मीना प्रभुंचे " गाथा इराणी " हे नवे कोरे पुस्तक ( मौज प्रकाशन, किंमत ३०० रुपये, पृष्ठे ३७६ ) नुकतेच वाचून संपवले.
खरे तर आम्ही त्यांचे चाहते, रोमराज्यची, गेली दोन वर्षे वाट बघत आहोत, पण हा त्यानी आम्हाला दिलेला सुखद धक्काच आहे.
आर्यनाम क्षेत्रम, असे मूळ नाव असणारा हा देश आणि या पुस्तकाच्या शीर्षकातील, गाथा हा शब्ददेखील, मूळ पारसीच.
इराणी रेस्टॉरंट्स आपल्याला परिचित. त्या कनवाळु लोकांचा देश कसा आहे, याचा अगदी सुंदर आढावा या पुस्तकात आहे. मीना प्रभुंच्या पुस्तकात छायाचित्र कमी असली, तरी त्यांच्या नेमक्या वर्णतून तो प्रदेश, तिथल्या इमारती, शिल्पकला, अगदी डोळ्यासमोर उभ्या राहतात. शिवाय इराणच्या खजिन्यातील ज्या संपत्तीचे मूल्यमापनही होवू शकत नाही, असे काहि नमुने, आपल्याला छायाचित्रातून दिसतात. प्रकाशनमूल्य, अगदी अव्वल दर्ज्याची आहेत.
इराणचे आणि आपले सांस्कृतिक धागे इतके एकमेकात गुंतले आहेत कि, पानोपानी, त्याचा अनुभव येत राहतो. तीनला ते से म्हणतात, आणि एक ला येक. बाकि दोन आणि चार ते दहा, सर्व अंक शब्दात तेच. इतिहासातही सतत आमनेसामने होतीच, ते संदर्भही इथे येत राहतात. औरंगजेबाने, शहा अब्बासला पाठवलेल्या एका पत्रात, आलमगीर अशी सहि केली होती, त्याला उत्तर देताना शहाने लिहिले होते, तुझ्याच देशात, तुझ्या दक्षिणेला असलेल्या शिवाजी नामक काफ़रालाही तू जिंकू शकत नाहीस, तू कसला आलमगीर ( जगाचा राजा )
इराणमधली अप्रतिम वास्तूकला, तर इथे अचंबित करते. निव्वळ प्रकाशाच्या मोराचे, वर्णन तर मूळातूनच वाचायला पाहिजे. एखादा पूल, किती देखणा, असू शकतो. तोही इथे भेटतोच.
पारसी लोकांच्या धर्माची इथे ओळख आहेच पण मुसलमानाच्या प्रतिमक्केला, दिलेली भेटही आहेच.
पण तरिही सगळे आलबेल आहे असे नाही. तिथे स्त्रियाना हिजाबचीच नव्हे तर चादोरची पण सक्ति आहे. लेखिकेला तर अगदी विमानात प्रवेश करण्यापासूनच त्या सक्तिचा सामना करावा लागला. आणि त्याबद्दलचा निषेध, लेखिकेने वेळोवेळी, जो भेटेल त्याच्याकडे केला. एका मुल्लाला सुद्धा त्यानी सोडले नाही. आणि या सर्वाचे परिणामहि त्यानी भोगले.
लेखिकेची देवधर्माविषयी मते, मला अत्यंत प्रिय आहेत. या पुस्तकात ती मते, अत्यंत धारदारपणे व्यक्त झाली आहेत.
आम्ही मस्कतला असताना, इराणी ओले पिस्ते, डाळिंब, केशर, हलवा यांचा मनसोक्त आस्वाद घेतला होता. पण प्रत्यक्ष तिथे मात्र लेखिकेचे जेवणाचे हालच झाले. सारखा क नावाने सुरु होणारा एक पदार्थ खावा लागला. या पदार्थाचा लेखिकेला इतका वैताग आला होता कि शेवटी, त्याचा उल्लेख देखील, त्याना नकोसा झाला होता.
