Submitted by वैवकु on 18 October, 2012 - 11:26
मी किती सांगायचो पण ती कुठे ऐकायची
जायची सोडून...मागे आठवण ठेवायची
मी विदूषक व्हायचो दुनियेस हसवावे म्हणुन
मी जरी रडलो.. तिला ती मस्करी वाटायची
पेन्शनीच्या चार पैशांवर कुठे भागायचे
मग तशी आजी जुने पितळी डबे मोडायची
रोज मी मागायचो सुख ...दुःख तो धाडायचा
नेहमी त्याची अशी देण्यात गफलत व्हायची ........... [ सौजन्य : शामजी ]
_________________________________________
अजनबीसा लागतो वाटू स्वत:चा चेहरा
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
किंवा
ओळखीचा लागतो वाटू कुणी "तो- आतला"
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
__________________________________________
येत नाही जी मजा कोण्या तिला चुंबूनही
हाय! ....गुलबर्ग्यातली थंडी किती झोंबायची !!
मी किती ठरवायचो पण व्हायचे नाही तसे
...."विठ्ठलाची याद नाही यापुढे काढायची!!"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेन्शनीच्या चार पैशांवर कुठे
पेन्शनीच्या चार पैशांवर कुठे भागायचे
मग तशी आजी जुने पितळी डबे मोडायची
ओळखीचा लागतो वाटू स्वत:चा चेहरा
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
मस्त शेर आहेत.
छान गझल.
धन्यवाद कणखरजी
धन्यवाद कणखरजी
जायची सोडून अन ...."जाते!"
जायची सोडून अन ...."जाते!" असेच म्हणायची>>> वृत्त बोंबल्लं की राव!, असा 'गा' करू नये कधी.....
मिसरा बदल हा
मतला वगळता सगळेच शेर
मतला वगळता सगळेच शेर उत्तम...!
संपूर्णच आवडली ! अभिनंदन
संपूर्णच आवडली ! अभिनंदन वैभव.
अरेच्या!!... रियली......
अरेच्या!!... रियली...... माहीतच नव्हते ....प्रयत्न करतो ....वेळ लागेल .
शामजी,भारतीताई धन्स!!
असे... सांगायची, बोलायची
असे... सांगायची, बोलायची काहीही चालेल... जास्त काही सांगून वाह्यात चर्चा नको म्हणून आवरले.
रोज मी मागायचो सुख ...दुःख तो धाडायचा
नेहमी त्याची अशी देण्यात गफलत व्हायची....? असेही वाटून गेले
पितळे डबे शेर आवडला. ओळखीचा
पितळे डबे शेर आवडला.
ओळखीचा लागतो वाटू - हा शेर गोंधळात पाडून गेला. आपल्या इतरांशी होत असलेल्या ओळखी वाढण्याची आता हद्द झाली हे आपण ओळखायला हवे कारण आता आपला स्वतःचा चेहरा ओळखीचा वाटू लागला आहे, म्हणजे काय?
(अवांतर - असाच एक माझा शेर आठवला आपला)
कोण जाणे कोण होता ओळखी लाखो इथे
हात करतो आपला मीही मला दिसलो तरी
नेहमी त्याची अशी देण्यात गफलत
नेहमी त्याची अशी देण्यात गफलत व्हायची...<<< हेच म्हणायचे होते, सुख दु:ख यांचे रिपिटेशन टाळता येईल
शामजी टॉप क्लास आहे हा बदल
शामजी टॉप क्लास आहे हा बदल .विचर करतोच आहे मीही एखादा बदल वरच्या मिसर्यात मला हवा होता
माझे काही पर्यायी मिसरे तयार आहेत कोण्ता घ्यावा सुचत नव्हते ......
