सा रे ग म प २०१२

Submitted by संपदा on 22 October, 2012 - 03:06

झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.

जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.

अँकर - गायक - जावेद अली.

ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.

लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.

२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.

३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.

४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.

५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.

६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा. Happy

७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.

८. शहनाझ अख्तर.

९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.

१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.

११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.

पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे तरी वाचल कि गुरदास मान आहे नेक्स्ट जज , म्हणजे पंजाबी लोकसंगीत गाणारे अर्शप्रीत -झेन बहुदा नाही करण्स्र एलिमिनेट !
गुर्दासनान कशाला येतोय काय माहित Sad , आधी एवढे दिग्गज पं जसराज - परवीन सुल्ताना वगैरे होते !

आज अमान आणि कुणाल ला काढलं :(.
मोहम्मद अमान मुळे या शो ला वेगळीच लेव्हल आली होती , त्याच्या एलिमिनेशन चा निषेध !
It wasn't best of Aman today but 1000 times better than Jazim , Arshprest , Vishwajeet , Padmanabh !
Even Kunal has potential and didn't deserve getting eliminated :).
असो , जसराज रॉक्स !!
माधुरीही चांगली गायली.
I hope the show doesn't lose dignity and not taking U turn by doing just film promotions !
Next guests include SRK , Katrina to promote JTHJ :(.

हो ना, अमान ला का एलिमिनेट केलें, प्रेक्षकांचा सपोर्ट पण होता त्याला. बेकार एपिसोड्स या आठवड्यात , आणि रिडिक्युलस एलिमिनेशन्स Sad
कुणालचं गाणं पण छान होतं. ती अर्शप्रीत व्हायला हवी होती एव्हाना एलिमिनेट Sad तसेही गुरुदास मान टाइप दंगा गाण्यावर आधारित काय एलिमिनेश्न करणार होते ! गुरुदास मान ला बोलावले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती! Angry

अमानचे एलिमिनेशन धक्कादायकच .तसे म्हटले तर 'अपेक्षीत 'ही . कावळ्यांच्या सौंदर्यस्पर्धेत राजहंसाला बक्षीस का मिळावे?
कुणालचा आवाज स्मूदिंग आहे पण त्याचा गाण्यात 'जान'नसते. फारच दुर्मुखलेला असतो व त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या (किंवा कोणाच्याही गाण्यात) उतरते.
अशप्रीत विनाकारण टिकून आहे.
विश्वजीत, रेणू,जसराज, मध्ये मारामारी होणार बहुधा.
जाजिम, रेणू , पद्मनाभ, हे शेवटी 'टिपिकल'आवाज म्हणून एलिमिनेट होतील.
विश्वजीत, जसराज व्हर्साटाईल व शास्त्रीय बेसवर वर टिकतील.
जसराज विजेता रहावा हा अंदाज आणि इच्छा .... Happy

जर का ह्या टाईपच्या स्पर्धेत भिमसेनजी, लता, आशा, रफी, किशोरकुमार,खरेखरे जसराज :), किशोरीताई, वगैरे मंडळी असते तर कोण जिंकले असते ? माझ्या मते पहिल्या काही राउंड्समधे सर्व क्लासिकलवाले एलिमिनेट झाले असते व टॉप ३ मधे किशोर, रफी व आशा असते. थोडक्यात काय ...रिअ‍ॅलिटीशो हा हार्ड कोअर गाण्यापेक्षा गाणे + बजावण्यावर जास्त अवलंबून आहे. वर्सटॅलिटी कशाला म्हणायची? भिमण्णा वेगळ्या वेगळ्या मैफीलीत नुसत्या यमनची अनेक रुपे उभी करत ही व्हर्सटालीटी नाही का? कुमारजींची व्हर्सटालीटीची पाहीली तर व्हर्सटालीटी हा शब्दसुद्धा कमी पडेल. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शोकडे गेम शो म्हणून बघावे. क्लासिकलवाल्यांचा गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा असतो. क्लासिकल संगीत ही साधना/धर्म असतो साधकांचा..त्याची स्पर्धा होऊ नाही शकत. देवाची पूजा करण्याची स्पर्धा असल्यासारखे होईल ते. त्यामुळे मनस्ताप व्हायला नको असेल तर क्लासिकल सिंगर्सने तिथे जाऊ नये हेच खरे.

