कार ट्युनिंग - परफॉरमन्स
तुम्हाला कधी आपली गाडी रेस कार सारखी चालवावी असे वाटते का?
तुम्ही कधी फास्ट मुव्हींग कार्सचा थ्रिल घेतला आहे का?
स्टॉक कार रेस मध्ये आपली कार चालवावी असे वाटले का?
उत्तर हो असेल पण तश्या कार्स तुम्ही विकत घेऊ शकत नसाल आणि तुमच्या कडे कार असेल तर मात्र इंजीन ट्यूनिंग किट एकदा वापरून बघाच. पेट्रोल व डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
कारचे स्टॉक इंजिन (म्हणजे गाडीत लावून आलेले) हे आपल्याला हवे आणखी ट्युन करता येते जेणे करून त्याचा शक्ती आणि प्रति लिटर क्षमता अजून वाढेल. (परफॉर्मन्स आणि मायलेज)
ट्युनिंग हे दोन प्रकारे करता येते.
१. अॅनलॉग - ज्यात कुठलीही कंप्युटर चिप वापरली जात नाही. पण ही झाली जुनी पद्धत. आजकालच्या सर्व इंजिनमध्ये कंट्रोल करायला कॉम्प चिप्स वापरल्या जातात.
२. डिजिटल - अर्थात चिप्सच्या साहाय्याने. ह्याला डिझेल ट्युनिंग बॉक्स / किट असे म्हणले जाते. ज्यात तुमच्या इंजिनच्या वायरिंग सोबत एक कंट्रोल युनिट बसवले जाते. हा किट बसवल्यावर गाडीची वॉरन्टी नष्ट होईल असे वाटू शकते पण तसे नाही. कारण ह्यात इंजिनच्या कुठल्याही भागाला उघडले जात नाही वा त्याच्या कुठल्याही वायरला तोडले जात नाही. केवळ प्लग आणि प्ले (जसे आपला यु एस बी ड्राईव्ह) आहे तसे हे युनिट असते. ज्यात नेहमीच्या पावर पेक्षा ३० टक्के जास्त पावर किंवा २० टक्के जात मायलेज ( दोन्ही एकत्र नाही) असे मिळू शकते. गाडी इकॉनॉमी मॅप वर ठेवायची की पॉवर मॅप वर हे तुमच्या हातात असते. त्याचे कंट्रोल आपण ड्रायव्हर सिटच्या आजूबाजूला बसवू शकतो.
असे एक प्रॉडक्ट खास भारतात बनविले जाते. वेबसाईट http://racedynamics.in/ किंमत साधारण २०००० रू. निगोशिएबल माझ्या काही मित्रांनी १७,००० मध्ये बसविले आहे.
ह्या आणखी काही
मस्तच.. असं काही असतं हे पण
मस्तच.. असं काही असतं हे पण माहित नव्हतं
धन्यवाद
केदारजी, प्रत्येक गाडीचा
केदारजी, प्रत्येक गाडीचा 'पॉवर टु वेट रेशो 'ठरलेला असतो. मॅक्स पॉवरनुसारच ट्रान्समिशन, ब्रेकिंग आलेले असते. तीस टक्के पॉवर वाढवुन संपुर्ण गाडीचे दिवाळे वाजेल....
पर्सनली असेंबल केलेल्या गाडीला रजिस्ट्रेशन देत नाहीत. कारण पोल्युशन सेफ्टी वगैरेचे इश्युज असतात .इथे तर इंजिनच मॉडीफाय करायचे म्हणजे कायद्यानेच गुन्हा ठरेल..
इथे तर इंजिनच मॉडीफाय करायचे
इथे तर इंजिनच मॉडीफाय करायचे म्हणजे कायद्यानेच गुन्हा ठरेल >.आँ?
इंजिनच मुळात जर electronically controlled ( turbo असो नसो ) असेल तर तुम्ही मॅप (हाच शब्द असतो) करू शकत नाही असे म्हणता ह्यात मला खूप आश्चर्य वाटते. हे मॅपींगच मुळात असे हे किट कंट्रोल करतात त्यामुळे जास्त पॉवर निर्माण होऊ शकते.
दुर्दैवाने आपण तसे काही केले नसल्यामुळे आपणास ह्या विषयात काही माहिती नसावी.
आपण DieselTronic रिव्हू वगैरे असे शब्द लिहून गुगलदेवांची मद्त घ्या. आपणास ही इंजिन ट्युनिंग बद्दल माहिती मिळू शकते.
माहिती देवाणघेवान असेल तर नक्कीच पुढेही लिहू पण केवळ वाद घालायचा असेल तर तुम्ही म्हणता ते सर्व म्हणणे खरे आहे.
