मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.
मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.
तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.
ती पाठ्मोरीच होती पूर्ण वेळ.
ती पाठ्मोरीच होती पूर्ण वेळ. किती वाइट choreography आहे....
>>>
ह्या इथे बघा. शर्मिला च्या लेखात ह्या गाण्याच्या चित्रीकरणाचा उल्लेख आहे.
http://www.maayboli.com/node/34781
'बर्फी' मधे खंगलेला गरीब सौरभ
'बर्फी' मधे खंगलेला गरीब सौरभ शुक्ला त्याच्या नरेटिव एव्हीमधे त्याला कारकीर्दित बर्फीमुळे प्रमोशन मिळालं नाही अन आता हालाखीचे दिवस काढावे लागताहेत वगैरे सांगतो, पण जाड फ्रेम चा चष्मा मात्र 'रे-बॅन' चा वापरतो
खबरदार मध्ये भरत जाधव मारुती
खबरदार मध्ये भरत जाधव मारुती कांबळेला लपवताना एका लाकडी कपाटातल्या फाइल्स खाली जमिनीवर टाकतो. थोड्या वेळाने पूर्ण रूम दाखवतात तेंव्हा जमिनीवर काहिही नसते..
ह्म्म... तरिच.
ह्म्म... तरिच.
सिलसिला सिनेमा ३र्यांदा
सिलसिला सिनेमा ३र्यांदा बघताना एक जाणवले. जया-अमिताभचे लग्न होते त्यानंतर त्यांना अपघात होतो. त्यात तिचा गर्भपात होतो, व ती रिकव्हर होत असतानच अमिताभ-रेखाचे लफडे सुरु होते. नंतर ते दोघे त्यात खूप वहावत जातात व दोघांचेही लग्न गोत्यात येते..असे असताना दी एण्ड च्या वेळेस जया त्याला सांगते की "मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हुं !
( ये बात कुछ हजम नहीं हुई बच्चनजी)
असे असताना दी एण्ड च्या वेळेस
असे असताना दी एण्ड च्या वेळेस जया त्याला सांगते की "मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हुं ! >>>>>> Abhishek baddal asel
खोटं पण बोलली असेल ! (
खोटं पण बोलली असेल ! ( सिनेमात !!! )
बाहेर खात असला, तरी माणूस
बाहेर खात असला, तरी माणूस घरीही खाणारच ना?
.
.
कुठे गेला तो मजेशिर
कुठे गेला तो मजेशिर निरिक्षणवाला विबासं धागा?
सिलसिलावरून आठवलं की शेवटी
सिलसिलावरून आठवलं की शेवटी संजीवकुमार अपघातात सापडलेला दाखवलाय. त्या प्रसंगात कमालीचं कल्पनादारिद्र्य दिसून येतं. त्याचं विमान म्हणे धावपट्टीवर उतरतांना घसरून आपटलेलं असतं आणि सतत स्फोट होत असतात. आपला अमिताभ त्याला चारपाच तासांनी वाचवायला जातो आणि त्याला खेचून बाहेर काढतो.
आता जेट विमानाच्या इंधनाचे स्फोट सतत ४ तास होत राहतील का?
एव्हढ्या ज्वालाग्राही इंधनाला एकदा का आग लागली की सगळं विमान भस्मसात होतं. या भंकशीऐवजी दुसरा कुठलासा अपघात दाखवायला हवा होता.
-गा.पै.
अगदी अगदी गापै. मी पण ह्याच
अगदी अगदी गापै. मी पण ह्याच बद्दल लिव्हलेलं. तो अमिताभ येऊन वाचवे परेन्त हे विमान जळत राहतं. जसे फरा खान च्या सिनेमात उत्तम नाच बाकी सर्व बेकार तसेच हे यश राजचे. रोमान्स बरोबर पण बाकी गळफटते.
काल जिंना मिदो पाहिला परत. केट्रिना बाइक घेउन जाऊ का मैत्रिणीला विचारते तेव्हा साधा गुलाबी टॉप असतो. मग जाताना वेगळाच मस्त टॉप घातला आहे. त्यात वैट काही नाही. पण जर सटकून लगेच निघाले तर आमच्या किल्ल्या चष्मा फोन विसरतो. आणि ही बाई नवा टॉप घालून आणि वेळेत पोह्चते.
जर सटकून लगेच निघाले तर
जर सटकून लगेच निघाले तर आमच्या किल्ल्या चष्मा फोन विसरतो. आणि ही बाई नवा टॉप घालून आणि वेळेत पोह्चते >>>
किल्ल्या आणि चष्मा जुन्या
किल्ल्या आणि चष्मा जुन्या झबल्याच्या खिशात राहून गेल्या असतील!
अमा, मस्त निरीक्षण!
अमा, मस्त निरीक्षण!
