धार्मीक स्टिरीओटायपींगचा भस्मासुर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

(१) एका अमेरीकन माणसाने मुहम्मदवर एक चित्रपट काढला. त्यात मुसलमानांच्या दृष्टीने अतिशय हीन प्रकारे मुहम्मदचे चित्र उभे केले गेले.
(२) गुगलने यु ट्युब वरील त्या चित्रपटाचे भाग काढुन टाकण्यास नकार दिला.

(३) त्या चित्रपटामुळे अनेक मुस्लीम देशांमधे निदर्शने झाली. काश्मीरमधे पण. या निदर्शनांमधुन, खासकरुन त्यात जेंव्हा जाळपोळादि प्रकार होतात, तेंव्हा ती नेमकी कुणाविरुद्ध असतात आणि ते नुकसान त्यांच्यापर्यंत कसं पोचतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
(४) लिबिया मधे तर अमेरीकन दुतावासावर हल्ला केला गेला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जिवे मारण्यात आले. अमेरीका अनेक दृष्टीने सेक्युलर देश आहे. दुतावासातील कर्मचारी काळे की गोरे, ज्यु की हिंदु, आस्तीक की नास्तीक हे न तपासता ती कत्तल झाली.
(५) त्या कत्तलीमागे पोळीभाजु अतिरेकी होते असं कळलं (हे असं नेहमीच असतं). आम जनतेनी एकत्र येऊन त्यांना हुसकावून लावले ही एक त्यातल्या त्यात चांगली गोष्ट झाली.

(६) त्या दरम्यान एका फ्रेंच वारंवारीकानं मुहम्मदचं एक कार्टुन प्रकाशीत केलं.
(७) कोर्ट त्याचं करायचं ते करेल, पण भाष्य-स्वातंत्र्याचा हक्क अबाधीत राहील असं वक्तव्य फ्रेंच पंतप्रधानांनी केलं.

(८) UN मधे ब्लासफेमी गुन्हा आहे असं म्हणु पाहणारा कायदा आणायचा प्रस्ताव बारगळला होता. तो पुन्हा डोकं वर काढतोय. (ते ही तुर्कस्थानातील पंतप्रधानांच्या पुढाकारानं - एकेकाळी मुस्लीम असुनही सेक्युलर म्हणुन हा देश प्रसिद्ध होता).
(९) पाकीस्तानातील एका नेत्यानी त्या फिल्म बनवणाऱ्या अमेरीकनाचा कोणी खून केल्यास भरपूर बक्षीस जाहीर केलं आहे (तो न पकडल्या जाता पाकीस्तानान जाऊन ते बक्षीस कसं मिळवणार हा प्रश्न निराळा).

या सर्वात आपण कुठे बसतो हा प्रश्न महत्वाचा आहे.

(१) आपले भाष्य-स्वातंत्र्याबद्दल काय मत आहे?
(अ) असावं, (ब) नसावं, (क) सोयीस्कर रित्या असावं किंवा नसावं

(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का?
(अ) हो, ते तसेच असतात, (ब) नाही, (क) सोयीप्रमाणे करावं, (ड) मी निधर्मी आहे

(३) इतरांचं भाष्य-स्वातंत्र्य जपण्याकरता तुम्ही आवाज उठवाल का?
(अ) हो, (ब) नाही बुवा, (क) ते इतर कोण आहेत यावरून ठरवु

(४) तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?
(अ) हो, तसंच करतो, (ब) अर्थातच नाही, (क) सोयीप्रमाणे ठरवु, (ड) मी निधर्मी आहे

प्रकार: 
शब्दखुणा: 

माझी उत्तरे - अ, ब, अ, अ.

First they came for the communists,
and I didn't speak out because I wasn't a communist.

Then they came for the socialists,
and I didn't speak out because I wasn't a socialist.

Then they came for the trade unionists,
and I didn't speak out because I wasn't a trade unionist.

Then they came for the Jews,
and I didn't speak out because I wasn't a Jew.

Then they came for me,
and there was no one left to speak for me.

