कधी तरी कोणाच्या तरी अवेळी जाण्याची बातमी आपण पेपर मधे वाचतो
हळहळतो, लाईफ इज अनसर्टन म्हणतो. एक उसासा टाकतो. पुन्हा रोजच्या गतीने श्वासोच्छ्वासाची लय पकडून आपला मार्ग चालू लागतो
आपल्या मागे आपल्या कुटूंबाची सोय करुन ठेवायला हवी ह्या जाणीवेने कुठल्या कुठल्या पॉलीसीज घेतो. फायनान्सची कॅलक्युलेशन्स करतो. पुन्हा एकदा आपला पेस पकडून चालायला लागतो
हजारोंच्या की लाखोंच्या संख्येने रोज कोणी ना कोणी कुठच्या ना कुठच्या जीवघेण्या आजाराशी झुंजत असतो. डॉक्टर "डोनर" कोणी मिळाला तर जगायचे क्षण वाढतील असं निदान करतात. जेव्हा आपण किंवा आपलं कोणी त्या जागी असतं तेव्हा "डोनर" मिळवायला आपण जीवाचं रान करतो.
लाईफ इज अन्सर्टन पुन्हा एकदा जाणवून जातं
जगात अमुक इतके अंध आहेत, अमुक इतकी लोकसंख्या आहे. अमुक इतक्यांनी नेत्र दान केलं तर तमुक इतक्या दिवसात जगातलं अंधत्व लोप पावेल अशा अर्थाचे इमेल्स फ़ॉरवर्ड वर फ़ॉर्वर्ड करतो
मला ठावूक आहे तुम्हालाही हे ठावूक आहे की असं इमेल्स फ़ॉरवर्ड करुन काही होत असतं तर आत्ता पर्यंत बरच काही झालं असतं
तरीही आपण ते करतो. का?
कारण कधी तरी कोणीतरी आपल्यासारखाच वेडा विचार करणारा ते वाचेल. कदाचित तो ही ह्या माहीतीच्या शोधात असेल जसे आपण होतो. आपल्याला जसा फायदा झाला त्या एका इमेलचा/ त्या एका लेखाचा तसा तो त्या व्यक्तीलाही होईल.
१० मधल्या ५ जणांनी नुसतच डिलिट केलं, ३ जणांनी तुम्हालाच वेड्यात काढलं तरी एखाद दोन तर असतील ज्यांना ही पायवाट चालून बघावी वाटेल
त्या एक दोघांसाठी आपण ते इमेल फ़ॉरवर्ड करतो/ अनुभव लिहितो
तर आत्ता पर्यंतच वाचून हे कळलच असेल की हे लिहिण्याचा प्रपंच त्या एक दोघांसाठी आहे. तेव्हा बाकीच्या इग्नोर मारणाऱ्यांनी, डिलिट करण्याच्या मुडात असणाऱ्यांनी आणि खिल्ली उडवण्याच्या बेतात असणाऱ्यांनी इथेच रामराम म्हणायला हरकत नाही :फ़िदी:
झोनल ट्रान्सप्लान्ट को ऑर्डिनेशन सेंटर (मुंबई) ही संस्था ऑर्गन डोनेशन वर काम करते. जसं नेत्र दान करता येतं, तसच हृदय, यकृत, किडनी, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, फुफ्फुस, आणि त्वचा दान देखील करता येतं.
अर्थात वरील पैकी त्वचा आणि नेत्र दान सोडता बाकीच्या गोष्टी ब्रेन डेड अवस्थेतील पेशंट्च दान करु शकतो
किडनी, यकृताचा काही भाग हा जीवित व्यक्ती देखील दान करु शकते पण त्यासाठीचे नियम वेगळे आहेत.
आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल?
असे केल्यानंतर देखील तुमच्या पार्थिवाचे तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यसंस्कार करता येतात तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही हा विचार मनात येत असेल तर त्याच उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असच आहे
मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरले तरी काही ठरावीक केसेस मधे ती इच्छा पुर्णत्वास नेणे अशक्य होते (जसं माझे वडील कॅन्सर पेशंट होते म्हणून त्यांचे नेत्रदान शक्य झाले नाही तसच माझ्या सासऱ्यांचे देखील शरीरात इन्फ़ेक्शन पसरल्यामुळे शक्य झाले नाही). तरी देखील आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे केव्हाही योग्यच.
