उत्तम तंदूरी चिकन मिळाण्याची ठिकाणे

Submitted by भानुप्रिया on 17 August, 2012 - 08:56

माबो वरील सर्व खवय्यांना मझा साष्टांग प्रणाम!

पुण्यात सर्वोत्तम तंदूर चिकन कुठे मिळतं हे जाणून घेण्यासाठी हा धागा आहे!

सर्वांत वाईट कुठे मिळतं हे ही अवश्य सांगावे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही (नवाबी) चिकन खाल्लं - करीम्स, इस्ट स्ट्रीट ( टेक अवे साठी छान. बसायला बंडल). तेज रिजन्सीच्या वर ७व्या मजल्यावर असणारं - चारकोल पीट. संजीव कपुरच्या 'यलो चिलीज' मधलं चिकन ही एकदम फ्रेश आणि टेंडर असतं. बार्बेक्यु नेशन आणि कोयला - कोरेगाव पार्कमधलं, इथे पण छान तंदुरी चिकन खाल्लं.

सगळ्यांना प्रचंड आवडणार्‍या 'ब्ल्यु नाइल' मधलं चिकन सगळ्यात बंडु असतं. मला अजिबात आवडलं नाही. लोकं प्रचंड गर्दी करतात त्या जॉर्जमधलं चिकनही मला अजिबात आवडलं नाही. ( जागाही फार अनहायजेनिक वाटते)

लाँग लाँग अ‍ॅगो वन्स अपॉन अ टाईम.. (पुणं सोडून २५ वर्षेहून जास्त झालीत..) तरीही जॉर्ज ची चिकन रोटेसरी .. ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊह!

चिनुक्स, तु मांसाहारी आहेस?

श्या..आठवत नाहीये, पुणे फेस्ता च्या वेळी मासे खायला गेलो होतो तेव्हा तू होतास की नाही ते!

इथं तंदुरी चिकनबद्दल कोणी बोलतच नाही आहे... Sad

ब्ल्यू नाईलच्या बिर्याणीबाब्त माझा अपेक्षाभंगच झाला. पण बहुधा नेहमीची जी तिखट व अति मसालेदार बिर्याणी खायच्या सवयीच्या पार्शवभूमिवर तसे झाले असावे असे ,मला वाटले. फारच फिकी म्हनजे मसाला जवळ जवळ नसतोच त्यात .. पण पार्सलला गर्दी खूपच होती म्हनजे ती टेस्ट डेवलप झालेली मंडळी असावी.....

मनिमाऊ ला अनुमोदन. आत्तापर्यंतचे बेस्ट तंदुरी चिकन- करीम्स. येलो चिलीजचे चिकनही सुंदर शिजवलेले असते. पण तंदुरीबद्दल माहिती नाही. कबाब्ज मस्त .

मला पण वाटत होते चिनूक्स शाकाहारी आहे.

बोराओके - डेक्कन... तंदुरी खायची असेल तर तिथेच बसून खाणे.. घरी नेऊन खाणे व्यर्थ आहे.. पण बाकीच्या रस्सा डिशेस घरी नेल्या तरी चालतात..

मिर्च मसाला - वारजे.. जबरी चिकन तंदुरी...

बाणेर रोड वर एक ढाबा आहे छोट्टासाच आहे पण तिथे पण मस्त तंदुरी चिकन मिळते..

कुठे खाऊ नये -
तिरंगा (कुठलेही. विशेषतः सातारा रोड, सिटी प्राईडजवळील)
ब्लू नाईल (एक वेळ बिर्याणी खा, पण तंदूरी चिकन नको)
कोयला (हे बरेचदा तंदूर जाळूनच आणतात)
फोर सिझन्स (करिश्माजवळील)

आवर्जून खाण्याजोगे-
मराठवाडा (ओंकारेश्वराजवळ)
येथे कंदूरी चिकन नावाची अप्रतिम डीश मिळते. जरूर खाऊन पाहा.
गावराण कोंबडीची नेहमीपेक्षा वेगळी चव.

कुठे खाऊ नये -
तिरंगा (कुठलेही. विशेषतः सातारा रोड, सिटी प्राईडजवळील)
ब्लू नाईल (एक वेळ बिर्याणी खा, पण तंदूरी चिकन नको)
कोयला (हे बरेचदा तंदूर जाळूनच आणतात) >>>>>

सागर या तीन जागांबद्दल मला एका ओळीत फीडबॅक द्यायला सांगितला असता तर मी अगदी हेच्च लिहिलं असतं. पण कोयला मधे (कोरेगाव पार्क) बाकी जेवण छान असतं.

