बाणेर,बालेवाडी,पाषाण,औंध,वाकड,हिंजेवाडी भागातल्या शाळा.

Submitted by अगो on 12 October, 2012 - 04:57

माझे प्रश्न असे आहेत :
१. बाणेर-बालेवाडी- औंध भागात एसएस्सी अभ्यासक्रमाच्या चांगल्या शाळा कुठल्या ?

२.बालेवाडीत भारती विद्यापीठ स्कूल आहे. इंग्लिश मिडियम सीबीएसई आहे असे वाटते. ती चांगली नाहीये का ? मी बालेवाडीत असतानाही आमच्या सोसायटीत मी वर दिलेल्या शाळांचीच चर्चा असायची. भारती विद्यापीठ बद्दल कुणी बोलत नसे.

३. वरील दिलेल्या लिस्टव्यतिरिक्त अजून काही सीबीएसई / आयसीएसई शाळा आहेत का ज्या माझ्या नजरेतून सुटल्या आहेत ?

४. इथल्या कुणाची मुलं त्या शाळांत जात असतील तर त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील.

५. मी आत्ता काही शाळांना अ‍ॅडमिशन संदर्भात इ-मेल्स पाठवल्या आहेत. कुणाचेच उत्तर आलेले नाही. बर्‍याच शाळांच्या वेबसाईट्सवर 'नो व्हेकन्सीज' असेही लिहून ठेवले आहे. अ‍ॅडमिशनची प्रोसेस लवकरात लवकर कधी सुरु होते ? कधी सुरु करावी ?

६. ह्या शाळांमधील फी / डोनेशन ह्याबद्दल काही माहीत असेल तर सांगावे.

साधारण बाणेर-बालेवाडी एरियाजवळच्या मी ऐकलेल्या शाळा अशा :
१. ऑर्किड ( बाणेर )
२. व्हिबग्योर हाय ( बाणेर-बालेवाडी )
३.इंदिरा (वाकड )
४. डि.ए.व्ही ( औंध )
५. विद्या व्हॅली ( पाषाण )
६.ब्लू-रिज ( हिंजवडी )

ह्या सगळ्या आठ-नऊ किमीच्या परिघात आहेत. ह्याशिवाय सेनापती बापट मार्गावरची विखे-पाटील ऐकून आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जराशी अलिकडे शासकीय पॉलिटेक्निकच्या इथे, इस्क्वेअर थिएटरच्या मागच्या बाजूला गुरुकुल. सीबीएससी.

वरील दिलेल्या लिस्टव्यतिरिक्त अजून काही सीबीएसई / आयसीएसई शाळा आहेत का ज्या माझ्या नजरेतून सुटल्या आहेत ? >> हो आता बर्‍याच आहेत.

उदा १. अक्षर इंटरनॅशनल - वाकड
विझ्डम वर्ल्ड - काळेवाडी फाटा
ब्लॉसम - वाकड
इंदिरा नॅशनल - वाकड
ब्लू रिज - हिजवडी.
मर्सेडिज बेंझ - हिंजवडी - अप स्केल

बहुतांश शाळेच्या साईट्स आहेत. . . त्यावर तुला खूप माहिती मिळेल. . माझी मुलगी विझ्डम वर्ल्ड मध्ये जाते
परतोनि पाहे मध्ये मी ह्या शाळेबद्दल लिहिले होते.

अ‍ॅडमिशनची प्रोसेस लवकरात लवकर कधी सुरु होते ? कधी सुरु करावी ? >> डिसेंबर मध्ये किंवा नंतर.

ह्या शाळांमधील फी / डोनेशन ह्याबद्दल काही माहीत असेल तर सांगावे. >>. शाळेची फि शाळेवरच अवलंबून आहे. साधारण ५०,००० ते १ लाख प्रति वर्षे कितीही असू शकते. डोनेशन पण असेच. २०,००० पासून पुढे.

पण तू बालेवाडी- बाणेर- औंध, वाकड, पाषान असा एरिया (वाईल्ड चॉईस) का निवडत आहेस? तुझे घर आहे त्यापासून जवळची शाळा निवड. अंतर खूप असल्यावर ट्रॅफिकचा त्रास मुलांना खूप होतो व लवकर निघून उशीरा यावे लागते, त्यातच वेळ जाईल.

