झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.
जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.
अँकर - गायक - जावेद अली.
ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.
लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.
२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.
३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.
४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.
५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.
६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा.
७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.
८. शहनाझ अख्तर.
९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.
१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.
११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.
पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की
अय्या! इश्श! मी
अय्या! इश्श! मी पहिली.
जसराजचा ओवर कॉन्फीडन्स नडणार बहुधा........
बाकी, सुरुवात तरी चांगलीय..
ताई, वर हेडरमधे भारतातली/
ताई, वर हेडरमधे भारतातली/ भारताबाहेरची वार-वेळ पण द्या.
मी फक्त विश्वजीतचं एक गाणं ऐकलंय, तसाही तो मराठी सारेगमपपासून आवडतोय, त्यामुळे बाकीच्यांची गाणी ऐकेपर्यंत तोच आपला आवडता
जसराज जोशी का कोण जाणे पण अजिबात आवडत नाही.
वेळ मलाच शोधावी लागेल ,
वेळ मलाच शोधावी लागेल , बघते.
आज जितक्या वाहिन्यांवर
आज जितक्या वाहिन्यांवर रिअॅलिटी शोज चालू आहेत त्यातली कुठलीही वाहिनी झी च्या सारेगमप च्या जवळपास जाऊ शकत नाही. अगदी गजेंद्रसिंहलाही दुस-या वाहीनीवर ते जमलेलं नाही. झी लाच नेहमी दर्जेदार स्पर्धक का आणि कसे मिळतात हे काही कळत नाही. अर्थात कित्येक गुणी गायक थोड्याफार फरकाने डावलले जातात.. पण स्पर्धा म्हटल्यावर हे सगळं आलच.
संपदा.. तू लिहिलं आहेस तसंच
संपदा.. तू लिहिलं आहेस तसंच झालं तर चांगलंच आहे. पण दुर्दैवानी गाण्यांची निवड ही कार्यक्रमाच्या टीआरपी वर आधारित असल्याने चांगली गाणी ऐकायला मिळतीलच अस नाही.. काही काही अगदीच टुकार गाणी नक्कीच ऐकायला लागरील...
पुढच्या आठवड्यात पं. जसराज आहेत बहुतेक. तेव्हा जरा बरी गाणी असतील.
बरोबर हिम्सकूल.
बरोबर हिम्सकूल. सुरुवातीपासूनच ऑडियन्स पोल घेणं हे मला खटकलं आहे. पुढे काय होते ते बघूया
ते सुरूवातीपासून ऑडियन्स पोल
ते सुरूवातीपासून ऑडियन्स पोल (अगदी ऑडिशनलादेखील) काही झेपलं नाही.
पण जजेस चांगले आहेत. एक जज नॉन फिल्मी असल्याने अजून चांगले वाटले. शंकर महादेवनबद्दल प्रश्नच नाही. साजिद वाजिद थोडे आगाऊ वाटतात.
स्पर्धकांची तयारी जोरात आहे असं वाटलं.
मृण्मयी तिरोडकर आणि तो
मृण्मयी तिरोडकर आणि तो गुवाहाटीचा गायक हे दोघे राहिले वरच्या यादीत..
मंजू.. जसराज जोशी मलाही आवडत नाही.. पण त्याचा सध्याचा परफॉरमन्स चांगलाच सुधारला आहे.. तो शाळेत असल्यापासून त्याचे गाणे ऐकतोय मी.. घरीच गाणे असल्याने तो जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्ट वाटतो.
कुणाल पंडितने गायलेलं मौला
कुणाल पंडितने गायलेलं मौला मौला ने मन बाग बाग केलं... छान गायला..
मृण्मयी मला स्वतःला आवडत
मृण्मयी मला स्वतःला आवडत नाही आणि पद्मनाभ ऑनिक वगैरेंसारखा वाटला, म्हणून वरच्या लक्षात राहणार्यांच्या यादीत ते दोघे नाहीयेत :फिदी:. पुढे जाऊन जर ते दोघे फार छान गायला लागले तर अॅड करेन.
झी लाच नेहमी दर्जेदार स्पर्धक
झी लाच नेहमी दर्जेदार स्पर्धक का आणि कसे मिळतात हे काही कळत नाही>> +१..
इन्डियन आयडॉल मध्ये डामडौल मोठा पण स्पर्धक फुस्स..
फक्त पहिल्या सीजनमध्ये ठीकठाक स्पर्धक होते.
पारुल मिश्रा- कच्चा दुवा
पारुल मिश्रा- कच्चा दुवा वाटतेय कालच्या गाण्यावरुन!
पद्मनाभ तर मला ही नाही आवडला.
पद्मनाभ तर मला ही नाही आवडला. जुगनी जी गाणारी अर्शप्रीत जबरी वाटली मला.
