धार्मीक स्टिरीओटायपींगचा भस्मासुर
(१) एका अमेरीकन माणसाने मुहम्मदवर एक चित्रपट काढला. त्यात मुसलमानांच्या दृष्टीने अतिशय हीन प्रकारे मुहम्मदचे चित्र उभे केले गेले.
(२) गुगलने यु ट्युब वरील त्या चित्रपटाचे भाग काढुन टाकण्यास नकार दिला.
(३) त्या चित्रपटामुळे अनेक मुस्लीम देशांमधे निदर्शने झाली. काश्मीरमधे पण. या निदर्शनांमधुन, खासकरुन त्यात जेंव्हा जाळपोळादि प्रकार होतात, तेंव्हा ती नेमकी कुणाविरुद्ध असतात आणि ते नुकसान त्यांच्यापर्यंत कसं पोचतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
(४) लिबिया मधे तर अमेरीकन दुतावासावर हल्ला केला गेला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जिवे मारण्यात आले. अमेरीका अनेक दृष्टीने सेक्युलर देश आहे. दुतावासातील कर्मचारी काळे की गोरे, ज्यु की हिंदु, आस्तीक की नास्तीक हे न तपासता ती कत्तल झाली.
(५) त्या कत्तलीमागे पोळीभाजु अतिरेकी होते असं कळलं (हे असं नेहमीच असतं). आम जनतेनी एकत्र येऊन त्यांना हुसकावून लावले ही एक त्यातल्या त्यात चांगली गोष्ट झाली.
(६) त्या दरम्यान एका फ्रेंच वारंवारीकानं मुहम्मदचं एक कार्टुन प्रकाशीत केलं.
(७) कोर्ट त्याचं करायचं ते करेल, पण भाष्य-स्वातंत्र्याचा हक्क अबाधीत राहील असं वक्तव्य फ्रेंच पंतप्रधानांनी केलं.
(८) UN मधे ब्लासफेमी गुन्हा आहे असं म्हणु पाहणारा कायदा आणायचा प्रस्ताव बारगळला होता. तो पुन्हा डोकं वर काढतोय. (ते ही तुर्कस्थानातील पंतप्रधानांच्या पुढाकारानं - एकेकाळी मुस्लीम असुनही सेक्युलर म्हणुन हा देश प्रसिद्ध होता).
(९) पाकीस्तानातील एका नेत्यानी त्या फिल्म बनवणाऱ्या अमेरीकनाचा कोणी खून केल्यास भरपूर बक्षीस जाहीर केलं आहे (तो न पकडल्या जाता पाकीस्तानान जाऊन ते बक्षीस कसं मिळवणार हा प्रश्न निराळा).
या सर्वात आपण कुठे बसतो हा प्रश्न महत्वाचा आहे.
(१) आपले भाष्य-स्वातंत्र्याबद्दल काय मत आहे?
(अ) असावं, (ब) नसावं, (क) सोयीस्कर रित्या असावं किंवा नसावं
(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का?
(अ) हो, ते तसेच असतात, (ब) नाही, (क) सोयीप्रमाणे करावं, (ड) मी निधर्मी आहे
(३) इतरांचं भाष्य-स्वातंत्र्य जपण्याकरता तुम्ही आवाज उठवाल का?
(अ) हो, (ब) नाही बुवा, (क) ते इतर कोण आहेत यावरून ठरवु
(४) तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?
(अ) हो, तसंच करतो, (ब) अर्थातच नाही, (क) सोयीप्रमाणे ठरवु, (ड) मी निधर्मी आहे
हा धाग्यात बंद पडण्याचे लैच
हा धाग्यात बंद पडण्याचे लैच पोटेन्शियल आहे...
माझ्यासाठी सर्व प्रश्नांची
माझ्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तर- (अ)
बाकी हा विषयावर लोकांची मते अत्यंत सापेक्ष आणि एकांगी असतात. म्हणजे मुहम्मदाचे कार्टून मला गुदगुल्या करते आणि ते काढणार्या कलाकारचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला जपले जावेसे वाटते. पण उद्या कोणी रामाचे / बुद्धाचे / येशूचे - थोडक्यात माझ्या धर्माच्या आदरस्थानाचे तसे कार्टून काढलेले मला चालणार नाही, असे काहीतरी.