अरेरे, महंमद अमान गेला??? धक्का आहे हा!!!
मोहम्मद अमान मुळे या शो ला वेगळीच लेव्हल आली होती , त्याच्या एलिमिनेशन चा निषेध ! >> +१
कशाच्या आधारावर काढलं म्हणे पण? परिक्षकांना आवडलं नाही का स्टुडीओमध्ये कमी लोकांना आवडलं!
मी आता विश्वजीत आणि जसराज करता पाहणार, बाकी बर्‍याच जणांची गाणी पुढे पळवत.
जॅझिमचं कसं झालं ह्यावेळेला?
सुमेधाव्हीची पोस्ट बरीच पटली.

हे लोक प्रत्येक आठवड्यात दोन दोन मुलांना काढणार आहेत ???
फारच लवकर संपेल मग तर ही स्पर्धा Sad
अमान गेला.......... खरय ........तो ह्या स्पर्धेच्या कितीतरी वर आहे.

अरे असं काय करता? अमान येणार परत wild card ने. Happy (मजा म्हणजे स्पर्धकांना सहसा अवघड गाणे असेल तर त्रास होऊ शकतो पण अमान ला बहुतेक मधुबन फारच सोपे पडत होते गायला म्हणुन त्रास झाला असेल व म्हणुन गेला असेल) Happy

अश्प्रीत ने जुगनी नंतर गायचेच थांबवले आहे. Sad ..

एकुण सुमार गाणी झाली खरी. मला वाटले दिवाळी म्हणुन जरा गायकांना विश्रांती, म्हणुन सुमार कामचलाऊ गाणी व म्हणुन ह्यावेळी कुणाला काढणार नाहीत. पण फसवले त्यांनी.

अमान यइल अस नाही वाटत , अला तर त्यानी शंकर च्या टिम मधे जाउ नये , शंकर च सगळं लक्ष आणि ईंटरेस्ट जसराज मधे आहे :).

कुणीतरी जजने अमानला सांगितले होते की स्पर्धा येतील आणि जातील , तू सर्व स्पर्धांच्या वर आहेस. इव्हन शंकर ही म्हटला आहे की तू येत्या १० वर्षात भारताच्या टॉप क्लासिकल सिन्गरम्ध्ये असणार आहे. खरे तर ही स्पर्धा अमानसाठी नाहीच आहे.स्पर्धेचाच वकूब नाही तेवढा . पण अमान लोकाना माहेत झाला भारतभर त्याच्या स्वतःच्या क्लासिकल सिंगर म्हणून प्रमोशनला फायदा होइल. आपणच शक्य झाल्यास त्याचे क्लासिकल गाणे सोडणार नाही. नाहीतर 'कोण बुवा हा अमान?'हा प्रश्न विचारला असता आपण. कदाचित काही आर्थिक स्थैर्यही त्याला लाभले असेल. चांगला मंच आहे नवोदिताना....

कालचा रेकॉर्डेड एपिसोड आत्ता पाहिला. जतहैजा चं प्रमोशन,शारुख इ नुस्ता टाइमपास एपिसोड होता. एकही गाणे धड वाटले नाही. त्यातल्या त्यात - जसराज अन झैन चे छल्ला .. अवडले.चांगलं इम्प्रोवाइज केले त्यांनी. बाकी कुणीही सिरियसली गात नव्हते. शारुखने आख्खा प्रोग्राम व्यापून टाकला होता.

शो इज टेकिंग यु टर्न :(.
फिल्म प्रमोशन आणि सगळी शारुख ची गाणी Uhoh
शारुख गायकांना गाउ देत नव्हता, जजेस ना बोलु देत नवह्ता, अगदी बाजुला बसलेल्या २ बाया ही शारुख मुळे गप्प च होत्या !
मला एकही गाणं नाही आवडलं, ते छल्ला गाणं मुळातच रेहमान नी इतक पकाउ फडतुस बनवलय, त्यात कितीही माल मसाला केला तरी मला आवडणार नाही .
तसे झेन-जसराज फ्युजन पेअर आहे इंटरेस्टिंग.