केदार, आमच्या घराच्या सगळ्यात जवळ 'ऑर्किड' आहे ( साधारण एक किमी असेल ) पण मला एसी शाळेत नाही घालावेसे वाटत मुलाला ( बाकीच्या पण एसी आहेत का ? माहीत नाही. नसाव्यात असे धरुन चालले आहे. ) आणि फी हाईकचा मुद्दा आहेच. ती सोडली तर मग बाकी सगळ्या पाच-सहा किमीवर आहेत. आमच्या इथून त्याहून जवळ मलातरी दुसरी कुठली दिसत नाही. जवळ असेल तर माझं प्राधान्य त्यालाच असेल आणि त्याबाबतीत मी जरा disappointed आहे.

काल सर्च करताना डॅफोडिल इंटरनॅशनल स्कूल म्हणून एक दिसली बाणेरमध्ये. ती जवळ पडेल पण इंटरनॅशनल म्हणजे आयबी अभ्यासक्रम का ? त्यांची साईट under construction आहे. काही माहिती मिळाली नाही.

दुसरं ह्या नवीन शाळांमध्ये शिक्षकही नवीन, सतत बदलणारे असतात असं मला वाटलं म्हणून मी एसेस्स्सी चांगल्या शाळा विचारत आहे. एकदा अ‍ॅडमिशन घेतली की मग बदलण्याची वेळ येऊ नये म्हणून आधीच विचारत आहे.

शाळा मनासारखी मिळणे महत्वाचे. अभ्यासक्रम ICSE, CBSE, SSC काहीही असेल तरी मला चालेल. SSC ने बरेच बदल केले आहेत, आठवीपर्यंत परीक्षा नाही वगैरे. ते मला आवडले.

मनीष, लॉयला आमच्यापासून पाच किमी पेक्षा जास्त आहे. अ‍ॅडमिशन घेताना पाच किमीच्या आत राहणारीच मुले हवी असा नियम वाचला होता मी त्यांच्या साईटवर. शिवाय ती को-एड नाही.

मग तू हायवे लगतच्या शाळा पाहा जसे इंदिरा, अक्षर वगैरे. ब्लू रिज पण चांगली आहे. तिथेही विचारून बघ. ऑर्किड ही शाळा कमी अन पैसे वाढवणारे मशीनच जास्त आहे.

तुला लांब चालणारी असेल तर संस्कृती आणि ज्ञान प्रबोधिनी पण चांगल्या आहेत. संस्कृतीच्या बस बाणेर मध्ये पण येतात.

मराठी माध्यमाची शाळा हवी असेल तर अक्षरनंदनचा पण विचार करा. एस.एस.सी. बोर्ड आहे. पण उत्तम शाळा आहे.

माझी मुलगा आणि मुलगी दोघेही "ब्लु रिज पब्लिक स्कुल" हिंजेवाडी मधे आहेत. आमचा तरी अनुभव चांगला आहे. आय सी एस ई अभ्यासक्रम आहे. शिक्षक चांगले आहेत. फीही रीझनेबल आहे.(सध्यातरी).
शाळेची बस सर्विस आहे. (त्याना बॅज इशु केले आहेत.. ते शाळेला पोहोचले आणि शाळेतुम निघाले की बॅज स्कॅन केला जातो आणि एस एम एस पाठवतात). शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे उत्तम आहे. डिसेंबर पासुन प्प्रवेश रक्रिया सुरु होते.

बालेवाडीत भारती विद्यापीठ स्कूल आहे. इंग्लिश मिडियम सीबीएसई आहे असे वाटते. ती चांगली नाहीये का ? मी बालेवाडीत असतानाही आमच्या सोसायटीत मी वर दिलेल्या शाळांचीच चर्चा असायची. भारती विद्यापीठ बद्दल कुणी बोलत नसे.>>>>>>> एकदा शाळेला भेट दिलीत की सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपोआप मिळतील. बाय द वे ही शाळा आम्हाला चालत ५ मिनिटावर आहे. पण माझी मुले ब्लु रिज मधे जातात.

