इन्व्हेस्टमेंट - पहिली झलक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 October, 2012 - 01:08

आशिष हा आजच्या काळातला एक शहरी तरुण. एका मोठ्या अमेरिकन कंपनीत तो नवी नोकरी सुरू करणार आहे. त्याची पत्नी प्राची. लवकरात लवकर भरपूर पैसे मिळावेत, आणि उच्चभ्रू वर्गात जागा मिळवावी, ही तिची इच्छा. या दोघांचा मुलगा सोहेल. मोठं होऊन त्यानं राजकारणात उतरावं, हे त्याच्या आईवडिलांचं स्वप्न. त्यासाठी आत्तापासून सोहेलवर योग्य ते संस्कार होतील, याची काळजी ते घेतायेत.

पण मग एका घटनेमुळं हा सारा डोलारा कोसळेल की काय, असं वाटू लागतं.
काय नैतिक आणि काय अनैतिक, हे प्रश्न उभे राहतात.

’इन्व्हेस्टमेंट’ हा ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात देशभरातले तेरा उत्कृष्ट चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागासाठी निवडले गेले आहेत. 'इन्व्हेस्टमेंट'चा या विभागात समावेश आहे.

दि. २२/१०/१२ रोजी आयनॉक्स, स्क्रीन नं. ५ इथे दुपारी १२ वाजता
आणि
दि. २३/१०/१२ रोजी सिनेमॅक्स, सायन इथे संध्या. ५.४५ वाजता हा चित्रपट दाखवला जाईल.

Poster-Final copy.jpg

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव आहे ना? मग आयनॉक्स पुण्यातलं कसं असेल?
आयनॉक्स, नरीमन पॉईंट, मुंबई.

चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात आज 'इन्व्हेस्टमेंट'चा प्रीमियर शो.

आयनॉक्स, स्क्रीन नं. ५, दुपारी १२ वाजता.

सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांना हार्दिक शुभेच्छा Happy