सलून मधे खुर्चीवर जाऊन बसलो, "मिडियम", आणि भांग कोठून पाडायचा हे सांगून झाले, सलून मधली ती मुलगी तिच्या कामाला लागली, आणि मी आता वेळ कसा घालवावा विचार करू लागलो. भिंतीवरच्या फ्रेम्समधल्या हेअरस्टाईल्स आधीच बघून झाल्या होत्या. त्यातील एकही गेल्या दहाबारा वर्षातली दिसत नाही याचेही नावीन्य नव्हते. तेथे बसल्यावर तो घोस्ट वर्ल्ड का कशातील संवाद नेहमी आठवतो "The 80s have called and they want their hairstyle back". काही सलून्स मधे आरशात उलटा का होईना पण टीव्हीतरी दिसतो. येथे ते ही नव्हते. इतरही काही टाईमपास नव्हता. एकूण एखाद्या गावात व्हिलन अचानक उगवायच्या आधी सगळे लोक आपआपली कामे करत असतात तसे काहीसे वातावरण होते.
तेव्हढ्यात सलूनच्या दारात कोणीतरी आले म्हणून सलूनवाल्या कोणीतरी 'हाय' केले आणि मीही सहज तिकडे बघितले. तर साधारण नरेन्द्र हिरवाणीसारखा दिसणारा, अगदी ८७-८८ मधल्या तेंडुलकरची हेअर स्टाईल असणारा पण स्वतःला बहुधा चिरंजीवी, मिथुन किंवा रजनी समजणारा एकजण गुंडांच्या अड्ड्याच्या दारात एण्ट्री मारायला उभा राहतो तसा मधोमध उभा होता.
"Do you need a haircut?" सलूनवालीने विचारले.
"You think?" मी तिच्याकडे वळून ऑल्मोस्ट विचारले. कारण त्याच्याकडे एकदा बघितल्यावर हा प्रश्न पडायलाच नको होता. आणि त्यात एखादी 'एण्णोबडी लाईक' देसी गर्ल आली असती तरी ठीक आहे, पण वीकेंडला दुपारी २ वाजता एखादा देसी गाय सलूनमधे काय पेडिक्युअर करायला जाणार आहे? हे म्हणजे चिरंजीवीला "मै ये तुम्हारी लंका जलाने आया हू" वगैरे प्लेझंट्रीज झाल्यावर त्या गुंडांच्या म्होरक्याने "नमस्कार, मी आपली काय मदत करू शकतो?" विचारल्यासारखे झाले.
मग तो खुर्चीवर बसला. "how do you need your hair cut?" हा नेहमीचा प्रश्न आल्यावर त्याने लांबी, रूंदी मोजण्याची विविध मापे, दशमान पद्धती - इंच, सेमी वगैरेची स्वतःच्या हेअर स्टाईलशी गुंफण घालत माहिती दिली. त्यात "quarter of an inch" खूप वेळा येत होते. सुमारे पंधरा मिनीटे ते ऐकल्यावर साधारण कळाले की त्याला आहे ती हेअर स्टाईल ठेवायची होती, पण फक्त १/४ इंच कमी करायचे होते. त्यात 'मिडियम', 'स्मॉल', 'हेअर कट' वगैरे कीवर्ड्स नव्हते. सलूनवालीला वाटले की तो दुसर्याच कोणाशी तरी बोलत असावा. कारण हमाम मे सब काय काय असतात त्याप्रमाणे सलूनमधे सगळेच कोणाशीही बोलत असले तरी बहुतेक वेळा समोर आरशात बघून बोलतात.
त्यामुळे सर्व ऐकून घेऊन तिने शांतपणे विचारले, "so how do you need your hair cut?"
आता पुन्हा "गुंडांच्या अड्ड्यातील चिरंजीवी" मोडमधे एक उत्तर आले "I said, a quarter of an inch!". हे आधीच्या वाक्याच्या संदर्भाने येणारे "I said" फार डोक्यात जाते. बर्याच देसी लोकांना असे बोलायची सवय असते. त्याचा टोन साधारण असा असतो की मला सांगायचे ते मी आधी बरोबर सांगितले होते पण ही तुमची चूक आहे की तुम्ही माझा शब्द न शब्द अमृताप्रमाणे प्राशन केला नाहीत.