संस्कृती २१ किमीवर आहे रे. ज्ञानप्रबिधिनी पण १२/१३ किमी. ब्लू रिज ९ किमी. इतके लांब पाठवण्याची माझी तयारी नाही कितीही चांगली शाळा असली तरी. खरंतर पाच किमी पण मला जास्तच वाटते पण दुसरा पर्यायच नाही म्हणून मनाची तयारी करत आहे Sad

त्रिशंकू, मराठी मिडियम नको. अक्षरनंदनबद्दल ऐकून आहे.

गुरुकुल चांगली आहे पण अगोला (आणि आम्हाला पण) लांब पडेल. इतक्या लहान मुलांना शाळेसाठी किती कम्युट करायला लावणार ? रोजचा प्रश्न आहे त्यामुळे मला पण नको वाटते लांब शाळा.

सिंडी + १. सध्या विचार करतेय त्या शाळांना सुद्धा अर्ध्या-पाऊण तासाचा कम्युट आहेच. आम्ही दहा मिनिटांत चालत शाळेत पोचायचो ते स्वप्नच वाटते. असो. तो ह्या बाफचा विषय नाही Happy

डॅफोडिल इंटरनॅशनल स्कूल म्हणून एक दिसली बाणेरमध्ये. ती जवळ पडेल पण इंटरनॅशनल म्हणजे आयबी अभ्यासक्रम का ? >>>
अगो, मागील वर्षी राजसच्या अ‍ॅडमिशनच्या निमित्ताने मी बराच रीसर्च केला तेव्हा इंटरनॅशनल स्कूल असे नाव असले तरी अभ्यासक्रम इंटरनॅशनल असतोच असे नाही, हे लक्षात आलेय. पोदार मध्ये ICSE पॅटर्न आहे पण नावान इंटरनॅशनल स्कूल असे आहे. त्यामुळे नक्की बोर्ड काय आहे ते बघून घे. आगाऊ ने भारतीय बोर्डांची माहिती, तुलना इ. वर एक लेख मालिका लिहिली होती, ती तू वाचली असशीलच!

बाकी पुण्यातल्या कुठल्याच शाळांबद्दल मला काहीच माहिती नाही. इंटरनॅशनल शब्दावरून गोंधळ/ गैरसमजूत होऊ नये म्हणून ही पोस्ट!

थँक्स निंबुडा. त्या शाळेची काहीच माहिती मिळत नाहीये ( इंटरेस्ट आहे कारण ती शाळा आम्हाला जवळ आहे. ) त्यांना पाठवलेली मेल पण बाऊन्स झालीय.

त्या एरीयात तुझ्या कुणी ओळखीचे असतील तर प्रत्यक्ष जाऊन चौकशी करायला सांगावे लागेल मग. मी तरी माझ्या घराच्या आसपास जाऊन सर्व शाळा पर्सनली छान मारून सर्व माहिती गोळा केलेली. आता ह्या वर्षी अ‍ॅक्च्युअल अ‍ॅडमिशन घेणार. Happy

विझ्डम वर्ल्ड म्हणजे पार्क स्ट्रीटच्या कँपस मध्ये आहे तीच का ? कशी आहे शाळा ? >>. हो. आम्हाला आवडली. इतर तासांसारखा स्विमिंगचा पण तास वगैरे. फि पण रिझनेबल. ICSE आहे.

ब्लु रिज मध्ये आता टेनिस अ‍ॅकेडमी पण सुरू झाली आहे. आमच्या समोरचा अश्मित तिथे जातो. त्यांना ती शाळा आवडते.

अगो डॅफोडिल्स चा विचारही करू नकोस. नावापुरती इंटरनॅशनल आहे.(तशी एक सह्याद्री इंटरनॅशनल नावाची पण आहे पाषाण गावात Uhoh स्टेट बोर्ड ) एका रो हाउस मधे चालवली जात होती २ वर्षांपुर्वी . तेव्हाही वेबसाइट अंडर क्न्स्ट्रक्शनच होती.
व्हिब्ग्योर हाय सध्या सगळ्यात बरी वाटली. जुनी पारशी संस्था आहे. नेटकी, आणि पारदर्शक आहे.
माझा भाचा जुन पासून जातोय. (वय ४) . वेब्साईट वर्ची माहिती आणि खरी परिश्तिती यात तफावत नाही Happy

अगो, चांगला धागा. पुण्यात परतोनी पाहणारे मॅक्सिमम मराठी लोक ह्या आणि आसपासच्या एरियामध्ये राहणे पसंत करतात. त्यांना उपयोगी पडेल.

