तुम्ही म्हणताय ते कितीही बरोबर असलं तरी या हिशोबाने मग फ्रेशर्सला कामालाच ठेवायला नको की
अस कस चालेल?
>>आम्ही अजुनही स्टुड्ण्ट्सच आहोत. त्यामुळे आम्हाला जितकं जास्त नवं ज्ञान देता येईल तितका प्रयन्त करण हेच सध्या माझ्या बॉसच काम असावं
अनुमोदन !!!
>>मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा सर्विस इंड्स्ट्रीत नाही चालणार असे नगाला नग. किंवा कामचलाऊ धोरण.
या ठिकाणी जे नविन लोक येतात त्यांना अनुभव कसा मिळतो ? मला तरी वाटते की वर रियाने लिहिले आहे त्याप्रमाणे अनुभवी टीमबरोबर नविन रिसोर्सेस मिक्स करूनच असे केले जाते. अन्यथा कोणीच नविन क्षेत्रामधे काही शिकू शकणार नाही. चुकत असल्यास करेक्टावे.
माझी टिम १० जणांची आहे आणि
माझी टिम १० जणांची आहे आणि उरलेले ९ जण एक्सपर्ट आहेत त्यामुळे बॉसला परवडत असेल एक कच्चा रिसोर्स सांभाळण. >>>>>>>
.
.
.
अरे हे आपले ESPN CRICKET FANTASY TEAM सारखे आहे....... हवी ती टिम निवडल्यावर एक कच्चा लिंबु घ्यावाच लागतो..
उदयन. तसं नाहीये ते... फँटसी
उदयन. तसं नाहीये ते... फँटसी लीग मधला तो कच्चा खेळाडू ती लीग संपेपर्यंत कच्चाच राहू शकतो.. पण इथे प्रोजेक्ट जसं जसं पुढे जाईल तसं तसं हा कच्चा खेळाडू पण स्टार परफॉर्मर होऊ शकतो..
अमा.. हे असे अॅलोकेशन सगळी कडे चालणारच... तसं नाही झालं तर मग नवीन लोक तयार कसे होणार.. कॉलेज मधून शिकून आलेल्या लोकांना कुठेतरी आधीपासून त्याच कामात असलेल्यां बरोबर काम करूनच पुढे जावे लागते... हे तर सगळ्याच इंडस्ट्रीमधे चालते..
रिया.. इनफॉरमॅटिका मध्ये काम असेल तर बिन्धास्त संपर्क कर.. जेव्हढे माहिती आहे तेव्हढे नक्कीच शेअर केले जाईल..
माझी टिम १० जणांची आहे आणि
माझी टिम १० जणांची आहे आणि उरलेले ९ जण एक्सपर्ट आहेत त्यामुळे बॉसला परवडत असेल एक कच्चा रिसोर्स सांभाळण. >> ९०-१० डिव्हिजन पण खूप झाले. बर्याचदा ७०-३० किंवा ६०-४० डिव्हिजन असते. काँट्रिब्युशन, प्रॉफिटॅबिलिटी वाढवण्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. शिवाय, आयटी मध्ये असाध्य असं काहिच नाही. शिवाय तिचा प्रोजेक्ट चालू व्हायला अजून काही वेळ आहे तेवढ्यात तिला ट्रेन करतील. बहुतेक सगळ्या टेक्निकल स्किलसेटसचं ट्रेनिंग देता येतं.
पक्की देशी अॅटिट्यूड आहे >> अजिबात नाही. मी अमेरिकेतल्या एका प्लँटमध्ये काम केलंय. तिथला आमच्या आयटी टीममधला एकजण सिक्युरिटी गार्ड पासून सगळ्या डिपार्टमेंटमधे (मटेरियल्स, क्वालिटी, इ.) काम करून नंतर आयटी मध्ये आला होता. अशी बरीच उदाहरणं मी बघितली आहेत.
