उत्तम तंदूरी चिकन मिळाण्याची ठिकाणे

Submitted by भानुप्रिया on 17 August, 2012 - 08:56

माबो वरील सर्व खवय्यांना मझा साष्टांग प्रणाम!

पुण्यात सर्वोत्तम तंदूर चिकन कुठे मिळतं हे जाणून घेण्यासाठी हा धागा आहे!

सर्वांत वाईट कुठे मिळतं हे ही अवश्य सांगावे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंजो, चिकन कसं चालतं मग जोशांना? Wink आणि हॉटेलमधे जेवायला जाता तेव्हा शेफच्या जातीचं प्रमाणपत्र चेक करता का ? Happy कर्वे रोडवर जावुन खाल्लेली बिर्याणी पांचट आणि फिकी लागणारच. बिर्याणी खावी तर यवनांच्याच हातची.

अरे बिर्याणी बद्दल पण बोलताय का ? मग गुडलकची अन हाँगकाँग लेन मधल्या त्या (नाव विसरले) हॉटेलमधली बिर्याणी ? मस्त. कँम्पातल्या सिगरीचीही मस्त असते. सहसा बाहेरच्या बिर्याण्या जरा कमी तिखटच असतात.
मी मात्र चांगली झणझणीत करते. वर तर्रीदार ग्रेव्ही आहेच Wink
अरेच्च्या मला वाटलं की मी माझी तंदूरीची रेसिपी टाकलीय इथे. पण नाही बहुदा. आज टाकते. फोटो बघते जुना कुठला सापडतोय का. नाही तर रविवार पर्यंत फक्त रेसिपीवर भागवा दोस्त हो Happy

परवा साई पॅलेस पौड रोडवरचे खाल्ले.. एकदम मस्त.. तंदुरी , बटर चिकन.. पण बार आहे.. त्यामुळे फॅमीलीसाठीची जागा खुपच छोटी आणि कंजस्टेड Sad

एशियन मिलांज.
डहाणूकर रोडवर. नवीन टायटन शोरूमसमोर.
तंदूरी नाही, पण बिर्याणी खाल्ली.
सौम्य, पण चविष्ट.
चिकनही उत्तम.

ना देशस्थ, ना कोकणस्थ.
नॉनव्हेज खाणारे सारे ब्राम्हण तर उध्वस्त !! Happy

कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. हलकेच घ्या Happy

बागबान खरंच मस्त होतं. पण आता त्याची दुर्दशा झाली आहे. फार कळकट वाटतं. >>>>>>>>>>> +१ .पण तरीही मला तिथलेच सगळेच कबाब चे प्रकार आवडतात.. आनि खिमा पण... मग एक्च उपाय घरी पार्सल आणणे Happy पण मग सोबत ते साधा कांदा देतात फक्त .. हॉटेलात कबाब सोबत ते जे कांदा+ कोबी च सॅलड देतात ते मिस होत Sad

अजुन एक तंदुरीच ठि़काण... बागबान पासुन सरळ गेल की एफ.एस च्या ओपोजीट डाव्या हाताला एक तंदुरवाला थांबतो.. एक्दा असेच मी अन बाबानी तिथेच स्टुलावर बसुन खाल्ल होत.. मला आवडल होत... तो पण जो कांदा सोबत देतो .. काहीतरी वेगळाच प्रकार पण मस्त लागतो:) आता मात्र काही कल्पना नाही चवीची...

हाँगकाँग लेन मधल्या त्या (नाव विसरले) हॉटेलमधली बिर्याणी ? मस्त.

अवल नक्की ना...
मला तिथल्या खाद्यपदार्थांच्या क्वालीटीबद्दल शंका आहे....

सगळ्यात बेस्ट बिर्याणी कोणती मला हैद्राबादी तिखट, चिकन नीट मॅरीनेट झालेली बिर्याणी अपेक्षित आहे.

पिंपरी चिंचवड एरिया

अरे वाह हा धागा वरती आला तर

सध्या पिके बिर्याणी ची इच्छा मावळली आहे
गेल्या तीन चार वेळेला चिकन ची क्वालिटी अजीबत आवडली नाही
तरी भरपूर क्वांटीती मध्ये देत असल्याने भुकेच्या वेळी तिथूनच मागवलं जातं

निखारा बिर्याणी ची दोन तीन औटलेत झाली आहेत पण त्याची एकंदरीत कळा बघून खायची कधीच इच्छा झाली नाही

पलंगे बिर्याणी चांगली आहे तर पण मसालेदार आणि तेलकटपणा कडे झुकते

पथिकला खूप वेटिंग होती. अरोमाला गेलो मग, पिंपळे सौदागर कोकणे चौक. मस्त आहे

बोरावके चिकन बंद झाले आहे.
कर्वेनगर मध्ये कॅनॉल रोडवर तीन उत्तम चिकन तंदूर ची दुकाने आहेत समक्ष व्यवस्थित भाजून देतात अर्थात सर्व आपले मुस्लिम भाई आहेत अप्रतिम चव (फक्त ambience कडे लक्ष द्यायचे नाही)
लक्ष्मी रोड गणेश पेठ नर्तिका बार कॉर्नर.
कोपऱ्यावरील इराणी हॉटेल.

Pages