<झी लाच नेहमी दर्जेदार
<झी लाच नेहमी दर्जेदार स्पर्धक का आणि कसे मिळतात हे काही कळत नाही.>
कलर्स-सहारा वन वरच्या 'सूरक्षेत्र' मधले स्पर्धक चांगले तयारीचे वाटतात. यशराज कपिल आणि दिलजान या भारतीय , तसेच काही पाकिस्तानी स्पर्धकांचे गाणे छान आहे. हिंदीचित्रपटगीतंबरोबरच गैर-फिल्मी गाणीही ऐकायला मिळतात.
पण या कार्यक्रमाचा फॉर्मॅट तापदायक आहे. अँकरचे संवाद लिहून दिले जात नसल्याने कदाचित, आयेशा टाकिया फार काही बोलत नाही
आयेशा टाकिया फार काही बोलत
आयेशा टाकिया फार काही बोलत नाही >> आयेशा आझमी प्लीज. (मी नाही म्हणत तिनेच एका टीव्ही चॅनलवरच्या मुलाखतीत म्हटले होते. असो.)
मृण्मयी तिरोडकर << मराठी सारेगामा मधली का?
यशराज कपिल इंडियन आयडोलमधे पण होता ना?
संपदा, थँक्स. मी वाट बघत
संपदा, थँक्स. मी वाट बघत होते कि कोणी सारेगम साठी धागा चालु करतं आहे का?
मी जसराज आणि विश्वजीतचा सिटी लेवल सिलेक्शनचा एपिसोड फक्त पाहिला. दोघंही सहीच आहेत.
जसराजचं 'लंबाडा' मधलं 'केतकी गुलाब जुही' भन्नाट मस्त होतं. तेव्हापासुन मी त्याची फॅन आहे. सिलेक्शन राउंडला त्याने 'उर्वशी उर्वशी' नंतर राग मधुवंती गायला, तेव्हाच मी त्याला विनर ठरवुन टाकलं. विश्वजीत बोरवणकर माहित नव्हता. पण त्याने गायलेलं 'सपनोंसे भरे नयना' पण प्रचंड आवडलं. बाकी २-३ गझल गायक आणि ती बार्बी गर्ल सिलेक्शन राउंडला आवडले होते. त्यांचं पुढे काय झालं माहित नाही.
सिलेक्शन राउंडनंतर एकुणच एक ढोबळ मत बनलं कि राजस्थानी कलाकार फार सुंदर गातात.
मने, विश्वजीतची तयारी बघायची
मने, विश्वजीतची तयारी बघायची असेल तर झी मराठी वरच्या २०११ च्या सारेगमपचे एपिसोड्स युट्यूबवर पहा. तो त्या पर्वाचा विजेता होता
विश्वजीत इम्प्रेसिव्ह.
विश्वजीत इम्प्रेसिव्ह.
प्रत्येक जज डोक्यात गेला व जातो.
यापेक्षा फक्त सचिन वाईट जज असू शकतो (भले नृत्यातला असो)
नक्की बघेन, संपदा. फारच मस्त
नक्की बघेन, संपदा. फारच मस्त आवाज आहे त्याचा. त्याचं 'सपनोंसे भरे नयना' ऐकुन शहारे आले होते. फार जबरदस्त वाटला मला त्याचा आवाज.
पुर्वी रिजनल सारेगम मधे जिंकलेल्या कलाकारांना हिंदी सारेगमच्या फायनल १० मधे डायरेक्ट एंट्री मिळायची. त्यामधे झी मराठी विनर अभिजीत कोसंबीचा सॉल्लीड मामा झाला होता. माझ्या ऑफिसमधे माझ्या बेंगॉली मैत्रिणीने झी मराठीची फार टर उडवली होती. तेव्हा तिच्या कोलकत्याचा विनरपण फायनल १० मधे होता आणि फारच सही गायचा तो. यावेळी मराठी सारेगममधुन इतक्या तयारीचा कलाकार उतरला आहे त्यामुळे विश्वजीतच्या आवाजाचं आणि गाण्याचं मला जास्तच कौतुक वाटलं. शोधते आता याला युट्युबवर.
विश्वजीत चांगला असला तरी मी लंबाडा फेम जसराजचीच फॅन.
आज जितक्या वाहिन्यांवर
आज जितक्या वाहिन्यांवर रिअॅलिटी शोज चालू आहेत त्यातली कुठलीही वाहिनी झी च्या सारेगमप च्या जवळपास जाऊ शकत नाही>
अनुमोदन.
आयेशा टाकिया फार काही बोलत नाही >>
काहीच न समझल्या सारखी नुसतीच हसत असते.
