थंडी किती झोंबायची

Submitted by वैवकु on 18 October, 2012 - 11:26

मी किती सांगायचो पण ती कुठे ऐकायची
जायची सोडून...मागे आठवण ठेवायची

मी विदूषक व्हायचो दुनियेस हसवावे म्हणुन
मी जरी रडलो.. तिला ती मस्करी वाटायची

पेन्शनीच्या चार पैशांवर कुठे भागायचे
मग तशी आजी जुने पितळी डबे मोडायची

रोज मी मागायचो सुख ...दुःख तो धाडायचा
नेहमी त्याची अशी देण्यात गफलत व्हायची ........... [ सौजन्य : शामजी ]
_________________________________________

अजनबीसा लागतो वाटू स्वत:चा चेहरा
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची

किंवा

ओळखीचा लागतो वाटू कुणी "तो- आतला"
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
__________________________________________

येत नाही जी मजा कोण्या तिला चुंबूनही
हाय! ....गुलबर्ग्यातली थंडी किती झोंबायची !!

मी किती ठरवायचो पण व्हायचे नाही तसे
...."विठ्ठलाची याद नाही यापुढे काढायची!!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया देवसर धन्स

कावळोजीराव रापचिक प्रतिसादासाठी विशेष आभार

देवसर आताशा मला हा खयाल -विषय / आशय पूर्णच बदलयचा आहे(चिवडून चिवडून त्याचा चोथा झाला आहे आताशा)

रियुडे ..............
http://www.maayboli.com/node/38624
...........इथेही भेट दे..............इथेही छान चर्चा झाली आहे

Pages