चर्चा वाचतोय..

जगात सर्वत्र नास्तिक असतील तर वादाचे कारण राहणार नाही. पण जर मी देव मानत नसेन तर माझ्याबाबतीत दोन शक्यता संभवतात. पहिली म्हणजे माझ्या नास्तिकतेचा सन्मान करून इतरांच्या श्रद्धांचा सन्मान करणे. दुसरी म्हणजे इतरांच्या श्रद्धास्थानांबद्दल माझी मते जाहीर करणे. पहिल्या बाबतीत वाद असण्याचं कारण नाही पण जेव्हां माझ्या मतांचं मी जाहीर प्रदर्शन करीन तेव्हां वाद होण्याची शक्यता आहे. ही शक्यता देखील श्रद्धाळूच्या माझ्या नास्तिकतेला समजून घेण्यावर असेल.

जेव्हां वाद उत्पन्न होईल तेव्हां कदाचित माझा हेतू साफ नसेल. पण जेव्हा शुद्ध हेतूने जेव्हां मी माझी नास्तिक मते जाहीर करतो तेव्हां वाद होत असेल तर कदाचित श्रद्धाळूंच्या नावाने धर्मांध किंवा हेतुपुरस्सर वाद माजविणारी व्यक्ती अथवा गट त्याच्या मागे असण्याची शक्यता असते. माझी नास्तिकता ही माझी अभिव्यक्ती असते. जेव्हां मी हा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हां हेतुपुरस्सर दंगलीत रस असणारा गट हा बुद्धीभेदाची वाट चोखाळतो. अशा वेळी तुम्ही असं म्हणता तर मी तुमच्या भावनांना का दुखावू नये अशी भूमिका घेतली जाऊ शकते. यामागचा हेतूच आव्हान देण्याचा असल्याने कदाचित मी प्रतिक्रिया देईन किंवा इग्नोर करीन. दोन्ही परिस्थितीत समोरच्याचा हेतू साध्य होतो.

म्हणूनच प्रत्येक घटना ही स्वतंत्रपणे पाहिली जावी असं वाटतं..

- Kiran..
(प्रतिसाद अजून वाचतोय)

धार्मिक स्टिरीयोटायपिंगच्या अन्य मुद्यांवर अन्य धाग्यांवर अनेकदा चर्चा झालेली आहे. त्याचा एकत्रित सारांश या धाग्यावर यावा म्हणजे पुन्हा पुन्हा या चर्चा नकोत व्हायला.

आपल्याकडेही असे काही मुद्दे आहेत जे बुद्धीभेदाचे उत्तम नमुने आहेत.

१. पूर्वेकडच्या राज्यांतील धर्मप्रसार

बुद्धीभेद कसा - पूर्वेकडच्या नागरिकांचा कळवळा असणारे लोक मिशन-यांच्या आधी तिथे का पोहोचले नाहीत यावर यांच्याकडे उत्तर नसतं. मिशन-यांनी शाळा काढल्या, यांनी का काढू नयेत ? मिशन-यांनी त्यांची प्रगती घडवून आणली.. आपले सुरुवातीपासूनचे अर्थसंकल्प पहा आणि त्यात या राज्यांसाठी असलेली तरतूद पहा. मोठमोठ्या देवस्थानांची संपत्ती पाहिली आणि त्यातून या राज्यांसाठी काय केले याची माहिती घेतली तर मिशन-यांना नाक मुरडायचा हक्क आक्षेप घेणा-यांना कसा काय पोहोचतो हे समजत नाही.

इतर मुद्दे पण घेऊयात हळूहळू..

भास्कर, अल्पसंख्यक कुणी पण असु शकतात. उर्वरीत भारतातील मुसलमान, तसेच काश्मिरातील हिंदु पंडीत, आणि तुम्ही म्हणता तसे अनेक गट. आणि ते गट धार्मीकच असतील असे नाही तर समलिंगी पण असु शकतात, किंवा व्हॅलेन्टाईन डे ला एकमेकांना फुले देऊ पाहणारी तरुण मंडळी. आगाऊचा इंग्रजी उतारा बरोब्बर बसतो या सिचुएशन मधे. भाष्य-स्वातंत्र्य सगळ्यांकरताच हवे, आणि आपण इतरांकरता सुद्धा आवाज उठवणे त्याकरताच महत्वाचे ठरावे.