भावना आणि अस्मितांची तीव्रता उपद्रवमूल्याबरोबर वाढत जाणे दुर्दैवी आहे. त्याचबरोबर "अभिव्यक्ती"सुद्धा निखळ आहे की लोडेड आहे हेसुद्धा पाहिले गेले पाहिजे असे वाटते. डेलिबरेटली भावना डिवचण्याचे प्रकारही घडू शकतात, ज्याला (कायद्याच्या चौकटीत) शासन होणे अनिवार्य आहे.
या निदर्शनांमधुन, खासकरुन
या निदर्शनांमधुन, खासकरुन त्यात जेंव्हा जाळपोळादि प्रकार होतात, तेंव्हा ती नेमकी कुणाविरुद्ध असतात आणि ते नुकसान त्यांच्यापर्यंत कसं पोचतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
हो का? मनसे बसगाड्या आणि रिक्षा जाळते, तेंव्हा हा प्रश्न पडतो का?
कांही वर्षांपूर्वी अमेरिकेतला
कांही वर्षांपूर्वी अमेरिकेतला कुठला तरी ख्रिश्चन-फादर मुसलमानांच्या भावना दुखावणारे कांहीतरि बोलला म्हणे. त्याने भारतातील इतर गावांमध्ये जरी तितक्या नाहीत तरी फक्त मी राहातो त्या गावच्या मुसलमानांच्या भावना इतक्या दुखावल्या कि त्यातून उद्भवलेल्या दंगलीने कांही हिंदूंचे बळी घेतले. बळी पडलेले गेले १२च्या भावात . सगळे आरोपी सहिसलामत सुटले.
आता भारतातील जाळपोळ व हिंदूंचा बळी घेऊन त्या ख्रिश्चन-फादरला काय झाले?
वड्याचे तेल वांग्यावर.
फादरला मारले असते तर अमेरिकेने मारेकर्याला असेल तेथुन मुसक्या बांधून आणला तरी असता वा त्याच्या देशात जावून त्याला ठेचला असता.
एक अगदी उदार मतवादी समाज आणि एक फार फार असहिष्णु समाज फार काळ गुण्यागोविंदाने कसा राहील ? त्यांच्यातील संघर्ष टळायला अतिरेकी उदारमतवाद कमी व्हावा लागेल आणी अतिरेकी असहिणुता कमी व्हावी लागेल.
अभिव्यक्ती म्हणजे काय हो भौ ?
अभिव्यक्ती म्हणजे काय हो भौ ?
(१) आपले
(१) आपले भाष्य-स्वातंत्र्याबद्दल काय मत आहे?
(अ) असावं, (ब) नसावं, (क) सोयीस्कर रित्या असावं किंवा नसावं
जोवर स्वगते रचुन स्वतःलाच ऐकवतोय, तोवर ते स्वातन्त्र्य १००% असावे
जेव्हा दुसर्याकरता, दुसर्याबद्दल, दुसर्याशी काही विचार मान्डायचे असतील, तर ते नितीनियमान्च्या बंधनान्नी युक्तच असावे.
जेव्हा मूर्खासमोर वा (एकल किन्वा झुन्डीच्या) सर्वसत्ताधीशासमोर दुर्दैवाने कधि काही विचार मांडायची वेळ आलीच, तर सरळ मौनव्रत धारण करावे
(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का?
(अ) हो, ते तसेच असतात, (ब) नाही, (क) सोयीप्रमाणे करावं, (ड) मी निधर्मी आहे
जोवर इतर धर्मिय माझ्यासहित माझ्या धर्मियान्बरोबर सद हेतुने, जिव्हाळ्याने वागतात/बोलतात, तोवर एकाच पारड्यात मोजावे.
