नमस्कार मायबोलीकर्स,
तों.पा.सु., मायबोली गणेशोत्स्व २०१२ या स्पर्धेसाठी मी थीम निवडली आहे "पार्टी टाईम", मग यामध्ये बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी किंवा आपले एखादे घरगुती गेटटुगेदर असो, त्यासाठी आपला सर्वसाधारण मेनु असतो केक,मिठाई,स्वादिष्ट जेवण व शेवटी मुखवास म्हणुन पानाचा विडा
मी स्वादिष्ट जेवण वगळता बाकीचे पदार्थ बनवले आहेत, तर सर्व मायबोलीकरांना विनंती कि त्यांनी या चविष्ट व तोंपासु पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा ( अर्थात फक्त फोटो पाहुन )
हे पदार्थ बनविण्यासाठी मी वापरलेले साहित्य खालीलप्रमाणे
साहित्य :-
१. क्ले
२. सिल्व्हर फॉईल
३. कार्डपेपर
४. फेव्हिकॉल
५. रंग
६. सुई
कृती :-
१. खालील प्रचिंमधील सर्व पदार्थ क्ले हाताने मळुन, त्याला विविध आकार दिले आहेत.
२. काजुकतलीवरील चकाकीसाठी सिल्व्हर फॉईल बारीक कापुन फेव्हिकॉलने चिकटवली आहे.
३. केकचा बेस बनविण्यासाठी कार्डपेपर हवा असलेल्या आकारात कापुन त्याला सिल्व्ह फॉईलने कव्हर केले आहे.
४.कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली आहे.
५. पानाचा विडा बनविताना लवंगेसाठी सफेद क्ले वापरुन त्याला रंगाने शेंडीग केले आहे. विडा खरा वाटण्यासाठी क्लेवर सुईने पानाचे टेक्स्चर दिले आहे
पदार्थांची नावे :-
१. केक्स - वेडिंग केक, लव्ह केक, बर्थडे केक्स
२. पेढे - सफेद व केशरी
३. काजुकतली
४. पानाचा विडा
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
आशा करते की मायबोलीकरांना मी बनवलेले पदार्थ आवडतील व त्याचा मनमुरादपणे ते आस्वाद घेतील
धन्यवाद
-----
वर्षा व्हिनस
सगळेच पदार्थ अफलातून!!!!!!!!!
सगळेच पदार्थ अफलातून!!!!!!!!! कापलेला केक तर अतिशय सुंदर!
केकचा कापलेला भाग छानच !
केकचा कापलेला भाग छानच !
पेढे खूपप्प्प्प्प्प्प्प्प्च
पेढे खूपप्प्प्प्प्प्प्प्प्च आवडले
जबरी... विडा थोडा गडद रंगाचा
जबरी... विडा थोडा गडद रंगाचा हवा होता असं वाटतंय
वॉव.. सुप्पर्ब गं
वॉव.. सुप्पर्ब गं वर्षा...
वर्षा नावाचे सगळेच आर्टिस्ट अस्तात नै??
सगळेच मस्त. विड्याचं
सगळेच मस्त. विड्याचं टेक्श्चरही छान.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
मस्तच ! सगळे पदार्थ अगदी
मस्तच ! सगळे पदार्थ अगदी पाहिल्या बरोबर उचलुन खावेसे वाटले..... गुड वर्क, वर्षा
धन्यवाद सर्वांना अंजली मला
धन्यवाद सर्वांना
अंजली मला हिरव्या रंगाच्या क्लेचा हाच शेड मिळाला त्यामुळे तोच वापरला
मस्त
मस्त
पेढे पान आणि रेड कलरचा
पेढे पान आणि रेड कलरचा हार्टवाला केक अगदी हुबेहुब
मस्त!
सगळेच छान!! कापलेल्या केकचे
सगळेच छान!! कापलेल्या केकचे टेक्श्चर मस्त जमले आहे.
सगळे पदार्थ मस्त आहेत.
सगळे पदार्थ मस्त आहेत. पांढर्यापेक्षा पिवळे पेढे अगदी हुबेहुब आहेत. मिल्क पावडर / खव्याचे खायचे विडे करतात ते अगदी ह्याच रंगाचे दिसतात त्यामुळे ते खूप आवडले
अतिशय सुरेख..पेढे, केक अन
अतिशय सुरेख..पेढे, केक अन विडा खलासच!!
धन्स वर्षुताई हो ना,
धन्स
वर्षुताई हो ना, मायबोलीवर जेवढया म्हणुन वर्षा आहेत त्या सर्व आर्टिस्ट आहेत अर्थात माझा नंबर खालुन पहिला बरं का
सगळेच पदार्थ खरंच तोंपासु!
सगळेच पदार्थ खरंच तोंपासु! विड्यासकट!
खोते एतके चान... मग खरे किति
खोते एतके चान... मग खरे किति चान करत असाल
सह्हीच. सगळे केक्स एकदम
सह्हीच. सगळे केक्स एकदम तोंपासु.
तो कापलेला केक आतून जाळीदार कसा केलास?
>>>>> वर्षा नावाचे सगळेच आर्टिस्ट अस्तात नै?? >>>>>> वर्षुताई ...
जिवाला त्रास आहे! खायला तर
जिवाला त्रास आहे! खायला तर मिळत नाही नि नुसतं बघून समाधान मानायचं... ह्या!
वर्षा,
मस्त कलाकारी!
जबरी!!
जबरी!!
कापलेला केक लगेच खावासा वाटत
कापलेला केक लगेच खावासा वाटत आहे. मस्त!
धन्स मामी कापलेला केक आतुन
धन्स
मामी कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली
कापलेला केक आतुन जाळीदार
कापलेला केक आतुन जाळीदार करण्यासाठी त्यावर सुई हलक्या हाताने फिरवली>>>मला वाटले तो स्पंज आहे.
अरे देवा!!! किती सुंदर ते
अरे देवा!!! किती सुंदर ते सर्व! ... कापलेला केक अप्रतिम व पेढेपण...
सगळेच पदार्थ अफलातून!!!!!!!!!
सगळेच पदार्थ अफलातून!!!!!!!!! कापलेला केक तर अतिशय सुंदर! >>>> +१
पेढे मस्तम! आणी काय विडा
पेढे मस्तम!
आणी काय विडा लावलायस ग!
खाल्ला तर रंगेलच बघ !
एकदम तो पा सू !
एकदम तो पा सू !
सगळेच पदार्थ अफलातून!!!!!!!!!
सगळेच पदार्थ अफलातून!!!!!!!!! कापलेला केक तर अतिशय सुंदर!
वॉव! कापलेल्या केकची आयडीया
वॉव! कापलेल्या केकची आयडीया भारीयं!
सही ! सगळेच पदार्थ छान. विडा,
सही ! सगळेच पदार्थ छान. विडा, कापलेला केक, पिवळे पेढे एकदमच तोंपासु.
काय कलाकार आहेत एकेक !!!
Pages