भाजी घ्या भाजी

Submitted by Kiran.. on 7 September, 2012 - 03:34

भाजी घ्या भाजी
कोबीची भाजी
सकाळी दुपारी तिन्ही त्रिकाळी
आवडीने खा ही कोबीची भाजी

फळं घ्या फळ
भरदार केळं
उठता बसता तिन्ही त्रिकाळी
पोटाला बरी जळगावची केळं

टीव्ही पहा टीव्ही
मालिकांचा टीबी
हिंदी मराठी चॅनेल कुठलेही
शिळ्याच मालिकांची मसालेदार ग्रेव्ही

गझल घ्या गझल
रतिबाची गझल
रोजचा पेपर चुकेल गं बाई
पण चुकणार नाही या माबोवर गझल

( दिवे घ्या दिवे
खाणीतले दिवे
अस्सा कवी नको गं बाई हिला
असला गुर्जी कनो गं Light 1
फू फू फू फू)

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेचं शिर्षक आणि मग पहिली दोन कडवी वाचल्यावर मला वाटलं कि किरणला शशांक पुरंदरेंनी इन्स्पायर केलं की काय? एकदम बालकविताच.

किरण, नमनाला घडाभर तेल Wink

गझल घ्या गझल
रतिबाची गझल
रोजचा पेपर चुकेल गं बाई
पण चुकणार नाही या माबोवर गझल>>>>किरण्या,तुझा बकवास वाचण्यापेक्षा अर्थपुर्ण गझला बर्‍या.

<<<किरण्या,तुझा बकवास वाचण्यापेक्षा अर्थपुर्ण गझला बर्‍या.>>>>

Makarand. जोरदार अनुमोदन

सतराशेसाठ आयडी बदलून पांचट लिहीलेल वाचण्यापेक्षा तरी नक्कीच उत्तम Happy

-सुप्रिया.

सुप्रिया ताई

इथे गोंधळ घाल्णा-या ड्युआय ना मी किंमत देत नाही. पण तुमच्यासारख्याने बेजबाबदार विधाने करावीत ? इथे अ‍ॅडमिन आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकाचे कारनामे नोंद होत असतात हे तुम्हाला सांगायला लागावे का ? कुणाचं तरी ऐकून अशी बेफाट विधाने टाळावीत.

<<<कुणाचं तरी ऐकून अशी बेफाट विधाने टाळावीत.>>>>

कैच्याकै....माझा रोख फक्त आणी फक्त गझलांच्या प्रतिसादांबद्दल आहे.

-सुप्रिया.

Kiran.. | 8 September, 2012 - 14:10 नवीन
सुप्रिया ताई
>>>इथे गोंधळ घाल्णा-या ड्युआय ना मी किंमत देत नाही. ------- pointing-and-laughing.gif

सुप्रियाजी

आश्चर्य वाटतंय. अनुमोदनाचा आणि गझलेचा संबंध नाही. दुसरी गोष्ट १७६० आयडी असते तर अ‍ॅडमिनने केव्हाच ब्लॉक केले असते. ड्युआय बनवून गरळ ओकण्याचं मला कारण नाही. माझ्या नावाने कोण स्वतःचे आयडी खपवतं हे माहीत आहे. पण त्याला उत्तर देण्यात वेळ दवडत नाही. तुम्ही काय वाट्टेल ते आरोप करा.. मला फरक पडत नाही. इतकं सिंपल आहे. Wink

आणि हो, आपण स्वतः याआधी हास्य विशेषांकासाठी काम केलेलं आहे. त्याच्या संपादक मंडळावर सुप्रसिद्ध ड्युआयच होते :D. विशेष म्हणजे फक्त कंपूतल्या लोकांचं साहीत्य प्रसिद्ध होतं म्हणून लोकांनी त्या उपक्रमाकडे पाठ फिरवलेली, तेव्हां या विषयावर आपण आगपाखड करू नय हे उत्तम ! काय म्हणता ?

किरणजी,

<<<आणि हो, आपण स्वतः याआधी हास्य विशेषांकासाठी काम केलेलं आहे. त्याच्या संपादक मंडळावर सुप्रसिद्ध ड्युआयच होते .>>>

काय हे, निव्वळ बायकी प्रतिसाद!

आहो माझ्या संपादकांपैकी कोणी कीती आ.डी घेवून वावरावे अथवा तसेही कोणी किती आयडी घेवून साहित्य-लेखन करावे हा प्रश्न ज्याचा-त्याचा

काईच्या काई संबध जोड्ता राव....:-)

बायदवे,

आपल्या मेलचा काही भाग इथे द्यावाच म्हणतेय...

काय म्हणता?

Happy

Pages