चला चला बघायला चला...
हि तर समदी निसर्गाची उत्पती...
तर कधी दरीखोर्यात...
माळरानावर..
तर कधी शेताच्या बांध्यावर
असते यांची वस्ती....
पावश्यासंगे चाले यांची मस्ती ...
हसत,खिदळत ..
फुलतो आनंदाचा मळा....
चला चला बघायला चला... रानफुलांची भरली शाळा..
![](https://lh6.googleusercontent.com/-0to1m5M8TIM/UEIYVFZPmaI/AAAAAAAADsA/QWofdup-uHs/s640/Ranful.jpg)
सह्याद्रीच्या कुशीत वावरताना... दर्या-खोरे पालथे घालताना ..ही रानफुले नेहमी भेटतात.ही हसरी फुले नेहमी आनंदी असतात अन आपल्या मनाला तजेला देतात.प्रवासातला थकवा यांना पाहुन कुठल्याकुठे पळुन जातो.रानफुलांच्या नुसत्या दर्शनाने मन प्रसन्न होते.सह्याद्रीत भटकंतीला जेव्हापासुन सुरुवात झाली तेव्हापासुन तर आतापर्यंत वेगवेगळ्या रुपात,रंगात ,वेगवेगळ्या मोसमात ही भेटत गेली अन त्यांना टिपत गेलो.खर म्हणजे पावसाळा सरता सरता लोकांना कासची आस लागलेली असते.पण मला प्रत्येक सह्यभेटीत यांचे दर्शन घडते.असा हा माझ्या पोतडीतला निसर्गाचा अनमोल खजिना तुमच्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न...
प्रकाशचित्र १ . कवळा (Smithia hirsuta)
प्रकाशचित्र २.
![](https://lh4.googleusercontent.com/-MnnlQr8XBjM/UEH249BHHVI/AAAAAAAADp4/aVtmXP3Z3d0/s640/Picture%2520855.jpg)
प्रकाशचित्र ३. ऑर्किड
प्रकाशचित्र ४. दहाण (Tricholepis amplexicaulis)
प्रकाशचित्र ५.
प्रकाशचित्र ६. घाणेरी - तणतणी
प्रकाशचित्र ७.
![](https://lh3.googleusercontent.com/-HhKj5tCJDWw/UDyz2GbGYhI/AAAAAAAADeY/aGT8BpfCCoE/s640/Tikona%252040.jpg)
प्रकाशचित्र ८.
प्रकाशचित्र ९. बाभळीची फुलं
![](https://lh3.googleusercontent.com/-3ZL1LFPkTt4/UDy3IWklyvI/AAAAAAAADe0/LFlU2TDi_aU/s640/Picture%2520665%2520copy.jpg)
प्रकाशचित्र १०. रानहळद
![](https://lh6.googleusercontent.com/-hP7E3lcxDK8/UDy3f24KqAI/AAAAAAAADe8/_dQGEsDM6AI/s640/IMG_0092.jpg)
प्रकाशचित्र ११.
प्रकाशचित्र १२. गोकर्ण
प्रकाशचित्र १३. काटेसावर
प्रकाशचित्र १४. पिवळा धोतरा
प्रकाशचित्र १५.
![](https://lh6.googleusercontent.com/-3-wEzRHuxms/TcULKAjQiJI/AAAAAAAABuU/xTwl4ndUlx4/s640/Picture%2520792%2520copy.jpg)
प्रकाशचित्र १६. गोविंदी(Ceylon caper)
प्रकाशचित्र १७. भंडीरा
प्रकाशचित्र १८. जास्वंदी
प्रकाशचित्र १९. बिट्टी
प्रकाशचित्र २०.
प्रकाशचित्र २१. तेरडा
प्रकाशचित्र २२. जांभळी मंजिरी
प्रकाशचित्र २३.
प्रकाशचित्र २४.
प्रकाशचित्र २५.
प्रकाशचित्र २६.
प्रकाशचित्र २७.
प्रकाशचित्र २८. सोनतारा (Hypoxis aurea)
प्रकाशचित्र २९. घाणेरीची फुले
प्रकाशचित्र ३०. अभेळी(Cyanotis Tuberosa)
![](https://lh6.googleusercontent.com/-2QDINkVJ4I8/UEIFiZP2W1I/AAAAAAAADq8/XV5qyUbwFPg/s640/Picture%25201026.jpg)
प्रकाशचित्र ३१. सडा प्राजक्तांचा...
मन भरल का ?
नाही ना...
मग जाऊ नका कुठे ...
आत्ताशी झालीय मधली सुट्टी...
धन्यवाद .. ईनमीन
धन्यवाद .. ईनमीन तीन,गौरी,रैना,mana ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्या कोलाज चं पिक्चर सेव करावंस वाटतंय ,चलेगा क्या??? >> हो चालेल ना ...:)
ते १५ नंबरचं फूल कसलं आहे??? >>>पुरंदरे शशांक जी.... नक्की कुठल फुल असेल याबाबत शंका आहे ... वाटर लिलीचाच प्रकार असावा असे वाटते..
कारण मला ती रानफुल गोरखगडावरील पाण्याच्या टाक्यात आढळली होती.
पूर्वी डॉ प्र के घाणेकर हे एस
पूर्वी डॉ प्र के घाणेकर हे एस पीचे बॉटनीचे प्राध्यापक सुटीच्या दिवशी मुलांना घेऊन परिसरात ट्रिप काढायचे व वनस्पती ओळखून परिचय करून द्यायचे. हल्ली ते किंवा कोणी करते का तसे?
पक्षांच्या बाबतीतही घनघोर अज्ञान आहे ....:(
एक से एक सुंदर फुलं आणि
एक से एक सुंदर फुलं आणि प्रचि!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाप्पाचे कोलाज खुपच मस्त जमलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रकाशचित्र
प्रकाशचित्र ४. दहाण_Tricholepis amplexicaulis
प्रकाशचित्र २५. कुसुंबी
प्रकाशचित्र २८. सोनतारा_Hypoxis aurea
प्रकाशचित्र ३०. नभेळी_Cyanotis Tuberosa
प्रकाशचित्र १६. गोविंदी_Ceylon caper (??)
पूर्वी डॉ प्र के घाणेकर हे एस
पूर्वी डॉ प्र के घाणेकर हे एस पीचे बॉटनीचे प्राध्यापक सुटीच्या दिवशी मुलांना घेऊन परिसरात ट्रिप काढायचे व वनस्पती ओळखून परिचय करून द्यायचे. हल्ली ते किंवा कोणी करते का तसे?<< बाजो पुण्यामधे अरण्यवाक नावाची एक संस्था आहे ते पुणे परीसरात हे काम करतात
मस्तच ......
मस्तच ......
Pages