मला कळाले नाही. मध्यंतरी टू
मला कळाले नाही. मध्यंतरी टू व्हीलरला असंच काहीसं लावले होते तेव्हां संपूर्ण इलेक्ट्रिकल केबल्स, रिले आणि कॉईल्स हे बदलावे लागले होते. ते हेच आहे का माहीत नाही. गॅरेजवाले सांगत होते कि कशाला खेळ केलात. खूप तक्रारी येतात. इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स शी संबंधित असल्याने पॉवर किंवा मायलेज कसा वाढतो हे समजावून सांगा प्लीज. टर्बो ड्राईव्हमुळे परफॉर्मन्स वाढतो हे माहीत होतं.
चक्रमचाचा.... तुम्हीच केला
चक्रमचाचा.... तुम्हीच केला होतात ना खेळ आणि तुम्हालाच माहिती नाही काय केल होत ते?
हे मॅपींग कोणत्या कार्स च्या
हे मॅपींग कोणत्या कार्स च्या संदर्भात करता येते ?
कोरोला अल्टिस आणि होंडा सिटीला करता येइल का? ( दोन्ही पेट्रोल)
ट्रॅफिक मधे ह्या सुधारलेल्या इंजिन मुळे काही अॅव्हरेज मधे फरक पडतो का?
ह्यातल्या कोरोला अल्टिस चे रोजचे रनिंग साधारण ६० कि.मी. गच्च ट्रॅफिक मधुन ( ऑफिस टाइम ठाणे ते प्रभादेवी सकाळी ९ आणि प्रभादेवी ते ठाणे रात्री ८.३० नंतर) आहे. तर ह्या मॉडिफिकेशन मुळे अॅव्हरेज वर फरक पडेल का?
अनेक पेट्रोलपंपावर असे कीटस
अनेक पेट्रोलपंपावर असे कीटस लावून दिले जातात. एका ठिकाणी खूप मागे लागले म्हणून लावलं. त्या वेळी काय माहिती हे. मी स्वतः नाही लावलेलं.
केदार, इंजिन मॅप केल्याने
केदार, इंजिन मॅप केल्याने पॉवर वाढते असे आपणच लिहले आहे, मग वाढलेली पॉवर हॅन्डल करायला ब्रेक्स, ट्रान्समिशन तुम्ही बदलणार का? हा साधा प्रश्न आहे. नसेल बदलणार तर गुन्हा ठरु शकतो .ट्युनिंग, मॅप वगैरेची मला जास्त माहीती नाही ,परंतु पॉवर आऊटपुट तीस टक्के वाढतो हा तुमचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. वाद घालायची ईच्छा नाही.फक्त मी एवढेच सांगतो की असले अघोरी आणि बेकायदेशीर प्रकार करु नका. बाकी चालु द्यात
मला इंजिनचा परफॉर्मन्स कसा
मला इंजिनचा परफॉर्मन्स कसा सुधारतो हे जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे इंजिनचे व्हाल्व टायमिंग, फ्युएलची कॅलरीफिक व्हॅल्यू हे बदलता येत नाही. फ्ल्यु गॅसेसचं बॅक प्रेशर न येता पॉवर स्ट्रोक व्यवस्थित होणं यावर परफॉर्मन्स अवलंबून असावा असं वाटत होतं. इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रीनिक्स सर्किट हे फक्त इग्निशनला कंट्रोल करत असावं कदाचित. त्यातून हल्ली एमपीएफआय इंजिनमधे इग्निशन स्ट्रोकवर भरपूर संशोधन झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर हे इंटरेस्टिंग वाटतंय. कृपया सोप्या भाषेत माहिती द्यावी ही विनंती.
हे मॅपींग कोणत्या कार्स च्या
हे मॅपींग कोणत्या कार्स च्या संदर्भात करता येते ? >> कोणत्याही कार्ससाठी कारण हे इंजिन वर अवलंबून आहे. त्या इंजिनचे किट असेल तर तुम्हाला लाभ घेऊ शकता येतो.
कोरोला अल्टिस आणि होंडा सिटीला करता येइल का? ( दोन्ही पेट्रोल >> हो गॅसोलिन किट म्हणून मिळतात
तर ह्या मॉडिफिकेशन मुळे अॅव्हरेज वर फरक पडेल का? >> हो अनुभव असा की इकॉनॉमी मॅप वर कारच्या स्टॉक मॅप पेक्षा कमी पावर मिळते.त्यामुळे अॅव्हरेज जास्त देईल.
. इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स शी संबंधित असल्याने पॉवर किंवा मायलेज कसा वाढतो हे समजावून सांगा >>
मी मेकॅनिकल इंजिनअर नसल्याने प्रॉपर टेक भाषेत सांगू शकत नाही पण .. ले मॅन टर्म्स मध्ये - आपण जशी स्पिड वाढवू तसे इंधन स्प्रे जोरात किंवा कमी होते. त्याचाशी खेळ करून हे होत असते. जेंव्हा जास्त स्प्रे मिळतो तेंव्हा पावर जास्त निर्मान होऊ शकते. मग टर्बोला रेशो कंट्रोल करून जी पावर जास्त वेगाने पळविण्यासाठी वापरली जाते. हे किट हे फ्युअल इंजेक्टर किंवा इ़जेक्टर सिस्टिमच्या प्रेशर सेन्सर / गेज ला जोडले जाते व स्टॉक मॅपिंग खोडून त्या ऐवजी ह्या नवीन मॅपिंग केल्या जातात.
पण चाचा तुम्हाला जास्त माहिती हे ते किट वाले किंवा असे मेकॅनिक जे स्टॉक कार्सच्या रेस मध्ये भाग घेतात ते देऊ शकतील.
नाही. माहिती असून वेड पांघरत
नाही. माहिती असून वेड पांघरत नाहीये. इलेक्ट्रिकल विषयात मी अडाणी आहे. ही शक्यता आहे किंवा कसं याबद्दल निश्चित माहिती नसताना एकदम विधान करणं अयोग्य वाटलं. टर्बोचार्जिंगने शक्य आहे हे नक्कीच. मात्र अधिक माहिती घ्यायला हवी.
फक्त मी एवढेच सांगतो की असले
फक्त मी एवढेच सांगतो की असले अघोरी आणि बेकायदेशीर प्रकार करु नका. बाकी चालु द्यात >>.
अहो प्रोफेसर हे अघोरी आणि बेकादेशीर अजिबात नाही. अन्यथा ट्युनिंग किट वर सरकारनेच बंदी नसती का आणली.
अनेक पेट्रोलपंपावर असे कीटस लावून दिले जातात. >>. पेट्रोलपंपावरचे किट बसवू नयेत. मी वर जे निर्माते दिले आहेत ते "रेस कार म्यॅनुफॅक्चर" करतात.
केदार मॅपिन्गसाठी अॅक्सेस
केदार मॅपिन्गसाठी अॅक्सेस कसा मिळेल?
कारण बॉश वै चे किट असेल तर ते पासवर्ड प्रोटेक्टॅड असणार.
शिवाय गाडीचं आताच मॅपिन्ग हे कॅलिब्रेशन करुन केलेलं असेल.
मग अधिक पॉवर साठी कॅलिब्रेशन, टेस्टिन्ग कुणी केलेलं असणार आहे?
की इन जनरल मॅपिन्ग असणार?
जरा जास्तच प्रश्न आहेत.

पण डिटेल लिहि.
. टर्बोचार्जिंगने शक्य आहे हे
. टर्बोचार्जिंगने शक्य आहे हे नक्कीच. मात्र अधिक माहिती घ्यायला हवी>>
टर्बो चार्जर साध्या गाडीला लावुन घेणे हे अत्यंत किचकट काम आहे.
असं कोणी करतय अस मला वाटत नाही. ऑलमोस्ट इम्पोसिबल आणि प्रचंड खर्चिक.
झकासराव हल्ली नवीन गाडीत
झकासराव हल्ली नवीन गाडीत टर्बोचार्जिंग यंत्रणा असलेलीच इंजिने दिसतात. जुन्या गाडीला ही यंत्रणा बसवण्याबद्दल विषय चाललेला नाही इथे. या यंत्रणेने परफॉर्मन्स सुधारतो इतकंच.
It must be compromising on
It must be compromising on fuel consumption. What are changes in average? Otherwise the manufaturers would have fitted it originally...
Otherwise the manufaturers
Otherwise the manufaturers would have fitted it originally...>> नाही.
कारण त्यानी वाइड बॅण्डचा विचार करुन मॅपिन्ग केलेल असतं.
पण प्रत्येकाची रिक्वायरमेन्ट वेगळी असु शकते.
जसं की पेट्रोल, डिझेलचे भाव खुप वाढलेत आणि मला फक्त सिटी राइअडीन्ग हवय तर हाय पॉवर परफॉर्मन्स असण्यापेक्षा मी फ्युएल एफिशियन्सीला महत्व देइन.
केदार मॅपिन्गसाठी अॅक्सेस
केदार मॅपिन्गसाठी अॅक्सेस कसा मिळेल?
कारण बॉश वै चे किट असेल तर ते पासवर्ड प्रोटेक्टॅड असणार. >>
अरे किट हेच मुळात हे नवीन मॅप बसवत असते. म्हणजे त्या चीप मध्ये हे नवीन मॅप असतात. ते डिफॉल्टला ऑव्हरराईड करू शकतात. शिवाय एक सेटिंग अशीही असते ज्यात डिफॉल्ट सेटिंगवर देखील चालवू शकता. त्याचे बटन्स हे ड्रायव्हरच्या आजूबाजूला बसवता येतात.