आपल्या कडव्या धार्मिक आणि राजकिय मतानी, इराण जगभर बदनाम आहे. देश असा तर माणसे कशी असतील, असे लोक समजत असतात, पण या समजाला मात्र लेखिकेने पुर्णपणे खोटे ठरवले आहे.
पण या सर्वांपेक्षा पुस्तकभर व्यापून राहिला आहे तो, इराणी लोकांचा जिव्हाळा. हा जिव्हाळा त्यांचा राष्ट्रीयधर्म असावा, इतक्या निष्ठेने ते लोक तो पाळतात. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे, हि ओळ अक्षरशः खरी ठरते तिथे. आपण आपल्या परिचिताना, मित्रमैत्रिणीना सुद्धा जितका जिव्हाळा दाखवू शकत नाही, तितका जिव्हाळा, तिथले लोक, एका परदेशी प्रवाश्याला दाखवतात. ज्या लोकांशी लेखिकेचे वाद झाले, त्यानीदेखील हा जिव्हाळा जपला आणि लेखिकेला शरमिंदे केले. आणि हे सगळे खास मीना प्रभुंच्या निखळ प्रामाणिक लेखनातून आपल्यापर्यंत पोहोचते. हे सर्व प्रसंग मूळातूनच वाचण्याजोगे आहेत. लेखिकेच्याच शब्दात सांगायचे तर,
जीवनाच्या व्यवहारात स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र होण्याच्या नादात मी किती रुक्ष कोरडी झाले आहे. सगळं देणंघेणं किती मोजूनमापून करते आहे या जाणीवेने माझे डोळे उघडले. सारखे पाणावत असले तरी नक्की उघडले. असलं वेडं प्रेम शिकून घ्यायला हवं पुन्हा. ----
या मातीचा हा गूण असलेला हा प्रेमळपणा मला आतून उसवून पिंजून काढतो आहे. आता विचारा मला पुन्हा कुठल्या देशात जावंसं वाटतय ? इराण, निःसंशय इराण.
ईथली
ईथली लेखिकेबद्दलची चर्चा स्वतंत्र विभागात हलवली आहे.
http://www.maayboli.com/node/2733
'गाथा
'गाथा इराणी' (अतिशय प्रयत्नपूर्वक) वाचलं.
३७६ पृष्ठांच्या या पुस्तकात 'हिजाब', 'कबाब खाऊन आलेला कंटाळा', 'इस्लाम किती वाईट' आणि 'मला बघा कशी सगळ्यांनी मदत केली' हे किमान साडे तेरा हजार वेळा येतं.
नेटानं पुस्तक पुरं केलं.
तुझ्या
तुझ्या शर्थीची धन्य आहे.
***
It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
- Gore Vidal
सहमत आहे
सहमत आहे चिन्मय. मलाही हे पुस्तक अतिशय कंटाळवाणे वाटले. त्याच त्याच गोष्टि इतकेदा सांगितल्या आहेत. दरवेळी किमान ३०० पाने असायलाच हवित असं काही मौज वाले अट घालतात का बाईंना?त्यापेक्षा छोटेखानी पुस्तक काढले असते तर बरे झाले असते.
.
मुस्लिम धर्म कसा वाईट या बरोबर मी कशी देव मानत नाही हे इतकेदा आहे की त्या स्वतःच एक "नास्तिक धर्म प्रचारक" झाल्यागत वाटु लागले.
--------------प्रति
--------------प्रतिसादावर काम चालू.------------
काल बाबांनी लायब्ररीतून आणलं
काल बाबांनी लायब्ररीतून आणलं म्हणून गाथा इराणीची थोडी सुरुवात (२५-३० पानं) वाचली.
३७६ पृष्ठांच्या या पुस्तकात 'हिजाब', 'कबाब खाऊन आलेला कंटाळा', 'इस्लाम किती वाईट' आणि 'मला बघा कशी सगळ्यांनी मदत केली' हे किमान साडे तेरा हजार वेळा येतं. >>>>> चिन्मय, पहिल्या तीस पानांतच ३ हजार वेळा आहे !!!!