चर्चा वाचतेय..
माझी उत्तरं अ, ब, अ, अ.

इथे चौथ्या प्रश्नाविषयी थोडंस अवांतर:
"तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?" याचं उत्तर जरी "हो" असलं तरी धर्मा-धर्मात वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर तुलना (मनातल्या मनात का होईना) होणारच.

उदा. मला सर्वसाधारण ख्रिश्चनांच्या बायबल अन जीझसवरच्या नि:संदेह विश्वासाचं फार कौतुक वाटतं कारण ते मला साधारणतः हिंदूमध्ये दिसत नाही. हिंदुंच्या "योग" सारख्या हेल्दी जीवनशैलीसाठी असणार्‍या संकल्पनेचं कौतुक वाटतं कारण इतर कुठल्या धर्मात "देव/पापपुण्य" सोडून इतर संकल्पनांचा विचार केला असल्याचं मला अजूनतरी माहीत नाही. (मी खोलात जाऊन अभ्यास वगैरे अजिबातच केलेला नाही पण माझं सर्वसाधारण निरिक्षण मांडतेय).

त्यामुळे "योग" ही संकल्पना घेतली तर सगळे धर्म एकच पातळीवर असं मी म्हणू शकत नाही. त्या बाबतीत मला हिंदू धर्म ग्रेट वाटतो. अर्थातच इतर कुणाला (जो वरच्या प्रश्नाला माझ्यासारखेच "हो" असे उत्तर देईल) त्याला जर "योग" या संकल्पनेतच विश्वास नसेल त्याला माझं वागणं दुटप्पी वाटण्याची शक्यता आहे. ते माझ्यावर अन्यायकारक आहे.

नि:संदेह विश्वास ही स्वतंत्र विचार मारुन टाकणारी अत्यंत घातक आणि विषारी गोष्ट आहे, माणसाच्या सुदैवाने कोणताही धर्म आपल्या १००% अनुयायांवर असा पगडा बसवू शकलेला नाही.

उत्तम चर्चा.

माझी उत्तरे:
(१) आपले भाष्य-स्वातंत्र्याबद्दल काय मत आहे?
(अ) असावं, (ब) नसावं, (क) सोयीस्कर रित्या असावं किंवा नसावं

अर्थातच असावं. त्याचबरोबर या स्वातंत्र्यासोबत येणार्‍या जबाबदारीचं आणि अपेक्षांचं देखील भान असावं.

(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का?
(अ) हो, ते तसेच असतात, (ब) नाही, (क) सोयीप्रमाणे करावं, (ड) मी निधर्मी आहे

नाही, तसे ते एकाच पारड्यात मला तोलता येत नाहीत. प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ आणि प्रत्येक जात ही वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्ती ही मनामधे एक सेट पॅरामीटर्स घेऊन वावरत असते. हे पॅरामीटर्स त्या व्यक्तीची धार्मिक, राजकीय, भावनिक जडणघडण घडवतात. सोशल कंडिशनिंगच्या यामधे प्रचंड मोठा हात असतोच. या वेगळेपणामधून निर्माण होणारे संघर्ष अटळ आहेत. पण म्हणून हा वेगळेपणाच पुसून टाकावा असे मला वाटत नाही.

एखाद्या हिन्दू अथवा ख्रिश्चन व्यक्तीला मी जितक्या सहजतेने "डुक्कर" ही शिवी देइन, तितक्या सहजतेने एखाद्या मुसलमानाला देऊ शकणार नाही. दुसर्‍या व्यक्तीच्या श्रद्धास्थानांची अथवा धार्मिक भावनांची विनाकारण चेष्टा करण्याचा अथवा अशा भावना दुखवण्याच्या मला काहीएक अधिकार नाही. कृअप्या श्रद्धास्थाने आणि अंधश्रद्धा यामधे गल्लत होउ देऊ नका. अंधश्रद्धेला माझा विरोध कायम राहील. त्याचबरोबर कुठल्याही धर्मापेक्षा माझ्या दृष्टीने कायदा मोठा आहे.