ज्याक्षणी इतर धर्मियच नव्हेत, तर स्वधर्मिय देखिल माझे धर्माचे अहिताचे वागू/बोलु लागतील, तेव्हा त्यान्चेकरता वेगळे पारडे योजावे
(३) इतरांचं भाष्य-स्वातंत्र्य जपण्याकरता तुम्ही आवाज उठवाल का?
(अ) हो, (ब) नाही बुवा, (क) ते इतर कोण आहेत यावरून ठरवु
कैच्च्याकैच अपेक्षा! हिथ दोन वेळची पोटाची आग भागवता भागवता नै नै त्या लोकान्च्या नाकदुर्या काढण्यात आख्ख आयुष्य वाया जातय, इतरान्च्या भाष्यबिष्य स्वातन्त्र्याबद्दल विचार करायला सवड कोणाला आहे? जोक्स अपार्ट, त्या "इतरान्ना देखिल" वर उल्लेखिलेल्या क्रमान्क दोनच्या उत्तराचेच निकष"जोपर्यन्त लागू पडताहेत, तोवर जरुर आवाज उठवू.
(४) तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?
(अ) हो, तसंच करतो, (ब) अर्थातच नाही, (क) सोयीप्रमाणे ठरवु, (ड) मी निधर्मी आहे
पर्याय चूकीचे वा अपुरे/अस्पष्ट आहेत. वर उल्लेखिलेल्या क्रमान्क दोनच्या उत्तराचेच निकष"जोपर्यन्त लागू पडताहेत तोवर सर्व धर्म स्वतन्त्रपणे जगण्यासाठी समान मानायला माझी कसलीच हरकत नाही.
limbutimbu >> १००
limbutimbu >> १००
मला असे वाटते की मी गाढव
मला असे वाटते की मी गाढव आहे ( तसे "भारतीय" गाढवच आहेत) - मुख्य म्हणजे जे काय आज चालु आहे ते पाहिले की उदा. सत्तेवर बसलेली माणसे,भ्रष्टाचार, धर्मांधता वगैरे.
गाढवाला कोणताच धर्म नसल्यामुळे तुमच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरे नाहित
- धर्म religion याआर्थाने घेत
- धर्म religion याआर्थाने घेत आहे.
प्रश्न १) अ - (त्याबरोबर अहिंसात्मक निदर्शन-स्वातन्त्र्य ही आलेच).
प्रश्न २) ब - (टीप १- नास्तिकधर्म हाही एक धर्मच आणि त्यातही पंथ आहेतच. २ - सर्व लोकांना एका पारड्यात टाकण्यासाठी पारडे केवढे मोठे हवे!)
प्रश्न ३) अ - (पण खरे तर ब. - कारण दुसरे जर भाष्य-स्वातन्त्र्य नको हिंसेद्वारा म्हणणारे असतील तर? टीप - Bertrand. Russel यांचा संच आठवा.)
प्रश्न ४ - यापैकी काही नाही.
limbutimbu - + १
भारतीय - +१ मला अजून माझी अर्धीच ओळख पटली आहे.
हं... संपादकांचा झाडू फिरून
हं...
संपादकांचा झाडू फिरून गेलेला दिसतोय धाग्यावरुण..
संपादक तिबेटमधील आहेत ?
संपादक तिबेटमधील आहेत ?
संपादकांचा झाडू ठराविक ठिकाणी
संपादकांचा झाडू ठराविक ठिकाणी आणि ठराविक लोकांवरुन फिरतो... विजय आंग्रेने सोनियांबद्दल लिहिलेला मजकूर अजून तसाच आहे.
ज्ञानेश, लिंबुटिंबु, सुसुकु,
ज्ञानेश, लिंबुटिंबु, सुसुकु, उत्तरं दिल्याबद्दल धन्यवाद.
दुसरा प्रश्न बहुदा सर्वात गहन आहे आणि त्यावर विचार न झाल्यामुळेच सर्वात जास्त रक्त वाहतं.
एखादी व्यक्ती एखादं वक्तव्य करते (किंवा चित्रातुन काही व्यक्त करते) तेंव्हा ते त्या व्यक्तीच्या धर्माशी किंवा देशाशी का जोडलं जावं? त्या व्यक्तीसारखी मुळीच नसलेली, पण त्याच धर्माची आणि देशाची व्यक्ती इतरांच्या शारीरीक हल्ल्याची शिकार (त्यामुळे) का बनावी?