पक्की देशी अॅटिट्यूड आहे >>
पक्की देशी अॅटिट्यूड आहे >> -१
अज्जिबात नाही. इंफॅक्ट बाकी ठिकाणी 'लर्निंग बाय डुइंग' ला जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि ९ एक्सपर्ट मधे एक नॉन एक्सपर्ट हा फारच हेल्दी रेशो आहे. मी आत्तापर्यंत काम केलेल्या सगळ्या प्रॉजेक्ट्स मधे ५० % वर जास्त एक्सपर्ट कधीच नव्हते. जास्त नवशिकेच असतात.
अश्विनीमामी | 6 November,
अश्विनीमामी | 6 November, 2012 - 09:26 नवीन
मला तुमचे बॉस, तो प्रॉजेक्ट, कंपनी व एंड कस्टमर( असल्यास) यांची काळजी वाट्ते. तुमची पात्रता नाही हे क्लिअर केले तर एच आर करेक्ट रिसोर्स अॅलोकेट करू शकेल. सी द बिग पिक्चर.
++++++१
" एंड कस्ट मर जो पैसे भरून प्रॉजेक्ट देतो आहे त्याचे नुकसान होणार हे दिसत आहे. त्यामुळे जीव हळहळतो. "
मामी, तो "कस्ट मर" लवकरच मरणार आहे. अन नुस्ता नाही कस्टाने मरेल बिचारा. हाल्हाल होऊन.
या प्रकाराचे समर्थन करणार्या यांना सगळ्यांना जीवघेणे आजार झाले तर उपचारासाठी 'हॅण्ड्स ऑन' ट्रेनिंग घेणार्या डाक्टराकडे द्यायला पाहिजे. शिकायला शाळा/कॉलेजे नसतात का?
या प्रकाराचे समर्थन करणार्या
या प्रकाराचे समर्थन करणार्या यांना सगळ्यांना जीवघेणे आजार झाले तर उपचारासाठी 'हॅण्ड्स ऑन' ट्रेनिंग घेणार्या डाक्टराकडे द्यायला पाहिजे >> इतके ब्लॅक अँड व्हाईट नसते हो.
पुस्तकात वाचून / वर्गात शिकून सगळे कळत असते, येत असते तर मेडिकल कॉलेजमधल्यांना इंटर्नशिप कशाला करायला लागली अस्ती? सी पी ए / सी ए यांना आर्टिकलशिप कशाला करायला लावतात ? जीवघेण्या आजारात कोणी २५ वर्षांच्या डॉ कडे जातील की २५ वर्षे अनुभव असलेल्या डॉ कडे जातील ?
रेस्टॉरंट / खानावळ इ मधे नव्या लोकांना भांडी धुणे, चिरणे , मसाले वाटणे इथपासून सुरवात करावी लागतेच ना ?
तो "कस्ट मर" लवकरच मरणार आहे.
तो "कस्ट मर" लवकरच मरणार आहे. अन नुस्ता नाही कस्टाने मरेल बिचारा >> कोटी चांगली होती पण तुमचं सिरीयस मत असं असेल तर ते चुकीचं आहे.
या प्रकाराचे समर्थन करणार्या यांना सगळ्यांना जीवघेणे आजार झाले तर उपचारासाठी 'हॅण्ड्स ऑन' ट्रेनिंग घेणार्या डाक्टराकडे द्यायला पाहिजे.>> कस्टमरचा प्रोजेक्ट पूर्ण करायला एक टीम असते ज्यात अनुभवी आणि नवीन लोक दोन्ही असतात. एकच माणूस पूर्ण प्रोजेक्ट करत नसतो. त्यामुळं तुम्ही जी अॅनॉलॉजी दिली आहे ती चुकीची आहे.
शिकायला शाळा/कॉलेजे नसतात का?>> तुम्ही पण शाळा कॉलेजमध्येच शिकलात पण प्रॅक्टीस चालू करायच्या आधी १ वर्ष इंटर्नशीप केलीतच ना? तसेच असते हे. उद्या तुमच्या क्षेत्रात नवीन काही टेक्नीक्स आली तर ट्रेनींग घेउन पेशंटस् हॅंडल करालच की. का प्रत्येक डॉक्टर कॉलेजातूनच सगळं शिकून येतो?
Pages