नंतर बहुधा त्याला काय सांगायचे होते ते तिला कळाले असे दोघांनाही वाटले असावे. मग १०-१५ मिनीटे त्या आघाडीवर शांतता होती.
पण मग एकदम ऐकू आले "you have cut way too much". बहुधा सलूनमधल्या सर्वांनीच तिकडे बघितले. तर त्याचे केस एकदम सरळ झालेले होते. मग त्याने तक्रार केल्यावर तिने त्यांचे मिशन स्टेटमेंट सांगितले "I follow what you say. I don't cut too much". मात्र येथे माझे काम झाल्याने उठावे लागले. तशी तेथे 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' पाटी नव्हती, पण नाहीतरी त्याच्या शेजारच्या खुर्चीत बसून हसू आवरणे कठीण झाले होते. पण नंतर नक्की काय झाले कोणास ठाऊक. त्या सलूनची सर्वेलन्स व्हिडीओ टेप असेल तर बघायला हवी
फारेन्डा क्वार्टर ऑफ अॅन
फारेन्डा क्वार्टर ऑफ अॅन इन्च कापायचे की क्वार्टर ऑफ अॅन इन्च ठेवायचेत हे कन्फुजन असावे
इकडे पाठवा त्याला... इथे फक्त
इकडे पाठवा त्याला... इथे फक्त झिरो कट असतो, त्यापेक्षा सूतभर जरी जास्त ठेवायचे असतील, तर आपले आपण कापावे लागतात. त्यावेळी डेथ बिकम्स हर मधल्या. मेरिल स्ट्रीप ची हमखास आठवण येते !
कुठला प्रसंग आहे हा..
कुठला प्रसंग आहे हा.. अमेरिकेतला का भारतातला?
एकूण एखाद्या गावात व्हिलन
एकूण एखाद्या गावात व्हिलन अचानक उगवायच्या आधी सगळे लोक आपआपली कामे करत असतात तसे काहीसे वातावरण होते.>>>>>
देसी गाय उल्लेख म्हणजे अमेरिकेतला प्रसंग.
उसगावात माझे ऑफीसमधले लोक पण
उसगावात माझे ऑफीसमधले लोक पण तिकडच्या सलुन मधे जाउन आले की लगेच समजायचं.. इंच इंच करत केस कापायचे .. वाटायचं की उंदीरच डोक्यावरुन फिरलाय
उसगावातल्या पोरी बोटांच्या
उसगावातल्या पोरी बोटांच्या फटीत केस पकडून कापतात त्या प्रकारात केस खरंच एका लांबीचे कापले जातात का ही शंका मला फार दिवसांपासून आहे.
(No subject)
काय हे तिथे सलूनमधे टीव्ही
काय हे तिथे सलूनमधे टीव्ही नसतो! मग निदान टेपरेकॉर्डर तरी? म्हंजे वर्दी, क्रोध,फुटपाथ वगैरे सिनेमे आणि टिसेरिजवालीगाणी नाहीत, मग काईच मजा नाय
मस्त लिहिलयं फारेंडा !
मस्त लिहिलयं फारेंडा ! बिचार्याचा फुकट गोटा झाला
चिमण ते पोरीच्या बोटावर अवलंबुन असेल !
विनोदी आहे .. >> त्यात एखादी
विनोदी आहे ..
>> त्यात एखादी 'एण्णोबडी लाईक' देसी गर्ल आली असती तरी ठीक आहे, पण वीकेंडला दुपारी २ वाजता एखादा देसी गाय सलूनमधे काय पेडिक्युअर करायला जाणार आहे?
एकदम टेचात दिसतो की हा देसी गाय .. नाहीतर माझ्या तरी पहाण्यातले सगळे देसी गाय एकदम आदबशीर वाटतात ..
मी कल्पना कर्तो आहे ह्या
मी कल्पना कर्तो आहे ह्या प्रसंगाची.
आवडले पंचेस
आवडले पंचेस
फारेन्डा पन्चेस मस्त.. थोडं
फारेन्डा पन्चेस मस्त..