आणि हो कीनै तो ह्रीतिक असता
आणि हो कीनै तो ह्रीतिक असता तर आपण आणिक डब्बल घाईत गेलो असतो. आटो करून पण.
ह्या ह्या ह्या. मला पाहून तो रोशनांचा घर का चिराग पुढे अॅक्सिलेटर दाबून आणिक गाडी पळवत पळून गेला असता ते काय मनावर घ्यायाचे न्हाय.
अमा ....
अमा ....
अमा सहीच
अमा
सहीच
अमा
अमा
अजून एक नव्या "अग्निपथ"
अजून एक नव्या "अग्निपथ" बद्दल... संजय दत्तचे लोक एके ४७ घेऊन गोळ्या चालवतात, आणि सगळी जनता त्यांना दांडूक्याने हाणते... बरं, संजय दत्त व्हिलन ना! त्याच्याकडे साधा देसी कट्टा पण नाही
त्याच्याकडे साधा देसी कट्टा
त्याच्याकडे साधा देसी कट्टा पण नाही >>>>>> पैसे संपले एके ४७ मधे......:खोखो:
रा वन मधले एकदोन सीन्स पहायचा
रा वन मधले एकदोन सीन्स पहायचा योग आला. १ल्या सीनमध्ये बायका करीनाला करवाचौथच्या पुजेसाठी बोलावताना दाखवल्या आहेत. आणि लगेच नंतरच्या सीनमध्ये दसर्याला रावण जळताना दाखवला आहे.
पण करवा चौथ तर दसर्यानंतर येते ना?
चित्रपटाचे नावच रावन
चित्रपटाचे नावच रावन आहे......कधी ही जाळा मग
काय फरक पडतोय
आमा
आमा
काल डेव्हीड धवनचा हसीना मान
काल डेव्हीड धवनचा हसीना मान जाएगी पाहण्याचा योग आला. त्यात संजय दत्त अनुपम खेरच्या घरात शिरून तेथील दागिन्यांचा एक सेट घेवून बाहेर जाण्याऐवजी घरातील जीने चढून वर कुठेतरी जाताना दाखवलाय. येताना बरोबर येतो अर्थात मुख्य दरवाज्याने. प्रवेशद्वार वरती कसं असेल?
प्राची, >> पण करवा चौथ तर
प्राची,
>> पण करवा चौथ तर दसर्यानंतर येते ना?
तो पुढल्या वर्षाचा दसरा असेल!
मधल्या काळात कुंभकर्णासारख्या झोपा काढल्या असतील! 
आ.न.,
-गा.पै.
विकी डोनर मधे, डॉ. चड्डा
विकी डोनर मधे, डॉ. चड्डा पहिल्यांदा गाडीत त्याला कार्ड देतो त्यावेळी स्वतःचे क्वालिफिकेशन एम. डी. सांगतो. मग घरी आल्यावर विकी च्या रुममधे चर्चा करताना, स्वतःला एम.बी. बी. एस. सर्टीफाईड डॉक्टर असे म्हणतो.
अशिमा टेस्ट साठी जाते तिथल्या एका केबिनच्या दारावर एम. डी. ( गायनॅक ) असे लिहिलेले दिसते. माझ्यामते नुसते गायनॅक असे स्पेशलायझेशन नसते. ते ऑब्स्टेट्रीक्स अँड गायनॉकॉलॉजी असे असते. ( चु.भु.द्या.घ्या.)
पण या केवळ क्षुल्लक चुका आहेत. कथाविषय, अभिनय, संवाद आणि खास करुन चपखल पात्रनिवड यासाठी मला हा सिनेमा खुप आवडला.
स्पेशल २६ मधे ..........सर्व
स्पेशल २६ मधे ..........सर्व काही १९८७ साल चे दाखवले.....परंतु जेव्हा काजल आणि अक्षय चित्रपट बघायला जातात तेव्हा सिनेमाहॉल च्या खुर्च्या मात्र आधुनिक आहेत... त्याकाळच्या अजिबात वाटत नाही असे वाटते की कुठल्यातरी पिव्हीआर अथवा सिनेमॅक्स सारख्या मल्टीप्लेक्स मधल्या खुर्च्या आहेत
लोणावळा बायपास मधे, पेपरमधे
लोणावळा बायपास मधे, पेपरमधे बातमी आलीय का ते बघताना, संजय प्रत्येकाला एकेकच पेपर देतो. पण सर्वात शेवटी किशोरकडे मात्र दोन पेपर दिसतात.
भारतीय मधे, सुबोधच्या भाषणात अत्यंत अपमानास्पद असे दोन जातीवाचक शब्द आहेत. सेन्सॉरने ते अर्थातच म्यूट करवले आहेत पण ओठांच्या हालचालीवरुन ते शब्द सहज कळतात. तेवढे दृष्य संपादीत करता आले नसते का ?
३०० वा प्रतिसाद
३०० वा प्रतिसाद
Pages