Submitted by -शाम on 1 October, 2012 - 08:28
दरवळणारे गाव फुलांचे उजाड झाले
ऋतू कसे माणसांप्रमाणे लबाड झाले ?
मायेची मोहाची किमया आहे सगळी
भल्या-भल्यांच्या मेंदूमध्ये बिघाड झाले
त्यांनासुद्धा विकेंड असतो पार्टी असते
कसे कळावे कधी लेकरू उनाड झाले
तुझ्या भुकेला अंतच उरला नाही आता
बघता बघता तुझे माणसा गिधाड झाले
इथे कशाला दंगल करता धर्मान्धांनो
जे झाले ते तिकडे सीमेपल्याड झाले
याच भयाने मनातले विझवितो निखारे
उडेल भडका जर एखादे चहाड झाले
अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले
कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले
.................................... शाम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायेची मोहाची किमया आहे
मायेची मोहाची किमया आहे सगळी
भल्या-भल्यांच्या मेंदूमध्ये बिघाड झाले.....सहीय!
अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले...सलाम!
कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले...क्या बात!
अजूनही ये-जा दु:खांची तशीच
अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले
कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले
>>>
हे आवडले
ऋतू कसे माणसांप्रमाणे लबाड
ऋतू कसे माणसांप्रमाणे लबाड झाले ?
इथे कशाला दंगल करता धर्मान्धांनो
जे झाले ते तिकडे सीमेपल्याड झाले
अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले
कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले
>>>
वाह! आवडेश!
छान गझल. कळले नाही इतका कचरा
छान गझल.
कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले>>> व्वा.
सद्य सामाजिक परीस्थितीवरचे भाष्यही शेरांच्या स्वरूपात आवडले.
शुभेच्छा!
जबरी आहे रे गजल.......
जबरी आहे रे गजल....... मस्तच.........
मायेची मोहाची किमया आहे
मायेची मोहाची किमया आहे सगळी
भल्या-भल्यांच्या मेंदूमध्ये बिघाड झाले
त्यांनासुद्धा विकेंड असतो पार्टी असते
कसे कळावे कधी लेकरू उनाड झाले
तुझ्या भुकेला अंतच उरला नाही आता
बघता बघता तुझे माणसा गिधाड झाले
अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले
टॉप क्लास !!
खूप आवडले हे शेर.
सुंदर गज़ल शाम...! सद्य
सुंदर गज़ल शाम...! सद्य स्थितीवरचे भाष्य ही भावले
कवाड खाssस झालाय!
शामजी अख्खी गझल ज्जाम
शामजी अख्खी गझल ज्जाम आवडली
धन्यवाद
त्यांनासुद्धा विकेंड असतो
त्यांनासुद्धा विकेंड असतो पार्टी असते
कसे कळावे कधी लेकरू उनाड झाले
मस्त...
तुझ्या भुकेला अंतच उरला नाही आता
बघता बघता तुझे माणसा गिधाड झाले
हा ही आवडला...
अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले
टॉप क्लास शेर...
कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले
सुंदर शेर..
व्वा...व्वा...
एकंदरीत सुंदर गझल...
शुभेच्छा..
अख्खी गझलच ग्रेट.
अख्खी गझलच ग्रेट.
शाम! दरवळणारे गाव फुलांचे
शाम!
दरवळणारे गाव फुलांचे उजाड झाले
ऋतू कसे माणसांप्रमाणे लबाड झाले?
<<<<<<<<<<<सुंदर मतला! वा!
याच भयाने मनातले विझवितो निखारे
उडेल भडका जर एखादे चहाड झाले
<<<<<<<<<अप्रतिम!
तुझ्या उरलेल्या शेरांतील काही ओळी स्वतंत्रपणे आवडल्या.
काही ओळींवर अजून चिंतन हवे होते असे वाटून गेले.
तुझ्या शेरांचा पूर्ण आदर करून, तुझ्या आवडलेल्या काही ओळी वापरून आम्हाला खलील खयाल सुचले!
हे शेर तुझ्या शेरांना पर्यायी नव्हेत.
आम्ही दिलेल्या शेरांत, तुझ्या मनातीलच अर्थ असेल असे नाही.
फक्त आस्वादासाठी, व निखळ काव्यचर्चेसाठी हे खयाल आम्ही देत आहोत.
‘कबाड’ शब्दाचे तुला काय अर्थ अभिप्रेत आहेत?
कबाड काफियाचा शेर न समजल्याने पूर्ण वेगळा शेर आम्ही दिला आहे.
आम्हाला सुचलेले खयाल खालीलप्रमाणे...........
सोपे नसते माथे फिरू न देणे मित्रा!
भल्या-भल्यांच्या मेंदूमध्ये बिघाड झाले!!
डोळ्यांवरती वात्सल्याची पट्टी होती.....
कसे कळावे? कधी लेकरू उनाड झाले?
माणसासही अलीकडे खातात माणसे!
बघता बघता तुझे माणसा गिधाड झाले!!
धर्मांधांचा वणवा वेशीवरी कसा हो?