ज्ञानेश, दुसर्या प्रश्नाचेही उत्तर (अ)?
रच्याकने, माझी उत्तरः अ, ड, अ, ड
उत्तरं देण महत्वाचं नाही, पण प्रश्नांवर विचार करणं नक्कीच आहे. उत्तरं दिल्यानी, आणि त्यावर चर्चा झाल्यानी कदाचीत विचारांना मदत मिळु शकेल.
बहुतेक नसावेत. @ भारतीय | 26
बहुतेक नसावेत.
@ भारतीय | 26 September, 2012 - 22:29 नवीन
संपादक तिबेटमधील आहेत ?
<<
पण भिक्खूंच्या निरिच्छ बुद्धीने काम करतात, असेच अपेक्षित असते ना?
मला माझ्या देवतांचा अपमान
मला माझ्या देवतांचा अपमान झालेला आवडत नाही (पण कोणती गोष्ट अपमानकारक आहे हे सब्जेक्टिव्ह आहे - मला 'देऊळ' मधले गाणे तसे वाटले नाही पण हुसेन ने काढलेली चित्रे वाटली). त्यामुळे इतर धर्मीयांच्या देवतांचा अपमान त्यांनाही आवडणार नाही हे ही समजू शकतो. पण त्याची प्रतिक्रिया ही निषेध वगैरे घटनात्मक मार्गातूनच व्हायला हवी. तसेच त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचा पर्याय असतोच.
त्यामुळे १ चे उत्तर "अ".
२ चे उत्तर देणे अवघड आहे - मला इतर धर्मांची एवढी माहिती नाही. त्यामुळे सगळे धर्म सारखे आहेत का हे कसे सांगणार? मात्र भाषा स्वातंत्र्य सर्वांना सारखेच असावे का असा प्रश्न असेल तर उत्तर "हो".
३. हो
४. उत्तर साधारण २ प्रमाणेच. मला जेवढा काही माहीत आहे तो माझाच धर्म माहीत आहे. इतरांबद्दल काय सांगणार. काही काही गोष्टी वाचलेल्या, ऐकलेल्या आहेत पण ती अर्धवट माहिती आहे. मात्र जगातील बहुसंख्य लोकांचे वागणे एकमेकांपेक्षा फार वेगळे नसते एवढे माहीत आहे
(१) आपले
(१) आपले भाष्य-स्वातंत्र्याबद्दल काय मत आहे? <<
(अ) असावं
(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का? <<
हा प्रश्न योग्य पर्याय निवडाचा नाही. सर्व धर्मांना माणुसकी ते कायदा यापातळीवर मी तरी समान मानते. अमुक धर्मियाने अमुक वाईट कृत्य केले तर ते भयंकर वाईट आणि माझ्या धर्मातल्याने तेच अमुक वाईट कृत्य केले तर ती छोटीशी चूक असे मी समजत नाही. माणसाचा धर्म ही खाजगी बाब आहे त्याचा सामाजिक वर्तनाशी संबंध नाही. त्यामुळे मी माझ्यासकट प्रत्येकाला एकाच पारड्यात मानते. मी निधर्मी नक्कीच नाही पण.
(३) इतरांचं भाष्य-स्वातंत्र्य जपण्याकरता तुम्ही आवाज उठवाल का?<<
(अ) हो अर्थातच.
(४) तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?<<
(अ) हो, तसंच करते
@अस्चिग- ज्ञानेश, दुसर्या
@अस्चिग-
ज्ञानेश, दुसर्या प्रश्नाचेही उत्तर (अ)?
दुसरा प्रश्न असा आहे-
(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का?
मला दुसर्या आणि चौथ्या प्रश्नातला फरक समजला नाही. एकदा सर्व धर्म सारखे म्हटल्यावर सगळ्यांना एकाच पारड्यात टाकले पाहिजे ना?
वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही 'मी निधर्मी आहे' अशी दिली आहेत. निधर्मी झाल्यानंतर अशा विषयांवर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार संपतो, असे सुचवत आहात का?
कोणताही धर्म मानणारे लोक
कोणताही धर्म मानणारे लोक नैसर्गिकरीत्या आपला धर्म इतरांपेक्षा चांगला आहे असे मानत असतील (अपवाद असतीलच), त्यामुळे त्यांना २ व ४ लागू आहेत. तो प्रश्न निधर्मी लोकांना येणार नाही म्हणून तसा वेगळा पर्याय ठेवला असेल.
कोणताही धर्म मानणारे लोक
कोणताही धर्म मानणारे लोक नैसर्गिकरीत्या आपला धर्म इतरांपेक्षा चांगला आहे असे मानत असतील <<<
अस नसतं ना जनरली..
ज्ञानेश, दुसर्या प्रश्नात
ज्ञानेश, दुसर्या प्रश्नात 'धर्म' एकेरी आहे. कोणताही एक धर्म घेतल्यास त्यातील सर्व लोक सारखेच असे मानता का (केवळ त्यांच्या त्या धर्मात असण्यामुळे)? तुम्ही धर्मांमधील (धर्मा-धर्मातील लोकांच्यातील) फरक मानत नसाल तर (ड) उत्तर अपेक्षीत आहे. ते जास्त स्पष्ट करायला शब्दरचना बदलता येईल का?
चौथ्या प्रश्नात इतर सर्व धर्म थोडेफार एकत्र केले जातात. दुसर्यात कोणत्या धर्मात लोक आहेत त्यावरुन भेदभाव असु शकतो.
फारएण्ड, दुर्लक्ष करण्याचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तो पर्याय बहुतांश लोक विसरतात.
> माणसाचा धर्म ही खाजगी बाब आहे
नीधप, ती बाब खाजगी 'असावी' असे मी म्हणेन
"वाईट कृत्य" कशाला म्हणायचे हा प्रश्न ओघानी येतोच. आणि त्यावर काय करायचे हे पण (आणि कोणी).
फारएण्डला (बहुदा) चित्र काढणे "वाईट कृत्य" वाटले. तो हुसेनचे म्हणाला, पण कदाचीत असीम त्रिवेदीचेही वाटले असावे. वाटले नसल्यास दोन मधे काय फरक आहे हा पुढचा प्रश्न येतो. दोघांनीही कुणालाच शारीरीक इजा पोचवली नव्हती. एकानी हिंदुंच्या पुज्य स्थानांना हात घातला होता (बहुतांशांच्या मते काही गरज नसतांना) तर दुसर्याने जास्त संख्या असलेल्या भारतियांच्या पुज्य स्थानांना वाईट प्रकारे चित्रीत केले होते (अनेकांच्या मते तशी गरज होती, पण राज्यकर्त्यांना ते पटले नव्हते). हेच आता थोड्या फार फरकानी मुहम्मद विरुद्धच्या कार्टुन आणि फिल्म द्वारे होते आहे. कितीतरी वैयक्तिक अपमान लोक गिळतात, त्या कडे दुर्लक्ष करतात. पण कधीकधीच इतरांचे भाष्य-स्वातंत्र्य पूर्णपणे डावलतात (दुर्लक्ष करु शकत असतांना).
आशिष तुझा प्रश्न इंटरेस्टिंग
आशिष तुझा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. मला देवतांची (हुसेनने काढली तशी) चित्रे काढणे जेवढे अपमानास्पद वाटले तेव्हढे त्रिवेदीने काढलेली कार्टून्स बघून वाटले नाही. घटनेबद्दल संसदेबद्दल आदर आहेच पण ती कार्टून्स काढणार्याने संसदेचा अपमान केलाय असे वाटले नाही. का ते स्पष्ट करणे अवघड आहे. कारण आवड्/नावड ही स्वाभाविक असते, खरी असते. त्याचे स्पष्टीकरण तितक्या अचूकपणे देता येइलच असे नाही.