(३) इतरांचं भाष्य-स्वातंत्र्य जपण्याकरता तुम्ही आवाज उठवाल का?
(अ) हो, (ब) नाही बुवा, (क) ते इतर कोण आहेत यावरून ठरवु

आवाज उठवणे म्हणजे नक्की काय करणे यावरती ते अवलंबून असेल. फेसबूकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून आवाज उठवणे यात मला फारसं स्वारस्य नाही. (अर्थात आवाज उठवण्याचा तो एक प्रभावी मार्ग आहे याबद्दल दुमत नाही) मात्र, जिथे शक्य आहे तिथे मला इतरांचं आणि माझं भाष्यस्वातंत्र्य जपण्यासाठी काम करायला जरूर आवडेल.

(४) तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?
(अ) हो, तसंच करतो, (ब) अर्थातच नाही, (क) सोयीप्रमाणे ठरवु, (ड) मी निधर्मी आहे

कमी किंवा जास्त यापद्धतीने ही तुलना मला करता येणार नाही. कारण, माझा धर्मावरती काही विशेष अभ्यास नाही. हिंदू धर्मात जन्माला आलेली असले तरी मला हिंदू धर्म पूर्णपणे सम्जला आहे असे नाही. इतर धर्मीय काही व्यक्तीशी संबंध आलेला असला तरी त्यावरून मला तो "धर्म असाच आहे" हे जनरलाईज्ड विधान करता येणार नाही. वर लिहिल्याप्रमाणी प्रत्येक धर्मामधे काही डूज अँड डोंट्स सांगितलेले असतातच. मी वैयक्तिकरीत्या या डूज अँड डोंट्स ना मुद्दामहून डिवचण्ञाच्या विरोधात आहे. मुस्लिम धर्मामधे प्रेषित पैगंबराचे चित्र काढण्यास मनाई आहे. मी तसे चित्र काढणार नाही. दुसर्‍याने जर तसे चित्र काढले असेल तर आंधळेपणाने विरोध करण्याआधी त्यामागची कारणमीमांसा नक्की जाणून घेइन. मात्र, हे असे कृत्य केवळ प्रसिद्धीकरता अथवा दंगेधोपेकरिता केलेले असेल तर अशा कृत्याना माझा विरोध नक्की राहिल. हेच तत्व टॉयलेटवर छापलेल्या लक्ष्मीच्या चित्रापासून ते हुसेनच्या चित्रापर्यंत सर्वत्र असेल.

हिंदुंच्या "योग" सारख्या हेल्दी जीवनशैलीसाठी असणार्‍या संकल्पनेचं कौतुक वाटतं

योग आणि कुंडलिनी याबाबत सगळ्या धर्मात लिहिलेले आहे.

@जगजित कोलाटे | 3 October, 2012 - 13:48
>>योग आणि कुंडलिनी याबाबत सगळ्या धर्मात लिहिलेले आहे.>>
गामापैलवानांनी विचारलेली [प्रतिसाद उडाला वाटतं] माहिति द्या म्हणजे सर्वांना कळेल. फुटकळ उल्लेख नकोत. पातंजल योगसूत्रासारखा ग्रंथ हवा.

नताशा,
योग हा प्रकार काही हिंदू धर्माची मक्तेदारी नाही.
रादर योग प्रकार ज्या काळात रूढ झाला त्यावेळेस या धर्माला हिंदू असे नावच नव्हते.
योगाला आपण भारतीय संस्कृतीचा शोध म्हणू शकतो.
कित्येक योगासने अशा लोकांनी शोधलीत ज्यांच्या विचारसरणीला आपण नास्तिक म्हणू शकतो.
आज भारतीय संस्कृतीत तयार झालेल्या आणि प्रचलित असलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, लिंगायत अश्या सर्वच धर्मात योग ध्यान यांना महत्त्व आढळते.
कोलाटे , या चारांव्यतिरिक्त कुठल्या धर्मात तुम्हाला योगाचा उल्लेख आढळलाय?

