अमेरिकेतील निवडणुका - २०१२

Submitted by लोला on 16 May, 2012 - 21:19

यावर्षी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होतील. रिपब्लिकन पक्षातर्फे 'मिट रॉमनी' उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील असं (जवळपास) निश्चित झालं आहे. त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील/असावेत यासाठी नुकत्याच मायबोलीवर घेतलेल्या सर्व्हेत भाग घेणार्‍यांचे आभार. मायबोलीकरांनी (प्रचंड) बहुमताने 'बॉबी जिंदल' (आर्च, आडनाव बरोबर लिहिलंय का?) यांना निवडले. त्यांच्या खालोखाल कॉंडालिझ्झा राईस (नाव ऐकलेलं आहे, द्या ठोकून!) यांना मते मिळाली.

हे रॉमनी यांना कळवायचे आहे, पण ते एक 'तु.क.' टाकतील. म्हणजे तुम्ही शेवटी निवडून कोण निवडणार? भारतीय वंशाचे आहेत म्हणून जिंदल! तश्या निक्की हेलीसुद्धा भारतीय वंशाच्या आहेत पण ते मत देणार्‍यांना माहीत नसणार. कारण एकूण सूचना धुडकावणे, न वाचता काहीही लिहिणे आणि कशालाही मत देणे हे प्रकार घडले त्यावरुन एकतर हे भारतातले मतदार असावेत किंवा डेमोक्रॅट्स असा अंदाज आहे. (यांना शिस्त म्हणून नाही!)

काही अन्-एन्जेकरांनी ख्रिस ख्रिस्टीना मत दिले आहे. खर्‍या एन्जेकरांना माहीत आहे की त्यांना उपाध्यक्ष होण्यात इन्टरेस्ट नसून अध्यक्षच व्हायचे आहे. ते वजन कमी होईपर्यंत वाट बघणार आहेत. (चमन आणि बुवा, तुम्हाला संधी आहे. ट्रेनरसाठी अर्ज करुन पहा).

हिस्पॅनिक मते मिळवण्यासाठी खरं तर यावेळी हिस्पॅनिक उमेदवार असण्याची शक्यता आहे असं आपलं म्हणतात. यात तथ्य आहे. 'सुझॅना मार्टिनेझ' हा चांगला पर्याय आहे. पण या फारश्या कोणाला माहीत नाहीत. तुम्ही तिकडे वाळवंटात किंवा आसपास रहात असाल तर नाव ऐकले असेल असे कुठेतरी वाचले. (म्हणूनच श्री ला त्या बरोब्बर माहीत होत्या!). 'मार्को रुबियो' हासुद्धा असाच अजून एक पर्याय. तो फारच तरुण आहे हे लोकांना झेपत नाही कारण तो फ्लोरिडाचासुद्धा आहे.

असो. तर आपण एक निर्णय देऊन मोकळे झालो आहोत. आता पुढील चर्चा सुरु करु. अमेरिकेतील निवडणुका - २०१२ याबद्दल काहीही चर्चा इथे करता येईल. तसेच या निवडणुकीत काही अर्थ नाही असे वाटत असल्यास 'ओबामाज सेकन्ड टर्म अ‍ॅन्ड बियॉन्ड' हेसुद्धा चालेल.

करा तर मग सुरुवात!

गॉड ब्लेस अमेरिका!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिस्पॅनिक मते मिळवण्यासाठी खरं तर यावेळी हिस्पॅनिक उमेदवार असण्याची शक्यता आहे असं आपलं म्हणतात. यात तथ्य आहे. >> +१. प्रायमरीमधे तोडलेले तारे ऐकून ह्या गटाची मते मिळवली नाहित तर जिंकणे कठीण आहे.

SNL चा नवीन ओबामा बघितलात का? धमाल आहे Happy
http://www.nbc.com/saturday-night-live/video/september-15---seth-macfarl...

लोकहो जरा रिपब्लिकन मते मांडणारा राष्ट्रीय पेपर कोणता आहे ते सांगा. मी वॉ.पोस्ट व वॉल स्ट्रीट जर्नल अधूनमधून बघत असतो. फॉक्स न्यूज ची साईटही. इतर कोणते आहेत? तसेच ब्लॉगर्सही सांगा.

अरारा ऱोमनी नी सगळ्यांना उताण पाडलं .
एकदंरीत वातावरण बघता ही निवडणुक ओबामांना दुसरा चान्स देणार नाही असचं दिसतयं.
माझ्यामते ओबामांना दुसरी टर्म मिळायला हवी , तो माणुस खरोखर प्रामाणिक वाटतो , पण तशी शक्यता कमीच वाटते.

ऱोमनी नी सगळ्यांना उताण पाडलं .>>> कोणत्या भाषणाबद्दल म्हणतोयस श्री?

मला तर दोघांमधे ही निवडणूक हरायची स्पर्धा लागली आहे असे वाटते.

फारेंडा मला म्हणायचं होतं रॉमनीच पारडं जड आहे ( अर्थात ह्यात त्याच्या वैयक्तिक करिष्म्यापेक्षा सामान्य माणसाची ओबामांना परत त्याच पदावर बघण्याची इच्छा नाही. कारण नक्की कळत नाही पण आहे हे नक्की.)

ओह.