तोंपासु हस्तकला स्पर्धेतील पेढे, बर्फी, मोदक, वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, ढोकळा, सुरळीच्या वड्या, काला-जामुन, कॉफी, वडापाव, ब्राऊन राइस नूडल्स आणि इतरही वेगवेगळे पदार्थ खाऊन तृप्त झालेले बाप्पा हळूच म्हणाले,
" काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय..."
बाप्पांना नेमकी कुठल्या पदार्थाची आठवण येत असावी हे आमच्या लग्गेच लक्षात आलं.
आम्ही तत्परतेने ते पदार्थ बनवून केळीच्या पानात मांडले.
बाप्पांच्या चेहर्यावर सोंडभरून हसू पसरलेलं पाहून आम्ही खुष !
आमचा मेनू :
ऊन-ऊन वरण-भात, वरून साजूक तुपाची धार, लिंबाची फोड, खोबर्याची लाल चटणी, पापड आणि बटाट्याची मोकळी भाजी.
सगळं झाल्यावर बाप्पांनी हळूच 'खखाव्रतातील फालुद्याचा' विषय काढला. म्हणून मग फालुदाही केला.
मोठ्ठा ग्लास खास बाप्पांच्या सोयीसाठी आणि छोटुकला ग्लास उंदीरमामांसाठी.
वापरलेले साहित्य :
कागदाचा लगदा, डि़ंक, प्ले डो, केसांना लावायचं जेल, पाणी, रंग, प्लॅस्टिकचे कागद, साधे कागद, नेलपेंट, जेलीबॉल्स, समुद्राकाठची रेती, कापूस.
कृती :
१. भात : कागदाचा लगदा (इतर हस्तकलांसाठी हा लगदा घरात कायम तयार असतो) वाटिका हेअर जेलमध्ये मिसळला.
(उत्साहाच्या भरात खरेदी केलेलं हे हेअर जेल वर्षभर घरात के च्या टो मध्ये जाण्याची वाट पहात पडून होतं. त्याला सद्गती दिली :फिदी:)
त्या लगद्याची मूद पाडली.
२. वरण : फेव्हिकॉलमध्ये पाणी आणि पिवळा रंग मिसळला.
(डाळ दिसावी म्हणून पिवळ्या रंगाच्या कागदाच्या टिकल्या टाकल्या आहेत. फोटोत दिसत नाहीयेत.)
३. बटाट्याची भाजी : क्ले (प्ले डो) चा बटाटा बनवून त्याच्या फोडी केल्या. काळ्या रंगाच्या प्ले डोच्या मोहरी बनवल्या. हिरव्या क्रेयॉनला सुरीने बारीक चिरून कोथिंबीर केली.
४. मीठ : समुद्राकाठची रेती
५. चटणी : कागदाच्या लगद्यामध्ये लाल आणि केशरी रंग मिसळला आहे.
६. पापड : पिवळ्या रंगाचा कागद एकावर एक चिकटवून पापड बनवला आहे. त्यावर पेन्सिलने मिरी दाखवली आहेत.
७. लिंबाची फोड : पिवळ्या क्ले मध्ये पांढरा क्ले लपवून एक गोल बनवला. तो अर्धा कापला. मग त्यावर सुरीने रेषांचे आकार केले. पांढर्या क्लेने बिया बनवल्या. लिंबूरसाची चकाकी यावी म्हणून वरून पारदर्शक नेलपेंटचा एक थर दिला.
८. फालुदा : खालचा थर - पाण्यात लाल रंग मिसळला आहे. त्यावर प्लॅस्टिकचा कागद कापून टाकला आहे
(हे न केल्याने उंदीरमामांच्या ग्लासमध्ये सगळे रंग एकत्र झाले होते)
त्यावर जेलीबॉल्स टाकले. मग मगाचं उरलेलं हेअर जेल, पाणी, पांढरा रंग एकत्र करून वरचा थर बनवला.
सगळ्यात वर कापसाचे आइसक्रीम.
गारेगार फालुदा तयार
गणपती बाप्पा मोरया !!
.
.
मस्त. विसर्जनापूर्वी
मस्त. विसर्जनापूर्वी बाप्पांची इच्छा राहून जायला नको.
मस्त,रुणुझुणू ....
मस्त,रुणुझुणू .... बाप्पांच्या मनातल ओळखून पूर्ण देखील केलीत बाप्पांची इच्छा
मस्तच!!
मस्तच!!
ती लिंबाची फोड फारच छान दिसत
ती लिंबाची फोड फारच छान दिसत आहे, अगदी खर्री. फालुदा पण मस्त जमलाय.
भारीच की लिंबाची फोड कशी
भारीच की
लिंबाची फोड कशी बनवली?
आहाहाहा.......... काय सह्ही
आहाहाहा.......... काय सह्ही दिसतोय तो वरणभात आणि बचीभा
रुणु, काय झक्कास दिसतंय ते
रुणु, काय झक्कास दिसतंय ते वरणभाताचं पान! आणि नंतर थंडगार फालुदा ... आहा! मज्जाच.
जरा डिटेलात दे की गं कसं केलंस हे सगळं.
खुप मस्त दिस्तोय भात वरण
खुप मस्त दिस्तोय भात वरण
मस्त.
मस्त.
बाप्पा तृप्त झालेला आहे...
बाप्पा तृप्त झालेला आहे...
वॉव! वरणभाताची मूद... माझा
वॉव! वरणभाताची मूद... माझा वीक-पॉईंट
फार खरं वाटतंय.. कसं केलं ते
फार खरं वाटतंय.. कसं केलं ते तपशीलात लिही ना..
तपशीलात कृती लिहिली आहे.
तपशीलात कृती लिहिली आहे. मगाशी गडबडीत होते.
खखाव्रतातील पहिल्याच प्रतिसादात आमच्या फालुद्याचा प्रेरणास्रोत आहे
किती तो खटाटोप फालुदा बाकी
किती तो खटाटोप

