प्रचि ०१
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.
भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......
(फेसबुकहुन साभार)
खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...
=======================================================================
=======================================================================
मज आवडते हि मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०२

प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६कुठे आहे कुठे तुझाच सोबती जुना, कळे गावातले विचार हे तुला पुन्हा
जुन्या वाटेवरी नवीन चालणे तुझे, फिरे गावातुनी जणु नवाच पाहुणा
जुने विसरायचे बरे नव्हे अरे मना, असे बदलायचे खरे नव्हे अरे मना
हसावे वाटते फिरून आजही तुला, कशी वळते नजर तुझी पहा पुन्हा पुन्हा
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९सहभोजन
प्रचि १०वनभोजन
प्रचि ११शाळेच्या स्नेहसंमेलनातलं कोळी नृत्य
प्रचि १२
प्रचि १३
=======================================================================
=======================================================================
एक होती चिऊ....एक होता काऊ
कावळ्याचे घर होते शेणाचे....चिमणीचे घर होते मेणाचे
एक दिवशी काय झाले...मोठ्ठा पाऊस आला आणि....
=======================================================================
=======================================================================
प्रचि १४
प्रचि १५
=======================================================================
=======================================================================
माझा खाऊ मला द्या
=======================================================================
=======================================================================
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
=======================================================================
=======================================================================
खेळ मांडियेला
=======================================================================
=======================================================================
आया रे खिलौनेवाला खेल खिलौने लेके आया रे...
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
दिसता दिसता गडप झालास
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का...?
आयुष्यातील हे सोनेरी दिवस कसे पटकन निघुन गेले नाही. अगदी चांदोबा मामाच्या या गाण्यासारखेच ते दिवस बघता बघता सरून गेले. उरल्या त्या फक्त आठवणी.
पण.... मला पुन्हा ते दिवस जगायचे आहे. एक घास चिऊचा...एक घास काऊचा करत भरवलेला जेवणाचा घास आईच्या हातातुन खायचा आहे, मला पुन्हा शाळेत जायचंय, मित्रांबरोबर खोड्या करायच्यात, मधल्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवणाचा डब्बा शेअर करायचाय, शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा आहे. पत्र्याची शिट्टी इतरांचा ओरडा पडेपर्यंत वाजवायची आहे. बायोस्कोपमधुन दिसणारी रंगबेरंगी दुनिया बघायचीय, चार आण्यात मिळणार्या लिमलेटच्या गोळ्या, शेंगदाण्याची चिक्की, चन्यामन्या बोरं खायची आहे, वडाच्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचे आहेत, "घोटीव" पेपराच्या होड्या, विमाने बनवायची आहेत, तासन् तास रंगणारा नवा व्यापार खेळायचा आहे, चंपक, ठकठक्, चांदोबा पुस्तकांचा एका दिवसात वाचुन फडशा पाडायचा आहे. कम्प्युटर से भी तेज दिमाग असणारा चाचा चौधरी, सोबत साबूला घेउन वाचायच आहे, मॅन्ड्रेक्सच्या हातातील अंगठीचा शिक्का उठवायचा आहे. फास्टर फेणे आणि चिंगीच्या साहसी करामती पुन्हा अनुभवायच्या आहेत. साबणाच्या पाण्याचे फुगे उडवायचे आहेत. वाळुत किल्ले बनवायचे आहेत. खुप काही करायचे आहे कारण...
उडणार्या त्या म्हातारीने माझे वय जरी नेले असले तरी माझे मन, जुन्या आठवणी मात्र अजुनही त्या म्हातारीला नेता आल्या नाही.
=======================================================================
=======================================================================
तळटिपः
१. यातील काही काही फोटो टेक्निकली तितकेसे खास नसतील पण ह्या थीमसाठी मुद्दाम घेतले आहे. यातील २ प्रचि पूर्व प्रकाशित आहे.
खरंच रे बाबा जिप्सी! सय नाही
खरंच रे बाबा जिप्सी!
सय नाही जात, गेल्या दिसांची
येती न जाऊन जे दिस,
मन का पुकारे, त्यांस
दिस पाखरू जर असते,
पकडून मी ठेविता
पाळता त्यांना खुशीने,
मोत्यांचे दाणे देता
छातीशी जपता धरून
प्रतिमा तयांची जरी का,
लपवता नजरेसमोरून
हृदयी उमटली मूर्ती,
परंतु हटे न हटवून
परकेच म्हटले जरी ते
बरे झाले तू पुन्हा एकदा त्यांना पकडून आणलेस ते! धन्यवाद.
जबरदस्त !!
जबरदस्त !!
जबरदस्त...हॅट्स अॅफ
जबरदस्त...हॅट्स अॅफ
एकदम सेंटी..... फोटोज छान
एकदम सेंटी.....
फोटोज छान आहेत....आणि त्यामुळे येणार्^या आठवणी वैट...
जिप्सी तू तीन पैसे वापरायचे त्या काळातला आहेस?
या थीमद्वारे काही काळ का
या थीमद्वारे काही काळ का होईना पण आपल्या प्रत्येकाला ते सोनेरी दिवस पुन्हा जगता आले हेच ह्या धाग्याचे श्रेय.
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद
जिप्सी तू तीन पैसे वापरायचे त्या काळातला आहेस?>>>>वेका, बिलकुल नाही, वीस, पंचवीस पैशाच्या काळातले आम्ही.

