सफरचंद १
उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे २-३
तांदळाचे पिठ १ वाटी
खोबरे १ वाटी
खजुर ८-१०
मिर्च्या ४-५
लाल मिर्ची पावडर १ चमचा
जिरे १ टेबल्स्पून
कढिपत्ता ६-७ पाने
मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
सफरचंद खोबरे कचोरी म्हणून सखो कचोरी
प्रकाशचित्र डाविकडून उजवीकडे क्रमवार
१. सफर चंद किसून घेतले.
२. एका पॅन मध्ये चमचाभर तेल तापवुन त्यात जिरे बारिक चिरलेल्या मिर्च्या आणि कढिपत्ता टाकुन चुरचुरीत फोडणी केली. त्यात अर्ध्या सफरचंदाचा किस टाकुन जरा सोनेरी रंग येई पर्यंत परतुन घेतले. मग त्यात खवलेले खोबरे घालुन त्यावर चविप्रमाणे मीठ साखर घालुन परतले. मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकुन गॅस बंद केला. हे कचोरीचे सारण गार होई पर्यंत पुढे पारी बनवण्याची तयारी केली.
३. उकडलेले बटाटे किसुन त्यात वाटीभरुन तांदळाचे पिठ चमचाभर तेलाचे मोहन, चवीप्रमाणे मीठ आणि लागल्यास थोडेसे पाणी लाउन घट्ट गोळा मळून घेतला.
४. एका बोल मध्ये खजुर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून १ मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह केले. मग त्यात उरलेल्या अर्ध्या सफरचंदाचा किस, थोडे भाजलेले जिरे आणि चवीप्रमाणे लाल तिखट व मिठ घालून चटणी मिक्सरवर वाटून घेतली. चटणीला एक उकळी काढली.
५. चटणी थंड होई पर्यंत. तेल तापायला ठेउन, पारीसाठी बनवलेल्या गोळ्यातले थोडे पिठ घेउन त्याची हाताने वाटी करुन त्यात एक मोठ्ठा चमचा सारण भरुन गोळे बंद केले. सोनेरी रंगावर सर्व कचोर्या तळून काढल्या.
ह्या कचोर्या तिखट आंबट गोड मस्त चवीच्या होतात.
सफरचंदाची मस्त चव येते.
सारणामध्ये थोडेसे मनुके आणि काजु तुकडे टाकता येतील.
बटाटे उकडण्यापूर्वी त्यावर सुरीने मध्यभागी चिर देउन उकडले (वर फोटो पहा) तर सोलताना एका झटक्यात साल निघुन येते.
तांदळाचे पिठ आणि बटाटा वापरल्याने पारी मस्त खुट्खुटीत होते. (क्रिस्पी + सॉफ्ट पण कडक नव्हे )
अफलातून दिसताहेत कचोर्या
अफलातून दिसताहेत कचोर्या
सत्यासाठी प्रयोग.... >> एकदा
सत्यासाठी प्रयोग....
>> एकदा तुमच्या प्रयोगशाळेत यायला हवे
(No subject)
Pages