यावेळचे गायक मस्त आहेत
यावेळचे गायक मस्त आहेत सारेगामा मधे. विश्वजीत आवडला. जसराज पण मला तरी आवडला. अॅटिट्युड आहे, डोक्यात हवा गेली तर आउट होउ शकतो. शिवाय त्यचे फ्युजन म्युझिक पब्लिक ला काही झेपणार नही असं वाटतं!
माधुरी सुंदर गायली. अर्शप्रीत, रेणू पण मस्त. झैन आवडला. बहुतेक गायक प्रचंड तयारीचे आहेत.
मला मृण्मयीचा आवाज गोड वाटला पण इतरांच्या मानाने तयारी तितकी नाही असे वाटले.
शंकर महादेवन खूप सेन्सिबल बोलतो. राहुल राम चे अजून काही कलले नाहीत गुण! साजिद वाजिद मधे वाजिद त्यातल्या त्यात बरा, साजिद एकदमच छपरी!
मजा येणार या सीझन ला हे नक्की.
आज जितक्या वाहिन्यांवर
आज जितक्या वाहिन्यांवर रिअॅलिटी शोज चालू आहेत त्यातली कुठलीही वाहिनी झी च्या सारेगमप च्या जवळपास जाऊ शकत नाही. अगदी गजेंद्रसिंहलाही दुस-या वाहीनीवर ते जमलेलं नाही
<<< +++++ १ :).
फक्त यात 'झी हिंदी सारेगमप' अॅडिशन हवी :).
अशप्रीत आणि माधुरी डे जबरदस्तं !
बाकी गायक ही चांगलेच आहेत.. यावेळी सोनु निगम च्या काळातल्या सारेगमप चा जमाना परत आणाणे झी चा मुख्य उद्देश वाटतोय :).
होस्ट जावेद अलीला बोलण्याची कला आहे किंवा नाही हे अजुन तरी दिसले नाहीये पण उत्तम गायक होस्ट असणे (मनीष पाल सारखा फालतु पणा न करणारा) हीच एक चांगली सुरवात आहे !
क्लासिकल गाणार्या त्या अमन ला पब्लिक ने ६२% दिल्यावर समजलच कि प्युअर क्लासिकल बन्दिश वाल्यांना पब्लिक कसा न्याय देणार ते :(.
मी अत्ताच फॉलो करायला सुरवात केलीये त्यामुळे इतरांचे आवाज नाही ऐकले.
माझ्या दृष्टीने स्पर्धा
माझ्या दृष्टीने स्पर्धा संपली.
विजेते
१. शेहनाज अख्तर
२. विश्वजीत बोरवणकर
३. रेणू नागर
उत्तेजनार्थ
१. जसराज जोशी
२. अर्शप्रीत
३. कुणाल पंडित्/जाझ्म
अरे वा, सुरु झाला का नवा
अरे वा, सुरु झाला का नवा सिझन!
जसराज खु ति गु मध्ये आवडला नव्हता. काही काही गाणी बरी गायली होती, आणि काही अगदी बेसूर. होपफुली आता सुधारला असेल.
सुरुवातीचे ४-५ गळले की पाहायला सुरुवात करेन. बाकी चांगल्या गाण्यांच्या लिंक्स इथे देत जा लोक्स म्हणजे तेवढी पाहता येतील.
बाकी, एकच पाकी आहे का ह्या वेळेला?
हे युट्युब वर आहे का? कधी
हे युट्युब वर आहे का? कधी सुरु झाले?
यु-ट्युब वर असेलच. इथे सर्व
यु-ट्युब वर असेलच. इथे सर्व भाग बघायला मिळतील
http://www.desi-tashan.com/category/tv-serials/zee-tv/sa-re-ga-ma-pa-2012/
महागुरु धन्यवाद ! आता सवडीने
महागुरु धन्यवाद ! आता सवडीने बघेन. म्हणजे चर्चेत उतरता येईल.
तो झैन कुठल्या शहरातून आला?(
तो झैन कुठल्या शहरातून आला?( दिल्ली तून का?)
मला वाटलेले ह्यावेळेला फक्त भारतातल्या राज्यातून घेत आहेत गायकांना...
असो. पण बरा वाटला.
जसराजचे सूर फाटतात मध्ये मध्ये....
खाली बसला की बरे लागतात खालचे सूर.
यंदा जबरदस्त तयारीचे गायक
यंदा जबरदस्त तयारीचे गायक आहेत. मजा येणार
मला सगळ्यात जास्त आवडलेले गायक म्हणजे......
माधुरी डे
विश्वजीत बोरवणकर
जसराज..... वर म्हणालात तसं.......ओव्हर कॉन्फिडन्स नसला तरच.
अर्शप्रीत
जावेद अलीचे अँकरींग जरा
जावेद अलीचे अँकरींग जरा "विविधभारती" स्टाईल वाटते.... आणि म्हणूनच कदाचित आवडतेय
Pages