चार आणे....गेले ते पण
चार आणे....गेले ते पण
असो....या निमित्ताने ते क्षण पुन्हा तसेच्या तसे आठवले....
अ प्र ति म!!!!! पुन्हा निवडक
अ
प्र
ति
म!!!!!
पुन्हा निवडक दहात
जिप्सी, हे काही बरोबर नाही.
जिप्सी, हे काही बरोबर नाही. आजचा दिवस वैट्ट जाणार माझा.

सुट्टे पैसे पाहून मी गहिवरून येईन असं मला वाटलं नव्हतं कधी!
बाकी - चंपक्,ठकठक पाहून कधी एकदा माहेरी जाऊन माळ्यावरची सगळी चंपक्,ठकठक्,किशोर मासिकं काढून झोपाळ्यावर जाऊन वाचत बसतीय असं झालं आहे. बाबा नेहेमीप्रमाणे मँगो मिल्कशेक करून आणतीलच माझ्यासाठी. (उन्हाळ्याच्या सुट्टीतली प्रत्येक सकाळ अशीच व्हायची माझी!) ते हि नो दिवसा गतः ..
(No subject)
...... त्या उडणार्या
...... त्या उडणार्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."
हे वाक्य अजूनही मनात घर करुनं राहीलेलं ......
वा! वा!! काय दाद देऊ तुमच्या या थीमला......... लय भारी ------^-------
लहानपणीच्या आठवणीनीं मन भरुन आलं........
१६ व्या प्रचि. तील गाभुळ्लेली चिंच आणि १८ व्या प्रचि. तील लाल बोरं पाहुन तर शाळेसमोर उभ्या राहणा-या खाऊवाल्याची आठवण झाली......
धन्यवाद!!!!!!! त्या जुन्या जादुई दुनियेतुन फिरवुन आणल्याबद्द्ल
आई, मला छोटासा कॅमेरा दे ना
आई, मला छोटासा कॅमेरा दे ना |

कॅमेरा घेईन | फुटोग्राफर होईन |
थीमीत लिहिन | क्लिक क्लिक क्लिक ||१||>> इन्द्रा
पण पर्फेक्ट लिहिलस.
जिप्स्या... अरे काय भन्नाट!
जिप्स्या... अरे काय भन्नाट! माझ्या पण शाळेच्या वाटेवर जांभूळ, पेरू, बोरं, अन कवठाची झाडी होती. भोकरं हा प्रकार माहीत आहे का? बोराएवढे पण फिकट पिवळ्या-पांढर्या रंगाचे, खूप गोङ पण अतीशय चिकट. खाऊन झाल्यावर त्याच्या बिया फेकून मारल्या तरी चिटकून बसतील एवढ्या. जवळच साखर कारखाना असल्याने हंगामात गाड्यांवरचा ऊस ओढून खायचो. नाण्यांचा फोटो पण छान, तो मधे भोक असलेले नाणे सोडले तर बाकी सर्व बघितलेले आठवतात...
योग्या... आज पुन्हा हेच
योग्या... आज पुन्हा हेच बघतोय्/वाचतोय.... मनच नाहि भरत रे.... अस वाटतय की या आठवणीतुन बाहेरच पडु नये.....
बापुडा मी सर्वांशी सहमत
बापुडा मी सर्वांशी सहमत असण्यापेक्षा काय जास्त बोलू शकणार? ज ब र द स्त केवळ!
किती काव्यात्म थीम आहे. सलाम तुमच्या कल्पकतेला आणि प्रयत्नांनाही, तसेच प्रचिंनाही
एकदा भेटाल का?
सगळ्यांचे प्रतिसाद/आठवणी खुपच
सगळ्यांचे प्रतिसाद/आठवणी खुपच छान
विजेता/दिनेशदा>>+१