तिथल्या बायका कबूल करतायत की हिजाब जाचक आहेच पण सध्या आमच्या पुढे सोडवण्यासाठी इतर जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत तरी ह्यांचं हिजाब पुराण सुरुच !
'मला बघा कशी सगळ्यांनी मदत केली' >>>> ते जे कोण प्राध्यापक होते त्यांना इतर काही कामं नव्हती का असं वाटलं त्यांच्या मदतीचे गोडवे ऐकून.. !
एकंदरीत अत्यंत रटाळ पुस्तक !
श्र.. प्रतिसाद झाला की नाही लिहून.. की पुस्तक रटाळ आहे हे साडे तेरा हजाव वेळा लिहून होईपर्यंत थांबली आहेस ?
मध्यंतरी "नॉट विदाऊट माय
मध्यंतरी "नॉट विदाऊट माय डॉटर" वाचनात आले होते (ओरिजिनल विंग्रजी मधले. अनुवादीत नाही). त्यातून जो इराण समोर आला तेव्हापासून मला भारतात जन्मास घातल्या बद्दल देवाचे मी लाखो वेळेला आभार मानले आहेत.
अर्थात "नॉट विदाऊट माय डॉटर" ची कथा १९८५ च्या आसपासची आहे त्यामुळे सद्य स्थिती वर भाष्य करता येणार नाही. परंतु एकंदरीतच इस्लाम धर्माच्या लोकांचा कडवेपणा (विशेषता: बायकांना सक्तीचे बुरख्याआड ठेवणे इ.) इतरही ठिकाणी नजरेस येतोच आणि अस्वस्थ वाटते. ट्रेन मधे मुंब्र्याहून चढणार्या कित्येक जणी मुंब्रा मागे पडल्यावर त्यांचे काळे डगले काढून टाकतात. संध्याकाळी मुंब्रा येण्यापूर्वी पुन्हा चढवितात.
(अवांतरः "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या पुस्तकावरही खूप राळ उठली होती म्हणे. बेट्टी मेहमूदीने पूर्वग्रहप्रदूषित नजरेने ते लिहिले आहे, तिच्या वतीने लेखन करणार्या लेखकाने ते स्वतःच्या इराणविरोधी पूर्वग्रहातून लिहिले आहे इ.इ. आरोप - प्रत्यारोप झाले. त्यावेळेस चालू असलेल्या इराण-इराक युद्धात अमेरिका इराक ला शस्त्रास्त्रे पुरवित असल्याने इराण मधे अमेरिकाविरोधी वातावरण होते.)
चिनूक्स अनुमोदन.
चिनूक्स अनुमोदन.
या संमिश्र प्रतिसादांमुळे
या संमिश्र प्रतिसादांमुळे नक्की कळत नाहीये वाचावं की नको........
शशांक, एक प्रवासवार्णन म्हणुन
शशांक, एक प्रवासवार्णन म्हणुन जर हे पुस्तक वाचणार असशील तर वाच कारण पुस्तक चांगल आहे..
धन्स गिरीविहार......
धन्स गिरीविहार......
पण पग्या २७३३ वर तर तू
पण पग्या २७३३ वर तर तू म्हणाला आहेस की त्यांचं लेखन तुला आवडतं म्हणून!
माझं मत- गाथा इराणी बरं आहे. कंटाळवाणं वाटलं नाही. हां ते कबाब वगैरे होतं जरा ओव्हर, पण ठीके.
मीना प्रभुंचा एक वेगळा वाचक
मीना प्रभुंचा एक वेगळा वाचक वर्ग आहे.... ज्यांना त्यांची पुस्तके आवडतात ते एकही सोडत नाहीत. नक्कीच वाचतातच....
मला त्यांचं चीनी माती आणि मॅक्सिको पर्व फार म्हणजे फारच आवडलं. साधारण पणे त्या जिथे जातात तिकडच्या चालीरीती, माणसं, संस्क्रुती ह्या बद्दल जास्त लिहितात. तिकडच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत वगैरे भरपुर माहिती देतात. व्हॅटीकन मधे फिरताना मला त्यांच्या रोमराज्य चा खुप फायदा झाला. निवांत बघीतलं. 'वाट तिबेटची" बरच गंडलं आहे....कारण तिबेट आणि हवाईची एका पुस्तकात घातलेली सांगड!!!!