फालुदा बाकी जबरी झालायं , वरण भात सगळचं मस्त झालयं.
आमच्या फालुद्याचा प्रेरणास्रोत >>> पण तुमच्या फालुद्यात मामी कुठाय ?
मस्त मस्त!!!
मस्त मस्त!!!
पाहुन भुक लागली.
पाहुन भुक लागली.
फारच मस्त. हिम्सकूल + १
फारच मस्त. हिम्सकूल + १

वाटिका हेअर जेल
अरे...काय हा छळ चालवलाय
अरे...काय हा छळ चालवलाय मायबोलीकरांनी! फालुदा चारुन दोन दशके उलटलीत लोकहो! हे असे सुदंर पदार्थ दा़खवून झोप उडाली की! काय उत्तम पान सजवले आहे!
अरे वा........ एकदम भन्नाट
अरे वा........ एकदम भन्नाट कल्पना!!!!!!!
बापरे किती खटाटोप! हस्तकला
बापरे किती खटाटोप! हस्तकला एकदम आवडीची दिसतीय!

एकट्या लिंबासाठी १०० पैकी १०० मार्क्स!
कस्लं परफेक्ट आहे..वॉव
कस्लं परफेक्ट आहे..वॉव ____/\___
पापड थोडा ़कच्चा आहे की तळलेला असल्याने तसा दिसतोय
लिंबाची फोड अप्रतिम! साक्षी.
लिंबाची फोड अप्रतिम!
साक्षी.
रुणू, मस्त! फालुदाही
रुणू, मस्त! फालुदाही झक्कास.
बाप्पा यावेळेस मायबोलीवर विशेष खुश होणार.
रुणू... वॉव.. आयडियाबाज.. गरम
रुणू... वॉव.. आयडियाबाज..
)
गरम गरम वरणभात लिंबु,पापडासकट .. बाप्पा ला खूश करून टाकलं असशील!!
फालूदा तर एक्दम खासमखास दिस्तोय
(रच्याकने..रुणूनी हळ्ळूच टाकलेला सुटकेचा श्वास ही ऐकू आला,'हुश्श्श!!!!!!!!! संपला एकदाचा हेअरजेल' ..
कसले मस्त केलेत पदार्थ
कसले मस्त केलेत पदार्थ रुणू... एक्दम सही!!!!!!!!..
वर्षू
वर्षू
धन्यवाद सर्वांना << पण
धन्यवाद सर्वांना

<< पण तुमच्या फालुद्यात मामी कुठाय ? >> म्या पामराने काय मामी बनवावी ? आमची झेप फालुद्यापर्यंतच
<< हस्तकला एकदम आवडीची दिसतीय! >> हो गं. अति-आवडीची. तिकडच्या स्वारीने रौद्रावतार घेतल्यावरच मी आणि लेकाने घातलेला हस्तकलेचा पसारा आवरला जातो.
<<पापड थोडा ़कच्चा आहे की तळलेला असल्याने तसा दिसतोय >> पापडावर पण पारदर्शक नेलपेंट लावलं होतं. पण एवढं तेल बघून कॅलरी-कॉन्शस बाप्पा रागवले. मग तेल टिश्यूने पुसून टाकलं
<< (रच्याकने..रुणूनी हळ्ळूच टाकलेला सुटकेचा श्वास ही ऐकू आला,'हुश्श्श!!!!!!!!! संपला एकदाचा हेअरजेल'>> अगदी अगदी
मस्त मस्त
मस्त मस्त
मस्तच... सगळे ताट अगदी
मस्तच... सगळे ताट अगदी नैवेद्य ठेवल्यासारखे वाटतेय... बस मोदकाची तेवढी कमी.. आता बाप्पांनाच मोदकाच्या जागी फालूदा हवा झाला त्याला आपण तरी काय करणार..
Pages