साती, हो का? बौद्ध धर्मात असावं असा अंदाज होता. बाकी २ विषयी माहिती नव्हती. हिंदू धर्मात पुजा करताना ध्यानमुद्रा, पद्मासन वगैरे सांगतात त्यावरुन मी ते वरचं म्हणत होतं (धार्मिक विधीत योगाची सांगड इंटरेस्टिंग वाटते).
अवांतर होतेच आहे तर- लिंगायत हा धर्म आहे हे माहीत नव्हते.

धार्मिक श्रद्धास्थानांबद्दल संवेदनशील असणार्‍यांचाच (किंवा किमान तसे दाखवणार्‍यांचा) स्टिरियोटायपिंग भस्मासूर असतो असे नव्हे, तर अशा श्रद्धास्थानांवर दगडफेक करणार्‍यांचाही एक स्टिरियोटाइप असतो, असे वाटण्यास कारण झालेले हे जाहिरातसत्र आणि त्याबद्दलचा लेख

"Everything today seems very tame, boring and to be honest, the way the religion wants a special exemption from criticism and free speech being held hostage by fanatics, pisses us off. We decided it would be fun to use satire to make a point, rather than yet another boring as hell logo design.”

On whether the campaign was deliberately provocative, he said: “Absolutely. The freedom to be offensive is important.” ठळक केलेल्या वाक्याच्या संदर्भात अश्चिग यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कायम राहतील का?

या जाहिराती करणारेही fanatics आहेत असे मला वाटते.

ऑसी नियतकालिकाने चर्चेसाठी काही विशिष्ट चित्रेच का निवडली आणि अन्य काही का निवडली नाहीत, हेही उल्लेखनीय आहे. त्यांची भूमिका कातडीबचाऊपणाची आहे की त्याला काही नैतिक अधिष्ठान आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.

अश्चिग यांच्या लेखातील तिसर्‍या प्रश्नाच्या संदर्भात या वरच्या लेखातलेच एक वाक्य :"And while some principles are worth fighting for, a crass, attention-seeking Kiwi skateboarding brand is not."

>>योग हा प्रकार काही हिंदू धर्माची मक्तेदारी नाही.<<
पतंजली मुनिंनी ग्रंथ लिहिला त्यावेळी कॉपि राईट वगैरे कांही नव्हते. योग, कुंडलिनी इ. चे शास्त्र त्याआधी शेकडो वर्षे विकसीत होत राहिले असावे. त्यामुळे असे म्हणता येईल कि ती भारतीयांनी [व्यापक अर्थाने ज्यांना हिंदू असे संबोधले जाते त्यांनी ] समस्त मानव जातीला दिलेले ते एक वरदान आहे.

भरत मयेकरांनी दिलेल्या लेखातल्या एका वाक्यावर माझा जोरदार आक्षेप आहे.

>> ..the way the religion wants a special exemption from criticism...

वैदिक परंपरेने धर्मचिकित्सा अत्यावश्यक मानली आहे. तसेच बुद्धिप्रामाण्य हेही एक तिचे अंग आहे. "अथ तो ब्रह्मजिज्ञासा" ही भूमिका आहे. त्यामुळे वरील वाक्यातून हिंदु धर्मास वगळलेले बरे.

-गा.पै.

>>वैदिक परंपरेने धर्मचिकित्सा
तर मग वैदिक धर्माला वगळू शकू.
पण सध्या जो 'हिंदू' धर्म आहे तो मूळ वैदिक धर्मापासून अतोनात वेगळा आहे. (असे वाटते तरी.)

