सा रे ग म प २०१२

Submitted by संपदा on 22 October, 2012 - 03:06

झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.

जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.

अँकर - गायक - जावेद अली.

ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.

लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.

२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.

३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.

४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.

५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.

६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा. Happy

७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.

८. शहनाझ अख्तर.

९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.

१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.

११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.

पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या एपिसोड मधे जसराआणोणि अमान यांची जुगलबंदी झाली. त्या दोघांपैकी एक टॉपर आणि दुसरा रनर अप आहे.

झैन गेला न?

मला माहित नाही का पण मला जसराज अपिलच होत नाहीये..खुप्तेपासून खुपलाय तो अजून्ही;) रच्याकने, राखी सावंतवाल्या खुप्ते च्या एपिसोड्ला मॄ दिसली ...:)
असो..विश्वजीतने लगेच तळ गाठल्यावरून काही बोध घ्यायला हवा आहे. आएमएचओ, अलबेला सजन प्रचंड स्लो गाऊन थोडि वाटच लावली..

काल अगदी तॄप्त तृप्त झालं सगळी गाणी ऐकून Happy

जसराज आणि अमान तर केवळ अफलातून... !!

विश्वजीत काल खूपच हिरमुसला होता....... त्याला तसं बघून फार वाईट वाटलं Sad बच्चा चिअर अप !!

शहनाज चं गाणं पण आरपार गेलं... !!

जसराज- अमान ची जुगलबंदी केवळ खल्लास! मजा आली. विश्वजीत ला का बॉटम मधे टाकले पब्लिक ने?! Uhoh मला अ‍ॅक्चुअ॑ली अलबेला सजन आवडलं होतं त्याचं अन माधुरीचं. जाझिम अन हिमांशुचं आवारगी.. तर उच्च च!

बेस्ट परफॉर्मर शहनाझ ??
मला एवढा नाही एक्सेप्शनल वाटला , मुस्सर्रत अब्बास च 'तेरे बिना जिया मोरा नाही लागे' , अजुन लक्षात आहे !
असो , पण शहनाझ चा आवाज -सुर हे दिग्गज गेस्ट जजेस ना नेहेमी अपिल होतात , मे बी मीच काही तरी मिस करतेय !

शनिवारच्या भागात पहिल्यांदाच कुठेतरी झुकतं माप दिल्यासारखं वाटून गेलं.. विश्वजीत - माधुरीचं गाणं आणि शेवटचं झैन आणि शहनाझचं गाणं ह्यात अलबेला जास्त उजवं वाटलं होतं... शहनाझ जास्त चांगला गायला पण एकूण परिणाम बघता थोडा कमी वाटला त्या गाण्यात...

बाकी गाणी जोरातच झाली...

सुमेधा जोरदार अनुमोदन... अमाननी अजून पर्यंत एकही ठाय लईतलं गाणं गायलंच नाहीये...

जसराज - अमान गाणं परफॉरमन्स म्हणून जबरी झालं.. किंवा एक वेगळा प्रयोग म्हणूनही भारी होतं पण काही तरी मिसिंग वाटलं...

रविवारची शेवटची तीनच गाणी ऐकली... पण त्यात शहनाझ फारच अप्रतिम.... आधीची ऐकली नाहीयेत त्यामुळे ऐकूनच बाकीच्यांबद्दल..

विश्वजीत बॉटम तीन मध्ये झेपलाच नाही त्याची कुवत किंवा मराठी सारेगमप मधला प्रवास बघता... त्याची गाणी चुकतायेत असं वाटतय.... दिलेल्या गाण्यांना त्याचा आवाज तितकासा सूट नाही होत असे वाटते आहे..

अमानने रविवारी गायलेलं , मेरे घर आये..' असच होतं ना?
की मला सारखं 'मेरे घन आये असे एकायला येत होतं? काय होते ते शब्द?

ताना मध्ये कधी कधी गायक बोबडं गातात असे वाटते मला...

रविवारी परफॉर्मर ऑफ द डे कोण होतं ?
मला विश्वजीत चं 'पिया रे पिया रे' खूप अवडलं, जसराज चं 'दिल चाहता है' जितकं कौतुक झालं तितक काही भारी नाही वाटलं.
माधुरी-अर्श्प्रीत-रेणु ही चांगल्या गायल्या या वेळी.
हिमांशु अ‍ॅव्हरेज वाटला.

येत्या रविवारी सलमान खान असणारे म्हणे गेस्ट (अर्थात दबंग २ प्रमोट करायला) !
मजा येणार, सलमान दर वेळीफअर फधम्माल आणतो :).
दबंग चे म्यु.डा. साजिद वाजिद मेन्टर आहेत म्हणजे हा एपिसोड जास्त प्रमोशन मधेच जाणार.
'दगाबाज रे' गाणं साजिद वाजिद कोणाला देतील ? शहनाझ ??

मी शहनाझ च्या आवाजाची फॅन.
विश्वजीत, जॅझींंम, जसराज ही आवडतात, अमान चे गाणे तर प्रत्येक एपिसोड्ची ट्रीट असते. फार मस्त सीझन.
अजून तरी फारशी ड्रामेबाजी केलेली नाही. Hope that continues.

खरच मस्तं सिझन आहे , जजेस (अगदी ते टपोरी 'साजिद वाजिद' सुध्दा) बर्‍यापैकी न्युट्रल वागतात, रिस्पेक्ट देतात एकमेकांना.