दोन भावन्डे जुळी सुन्दर मयोमय गोजिरी
नेहमी माझी सुखादु:खात गफलत व्हायची
पाहुनी भोळी सुखे दु:खे तशीच बनायची
नेहमी माझी सुखादु:खात गफलत व्हायची
अजूनही एक-दोन आहेत पण मलाच फारसे नाहीत आवडले
ओळखीचा लागतो वाटू ...>>>
ओळखीचा लागतो वाटू ...>>> वाक्य रचने ऐवजी
ओळखीचा वाटतो जेंव्हा ... असाही उचंबळ आला आहे
बेफीजी विशेष आभार
बेफीजी विशेष आभार ..........रिपीटेशन चा मुद्दा लक्षात आला नव्हता
तो उचंबळ कागदावर ओतला तरी
तो उचंबळ कागदावर ओतला तरी शेराचा अर्थ काय हेच समजत नाही आहे
ओळखीचा वाटतो जेंव्हा >>>> आधी
ओळखीचा वाटतो जेंव्हा >>>>
आधी असेच होते डि़ क्टो पण मलाच उ-चं-ब-ळ आला मग आता आहे तसे लिहिले
अरे काय उचंबळ उचंबळ चाललंय?
अरे काय उचंबळ उचंबळ चाललंय? शेराचा अर्थ काय त्या?
शेराचा अर्थ काय त्या? >>>
शेराचा अर्थ काय त्या? >>> उचंबळ
अर्थ : आपल्या अनेक ओळखी असतात
अर्थ : आपल्या अनेक ओळखी असतात , आपण त्या कष्टपूर्वक वाढवलेल्या असतात (ओळखी वाढवणे ..)
आपण अशा वेळी नाव अन चेहरे यान्ची सान्गड घालून लक्षात ठेवत असतो
एकदिवस असा येतो की आपला चेहराच आपल्याला आसाच 'फा़क्त एक ओळखीचा चेहरा वाटत राहतो' हा आपलाच चेहरा आहे हे विसरून जातो आपण .....मग काय ........
ओळखीचा लागतो वाटू स्वतःचा चेहरा
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची !!!:)
एकदिवस असा येतो की आपला
एकदिवस असा येतो की आपला चेहराच आपल्याला आसाच 'फा़क्त एक ओळखीचा चेहरा वाटत राहतो' हा आपलाच चेहरा आहे हे विसरून जातो आपण .....मग काय ..<<<
हे येत नाही आहे मूळ शेरात
ते शेरात नकोच होते मला जे
ते शेरात नकोच होते मला जे महत्त्वाचे वाटले तेच सान्गीतले आहे असे मला शेर झाल्यावर वाटले
चुकीचे असल्यास क्षमस्व
लागली ओळख कशीशी आपल्याला
लागली ओळख कशीशी आपल्याला आपली
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
होय हे पण छान आहे बेफीजी
होय हे पण छान आहे बेफीजी
लागता ओळख स्वत:ला ...."ओळखीचा"... आपली;
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
असे केले तर ???:)
तुम्ही जे गद्य लिहीत आहात ते
तुम्ही जे गद्य लिहीत आहात ते पद्यत बसवा की?
हे तुम्ही गद्यात जे लिहिले आहेतः
>एकदिवस असा येतो की आपला चेहराच आपल्याला आसाच 'फा़क्त एक ओळखीचा चेहरा वाटत राहतो' हा आपलाच चेहरा आहे हे विसरून जातो आपण ..<<<
त्यातील विसरून जाणे, आपला चेहरा फक्त एक ओळखीचा चेहरा वाटणे हे कुठे आले तुमच्या ओळीत?
होय नक्कीच ....एकदम मान्य
होय नक्कीच ....एकदम मान्य !!
प्रयत्न चालू आहेत ....वेळ लागेल बेफीजी !!
व्वा! व्वा!! सुरेख!! जायची
व्वा! व्वा!!
सुरेख!!
जायची सोडून अन ...."जाते!" असेच म्हणायची>>>> या ऐवजी
नेहमी 'जाते' म्हणूनी सोडुनी मग जायची.. असे कसे वाटेल. यात तुमचा 'च' येत नाहीये हे खरं!