वाईट कृत्य हे सब्जेक्टिव्ह असल्यानेच एकदा का कोणत्याही कॅटेगरीत एखाद्याची अभिव्यक्ती टाकून त्यावर जर बंदी येउ लागली तर ते स्वातंत्र्य शिल्लकच राहणार नाही.
त्यामुळे माझे मत असे आहे की आपल्या देवतांचा/दैवतांचा अपमान सहन न होणे हे साहजिक आहे. पण त्याची प्रतिक्रिया घटनात्मकच असली पाहिजे.
सविस्तर स्पष्टीकरणाबद्दल आभार
सविस्तर स्पष्टीकरणाबद्दल आभार ! मला तो प्रश्न लक्षात आला नव्हता.
कोणताही एक धर्म घेतल्यास त्यातील सर्व लोक सारखेच असे मानता का?
असा प्रश्न आहे. याचे उत्तर- (ब)नाही. जनरलायजेशन करत नाही.
तुम्ही निधर्मी असलात तरी अन्य धर्म, त्यांचे अनुयायी व त्यांचे धार्मिक व्यवहार ही वस्तुस्थिती आहे, जी टाळता येत नाही. त्यामुळे दुसर्या प्रश्नाचे उत्तर टाळता येणार नाही. चौथ्या प्रश्नाला 'पास' देता येईल.
दुर्लक्ष करण्याचा पर्याय हा काहीसा पलायनवादी आहे असे वाटते. तसे ठरवले तर कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करता येते, सोडून देता येते. तो एक पर्याय आहेच, पण उत्तर नाही. ज्यांना दुर्लक्ष करावेसे वाटत नसेल, त्यांनी कुठल्या पद्धतीने व्यक्त व्हावे? गुंतागुंतीचा प्रश्न आहे.
भावना-स्वातंत्र्य-कायदा यांची दरवेळी सांगड घालता येत नाही असे वाटते. फक्त बेकायदेशीर असे काही होऊ न देणे एवढेच प्राप्त परिस्थितीत शक्य आहे. म्हणजे ज्यांना अभिव्यक्ती करायची आहे त्यांनी करावी. ज्यांना निषेध करायचा आहे त्यांनी करावा. आणि दोहोंनी विद्यमान कायदा हातात घेऊ नये.
एकूण फारएन्ड म्हणतो तेच.
(यावरही तोडगा म्हणजे काही जण कायद्याचाच संकोच करू पाहतात. (ब्लासफेमी वगैरे) तर त्यापासून सुटका कशी करता येईल? असाही प्रश्न आहेच.)
फारएण्ड, >> त्यामुळे माझे मत
फारएण्ड,
>> त्यामुळे माझे मत असे आहे की आपल्या देवतांचा/दैवतांचा अपमान सहन न होणे हे साहजिक आहे.
>> पण त्याची प्रतिक्रिया घटनात्मकच असली पाहिजे.
अगदी १००% अनुमोदन. माझंही मत असंच आहे.
आ.न.,
-गा.पै.
मुळात ......देव आहे का
मुळात ......देव आहे का ????????????????????????????????//
आता भारतातील जाळपोळ व
आता भारतातील जाळपोळ व हिंदूंचा बळी घेऊन त्या ख्रिश्चन-फादरला काय झाले?
नगाला नग मिळाला. इस्लामला अपेक्षीत बदला मिळाला. हिंदु मारले काय आणि जिवंत असले काय ? बोलुन चालुन षंढ जमात. मेले तर मानवी हक्क वाल्यांना फार्से सुतक नस्ते.
चांगली चर्चा आहे. फारएंड,
चांगली चर्चा आहे.
फारएंड, तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने अजून काही जाणून घ्यावेसे वाटले, आणि शिवाय एक उत्सुकता म्हणूनही, एक प्रश्न - देवादिकांची चित्रे, धार्मिकदृष्त्या पवित्र गोष्टींची चित्रे आणि चिन्हे, संसदेचे चित्र वा घटनेचे चिन्ह, अशोकस्तंभाचे चित्र, राष्ट्रीय ध्वजाचे चित्र हे सारे म्हणजेच खरे देवादिक, खरा धर्म, खरा ध्वज, खरीखुरी संसद, खरी घटना इ. आहे असे मानतोस, की ती फक्त प्रतीके किंवा व्यक्त करण्याची माध्यमे आहेत असे मानतोस? किंवा यातल्या सगळ्या गोष्टींसाठी एकच पारडे नसेल, तर तसे का वाटते?