थोडं थांबायला हवं होतस..
पुर्ण स्टोरी मिळाली असती की...
थोडं थांबायला हवं
थोडं थांबायला हवं होतस..
पुर्ण स्टोरी मिळाली असती की>>> +१
मस्त लिहीलय
मस्त!
मस्त!
एकूण एखाद्या गावात व्हिलन
एकूण एखाद्या गावात व्हिलन अचानक उगवायच्या आधी सगळे लोक आपआपली कामे करत असतात तसे काहीसे वातावरण होते. >>> हे लई आवडलं !!
भारतात केस
भारतात केस कापतात............. अमेरिकेत केस लेव्हल करतात......
(No subject)
त्याचे केस एकदम सरळ झालेले
त्याचे केस एकदम सरळ झालेले होते>>
भारी किस्सा!!
एकूण एखाद्या गावात व्हिलन
एकूण एखाद्या गावात व्हिलन अचानक उगवायच्या आधी सगळे लोक आपआपली कामे करत असतात तसे काहीसे वातावरण होते. >>>
गुंडांच्या म्होरक्याने "नमस्कार, मी आपली काय मदत करू शकतो?" विचारल्यासारखे झाले.>>>
सलूनातही फारेन्डाचे सिक्सर!
तेच की, काहीतरी बहाणे करून थांबायचे. किमान बाहेर पडून समोरच्या फूटपाथववर थांबून टेहळणी तरी करायची होती!
(No subject)
मस्त रे
मस्त रे
इकडे पाठवा त्याला... इथे फक्त
इकडे पाठवा त्याला... इथे फक्त झिरो कट असतो....>>>>> +१०००
अगदीच.........पहिल्यांदा इथे आलो आणि इथल्या उत्कृष्ट (?) पाण्याने आपले प्रताप दाखवले.......:अओ:
तेव्हा रस्त्यावरच्या एका मुलाकडून केस कापायचं यंत्र विकत घेतलं.....आणि मीच कापले नवर्याचे केस.......
नंतर पुढच्या वेळी सलोन मध्ये गेलो तेव्हा नवरा फक्त तिथल्या माणसासमोर बसला आणि हाताने कात्रीची खूण करून तोंडाने "कार्ताव" असा म्हणाला......लगेच काम सुरु....आणि भयानक प्रकार म्हणजे झीरो मशीन मारायच्या ऐवजी त्या माणसाने ब्लेड नी क्लीन करायला सुरुवात केली.......:अओ:
तरी बरं नवर्याने शक्य ती सगळी "टोचण्स" मारून घेतली होती यायच्या आधी...!!!
फारेंडा, मस्त जमलेत सर्व
फारेंडा, मस्त जमलेत सर्व पंचेस
पूर्ण स्टोरी लिहायला हवी होतीस पण... अजून जबरा झाली असती...
सही रे. तिकडं पहिल्यांदा
सही रे.
तिकडं पहिल्यांदा केस कापणं हा खरंच एक अनुभव असतो. नंतर सवयीने कळायला लागतं काय सांगायचं ते
सलून मधली ती मुलगी तिच्या
सलून मधली ती मुलगी तिच्या कामाला लागली
सलून मधली ती मुलगी
मुलगी
मुलगी
मुलगी
.
.
.
.
अहो दादा आधी डिसक्लेमर तरी लावा.. की तुम्ही इकडचे नाहीत.. पहिला लाईनीलाच गारठलो ना आमी..
काहीतरी कारण काढून थांबायचं
काहीतरी कारण काढून थांबायचं होतं रे आणखी जरा वेळ.
मस्त वर्णन केलंय. छान भट्टी
मस्त वर्णन केलंय. छान भट्टी जमली होती.. जरा अजून रेंगाळता आलं असतं तर अनुभव पूर्णत्वाला गेला असता. आपलं संपायच्या आत वेटरनं डिश उचलून न्यावी तसं झालं.
आवड्या रे.
आवड्या रे.
मस्तच रे. थोडावेळ थांबायला
मस्तच रे. थोडावेळ थांबायला हवे होतेस
Pages