आशिष हा आजच्या काळातला एक शहरी तरुण. एका मोठ्या अमेरिकन कंपनीत तो नवी नोकरी सुरू करणार आहे. त्याची पत्नी प्राची. लवकरात लवकर भरपूर पैसे मिळावेत, आणि उच्चभ्रू वर्गात जागा मिळवावी, ही तिची इच्छा. या दोघांचा मुलगा सोहेल. मोठं होऊन त्यानं राजकारणात उतरावं, हे त्याच्या आईवडिलांचं स्वप्न. त्यासाठी आत्तापासून सोहेलवर योग्य ते संस्कार होतील, याची काळजी ते घेतायेत.
पण मग एका घटनेमुळं हा सारा डोलारा कोसळेल की काय, असं वाटू लागतं.
काय नैतिक आणि काय अनैतिक, हे प्रश्न उभे राहतात.
’इन्व्हेस्टमेंट’ हा ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.
यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात देशभरातले तेरा उत्कृष्ट चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागासाठी निवडले गेले आहेत. 'इन्व्हेस्टमेंट'चा या विभागात समावेश आहे.
दि. २२/१०/१२ रोजी आयनॉक्स, स्क्रीन नं. ५ इथे दुपारी १२ वाजता
आणि
दि. २३/१०/१२ रोजी सिनेमॅक्स, सायन इथे संध्या. ५.४५ वाजता हा चित्रपट दाखवला जाईल.
मस्त मस्त! दि. २२/१०/१२ रोजी
मस्त मस्त!
दि. २२/१०/१२ रोजी आयनॉक्स, स्क्रीन नं. ५ इथे दुपारी १२ वाजता>> पुण्यात ना?
भारीये ट्रेलर! (सुप्रिया
भारीये ट्रेलर! (सुप्रिया मतकरी मात्र त्या लहान मुलाची आई वाटत नाही.)
मुंबई आंतरराष्ट्रीय
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव आहे ना? मग आयनॉक्स पुण्यातलं कसं असेल?
आयनॉक्स, नरीमन पॉईंट, मुंबई.
(No subject)
वर वर्सोवा स्पेसिफीक लिहीले
वर वर्सोवा स्पेसिफीक लिहीले होते. आयनॉक्स बद्दल नव्हते, म्हणून गैरसमज झाला. त्याबद्दल क्षमा असावी हां.
मलावाटले काही ईन्व्हेस्टमेंट
मलावाटले काही ईन्व्हेस्टमेंट संबंधी मार्ग दाखविले असतील.
असो.
पण मिफ्फ तर दर २ वर्षांनी
पण मिफ्फ तर दर २ वर्षांनी जानेवारी किंवा फेब्रुवारीत असतं ना???...
चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय
चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात आज 'इन्व्हेस्टमेंट'चा प्रीमियर शो.
आयनॉक्स, स्क्रीन नं. ५, दुपारी १२ वाजता.
सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांना हार्दिक शुभेच्छा