'आवड्/नावड ही स्वाभाविक असते, खरी असते. त्याचे स्पष्टीकरण तितक्या अचूकपणे देता येइलच असे नाही.' हे तू म्हटलेले बरोबर आहे. उत्तरे मिळवण्याच्या प्रक्रियेतून स्वतःचीही विचारधारा तपासून बघता येईल, इतकाच हेतू.
मूलतः, वरील प्रश्न केवळ
मूलतः, वरील प्रश्न केवळ धर्माशी निगडीत ठेवलेत तसे प्रत्यक्षात नाहीये, नैतर बाबासाहेबाच्या इतर "पात्रान्सहित" चाळिसच्या दशकात काढलेल्या व्यन्गचित्रावरुन गदारोळ/बन्द वगैरे झाले नस्ते व ते चित्र पुस्तकातुन काढुन टाकण्याइतकेही प्रकरण झाले नस्ते.
दादोजी कोन्डदेवान्चा पुतळा पुण्यनगरीतून(?) हटविण्यासाठि रस्त्यावर उतरुन गुन्डागर्दी करणारे देखिल कोणते परधर्मिय नव्हते.
तेव्हा सान्गायचा मुद्दा इतकाच की वरील चर्चा केवळ हिन्दू विरुद्ध इतर धर्मिय या वा इतक्याच "धर्मान्च्या" परिघात असू नये.
मूर्खपणा, क्रुरता, निलाजरेपणा, स्वार्थी वृत्ती, आक्रमकता व दूसर्याचे बळकावण्याची वृत्ती व खास करून दुसर्याच्या अखत्यारीतील/नात्यातील/गोत्यातील स्त्रीयान्वरील अत्याचार हे सर्व काही कोणा एका धर्माचि गुणवैशिष्ट्ये नाहीत. उडदामाजी काळेगोरे या न्यायाने सर्वच धर्मात/जातीत, वा जिथे जिथे म्हणून मनुष्य आहे, तिथे तिथे हे दुर्गुण आहेतच आहेत. तेव्हा केवळ धर्माच्या आधाराने वरील प्रश्न विचारण्यात वा उत्तरे देण्यात खरे तर तितकासा अर्थ नाही. (असे माझे मत)
प्रस्तुत चित्रपट मी पाहिला
प्रस्तुत चित्रपट मी पाहिला नाही, त्यामुळे नक्की काय मांडले आहे हे माहित नाही. पण असे पाहिले खूप धर्मातील काही लोकं (ज्यांची संख्या खूप आहे) अजूनही " सिव्हिलाईज्ड सोसायटी" च्या पहिल्या टप्यात यायचे आहेत त्यामुळे थोडे काही खट झाले की त्यावर दंगली होतात. ( जेम्स लेन प्रकरण असो की दादोजी कोंडदेव की वर लिंब्याने लिहिलेले डॉ बाबासाहेबांचे व्यंगचित्र असो की श्री महंमद पैंगबर, ही लोकं लगेच रस्त्यावर येतात) व धर्मानुसार त्यांचे प्रमाण देखील कमी जास्त होते.
मलाही अगदी फारएन्डासारखे वाटते. एक व्यक्ती म्हणून मला कोणाबद्दल काहीही लिहिले तरी काही वाटत नाही पण एक समाज (ज्याचा मी एक अविभाज्य भाग आहे) म्हणून सरस्वतीचे नग्न चित्र काढणे जसे चूक वाटते तसेच श्री पैगंबर, गौतम बुद्ध, येशू किंवा कोणी देवरूप लाभलेल्या व्यक्तीबद्दल वेडेवाकडे काही लिहिणे चूक वाटते.