इंद्रा
गोळेकाका सुरेख कविता
एकदा भेटाल का? >>>>नक्कीच
सुरेख थीम आणि प्रचिही
सुरेख थीम आणि प्रचिही जबरदस्त!!
त्रिवार मुजरा महाराज... तु
त्रिवार मुजरा महाराज...
तु अक्षरशः भुतकाळात नेलेस आणि नोस्टॅलजिक केलेस...
सर्व फोटोज् ३-४ वेळा पाहिले पण मनच भरत नहिये...
भावूक केलेस मित्रा. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
लिखाण पण अप्रतिम.
तुझ्यासारखा तुच...
1 of the best of Gypsy.
आईशप्पथ!!!!!!! झकास! झकास!!
आईशप्पथ!!!!!!!
झकास! झकास!! निव्वळ अप्रतिम!!
ते नाव-गाव-फळ-फूल किती व्यवस्थित लिहिलंय.... इतका नीटनेटकेपणा त्याचवेळी आमच्या अंगात भिनता तर...
सगळेच फोटो उत्कृष्ट, नेहमीप्रमाणेच
ते नाव-गाव-फळ-फूल किती
ते नाव-गाव-फळ-फूल किती व्यवस्थित लिहिलंय.... इतका नीटनेटकेपणा त्याचवेळी आमच्या अंगात भिनता तर.. >>> मंजू, परफेक्ट !!
काल माझ्या मनातही हेच आलं...
जिप्स्या..परत परत पाहतेय
जिप्स्या..परत परत पाहतेय फोटोज..
माझ्या आवडत्या दहात..
दिनेश दा.. अगदी .. जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा लहानपण पुन्हा एकदा भोगून घ्यायचंच मनसोक्त..
नील मुळे मलाही अश्या भरपूर संधी मिळतात..
जिप्सी ... क्या बात है.....
जिप्सी ... क्या बात है.....
प्रचि बघताना एकदम हरवूनच गेले...
शाळा, तो नाव, गाव , फूल फळ खेळ, त्या पारंब्या , ते वनभोजन, ... अजून काय नि काय.... खुप छान वाटले पाहून आणि परत अनुभवून...
प्रचि ६ तर खासच...
सुरेख्च प्रची आणि लेख
सुरेख्च प्रची आणि लेख
अरे, पुन्हा त्या काळात नेलस
अरे, पुन्हा त्या काळात नेलस बघ. बाळपणीचा काळ सुखाचा, हे मोठ झाल्यावर कळतं. नाती बरोबर गुलमोहरांच्या पानांची भाजी, चिमुकल्या कप बशी मधून खोटाखोटा चहा पिणं, ... मजा येतें. हा तर सारा खजिनाच उघडला आहेस, गोट्या, सागरगोटे, भवरा, रानमेवा, गोळ्या चाकलेटं...
मला वाटतं ह्या संग्रहाचं आणखी चांगलं काही तरी व्हायला हवय. वृत्तपत्रात, साप्ताहिकात लेखमाला, आणि पुढे कदाचित पुस्तक, छायाचित्र आणि लेखांचं...
बघ, विचार कर.
पुढील यशाकरीता शुभेच्छा.
मस्त रे, फोटो आणी थीम खूपच
मस्त रे, फोटो आणी थीम खूपच आवडलेत.
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!
सगळंच अफलातून योग्या
सगळंच अफलातून योग्या
खुपच छान आहे......
खुपच छान आहे......
जिप्स्या जबरदस्त यार किती
जिप्स्या जबरदस्त यार किती मागे घेऊन गेलास. अस वाटल तिथुन परत येऊच नये. दुनिया दारी कळत नव्हति तेच बर होत. कित्ति आणि काय काय होत सांगुच शकत नाही. आता मागे वळुन पाहील्या वर कळत किती मोठ होत हे लहान पण. तेव्हा मोठ होण्याची होस होती आणि आता??? तेव्हा वाटायच आपण मोठे झाल्यावर हा अभ्यासाचा ताप सुटेल आणि आपण खुप मजा करु. पण झाल उलट आयुष्यातल शिकण अजुन चालुच आहे पण बाकी सगळ सुटल.
मनःपासुन धन्यवाद जिप्स्या.
अके, स्वाती, मनिष धन्यवाद!!!
अके, स्वाती, मनिष धन्यवाद!!!
तेव्हा वाटायच आपण मोठे झाल्यावर हा अभ्यासाचा ताप सुटेल आणि आपण खुप मजा करु. पण झाल उलट आयुष्यातल शिकण अजुन चालुच आहे पण बाकी सगळ सुटल.>>>>>>+१
पुन्हा अ प्र ति म.
पुन्हा अ प्र ति म.
Pages