>>religion wants a special exemption
हे वाक्य धर्माच्या नावाखाली चालणार्‍या दणदणाटी उत्सवांना, धार्मिक स्थळांना मिळणार्‍या आर्थिक व कायदेशीर सवलतींना आणि एकूणच धार्मिक कारणाने दिल्या जाणार्‍या सूटीला लागू व्हावे.

धागाविषय मांडताना संदर्भ मुहम्मद पैगंबरावरच्या सिनेमाचा दिला गेला आहे. हा सिनेमा पाहिला नाही पण काय आहे याचा धांडोळा घेतला. ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांमधे असलेलं वैर पाहता या सिनेमाच्या बाबतीतला हेतू काय हे जाणून घ्यायला हवं. या सिनेमाचा निर्माता म्हणून जी व्यक्ती समोर आली आहे तिचं ते नावच नाही असा एक प्रवाद आहे. खोटं नाव, खोटी कथा सांगून सिनेमातल्या कलाकारांचीही फसवणूक केलीय असं अल जझिरा या संस्थळावर म्हटलंय. या वृत्ताला पाश्चात्त्य जगाकडूनही पुष्टी मिळालेली आहे. यावरून सिनेमा काढण्यामागे काय हेतू असावा हे थोडंफार लक्षात येतं.

मात्र ख्रिस्ती समाजाविरुद्ध असा सिनेमा निघाल्यास तीव्र प्रतिक्रिया येत नाहीत हे आपण दा विन्सी कोड या सिनेमाच्यावेळी अनुभवलेले आहे. अर्थात त्या सिनेमाची जातकुळी वेगळी आहे. चिडवून देणे हा हेतू त्यामागे नसावा हे कुणीही म्हणेल. पैगंबरावरच्या सिनेमाबाबत असं म्हणता येईल का ?

सिनेमा कसाही असो तो ज्या पद्धतीने आणि ज्या हेतूने बनवला गेलाय तो सिद्ध झालाय असं म्हणता येईल हे नक्की. इथं स्टिरीओटायपिंग हा शब्द खटकतो.

या तो धर्म इंन्सान को बेबस बनाता हैं या फिर आतंकवादी!"

जिथे संस्कृती विकसित झालेली नाही तिथे माणसाला माणूस बनवून ठेवण्यासाठीही धर्म महत्वाची भूमिका बजावू शकतो. पण दुर्दैवाने संस्कृती विकसित झाली आणि धर्माच्या नावाने युद्धं व्हायची पाळी आली असेल तर धर्म फेकून देणे हा शहाणपणाचा मार्ग ठरेल. पण धर्माचे लाभार्थी तसं होऊ देणार नाहीत हे कटुसत्य आहे.

ज्याला आपण इथं स्टिरीयोटायपिंग म्हणतोय ती धर्माच्या लाभार्थिंना हवी तशी धर्माच्या गिनीपिग्जनी दिलेली रिअ‍ॅक्शन आहे. अशा प्रत्येक घटनेमागचं कारस्थान उघडकीला आणलं तर हा मुद्दा जास्त स्पष्ट होऊ शकेल.

जगाच्या सुरूवातीपासून इतके धर्म आले /गेले काही नवीन निर्माण झाले तर काही टिकून राहिले. का? मग ह्या सर्व उत्क्रांतीत हा सो कॉल्ड धर्मच लोकांनी का टाकला नाही? ह्याची कारणमिमांसा येथील निधर्मी लोकांनी केली आहे का? काय उत्तर येत असावे?

निधर्मी म्हणने बरोबर की सर्वधर्मसमभाव ठेवणे?

मला एक कळत नाही धर्माला एवढे नावं का ठेवत आहात? अनेक धर्मात त्यांच्या विषयी काही लिहिले तरी ते सह्न करण्याची ताकद असतेच. उदा हिंदू, ख्रिश्चन मग ह्या चांगल्या बाबी नाहीत का? हिंदू धर्माच्या दर्शनांचे अभ्यास केले ( जर इच्छा असेल तर) त्यात उलट एक नवीन आनंदच मिळतो. मग तुम्ही देव माना वा न माना.