हो ना यश चोप्रा म्हणजे काय फक्त शाहरुखच की काय. बाकी इतर चांगली गाणी होती की.चांदनी, कभी कभी, लम्हे, सिलसिला वगैरे.

आज जरा लायनीवर आले ते बघून बरे वाटले. Happy
विश्वाजीतचे सुरत पिया की.... फारच मस्त झाले. बायदवे कोणते ६ राग होते त्यात ? कुणाला काही कल्पना?

शनिवारच्या एपिसोडमध्ये शाहरूखने फार बोर केलं. डोकं फिरल्यासारखाच वागत होता. सारखं काय मी मी? Uhoh

अख्ख्या २ एपिसोडमध्ये फक्त विश्वजितचं सुरत पिया की भावलं. बाकी सगळे बोर गायले. शनिवारच्या एपिसोडात तर गायन नव्हतंच, नुसत्याच पाट्या..
अर्शप्रित कौर एलिमिनेशन वर्थ. ती थोडी मला कंटाळलेलीच वाटली गेल्या काही एपिसोडात. जणू तिला इथे थांबायचंच नव्हतं. तुम्हाला कुणाला वाटलं का तसं?

हो ना यश चोप्रा म्हणजे काय फक्त शाहरुखच की काय. बाकी इतर चांगली गाणी होती की.चांदनी, कभी कभी, लम्हे, सिलसिला वगैरे.
>> अगदी अगदी!! आणि काय रे प्रत्येक गाणं संपलं की स्टेजवर येऊन नाचून जात होता न कळे. यश चोप्रांच्या आठवणी कमी आणि धुडगूस जास्त असा प्रकार झाला.

डीजे, अनुष्काचा मेकप पाहिलास का? गॅदरिंगला करतात तसलं रंगवलं होतं चेहर्‍यावर.

कालचं सूरत पिया की ज ब र द स्त झालं. रेणूचं गाणं ठिकठाक झालं. जसराजचं पण ओके ओकेच वाटलं. जितकं खुलायला हवं तितकं खुललं नाही.

अमानच्या एलिमिनेशनचा राग आला होता, पण वाटलं बरं झालं, त्याला फक्त ओळख हवी होती, जी या कार्यक्रमामुळे मिळाली. पुढे तर तो नक्की जाईलच.

फिमेल सिंगर्स रेणू नागर वगळता निराशाजनकच होत्या/आहेत... >> संपूर्ण अनुमोदन!

मला वाटलेलं जेन ला काढतील काल. ८ दिल्यावर तोंड बारिक झालेलं त्याचं.
अर्शप्रीतचा चेहरा पाहून सुद्धा वाटलं होतं की तिला बहुतेक एलिमिनेशन अ‍ॅन्टिसिपेटेड होतं.

हे लोक हरल्यावर सार्वजनिक मंचावर रडतात का बरे?की मसालेदार व्हावे म्हणून त्यांना तसे ''डायरेक्ट'' केले जाते? ज्याना अपयश पचत नाही त्यांनी स्पर्धेत कशाला भाग घ्यावा? तिकडे 'सूरक्षेत्र'म्हनजे तमाशाचा फडच झालाय. वाईट म्हनजे त्यातले दिग्गज जजेस देखील ह्या 'तमाशा'त सहभागी होतात. गुलाम अली, आशा भोसले, रुना लैला. काय ती कृतक भांडणे अन काय सगळे उबगवाणे...