खरंच फारच सही सुरु आहे हा सिझन!!
रविवारचा एपिसोड तर ट्रीट होती.
ओव्हरऑल प्रत्येक गाणं जबरी होतं. अमान-जसराज, हिमांशू-जॅझीम, शहनाझ-झैन (त्यात परत शहनाझ) तर टू मच.
पूर्वी वेळेअभावी प्रायोरटाईझ करुन मी फक्त फक्त अमान, जसराज, विश्वजीत आणि कधी कधी जॅझिम ह्यांचीच गाणी पहायचे, पण रवीवारचा एपिसोड पाहून वाटलं बाकीच्यांची पण पहायला हवी.

मो, शहनाझचे 'आवारा' पहा म्हणजे ऐक. फार सुंदर गायला होता... त्याच्या सर्व गाण्यात सर्वात छान.

मलापण जसराज-अमान, श-झैन ह्यांची जुगलबंदी सर्वात आवडली. तो झैन तर काय सहजपणे बाहेर पडला. जसे काय आधीच ठरले होते. चांगला होता तो.

तो झैन तर काय सहजपणे बाहेर पडला. जसे काय आधीच ठरले होते. चांगला होता तो.
<<
मला त्याच्या एलिमिनेशन वरची त्याची प्रतिक्रिया पाहून एक सेकंद वाटलं कि याला उलट वाटलं कि काय तो सेफ आहे असं Proud
मला या सिझन ला मुस्सरात अब्बास ची जाम आठवण येतेय.. २००७ सिझन ला त्याला जॉनर सिंगर म्हणून सारखं इन्सल्टिंग ऐकून घ्यावं लागलं, या सिझन ला हवा होता..काय गायचा सुफी, बाप माणुस एकदम !!
मुस्सर्रत 'सांवरे' : http://www.youtube.com/watch?v=N13wqtHQ7ak
मुस्सर्रत च्या आवाजात 'तेरे बिना जोया मोरा नाही लागे': http://www.youtube.com/watch?v=fsGW-ZLbGxU

मुस्सर्रत च्या सिझन नंतर निरनिराळ्या रिअ‍ॅलिटी शोज मधे सुफी गायची ट्रेंड आली, खूप सुफी सिंगर्स आले पण सुफी सिंगर ला रिअ‍ॅलिटी शो मधे आणाणारे बहुदा पहिली सारेगमप टिम च !
अत्ताच्या बेटरफॉरमॅट मधे, पॉलिटिक्स - ड्रामा न करणार्‍या जजेस मधे, सध्या येतायेत त्या दिग्गज गेस्ट जजेस समोर गायची संधी मुस्सर्रत ला मिळाली असती तर मजा आली असती !

आता सलमान चा एपिसोड पण तसाच टिपी असणार आहे
<<
हो :).
फरक एवढाच कि शाहरुख असश्य आणि सलमान प्रचंड धमाल असतो, he knows how to connect with audience :).

<<< मला या सिझन ला मुस्सरात अब्बास ची जाम आठवण येतेय

अगदी अगदी डीजे Happy , मी सुद्धा मुसर्रतचे व्हिडिओज अधून मधून बघत असते. कोणीही सांवरे गायले की मनातल्या मनात मुसर्रत बरोबरच कंपॅरिझन होते Happy झैन मला खरंतर ह्याच कंपॅरिझनमुळे खूप अपील झाला नाही Happy . त्यातल्या त्यात मागच्यावर्षीचा विजेता कमाल खान चांगला होता.
ह्यावेळचं सारेगमप आवडायचं कारण सुद्धा हेच आहे की प्रत्येकाच्या गायकीची खास अशी पद्धत/ जॉनर आहे. आश्चर्य म्हणजे मेंटर्ससुद्धा त्यांच्या अशा गायकीला पाठिंबा देत आहेत. सूरक्षेत्रमध्ये हिमेशने परवा मस्त डायलॉग मारला, " ज्याच्या गळ्यातून २५ प्रकारचे आवाज येतील असा मिमिक्री आर्टिस्ट मी शोधत नाहीये" . तीच स्ट्रॅटेजी सारेगमपचे मेंटर्ससुद्धा अवलंबत आहेत Happy

रविवारचा एपि अर्धाच पाहिलाय..

फॉर चेंज मला जसराजचं "दिल चाहता है" आवडलं. थोडं अमेरिकन आयडॉलच्या सायमनच्या काळातल्या जजेस स्टाइलने सांगायचं तर
It was not a charaokee at all. He added his own element with his band and all. It is difficult to perform an already famous song like this and that too in front of Shankar himself. I totally liked the arrangement. ten on ten Wink

विश्वजीत पण रॉकलाय....गो विश्वजीत गो.... Happy

सारेगमप च्या फेबु पेज वर लिहिलय कि विश्वजीत दबंग मधल 'हमका पीनी है' गाणारे Uhoh
म्हणजे 'मस्त मस्त दो नै' किंवा 'दगाबाझ रे' नक्कीच शहनाझ ला!

मो, शहनाझचे 'आवारा' पहा म्हणजे ऐक. फार सुंदर गायला होता... त्याच्या सर्व गाण्यात सर्वात छान. >> हो का? नक्कीच पाहिन.
कुठल्या दिवशीच्या एपिसोडमध्ये तो ते गाणे गायला?

बहुतेक ४ आठवड्यापुर्वी असेल.

'मस्त दो नैन' न गायलेले बरे, ते काहीवेळा म्हणुन झाले आहे. 'दगाबाज' चालेल. शहनाझच्या पध्धतीपेक्षा ते जरासे जोरातच आहे त्यामुळे अंदाज येत नाहीये.

मुसर्रत बद्दल माझे काय मत होते ते मला आठवतच नाहिये. त्याची ठळक अजुन कोणती गाणी आवडलेली पण आठवत नाहियेत.
कमाल खान मात्र फार फार फार आवडला होता.

Pages