एखादा मी हिंदू / बौद्ध / ख्रिश्चन आहे असे म्हणाला, म्हणजे तो बुर्झ्वा अशी काहीशी काही जनांची विचारसरणी आहे का? का बरं?

पण सध्या जो 'हिंदू' धर्म आहे तो मूळ वैदिक धर्मापासून अतोनात वेगळा आहे. (असे वाटते तरी.) >>>

मी वर लिहिले की मला कोणी तरी सुप्रिम बिईंग आहे ह्यावर विश्वास नाही. पण मी तरीही हिंदू आहे व हिंदू म्हणून राहू शकतो. हे गेले काही हजार वर्षे हिंदू /वैदिक धर्मात चालू राहिले आहे.

पण मी तरीही हिंदू आहे व हिंदू म्हणून राहू शकतो. >>>>>> माणुस कोणीहि नसला तरी राहु शकतोच कि. अन्न , वस्त्र निवारा पाणी याशिवाय माणसाला जगण्यासाठी काहिहि आवश्यक नाहि.

मुळात नास्तिक मनुष्य हिंदुच्या व्याख्येत कसा येतो समजत नाहि. हिंदु म्हणजे दशावतार व कर्मविपाक मानणारा असा ढोब्ळ अर्तआह आहे ना?

माणुस कोणीहि नसला तरी राहु शकतोच कि. अन्न , वस्त्र निवारा पाणी याशिवाय माणसाला जगण्यासाठी काहिहि आवश्यक नाहि. >> अगदी बरोबर.

पण मग मी कोण, माझे काय? आमचे काय? असे प्रश्न पडून मग त्याला तत्वज्ञान सुचत गेले आणि धर्माची निर्मिती झाली. थोडक्यात बेसिक गरजा भागल्या की मग माणूस तत्वज्ञानाकडे वळतो असे म्हणूया.माणूस फक्त बेसिक गरजांसाठीच जिवंत आहे असे म्हणणे म्हणजे फारच होईल. मग कुठलेही शोध पण लावायची गरज पडली नसती. Happy

हिंदु म्हणजे दशावतार व कर्मविपाक मानणारा असा ढोब्ळ अर्तआह आहे ना? >> नाही.आस्तिक / नास्तिकचे आजचे अर्थही चुकीचे आहेत.

आस्तिक म्हणजे वेदप्रामाण्य माननारा
नास्तिक म्हणजे वेदप्रामाण्य न माननारा. भारतातील जैन किंवा बौद्ध हे नास्तिक धर्म आहेत.

पण तरीही, जो देवच मानत नाही, तो सगळे अवतार, सग्ळी पुस्तकं, कर्मविपाक याना फाट्यावर मारतो हे तर खरेच ना? मग तो हिंदु कसा?

@साबण | 4 October, 2012 - 20:22 नवीन
पण तरीही, जो देवच मानत नाही, तो सगळे अवतार, सग्ळी पुस्तकं, कर्मविपाक याना फाट्यावर मारतो हे तर खरेच ना? मग तो हिंदु कसा?<<

हिंदू कोड बिल कोणाकोणाला लागू आहे त्याची जरा माहिति घेणे उपयुक्त ठरेल.

अहो, हिंदु कोड बोल म्हणजे कायदा झाला. तो कोणत्याही जन्मजात ( किंवा धर्मांतरीत) हिंदुला लागु होतो.

इथे हिंदु म्हणजे हिंदु धर्माचरण करणारा या अर्थाने मी प्रश्न विचारले आहे.

>>जो देवच मानत नाही, तो सगळे अवतार, सग्ळी पुस्तकं, कर्मविपाक याना फाट्यावर मारतो मग तो हिंदु कसा?<< <<
घटना सर्वोच्च आहे ना? मग हे सर्व हिंदूच होत. हिंदु कोड बील यांनाच नाही तर शीख, जैन, बौद्ध यांनाही लागू आहे. तेव्हां व्यापक अर्थाने हिंदू शब्दाकडे पहायचि सवय आवश्यक आहे.

Pages