डोनर कार्ड हे साधारण असे दिसते
आपल्या पैकी कोणाला जर ह्या विषयी अधीक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा त्या संस्थेचा पत्ता
झोनल ट्रान्सप्लान्ट को ऑर्डिनेशन सेंटर
एल टी एम जी इस्पितळ, कॉलेज बिल्डींग
रुम नंबर ए/२९, त्वचा बॅन्केच्या जवळ
सायन (प.) मुंबई - ४०० ०२२
वेबसाईट: www.ztccmumbai.org
इमेल: organtransplant@ztccmumbai.org
फोन: 24028197/ 9167663468/ 69
वेळ: सोमवार ते शुक्रवार - सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
शनिवारी - सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत
सोबत त्यांचे पत्रक जोडत आहे
इब्लिसराव आम्हाला बिलकुल
इब्लिसराव आम्हाला बिलकुल माहिती नसलेल्या जगाचा खजिना आहे तुमच्याकडे, व्यनी तुन कशाला चर्चा.
तसे ही मनात कधीतरी, कुठेतरी रुतुन बसलेले गैरसमज, नाना शंका कुशंका निरसन होइल आपोआप.
अधिक माहिती आली तर चांगलीच आहे की.
अर्थात स्पेसिफिक प्रश्नोत्तरे व्यनी, विपुतुन होउदेत.
जनरल माहिती तुम्ही लेखमालेद्वारे लिहा अशी विनंती.
इब्लिसजी .....तुमच्या सगळ्या
इब्लिसजी .....तुमच्या सगळ्या पोस्टी अतिशय माहितीपुर्वक आणि सुरेख तसेच झकासरावानी सांगितल्या प्रमाणे जनरल माहिती तुम्ही लेखमालेद्वारे लिहा अशी विनंती, पुन्हा एकदा धन्यवाद
इब्लिस, धन्यवाद! खरं तर
इब्लिस, धन्यवाद! खरं तर गेल्या वर्षी पासुन मी हा विचार करत होते. आपल्या देहाचा जर कुणाला उपयोग होत असेल तर..... त्यावर विचार , दुसर्यांशी बोलणे हे चालु आहे. तुम्हांला याची खुप माहिती आहे म्हणुन तुम्हाला शंका विचारल्या. तुमच्या माहितीचा खुप उपयोग झाला...म्हणजे हा विचार जास्त बळकट झाला. धन्यवाद!
सर्वांचे
सर्वांचे आभार!
नेत्रदानासंबंधी एक दोन महत्वाच्या बाबी लिहायच्या राहून गेल्या, त्या लिहित आहे.
१.
एक मनुष्य २ डोळे दान करतो.
त्याने एकाच वेळी २ अंधांना दृष्टि मिळते.
(रुग्ण दोन्ही डोळ्यांनी अंध असला, तरीही अशा दोन अंधांचे ऑपरेशन करून एक-एक डोळा 'सुरू करण्याचा' प्रयत्न असतो.)
२.
तरूण वयात मृत्यूचे प्रमाण कमी असते, व दानाचे प्रमाण अजूनी कमी आहे.
कॉर्निया ब्लाईंडनेसमधे, फक्त कुपोषणामुळे अंध झालेल्या मुलांचे प्रमाण फार मोठे आहे. या लहान मुलांना ६०-७० वर्षे वयाच्या कॉर्नियाचे कलम अधिक उपयुक्त, की अपघाताने तारुण्यात आपल्याला सोडून जाणार्या कुणाचे?
तुम्हीच ठरवा, अन 'अशा' घटनेच्या वेळी नेत्रदान सुचवून पहा. तरूण डोळ्याचे कलम जगण्याची शक्यता खूपच जास्त असते..
(महत्वाचे अधिक काही अठवले, तर इथे नक्की लिहीन.)
एखाद्याला ठराविक ओळखीच्याच
एखाद्याला ठराविक ओळखीच्याच अंध व्यक्तीला डोळे दान करायचे असल्यास तसे करता येते का? ईब्लिस यांनी दिलेल्या माहितीवरून वाटते की असे करता येत नसावे. पण अशी परवानगी असल्यास रुग्णाचे नातेवाईक त्या त्या रूग्णासाठी दान करण्याची शक्यता अधिक वाटते. लोकांना नेत्रदानासाठी आवाहन करणे योग्यच आहे पण असे ओळखीतून रुग्णाला डोळे मिळणे जास्त लवकर शक्य होईल असे वाटते.