नंदिनी,
हो , शेडेड चेहरा होता तिचा :).
शारुख तरी काय येड्या सारखा सुटाबुटात आला होता Proud
सलमान खान कडून काही शिक म्हणाव Proud
'बिइंग ह्युम' चा सिंपल टी शर्ट जीन्स मधे येतो पण जेंव्हा सलमान सारेगमप मधे येतो तेंव्हा धमाल येते, he totally rocks the show , ते ही सिंगर्स-जजेस चा वेळ स्वतः न खाता.. कमी बोलेल पण सगळे चौकार-षटकार :).
विश्वजीत काल सुरेख गायला, जसराज पेक्षा चांगला गायला पण जजेस नी जसराज ला सुध्दा ३० देउन टाकले !
सध्याच्या गायकां मधे एकटा विश्वजीत सगळ्या जॉनर्स मधे चांगला गातोये, इतर कोणी तेवढं व्हर्साटाइल नाहीये.
वाइट इतकच वाटतं, क्लासिकल इतकं सुरेख गाउ शकणार्‍यांना हे जजेस एलिमिनेट तरी करतात नाही तर मग 'जरा सा झुम लु मै' किंवा ' नच ले नच ले (बायगो बायगो)' सारख्या अत्यंत फालतु गाण्यात वाया घालवतात !

या टॅलेन्ट हन्टचा प्रवास पार्श्गायनाकडेच जाणार आहे अथवा अल्बमकडे. त्यामुळे सगळ्या जॉनरमध्ये लीलया गाऊ शकणारे लोक अंतिम ला जातील. ही क्लासिकलची स्पर्धा नाही. ती तशी असती तर बाकीचे एलिमिनेट झाले असते. नंदिनी म्हणते ते पटले. अमानला एक मंच , एक ओळख पाहिजे होती ती मिळाली आहे तसेच जाजिमबाबतही. पुढच्या स्पर्धांमधून अशा दुर्मिळ जॉनरमध्ये गायन , करीअर करणार्‍यांचा आत्मविश्वास दुणावेल त्यामुळे.....

'बिइंग ह्युम' चा सिंपल टी शर्ट जीन्स मधे येतो पण जेंव्हा सलमान सारेगमप मधे येतो तेंव्हा धमाल येते, he totally rocks the show , ते ही सिंगर्स-जजेस चा वेळ स्वतः न खाता.. कमी बोलेल पण सगळे चौकार-षटकार>> मला तो हिमेश भाई जज असताना आला होता तो एपिसोड आठवला. हिमेशची अक्षरश: वाट लावली होती. Proud

या टॅलेन्ट हन्टचा प्रवास पार्श्गायनाकडेच जाणार आहे अथवा अल्बमकडे. >> बर्‍याचदा या टॅलंट हंटमधले गायक देशविदेशामधे स्टेज शो करण्यात देखील करीअर करतात. जसराजचा बराचसा रोख हा लाईव्ह परफॉर्मन्सकडेच असतो. जाझिम, अमानला शोजच्या पब्लिसिटीसाठी हा मंच मदतगार ठरेल.

आताच्या स्पर्धकांमधे विश्वजीत उत्तम पार्श्वगायक बनू शकतो. मुलींमधे नो कमेंट्स.

रेणू नागर ही बहुधा रेखा भारद्वाज, रिचा शर्मा, मालिनी अवस्थी, शारदा सिन्हा, जसपिन्दर नरुला यांच्या मार्गाने जाईल असे वाटते. इला अरुणचे नाव टाळले आहे.ते एक '' सोंग'' आहे. रेश्मा कधीतरीच जन्माला येते !

आताच्या स्पर्धकांमधे विश्वजीत उत्तम पार्श्वगायक बनू शकतो. >> अनुमोदन

जसराजला संधी मिळाली तरिही त्याचा कल लाईव्ह शोजकडे जास्ती आहे.

पण जेंव्हा सलमान सारेगमप मधे येतो तेंव्हा धमाल येते>
सारेगमप बदलुन कोणत्याही रियालिटी शो मध्ये पण लिहु शकतेस नंदिनी.

या वेळी कोण गेल??

पद्नाभ गेला. चांगला पर्फॉर्मर. त्याला या स्टेजचा चांगला फायदा होईल. स्पर्धा तीव्र होत असल्याने व सर्वोच्च जागी एकच व्हेकन्सी असल्याने हळू हळू चांगल्या लोकानाही जावे लागेल. पुढचा नम्बर बहुधा माधुरीचा. शहनाज अफलातूनच गायला काल....फायनल जसराज आणि विश्वजीत ह्या दोन मराठ्यातच होनार असे दिसतेय...

Pages