इन्ना, हो का ? कठीण आहे. ती पण ऑर्किडसारखीच जवळ होती. व्हिबग्योर हायमध्ये माझ्या मैत्रिणीने घेतली आहे तिच्या मुलासाठी. पण तिनेही गेल्या वर्षी भारताबाहेरुनच घेतली. शाळेचे बांधकाम अजून चालू आहे म्हणून ती जरा खट्टू होती. तोही ह्याच वर्षी जायला लागला. परत एकदा विचारेन तिला.

इथे लिहायचे राहूनच जात होते.

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात परतायचे नक्की असेल आणि एखादी शाळा मनात असेल तर डिसेंबर-जानेवारी मध्ये त्यांच्या वेबसाईटवर लक्ष ठेवून ऑनलाईन अ‍ॅडमिशन करणे उत्तम. आयत्या वेळी हव्या त्या शाळेत अ‍ॅडमिशन मिळणे फार कठीण आहे. हल्ली RTE अ‍ॅक्टच्या खाली २५ % सीट्स राखीव असल्याने उपलब्ध सीट्स अजून कमी झाल्या आहेत.

दुसरे असे की, पुण्यात सध्या दरवर्षी नवीन शाळा उघडत आहेत. हव्या त्या ( जुन्या, जम बसलेल्या ) शाळेत मिळाली नाही तरी नवीन शाळेत बहुतेकदा जागा असतात. तिथे अ‍ॅडमिशन घेता येते.

आम्ही एप्रिल एंडला भारतात परत आलो. हा धागा वेळेवर उघडला असला तरी शाळा न बघताच अ‍ॅडमिशन कशी घ्यायची आणि नक्की कुठल्या शाळेत घ्यायची ह्यावरुन बराच संभ्रम मनात होता त्यामुळे डिसेंबरमध्ये काहीच हालचाल केली नाही. यायच्या महिनाभर आधी ब्लू-रिजकडे जास्त कल झाला होता. कारण परांजप्यांची शाळा ( मी पार्ले टिळकमध्ये शिकल्याने परांजप्यांवर विश्वास ठेवायला थोडा अधिक वाव होता Happy ) आणि हिंजवडीत असल्याने नवर्‍याच्या ऑफिसजवळ आहे.
पण त्यांच्याकडे जागा नव्हती आणि ते वेटिंगलिस्ट ठेवत नाहीत. मे एंडपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. फोन, भेटी, प्रिन्सिपलांशी बोलणे ... पण काही उपयोग झाला नाही !

आत्येभावाची मुलं विद्या व्हॅलीत जातात. त्यांचा अनुभव चांगला आहे. त्यांच्यामुळे प्रिन्सिपल भेटायला तयार झाल्या पण त्यांनीही लगेच अ‍ॅडमिशन दिली नाही. जूनपर्यंत थांबायला लागेल मग कदाचित देता येईल असे सांगितले. पण एकंदर बोलण्यावरुन त्या पॉझिटिव्ह वाटल्या. विद्या व्हॅलीला जाताना शेवटचा एक किलोमीटर रस्ता हॉरिबल आहे पण शाळा, मोठी मैदानं, अभ्यासापेक्षा खेळावर फोकस जास्त हे आम्हाला खूप आवडले होते.