प्रत्येकाची रिक्वायरमेन्ट वेगळी असु शकते. >> +1 म्हणून त्यावर तीन ते पाच सेटिंग असू शकतात.
मॅन्युफॅक्चरर हा नेहमीच ज्यातून अधिकाधिक मायलेज त्या शक्तीच्या रेशोमध्ये मिळेल असा मॅप बसवतो. पण सुपर इकॉनॉमी मॅप मध्ये अतिशय कमी पावर घेऊन जास्त मायलेज मिळवता येते. तसेच ज्यांना मायलेजची गरज नसते पण स्पिड हवी असते त्यांना पॉवर मोड मिळू शकतो.
केदार ओक्के. समजलं
केदार ओक्के.
समजलं बर्यापैकी. हे प्रत्यक्षात कसं काम करत हे बघायला आवडेल. आय मीन त्याला गाडीत कस फिट करतात वै वै. हे खरतर मॅन्युफॅक्चररनेच द्यायला सुरवात केली तर अजुन मजा येइल/
भारतात असं माझ्या माहितीत तरी नाहिये.
भारतात असं माझ्या माहितीत तरी
भारतात असं माझ्या माहितीत तरी नाहिये. >> अरे आहे रे. वर साईटही दिली आहे की.
तुम्हाला कधी आपली गाडी रेस
तुम्हाला कधी आपली गाडी रेस कार सारखी चालवावी असे वाटते का?
I think this statement is very dangerous. We are also discussing safety measures on some other BB. To encourage people for race type driving is unethical IMHO...
. To encourage people for
. To encourage people for race type driving is unethical IMHO...
इथे लिहिलेलं वाचून पब्लिक रोज रेस कार सारखी गाडी चालवेल असे वाटणे म्हणजे भाबडेपणाचा कळस असावा. आणि वाचकांवर अविश्वास ! लोकं विचार करून निर्णय घेतील तो आपण घेऊ नये.
प्रत्येकाने इथे इकॉनॉमी कशी सुधारेल हे विचारले कोणीही मी आणि तुम्ही एक्सप्रेस वे वर शर्यत लावू असे लिहिले नाही.
ही माहिती आहे. कराच असा संदेश नाही. झालंय काय की लोकांनी काय करावं, काय करू नये असे सल्ले आता मायबोलीवर इतके लोकं देत सुटले आहेत की त्याचा कंटाळा आला आहे.
बाजारात पार १००० बि एच पी असलीली W 16 प्रॉडक्शन मॉडेल म्हणून उपलब्ध आहे. जी कार तुम्ही घेऊन रस्त्यावर चालवू शकता. म्हणजे ती कंपनी तुमच्या भाषेत unethical आहे का?
बाजारात मिळते ते चालते पण इथे लिहिले की ते अनइथिकल, अन मॉरल टाईप ! जे विकतात त्यांच्याकडे जाऊन "कृपया असे विकू नका" अशी तक्रार करा.
उगाच काहीतरी लिहून वाद घालणारे खूप लोक झालेत आताशा !
भारतात असं माझ्या माहितीत तरी
भारतात असं माझ्या माहितीत तरी नाहिये. >> अरे आहे रे. वर साईटही दिली आहे की>>
अरे म्हणजे कार मॅन्युफॅक्चरर जसे की ह्युन्डाइ, टाटा, मारुती वाले अशी सुविधा देत नाहीत अस म्हणायच होतं.
असे स्विच हवेतच. तुच लिहिलेल्स बहुतेक इम्पाला की अजुन कोणत्या गाडीत दोन सिलिन्डर फायर होत नाहीत अशी सुविधा आहे.
तुच लिहिलेल्स बहुतेक इम्पाला
तुच लिहिलेल्स बहुतेक इम्पाला की अजुन कोणत्या गाडीत दोन सिलिन्डर फायर होत नाहीत अशी सुविधा आहे. >>
हो मीच लिहिले होते. इम्पाला पासून ती सुरूवात झाली ज्यात पहिले ३ फायर होतात व नंतरचे ३ ऑन डिमांड फायर होतात. ज्यामुळे पिक अप मध्ये मार खाते पण इकॉनॉमीत मात्र ६ सिलेंडरच्या मानाने चांगली.
भारतीय मॅन्युफॅक्चरर अजून तेवढे प्रगत झाले नाहीत, तसा रिसर्च चालू असावा बहुतेक. पण सध्या तरी असे दिसते की असलेल्या इंजिनालाच रि ट्युन करून ते नवीन मॉडेल मध्ये येतं. उदा स्कॉर्पिओचे Mhawk ट्युन करून आणि त्याचे आउटपुट वाढवून तेच इंजिन XUV मध्ये लावले.