प्रसंग : सायना नेहवाल (सा ने) आणि पुल्लेला गोपीचंद (पु गो) लंडनहून परत येताहेत...
सा ने : दमले बुआ... एक तर खेळ खेळ खेळायचं, हिला हरव, तिला हरव...वर जरा मनासारखं खायला मिळेल तर तेही नाही. तिथे तुमची मेली ती शिस्त आडवी येते सारखी.
पु गो : मान्य. पण म्हणून तर टिकलीस ना.
सा ने : हे बरीक खरं हं गुर्जी. पण..पण.. आता मला खूप भूक लागली आहे... अब नही मै रुकुंगी, सारे बंधन तोड दुंगी, सारा जंक फूड खाउंगी... हिहाहाहा...
पु गो : नाहीSSS..(किंकाळी)...
(गातो - चाल : दिल्या घेतल्या वचनांची) पहिल्या वहिल्या कांस्य पदकाची, शपथ तुला आहे..
कन्ये, माझ्यावर विश्वास ठेव... मी आधीच याचा विचार केला आहे..मी तुला जंक फूड कदापि खाऊ देणार नाही..साधू..साधू..
सा ने : गुर्जीSSS (किंकाळी)...
पु गो : वत्से, लवकरच मायबोलीवर गणेशोत्सव आहे... उत्तमोत्तम पाककृतींचा नुसता पाउस पडेल पाउस..अर्रर्र..अशी धास्ताऊ नकोस.. नुसतीच हुल द्यायला हा काही मान्सुन चा पाउस नाही...
पाककलानिपुण अशा मायबोलीकरांच्या आंतरजालीय प्रायोगिक कृतींचा पाउस..अहाहा..काय ते प्रयोग...काय त्या कृती..मिसळम..पाकम आणि मग गट्ट्म गट्ट्म अ ग दी.. तों पा सु (स्वगत: हिला डाएट साठी मुद्दाम तों.पा.सु. पदार्थ सांगतो )
सा ने : अय्या हो?
पु गो : इतकंच नाही, तोंडी लावायला चटकदार चारोळ्या, खा, खेळा, चघळा, झब्बू द्या..गाणी गा, चित्र रंगवा, आरत्या म्हणा...आहे कि नाही मज्जा?
सा ने : वा वा वा वा... गुर्जी जिंदाबाद... हे मी सुशील कुमार ला ही सांगते पटकन...
पु गो : अरेच्चा! शिंदेंना कशाला? त्यांचं आता वय झालंय. ते नाही हो खायचे.
सा ने : गुर्जी, विनोद कसले करताय? पैलवान सुशील कुमार म्हणतेय मी. बायकोच्या मागे भुणभुण करत होता... आलू प्राठ्यांसाठी...
पु गो : हो... हो... सांग त्याला...
जसा बाप्पा सायनाला पावला, तसा तुम्हा, आम्हा लाभो...
मायबोली गणेशोत्सवात भाग घेताय ना...
इथे मायबोलीकर गणेशोत्सवासंबंधी गप्पा-टप्पा करु शकतात..
रामराम मंडळी, हे गप्पांचं पान
रामराम मंडळी,
हे गप्पांचं पान खास गणेशोत्सवाच्या मनमोकळ्या गप्पाटप्पांसाठी..
(No subject)
भारी लिहिलय
भारी लिहिलय
.. भारी आहे
मस्तंय.
संयोजकहो सर्व उपक्रम मस्त
संयोजकहो
सर्व उपक्रम मस्त आहेत. आवडले
खूप छान ...
खूप छान ...
भारी
भारी
उद्या, म्हणजे भारतीय
उद्या, म्हणजे भारतीय वेळेनुसार, १९ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ६:०० वाजता मायबोलीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा.
काहीकाही पंचेस मस्त आहेत पण
काहीकाही पंचेस मस्त आहेत पण मराठी सेलेब्रिटीजमधला संवाद दाखवला असता तर जास्त अपील झाला असता. सायना नेहवाल आणि गोपीचंद मायबोलीबद्दल बोलत आहेत हे काही पटत नाही
'अगो' +
'अगो' + १
---------------------------------------------------------------------------------
गणेशोत्सवासाठी हे पान सुरू करण्याची कल्पना आवडली.
भारी.
भारी.
अगो, मायबोली चा प्रभाव
अगो, मायबोली चा प्रभाव झपाट्याने पसरतोय..आणि या झंझावातात माय माउली मराठी सगळ्यांना सामावून घेते आहे..