इब्लिस, धन्यवाद. उपयुक्त
इब्लिस, धन्यवाद. उपयुक्त माहिती. माझ्या आई-बाबांनी कालच नेत्रदानाचा फॉर्म भरला आहे, तुमची परवानगी असेल तर त्यांना व इतर जवळच्या नातेवाईकांना तुम्ही दिलेली माहिती पाठवली तर चालेल का?
डेलिया | 24 October, 2012 -
डेलिया | 24 October, 2012 - 08:05 नवीन
एखाद्याला ठराविक ओळखीच्याच अंध व्यक्तीला डोळे दान करायचे असल्यास तसे करता येते का? ईब्लिस यांनी दिलेल्या माहितीवरून वाटते की असे करता येत नसावे. पण अशी परवानगी असल्यास रुग्णाचे नातेवाईक त्या त्या रूग्णासाठी दान करण्याची शक्यता अधिक वाटते. लोकांना नेत्रदानासाठी आवाहन करणे योग्यच आहे पण असे ओळखीतून रुग्णाला डोळे मिळणे जास्त लवकर शक्य होईल असे वाटते.
<<
डेलिया ताई,
नीट वाचून पहा बरं हे काय लिहिलं आहे तुम्ही? अहो, हे रक्तदान वा किडनीसारखे जिवंतपणी द्यायचे दान नाही. हे दान देण्यासाठी दात्याला 'वर' जावे लागेल 'जास्त लवकर.'
***
@ रेवू | 24 October, 2012 - 10:53
अहो नक्कीच चालेल. जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल तितके चांगले.
डायबेटिस असलेला पण डोळे
डायबेटिस असलेला पण डोळे व्यवस्थित असलेला नेत्रदान करु शकतो का?
उपयुक्त धागा, उपयुक्त
उपयुक्त धागा, उपयुक्त माहिती..
इब्लिस, विशेष धन्यवाद
डेलिया ताई, नीट वाचून पहा बरं
डेलिया ताई,
नीट वाचून पहा बरं हे काय लिहिलं आहे तुम्ही? अहो, हे रक्तदान वा किडनीसारखे जिवंतपणी द्यायचे दान नाही. हे दान देण्यासाठी दात्याला 'वर' जावे लागेल 'जास्त लवकर.' >>
हे आलेय लक्षात ईब्लिस दादा. पण तरीही नात्यात एखादा रूग्ण असेल तर आपल्या मृत्युनंतरच त्याला दान करता येऊ शकतात की नाही डोळे , असे विचारयचे होते. एखाद्याच्या मृत्युसमयी असा विचार करणे थोडे विचित्र आहे पण अंध रूग्णाच्या नात्यातीलच कोणी व्यक्ति असेल मृत्युच्या दारात तर हे असे दान होऊ शकते का ?
http://donatelifeindia.org/ab
http://donatelifeindia.org/about-organ-donation/myths-faqs/ इथे ऑनलाईन अवयवदानाचा फॉर्म भरता येतो. संस्थेविषयी काही माहित नाही. सर्फिंग करताना साईट दिसली. तिथे फॉर्म भरला त्यानंतर असे कार्ड मिळते
प्रकाश घाटपांडे, आपली
प्रकाश घाटपांडे, आपली वैयक्तिक माहिती कशाला प्रसिध्द करता? ती लपवुन मग तुमचे काडे दाखवा.
विद्याक, माझा आतापर्यंत
विद्याक, माझा आतापर्यंत आंतरजालावरील इतिहास व व्यक्तिमत्व पारदर्शी आहे. मला त्यात काही गैर वाटत नाही. अथवा दुरुपयोग होईल असे भयही वाटत नाही.ऑन लाईन फॉर्म भरल्यावर सदर कार्ड कसे दिसते एवढेच सांगण्याचा हेतु त्या मागे आहे. काही काळ मी ते दृष्य ठेवणार आहे.
