गृह हीत ( झब्बु )

Submitted by वर्षा_म on 27 September, 2012 - 01:58

कौतुकाच्या कौतुकाला मान देउन Happy
http://www.maayboli.com/node/38174

===========================

येता जाता दिसणार्‍या
सेटवरच्या,
मेकपच्या आवरणात खुलणार्‍या
नट्यांचा नटवेपणा
कितीही कौतुकास्पद असला तरी..
आवडीने घरात आणलेल्या
बायकोचे लाड मात्र
पैसे खर्चुन, वेळ देऊन
प्रेमाने करावेसे वाटतात.
..
.
आवडत्या नट्यांचे नाही तसे
त्यांच्यामुळे गृह-हीत साधत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

शिरोडकरांची मूळ कविता वाचून माझ्याही मनाला अशाच विडंबनाचा मोह झाला होता जो मी आवरता घेतला Happy

शाब्बास वर्षा_म...आवडेश Happy

येता जाता दिसणार्‍या
सेटवरच्या,
मेकपच्या आवरणात खुलणार्‍या
नट्यांचा नटवेपणा
कितीही कौतुकास्पद असला तरी..
आवडीने घरात आणलेल्या
बायकोचे लाड मात्र
पैसे खर्चुन, वेळ देऊन
प्रेमाने करावेसे वाटतात.
..
.
येथपर्यंत कविता (झब्बु) ठीक वाटला

परंतु खालील ओळीतुन कोणापासुन कोणाचे गॄह-हीत साधत नाही हे स्प्ष्ट होत नाही.

कॄपया स्पष्ट करुन सांगा?
..
.
आवडत्या नट्यांचे नाही तसे
त्यांच्यामुळे गृह-हीत साधत नाही.

नट्यांमूळे तर बायकोचे गॄह-हीत साध्य झाले.

धन्यवाद सगळ्यांना.. Happy

@ बंडोपंत : नट्यांचे लाड केल्याने गृह ( घराचे ) हीत होत नाही. असे म्हणायचे होते.