प्रथम मी हे थोडे स्पष्ट करतो की मी दैववादी नाही. देव नाहीत ह्यावर माझा विश्वास आहे. पण ... मी जरी देव नाही असे मानत असलो तरी इतर लाखो जन तो आहे असे मानतात. त्यामुळे त्यांच्या मताशी काही वेळा समाज म्हणून सहमत / असहमत होणे हे साहजिकच आहे.
सर्व धर्म सारखे आहेत किंवा सारखेच असतात हा भ्रम आहे. प्रत्येक धर्म वेगळा आहे.
भाषा स्वातंत्र्य असावेच. धर्म स्वातंत्र्य व हवे ते मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण अधिकार असला म्हणजे त्याबरोबरच काय चूक, काय बरोबर ह्याची जाणही मत मांडणार्याला हवी.
साजीराचा प्रश्न जरी अमोलला असला तरी मी पण त्याचे उत्तर देईन. तो प्रश्न नेमका का विचारला आहे हे थोडेफार मला कळाले आहे. त्याबाबतीत माझे मत ह्या बाफवर लिहिणार्या काहींचा वेगळे आहे.
धर्म हा देशाचा सीमा मानत नाही. पण संसंदेला देशाचा सीमा बांधील असतात. (इथे बरेचजण देशाच्या सीमाही मानत नाहीत पण आजच्या घडीला मात्र मी त्यांच्याशी सहमत नाही. ) घटना, अशोकस्तंभाचे चित्र हे जरी पूजनीय असले तरी त्यांचे पूजन संसदेत असणार्या लोकांकडूनही होत नाही. त्या व्यंगचित्रात मला काहीही दोषी आढळले नाही कारण तो प्रतिकांचा अपमान नव्हता, तर त्या प्रतिकांच्या पायी असणारी पवित्रता देखील संसदपटूंमध्ये नसल्यामुळे ती प्रतिके बदलून त्यातील आयरनी दाखवायची होती. तेच मत घटने बद्दल.
घटना खरीखूरी असली तरी ती बदलता येते / रादर, नित्य बदलली जाते.
राष्ट्रध्वज मात्र वंदनीय आहे. त्याचा अवमान (इथे अवमान म्हणजे चड्डी घालून फिरणे नाही किंवा अजानता उलटा पकडणे असे नाही तर तो जाळणे किंवा मुद्दाम पायदळी तुडवने वगैरे) करणे निंदनीयच आहे. पण उद्या त्याच राष्ट्रध्वजाला लांडके फाडून खात आहेत असे व्यंगचित्र आले तर ते मात्र निंदनीय नाही.
थोडक्यात काही प्रतिकांच्या पल्याड जाता येतं (घटना) पण काहींच्या अजिबात नाही. (देव व धर्म)
प्रस्तुत चित्रपट नेटवर यु
प्रस्तुत चित्रपट नेटवर यु ट्युबात आहे. इथे लिंक दिली तर मायबोली गोत्यात येईल... म्हणून देत नाही. 'त्यांचे' नाव आणि डिफेमिंग वगैरे शब्द टाकले तर लगेच सापडेल. अगदी घानेरडी फिल्म आहे. मुस्लिमाना डिवचण्यासाठीच ही फिल्म होती. त्यामुळे त्याची रिअॅक्शन येऊन कुणी मेले तर त्यांची जबाबदारी फिल्म बनवणार्यांवर येते.
राष्ट्रध्वज मात्र वंदनीय आहे. त्याचा अवमान (इथे अवमान म्हणजे चड्डी घालून फिरणे नाही किंवा अजानता उलटा पकडणे असे नाही तर तो जाळणे किंवा मुद्दाम पायदळी तुडवने वगैरे) करणे निंदनीयच आहे. पण उद्या त्याच राष्ट्रध्वजाला लांडके फाडून खात आहेत असे व्यंगचित्र आले तर ते मात्र निंदनीय नाही.
१०० कोटी लोकांची अशी १०० कोटी मते असूशकतील .... आपल्या मताचा आदर आहेच. पण कोर्ट जे सांगेल, ते मत महत्वाचे असते.
लांडके म्हणजे कोणता प्राणी
लांडके म्हणजे कोणता प्राणी हो?
Pages