Submitted by Kiran.. on 7 September, 2012 - 03:34
भाजी घ्या भाजी
कोबीची भाजी
सकाळी दुपारी तिन्ही त्रिकाळी
आवडीने खा ही कोबीची भाजी
फळं घ्या फळ
भरदार केळं
उठता बसता तिन्ही त्रिकाळी
पोटाला बरी जळगावची केळं
टीव्ही पहा टीव्ही
मालिकांचा टीबी
हिंदी मराठी चॅनेल कुठलेही
शिळ्याच मालिकांची मसालेदार ग्रेव्ही
गझल घ्या गझल
रतिबाची गझल
रोजचा पेपर चुकेल गं बाई
पण चुकणार नाही या माबोवर गझल
( दिवे घ्या दिवे
खाणीतले दिवे
अस्सा कवी नको गं बाई हिला
असला गुर्जी कनो गं
फू फू फू फू)
- Kiran..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहो माझ्या संपादकांपैकी कोणी
आहो माझ्या संपादकांपैकी कोणी कीती आ.डी घेवून वावरावे अथवा तसेही कोणी किती आयडी घेवून साहित्य-लेखन करावे हा प्रश्न ज्याचा-त्याचा
चला , कुठेतरी काहीतरी मान्य झालं म्हणायचं.
(मेलचा जो भाग तुम्ही देणार नाही तो मी देईन. चालेल ? काय पण धमया देताय !! )
धमक्या नाही...तुमच्या
धमक्या नाही...तुमच्या बोलण्यातला साळसुदपणा दाखवतेय...
मी आधीच क्लिअर केलय की गझलेला मधे-मधे आणताय म्हणून मी प्रतिसाद देतेय...
असो.
छे हो ! हा राग गझलेबद्दलचा
छे हो !
हा राग गझलेबद्दलचा नाही हे मी तुम्हाला स्पष्ट केलंय. तसं असतं तर तुम्ही मुद्यावर बोलला असतात. असो. मला कंटाळा आलाय आता. वाट्टेल ते लिहा... माझ्याकडून पूर्णविराम.
<<<<कंटाळा आलाय आता. वाट्टेल
<<<<कंटाळा आलाय आता. वाट्टेल ते लिहा... माझ्याकडून पूर्णविराम.>>>.
हे मात्र अगदी माझ्या मनातलच बोललात .:-)
Pages