ओळखीचा लागतो वाटू स्वत:चा
ओळखीचा लागतो वाटू स्वत:चा चेहरा
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
मला शेरात अव्यक्त असलेला असा अर्थ जाणवला,
जग माझ्यासाठी अनोळखी आहेच पण सर्वात जास्त मी स्वतः माझ्यासाठी अनोळखी आहे. आणि ज्या क्षणाला मला माझाच चेहरा ओळखीचा वाटू लागेल तेव्हा समजायचे की आपल्या ओळखी वाढण्याची हद्द झाली आहे.
मला ही कल्पना आवडली त्यामुळे शेर आवडला.
मी किती सांगायचो पण ती कुठे
मी किती सांगायचो पण ती कुठे ऐकायची
जायची सोडून अन ...."जाते!" असेच म्हणायची
दुसरी ओळ गडबडली राव.. (वर सांगून झालेच आहे!)
मी विदूषक व्हायचो दुनियेस हसवावे म्हणुन
मी जरी रडलो.. तिला ती मस्करी वाटायची
सुंदर!
पेन्शनीच्या चार पैशांवर कुठे भागायचे
मग तशी आजी जुने पितळी डबे मोडायची
अप्रतिम!
रोज मी मागायचो सुख ...दुःख तो धाडायचा
नेहमी त्याची सुखा-दुःखात गफलत व्हायची
'सुखा-दुःखात' हे विचित्र वाटलं. 'सुख-दु:खात' असाच शब्दप्रयोग मी वाच्लेला/ ऐकलेला/ वापरलेला आहे. कदाचित बरोबरही असेल, पण माझ्या दृष्टीने प्रचलित नसल्याने मला खटकलं असावं.
शेराचा आशय छान.
ओळखीचा लागतो वाटू स्वत:चा चेहरा
ओळखावे हद्द झाली ओळखी वाढायची
टोटल लागली नाही!! (ह्यावरील चर्चाही वाचली, पण तरीही शेर समजला नाही!)
येत नाही जी मजा कोण्या तिला चुंबूनही
हाय! ....गुलबर्ग्यातली थंडी तशी झोंबायची !!
अॅझलयोग्य झाला की हो!! (अॅडल्ट'स गझल!)
(दिवा घेणे!!)
आवडला पण!
मी किती ठरवायचो पण व्हायचे नाही तसे
...."विठ्ठलाची याद नाही यापुढे काढायची!!"
हम्म्म्म.... ठिक ठाक.. ह्याहून जोरदार 'विठ्ठल' निश्चितच तुझ्या गझलेत अवतरला आहे अनेकदा..
========================================
एकंदरीत गझल छान.
पाहुनी भोळी सुखे दु:खे तशीच बनायची
नेहमी माझी सुखादु:खात गफलत व्हायची
इथे पण पहिली ओळ धडपडत मात्रा पुर्या करतेय. (काठावर पास!)
प्राजु जितू धन्स !! कणखरजी
प्राजु जितू धन्स !!
कणखरजी विशेष आभार
जमतील तसे बदल केले आहेत ............ मेन्दू खूप शिणला पण खूप खूप समाधानही लाभते आहे
सर्वानी इतकी मदत केलीत........... मी आपला सर्वान्चा ऋणी आहे
धन्यवाद !!
Kiti diwasani gazalewar
Kiti diwasani gazalewar vachavi ashi valid charch chalt ahe....:-)
Kiti diwasani gazalewar
Kiti diwasani gazalewar vachavi ashi valid charch chalt ahe<<<
त्यासाठी असे प्रतिसाद देणे बंद करायला हवे, जसा तू ३८६७६ वर दिला आहेस
(कृ रा न)
>>>
रिया. | 19 October, 2012 - 14:45
दादावाला शेर
<<<
वैभवा, मतला असा करून
वैभवा,
मतला असा करून पाहिला...........
मी किती सांगायचो, पण, ती कुठे ऎकायची?
लगबगीमध्ये तिचे काळीज ती विसरायची!
Pages