व्हिब्ग्योर हाय-बालेवाडी, लोकसेवा ई-स्कूल पाषाण आणि इंदिरा ( इथे वर्गातली संख्या ४० वरुन ४५ केल्यामुळे अचानक जागा उपलब्ध झाल्या होत्या. ), बिल्डिंग बांधून न झालेली युरो स्कूल वाकड इथे अ‍ॅड्मिशन्स होत्या. त्यामुळे स्वस्थ बसलो Happy

जूनच्या पहिल्या आठवड्यात विद्या व्हॅलीत अ‍ॅडमिशन घेतली. ह्या शाळेच्या मला आवडलेल्या गोष्टी.
१. अभ्यासाचे अजिबातच प्रेशर नाही. होमवर्क बहुतेकदा नसतोच. प्रेशर इतके कमी आहे की कधीकधी पुढे कसे व्हायचे ह्या विचाराने थोडे टेंशन येते Wink पण एकंदरित मुलगा आत्ता खूपच एंजॉय करतोय हे महत्त्वाचे.
२. शाळेचे कँपस खूप मोठे आहे. खेळायला मोठी मैदाने आहेत.
३. एका वर्गात सव्वीस ते अठ्ठावीसच मुलं आहेत.
४. मराठी, हिंदी सध्या गाण्यातूनच शिकवत आहेत. दुसरीत हळूहळू सुरु करतील त्यामुळे बाहेरुन आलेल्या मुलांवर एकदम ताण येत नाही.
५. सगळी मुलं आणि शिक्षक नाश्ता आणि जेवण शाळेतच घेतात. नाश्त्याबरोबर खायला एखादे छोटे फळ आणि पाणी तेवढे पाठवायचे. फक्त कँटीनची सोय असती तर मला नाही वाटत मी मुलाला शाळेत जेवू दिले असते. त्याला अजिबातच तिखट चालत नाही पण शाळेतले जेवण अजिबात तिखट नसते म्हणाला. रोजच्यारोज सव्वासातला दोन डबे बनवावे लागत नाहीत आणि तसेही डब्यातून दाल-भात, पोळी, भाजी असे सगळे दिलेच नसते बहुतेक त्यामुळे मीही खूश आहे Happy
६. शाळेच्या स्वतःच्या बसेस आहेत. काँन्ट्रॅक्ट दिलेले नाही.
७. शाळेपर्यंतचा रस्ता खराब आहे हे खरे पण इमर्जन्सी झाल्यास तुमच्या येण्याची वाट न बघता ते शाळेच्या अँब्युलन्समधून मुलाला डायरेक्ट हॉस्पीटलमध्ये घेऊन जातात हे जाणून बरे वाटले.

इथे यायच्या आधी लांबच्या शाळेत कसं पाठवायचं अशी काळजी वाटत होती पण आता ८-९ किलोमीटर काहीच वाटत नाही. सवय झाली Happy

एक अबोली, परिहार चौकात डिएव्ही पब्लिक स्कूल आहे.औंधमध्ये स्पाईसर स्कूल म्हणूनही एक आहे. पण मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे आठ-नऊ किलोमीटरवरच्या शाळेत जाणे इथे कॉमन आहे. त्यानुसार आजूबाजूची मुलं ह्या शाळांत जाताना बघितली आहेत :

आयसीएसई :

विद्या व्हॅली पाषाण
युरो स्कूल वाकड
विज्डम वर्ल्ड वाकड
ब्लू-रिज हिंजेवाडी
व्हिब्ग्योर हाय बालेवाडी

सीबीएसई

विखे-पाटील -सेनापती बापट रोड
इंदिरा नॅशनल स्कूल -वाकड
लोकसेवा ई स्कूल पाषाण
ऑर्किड स्कूल बाणेर

एसएससी

सेंट जोसेफ किंवा लॉयेला

अगो/ मिलिंद तुम्ही बाणेर मधे कुठे रहाता?
मी ऑर्कीड च्या मागच्या बाजुला रहातो आणि माझा मुलगा विज्डम वर्ल्ड ला जातो

ब्लू रिज शाळेबद्दल कोणी माहिती सांगू शकेल का?
तसंच ICSE चा अभ्यास खूपच जास्त असतो, मुलांना जमत नाही, खेळायला किंवा इतर काहीही करायला करायला अजिबात वेळ मिळत नाही असे ऐकले.
ह्या नुसत्या ऐकीव गोष्टी की खरंच मुलांना अभ्यासाचे, प्रोजेक्ट्सचे खूप टेन्शन असते?
ICSE करत असलेल्या मुलांच्या पालकांचा काय अनुभव?

Back to top