मुळात मराठी मध्ये "प्रवास वर्णन" हा वाङमय प्रकार फार कमी लोकांनी लिहिला आहे. आजही इंग्रजीच्या तोडीचं ह्या प्रकारातलं वाङमय मराठीत नाही. बाकी अनेक प्रकारात आपण श्रीमंत आहोत. पण ह्या प्रकारात मात्र वानवा आहे.
गाथा इराणी मीना प्रभुंच्या वाचकांच्या अपेक्षा एकदम पुर्ण करतो. तिकडच्या स्त्रीयांचे आयुष्य, बांधिलकी , हीजाबाचं जोखड... ते जगत असलेली दुपेडी आयुष्य , एकीकडे अमेरिकेचा राग, दुसरी कडे अमेरिकेचं आकर्षण , धर्माचं ओझं, धर्माचं कडबोळं सुध्धा.... बाकी प्रोफेसरांची ह्यांच्या फिरती मधली दखल त्यांनाही जाचक वाटलीच की.... कबाब आणि इतर पदार्थां मधे नसलेलं नाविह्य, त्याच त्या पदार्थांचा आलेला कंटाळा... सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. काहीही लपवलेलं नाही. लोकांचं आदरातिथ्य, त्यांच दुसर्या साठी जान देणं, भाषा येत नसतानाही इतरांशी संवाद सादणं.... इराण मधे अराजक आणि युध्धा मुळे "पर्यटन" हा व्यवसाय फारसा पुढारलेला नाही. अशा देशात लेखिका जाते .. ती ही एकटी... कोणा कोणाच्या ओळखी काढुन, तिकडे धार्मिक परीसंवादात घुसुन, कवि संमेलनात घुसुन, थोडी आगावु वाटेल अशी हुज्जत तिकडच्या लोकांशी घालुन... मस्त माहिती वाचकांना मिळते.
अनेक वाचक त्यांची पुस्तके नावे ठेवत का होइना पण वाचतातच....
pustak wachoon magach nava
pustak wachoon magach nava thevavit, ya matacha mi aahe.
मी सुदधा नेटान हे पुस्तक
मी सुदधा नेटान हे पुस्तक पुर्ण केल. मधे मधे हे पुस्त्क खुप्च बोअर होत जात.
काही खाण्याचे पदार्थ कबाब सोडुन ,एका ठिकाणी लेखिके सोबत च कोणीतरी काहीतरी करपलेला,जळ्लेला पदार्थ मागवतात ,त्याचे केलेल वर्णन आनि आपल्या कडे जश्या पुराण कथा असतात तश्या इराणी कथा मात्र आवडल्या
काहीही होवो... वाचताना !!!!
काहीही होवो... वाचताना !!!! मग झालं तर.....
मला तर खूप आवड्ते 'मीना
मला तर खूप आवड्ते 'मीना प्रभू' , एक व्यक्ती म्हणून ही आणी एक लेखिका म्हणून ही....
नाहीतर प्रवासवर्णनं + इतिहास हे काँम्बिनेशन बोजड भाषेत लिहिलं गेलं तर वाचन कंटाळवाणं होण्याची भीती असते!!!
उत्कृष्ट, फेमस लेखकांचीही सर्वच पुस्तकं काही आपल्याला आवडत नाहीत पण म्हणून आपण त्यांना एकदम राईटॉफ पण करून टाकत नाही नं!!!
सर्वच पुस्तकं काही आपल्याला
सर्वच पुस्तकं काही आपल्याला आवडत नाहीत>> करेक्ट लिहीलंय. मीना प्रभूंच्या पुस्तकांचा एक ठरलेला साचा आहे. त्या साच्यात सर्व प्रवासवर्णनं येतात; मग स्थळ कोणतंही असो. तो साचा आवडत असेल, तर सगळी पुस्तकं आवडतात, नाहीतर दोन-तीन वाचल्यानंतर एकूण आवाका लक्षात येतो; आणि मग पुन्हा वाचलं जातं, अथवा सोडलं जातं.