ही रुबी हॉल क्लिनिक ची बातमी
ही रुबी हॉल क्लिनिक ची बातमी पहा. अवयवदाना संबंधी कसे गैर प्रकार चालतात.
http://abpmajha.newsbullet.in/pune/110-more/35056-2013-10-01-15-21-04
एकदा (१०-११ वर्षांपुर्वी असेल) अंनिस मधे एक लातूर भागातुन महाविद्यालयीन तरुण आला होता. त्याने त्याच्या वडिलांच्या किडनी बाबत सत्यसाईबाबाच्या पुट्टीपुर्ती येथील हॉस्पीटलमधील घटना सांगितली होती. त्याच्या वडिलांना किडनीचा प्रॉब्लेम असल्याचे सांगण्यात आले. नंतर त्याला किडनी डोनेट करण्याविषयी सांगितले. त्याने तसे केले. जवळपास वर्षभर तो सत्यसाईबाबांच्या आश्रमात सेवेत होता. हॉस्पिटल मधील उपचार मोफत होते. वडिलांना काही बरे वाटेना!लवकरच तो घरी परत आला. त्याचे वडिल शेवटी निवर्तले. त्यांना पुरले.शंकेची पाल मनात होती. मग काही सुजाण डॉक्टरांच्या मदतीने उकरुन परत पोस्टमॉर्टेम केले असता त्यांच्या एक्सरे त एकच किडनी दिसली.म्हणजे त्याची एक व वडिलांची एक किडनी हॉस्पिटल मधे काढून घेण्यात आली होती.त्याने कायदेशीर लढा दिला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.कोर्टाचा जजच सत्यसाईबाबाचा भक्त निघाला. ही सत्यकथा चित्रलेखाच्या अंकात त्यावेळी आली होती. कुणाला अंक मिळाला तर जरुर शेअर करावा.
अशा अजुन किती केसेस असतील ते सत्यसाईबाबांचा परमेश्वर जाणे!
अशा प्रकारांमुळे अवयवदान चळवळीवर मोठा परिणाम होतो. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी स्वतः अवयवदान करुन आदर्श निर्माण करणे अपेक्शित आहे. तसे मला दिसले नाही.
अवयव दानाने आपण मेल्यानंतर
अवयव दानाने आपण मेल्यानंतर सुद्धा अवयवरुपाने जिवंत राहतो. किती छान कल्पना आहे!
अर्थातच मी संपूर्ण देहदानाची इच्छा माझ्या मृत्यूपत्रात व्यक्त केली आहे. शेवटी जवळचे नातेवाईक या गोष्टीकडे कसे बघतात यावर सर्व अवलंबून आहे. पण ते तरी मृत व्यक्तीची इच्छा का म्हणून टाळतील?
पण ते तरी मृत व्यकतीची इच्छा
पण ते तरी मृत व्यकतीची इच्छा का म्हणून टाळतील?..............नाईलाजाने म्हणावे लागते की सुशिक्षित वगैरे असणारी मंडळीही,मृत व्यक्तीच्या अवयवदानाविषयी उदासीन असतात.इतर नातलगांचा रोष म्हणा किंवा प्रवाहाविरुद्ध जाण्याची तयारी नसते.
>>पण ते तरी मृत व्यकतीची
>>पण ते तरी मृत व्यकतीची इच्छा का म्हणून टाळतील?<<
ना.ग.गोरे यांची देहदानाची इच्छा ही त्यांच्या मुलीने नकार दिल्याने अपुरी राहिली असे पुरोगामी लोक सांगतात. अंत्यसंस्कार केल्याने मृतात्म्याला शांती मिळते हा समज कदाचित कारणीभूत असावा.
माझ्या नातेवाईकात एकीने
माझ्या नातेवाईकात एकीने देह दान केले आहे ......पण त्याचा आपल्याला फारच त्रास होतो हे नक्की ...... आपल्या लाडक्या प्रिय व्यक्तीचे ( देहाचे) मेडिकल कोलेज मधे अता काय काय होत असेल आणी किती दिवस तो देह रहणार ?? असे अनेक विचार सारखे सारखे मनात येत रहातात ...कुणास ठाउक कुणाला मधे जाउन पहायची इच्छा झालिच तर काय भयानक सत्याला सामोरे जावे लागेल .... .अर्थात आम्ही त्या व्यक्तीची इच्छा होती म्ह्णुनच असे केले ....
