Submitted by बागेश्री on 2 November, 2012 - 01:51
चित्त पावन बासरी
जरा वाजव मुरारी,
आर्त भाव खोळंबू दे
तुझ्या माझ्या ह्या नजरी..
व्हावे तुजला स्वाधीन
येत तुजला शरण,
साद घाल वेणूतून
स्वीकारून हे नमन...
मोरपीस रंग दावी
जगण्याचे नवे नवे
दोन डोळे मोहणारे
वेड कसे न लागावे?
कसे खेळ खेळलेस
काय कपट केलेस,
मला काय घेणे देणे
माझी भक्ती तू झालास!
नाद तुझ्या रे बोलांचा
माझ्या कानी ह्या गुंजावा,
एकरूप होत जावे
ध्यास तुझाच असावा...
लुब्ध मन तुझ्या ठायी
मला जाण काही नाही
आता स्वप्न, खरे खोटे
तमा उरलीच नाही...
जरा ऐकशील का रे?
'वेणू' नाम मज दे तू
तुझ्या करास स्पर्शावे
असे भाग्य आज दे तू...!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुं द र! प्रत्येक्ष त्या
सुं द र!
प्रत्येक्ष त्या समर्थ ईशासोबत गप्पा मारल्या आहेस वाटले.
मोरपीस रंग दावी
जगण्याचे नवे नवे
दोन डोळे मोहणारे
वेड कसे न लागावे?
कसे खेळ खेळलेस
काय कपट केलेस,
मला काय घेणे देणे
माझी भक्ती तू झालास!<< हे खास आवडले आहे
शुभेच्छा
नेहमीसारखी अप्रतीम नाही वाटली
नेहमीसारखी अप्रतीम नाही वाटली ...वैयक्तिक मत !!
..क्षमस्व !!
आवडली कविता... आशय खूप लाघवी
आवडली कविता...
आशय खूप लाघवी आहे...
पु.ले.शु!
बागेश्री टच मिसिंग वाटतोय मला
बागेश्री टच मिसिंग वाटतोय मला
त्याला हाक मारलेली.. पोहोचली.
त्याला हाक मारलेली.. पोहोचली. (लयीत आहे हे अजून एक )
सगळ्यांची आभारी आहे.....
सगळ्यांची आभारी आहे.....
<<< बागेश्री टच मिसिंग वाटतोय
<<< बागेश्री टच मिसिंग वाटतोय मला >> +१
प्रांजळ मतांसाठी मनःपूर्वक
प्रांजळ मतांसाठी मनःपूर्वक आभारी आहे दोस्तहो..
ह्यात नेहमीचा थोडासा प्रॅक्टीकल लाईफवर कमेंट करणारा सूर नाहीये हे खरं! ह्या वेळी जरा भक्तीभावाकडे झुकलेला आशय होता..
स्नेह असावा
छान आहे आवडली. नेहमीपेक्षा
छान आहे आवडली. नेहमीपेक्षा अगदीच वेगळी. भक्तीरस पहिल्यांदाच आला आहे तुझ्या कवितेत.
येस मने... थँक्स
येस मने... थँक्स
मनिमाऊ + १ समरसून लिहिलेली
मनिमाऊ + १
समरसून लिहिलेली जाणवते आहे.. वातावरणनिर्मिती छान झाली आहे..
लिहित रहा...
शुभेच्छा!