हे अर्थात सर्वच लेखकांना लागू आहे. साचा म्हणा, वा शैली वपुंबद्दल कायम असा वाद येत राहतो. कोणाला अतिशय आवडतात, कोणाला एक वाक्यंही सहन होत नाही.
अरे, मी हे विसरूनच गेले होते.
अरे, मी हे विसरूनच गेले होते.
चिनूक्साने आधी स्वतः पुस्तक वाचलं, मग 'मला दोन दिवसांत परत करायचं आहे, पण तरी तुला देतो' अशी स्वतःहून उदार ऑफर दिली. एवढेच नव्हे तर माझ्या ऑफिसकडे आला असताना मला अगदी हातात पुस्तक आणून दिलं. असा मित्र मला मिळाला आहे, हे पाहून माझे डोळेच भरून आले. पुस्तक वाचल्यावर तेच डोळे उघडलेही. आपल्याला कबाब खाऊन जितका वैताग आला तितकाच वाचकांना तो शब्द साडेतेराहजारवेळा वाचायला लावून द्यायचा, असा विचार त्यांनी केला असावा. तीच गत हिजाब वगैरे बाबींची. पण मीही नेट लावून संपवलं पुस्तक.
श्र
श्र
पर्शियन संस्कृती ही फक्त शराब
पर्शियन संस्कृती ही फक्त शराब आणि शबाब यामधेच रंगणारी नसून त्यात कबाबाचेही किती महत्व आहे हे फक्त या पुस्तकामुळेच कळते.
वर्षु ताई +१
वर्षु ताई +१
मलाही आवडतात त्यांची पुस्तके.
मलाही आवडतात त्यांची पुस्तके. कधीतरी खूप वर्णन सुरु झाले की मी एखादे पान गाळून टाकते. पण एकंदर आवडते.
अवांतर - वर्षू नील तुझी त्यांच्याशी personal ओळख आहे आणि चीन मध्ये तुम्ही एकत्र फिरला आहात हे फार मस्त वाटले.
आगावा, हिजाब ला विसरला वाटतं.
आगावा,
हिजाब ला विसरला वाटतं.
बोअर होणारं वर्णन गाळून मी ही
बोअर होणारं वर्णन गाळून मी ही हे पुस्तक वाचलंय. इराणबद्दलची माहिती मला इंटरेस्टिंग वाटली. पण एक मात्र आहे, की मीना प्रभूंची पुस्तकं मी एकापाठोपाठ एक नाही वाचू शकणार. कंटाळा येईल. वर्षाला एक या गतीने वाचायला हरकत नाही
राईट-ऑफ न करण्याला अनुमोदन.
माझ्या तर्फे त्यांना एक हिजाब
माझ्या तर्फे त्यांना एक हिजाब भेट. शी कुड अॅक्चुअली यूज इट यू नो आर ओ एफ एल.
.
.
श्र आणि आगाऊ, आम्हांला असे
श्र आणि आगाऊ,
आम्हांला असे मित्र नाहीत ह्याचा आनंद आहे.
मागे कुणीतरी मीना प्रभू चे
मागे कुणीतरी मीना प्रभू चे कौतुक केले म्हणून मी उत्साहाच्या भरात एकदम ३ पुस्तके घेतली
आईशप्पथ माझ्या कडून एकही पूर्ण नाही झाले...मला वाटत इजिप्तायन, तुर्कनामा आणि कोणतातरी होत
बाकी नेटाने वाचून पूर्ण करणार्या लोकांचे माझ्याकडून खूप खूप कौतुक
गीतु,.. पण इजिप्तायन चांगलं
गीतु,.. पण इजिप्तायन चांगलं आहे. गाथा इराणी मी अर्धवट वाचून तूर्त बाजूला ठेवलं आहे. चिनी माती मध्ये फोटोंची कमतरता खूप जाणवली..
Pages