दुसरी बाजु आशी आहे की -- कोलेज ने आमचे खुप खुप कौतुक आभार मानले. जमतिल ते अवयव Transplant करुन गरजु पेशन्ट चे भले केले . हे समाधान नक्कीच आहे...
>>दुसरी बाजु आशी आहे की --
>>दुसरी बाजु आशी आहे की -- कोलेज ने आमचे खुप खुप कौतुक आभार मानले. जमतिल ते अवयव Transplant करुन गरजु पेशन्ट चे भले केले . हे समाधान नक्कीच आहे...<<
देहदान व अवयवदान या गोष्टी वेगळ्या आहेत.
प्र घा --- कबुल ....पण देह पण
प्र घा --- कबुल ....पण देह पण कुणाला तरी ( अभ्यासा साठी ) उपयोगी पडतोय ना ...असा विचार आहे त्या मागील ....
निर्मला सामंत- प्रभावळकर
निर्मला सामंत- प्रभावळकर यांनी आपल्या मुलीचे अवयवदान करुन एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या धैर्याला सलाम
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/help/articlesh...
निर्मलाताई सामंत-प्रभावळकर
निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांनी अवयवदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यांचे मनोगत वाचा
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Nirmala-Samant...
महारष्ट्र टाईम्स अवयवदाना
महारष्ट्र टाईम्स अवयवदाना बाबत विशेष जागरु आहे असे दिसते. माहिती व तंत्रज्ञान युगात ब्रेन डेड पेशंटच्या संकलित नोंदीचा अभाव ही बातमी वाचली तेव्हा आश्चर्य वाटले.वैद्यकीय क्षेत्रातच याविषयी जागृती नाही तर लोकांमधे ही चळवळ रुजणार कशी?
अवयवदान चळवळीतून प्रेरणा घेउन
अवयवदान चळवळीतून प्रेरणा घेउन केलेल्या एका अवयवदानाची बातमी
...म्हणून केले अवयवदान
_/\_ ह्याची माहिती प्रत्येक
_/\_
ह्याची माहिती प्रत्येक सरकारी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी अश्या ब्रेन डेड पेशंट्सच्या नातेवाईकांना दिली पाहिजे.
सिंपल कारण म्हणजे नेत्रपेढी
सिंपल कारण म्हणजे नेत्रपेढी सुरू करणे व सुरू ठेवणे यासाठी डॉक्टरला स्वतःच्या डोक्याला करून घ्यावा लागणारा ताप व संताप. >>>
हो ना. मग इतर अवयवांच काय ? त्यांना कसं preserv करून ठेवणार ? आणि नक्की कोणत्या संस्थेमार्फत दान करावं ? ते गरजून पर्यंत पोहचेल ह्याची काय खात्री ? नाहीतर अश्या संस्थांना धंदा करायला फुकटात किडन्या मिळायच्या कि
जीर्ण वस्त्र असेच म्हणते ना नश्वर देहाला>>
म्हणतात खरं. पण फाटक्या चिंधी सुधा जपून ठेवणारे असतातच कि . मग ज्या देहा सोबत इतकी वर्षे काढलीत त्याची चिरफाड झालेली काहींना आवडत नाही . तेव्हा जिवंत पणी देह दानाची इच्छा व्यक्त केली असेल तरच त्या माणसाचे देहदान करावे . स्वताच्या मनाने करू नये .
पुण्यात ही आता झेडटीसीसी आहे.
पुण्यात ही आता झेडटीसीसी आहे. त्याच्या समन्वयक या आरती गोखले आहेत. त्या जनजागृतीचे काम करतात.
http://www.ztccpune.com/
इब्लिस
इब्लिस
या विषयावर पुढे कोणतीच चर्चा किंवा कोणताच प्रतिसाद दिसत नाहीये.
www.mohanfoundation.org
www.mohanfoundation.org
Tol Free : 18001037100
अवयवदान संबंधी याेग्य माहिती
अवयवदान संबंधी याेग्य माहिती मीळाली. परंतु जे अवयव दान करताे त्या बद्दलची माहिती गाेपणिय का ठेवली जाते? अशी माहिती गाेपणिय ठेवल्यास. त्याचा सर्रास गैरवापर हाेऊ शकताे
Pages