दंगेधोपे तिकडे सीमेपल्याड झाले!
खिडकीमधुनी, फटीतुनी ते दु:ख यायचे!
आता तर खिळखिळे घराचे कवाड झाले!!
सश्रम कारावास जाहल्यापरीच जगतो!
जणू रोजचे जगणे माझे कबाड झाले!!
..........प्रा.सतीश देवपूरकर
..........................................................................................
सुरेख गझल. आवडली.
सुरेख गझल. आवडली.
फारच छान !!! सुरेख !
फारच छान !!! सुरेख !
प्रोफेसरांनी परस्पर मला ही
प्रोफेसरांनी परस्पर मला ही गझल बहाल का केली आहे ?
.मस्तच........आवडली.
.मस्तच........आवडली.
शाम! ती गझल तुझीच आहे. आमची
शाम!
ती गझल तुझीच आहे. आमची नाही! त्यातील मूळ मिसरे तुझेच आहेत. शेरांचे उगम तू आहेस. तुझ्या मूळ ओळींमध्ये दम असल्याने मला त्यांच्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लिखाणाचा प्रपंच!
शामरव, तुला कसे वाटले हे विचार कळवलेस तर मला माझे खयाल तपासून घ्यायला मदत होईल! मनापासून सांगत आहे. थट्टा नाही!
>......प्रा.सतीश देवपूरकर
अहो काका, गझल शाम भाऊंची आहे,
अहो काका,
गझल शाम भाऊंची आहे, माझी नाही ! तुमचा नेम चुकला आहे.
ती गझल तुझीच आहे. आमची नाही!
ती गझल तुझीच आहे. आमची नाही! त्यातील मूळ मिसरे तुझेच आहेत. शेरांचे उगम तू आहेस. तुझ्या मूळ ओळींमध्ये दम असल्याने मला त्यांच्यावर चिंतन करावेसे वाटले,

क्या बात है रणजित... अभिनंदन !
ता.क.- गझलेबद्दल मत लिहायचे राहिलेच.
कमी-अधिक फरकाने सर्वच शेर आवडले.
गझल अतिशय उत्तम.
छान गझल.
छान गझल.
अरविंद काका, कुणाची ? शाम
अरविंद काका,
कुणाची ?
शाम भाऊंची की प्रोफेसर साहेबांची की माझी(?) ?
Devsaraanche jagane JEETOOMAY
Devsaraanche jagane JEETOOMAY zaalele disate aahe!!;)
(ek evadhee olach naahee, malaa hazalahee suchate aahe ;)!! )
शाम, खासच
शाम, खासच लिहिलेयेस.......
अवांतरः
आता इतरांच्या गझला पण तू त्यांनी लिहायच्या आधीच लिहितोस रणजीत.....

कुणाची ?
शाम भाऊंची की प्रोफेसर साहेबांची की माझी(?) ?
>>>>>>
शाम भाऊंची गझल...... रणजीतरावांचे नाव आणि प्रोफेसरसाहेबांचे संस्कार......
तुम्ही लोक गझले साठी एक
तुम्ही लोक गझले साठी एक गप्पांचं पान का नाही काढत?
तिथेच चर्चा करा.. पर्यायी गझला,चुका, चर्चा सगळ तिकडेच होऊ देत
हव तर रोजच्या रोज बहारात हलवत चला
एक फु.स.
छान गजल आवडली आहे गगनी
छान गजल आवडली
आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.
रणजीता! धन्यवाद आमचा
रणजीता!
धन्यवाद आमचा वेंधळेपणा निदर्शनास आणून दिल्याबद्दल! तुझी व शामरावची दोघांची आम्ही क्षमा मागतो. असो.
रणजीता! पहा, तू आमच्या किती लक्षात आहेस? बहुतेक गझलेच्या शब्दकळेच्या साधर्म्यामुळे ते अनावधाने झाले असावे!
>.........प्रा.सतीश देवपूरकर
अजूनही ये-जा दु:खांची तशीच
अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले -- शामराव
खिडकीमधुनी, फटीतुनी ते दु:ख यायचे!
आता तर खिळखिळे घराचे कवाड झाले!! --- देवपूरकर सर
यात शामरावांचा शेर उजवा वाटतो. हे.मा.वै.म. कॄ.गै.न.
सुरेख ..... आवडली........
सुरेख ..... आवडली........
सगळ्या मित्रपरिवाराचे खूप खूप
सगळ्या मित्रपरिवाराचे खूप खूप आभार!
देवपूरकर सर आपलेही विशेष आभार ...
वेळातवेळ काढून आपण माझ्या गझलेचे केलेले चिंतन आवडले .. खयालही आवडले.
भटांच्या सहवासाने गंधीत झालेला, कलत चाललेल्या आयुष्याचा सूर्य आपण आम्हा पामरांसाठी वाटावा हेच आम्हासाठी भाग्यदायी आहे.
आपली गझल साधना बहरत राहो...
....................
ज्ञानेश आपलेही आभार.
धन्यवाद
शामभौ, लय खास.
शामभौ, लय खास.
एकच नंबर!
एकच नंबर!
Pages