कोयला मधे (कोरेगाव पार्क) बाकी जेवण छान असतं.>>>
अगदीच मान्य Happy मी फक्त तंदूरबद्दल म्हणालो.
हे 'जॉर्ज कुठे आहे नेमकं?

जॉर्ज - एमजी रोडवरुन आपण इस्ट स्ट्रीटला ज्या लेनमधुन टच होतो तिथे इस्ट स्ट्रीटच्या कॉर्नरला. विल्सच्या शो रुमसमोर, ज्युस वर्ल्डच्या शेजारी. Happy माझ्या नावडत्या लिस्टमधे आहे, पण जॉर्जचे फॅन भरपुर आहेत.

मनिमाऊ, त्याचं नाव जॉज आहे. ते मधे बंद झालं होतं ना? परत सुरु झालं का?
माझं पडिक रहायचं अति आवडतं ठिकाण होतं ते एमेत असताना Happy

जॉज (Jaws) वेगळं गं वरदा. ते गोळीबारच्या चौकातुन आपण कॅम्पमधे शिरताना उजवीकडे लागतं. त्याशेजारी पॅलेससारखा मोठा पांढरा बंगला होता ( जो काही काळ पॅन्टलुनची शोरुम होता), तेच म्हणते आहेस ना? तिथे तर आम्हीपण पडिक असायचो. Happy तो जॉइन्ट केव्हाच बंद पडला.

वर सगळ्यांनी लिहिलेलं जॉर्ज (George) इस्ट स्ट्रीटवर आहे. तंदुरी चिकन आणि बिर्याणीसाठी फेमस.

चार वर्षांपूर्वी जेव्हा कँपात ऑफीस होतं तेव्हा वरचेवर बागबानमध्ये बिर्याणी आणि तंदुरी चिकन खायचो....
तेव्हाची चव अप्रतिम होती. थोडे महागडे असले तरी पैसा वसूल हॉटेल आहे...
व्हिक्टरी थिएटरच्या समोर...

तंदुरी चिकन कुठे खाऊ नये...कॅँप सोडून अन्यत्र कुठेही...विशेषत सदाशिव पेठ भागात....कोंबडीचा हकनाक बळी गेल्यासारखा वाटतो ते चिकन खाताना Happy

असं होय Happy
जॉजवरच्या अतिप्रेमाने बहुदा ईस्ट स्ट्रीट हा शब्द पाहिल्यावर पुढे आणखी काही पत्ता दिसलाच नाही Proud

आशु, बागबान खरंच मस्त होतं. पण आता त्याची दुर्दशा झाली आहे. फार कळकट वाटतं. अजुनही जोरदार चालतं. करीम आणि बागबान जोरदार कॉम्पीटिशन आहे. Happy

पण आता त्याची दुर्दशा झाली आहे. फार कळकट वाटतं.

अरेरे, हा धागा वाचून बागबानमध्ये जायची इच्छा जोरदार बळावली होती...:(
सागरने सुचवलेले मराठवाडा एकदा ट्राय करायला हरकत नाही...

विशेषत सदाशिव पेठ भागात....कोंबडीचा हकनाक बळी >>>
+१ Happy
ऑलिव्हिया (कर्वे रोड)
बांबू हाऊस (इथलं फिश तंदूरदेखिल उत्तम)
मिर्च मसाला (शनिवार, रविवार सोडून)

करीम्सने मात्र निराशा केली..खूप ऐकून होतो.
यलो चिलीज मधे तंदूर नाही पण इतर स्टार्टर्स मात्र केवळ लाजवाब !!

विषय पुण्यापुरता मर्यादित असूनही सांगावेसे वाटते असे ठिकाण म्हणजे औरंगाबादमधील फाजलपुरा भागातील एक छोटीशी जागा (कलेक्टर ऑफिसकडून आल्यानंतरची दूसरी गल्ली) नाव नेमकं आठवत नाहीये आत्ता. काही वर्षांपूर्वी तिथे तंदूर खाल्ली होती तिची अजून आठवण आहे !!
या मुस्लिमबहूल भागात तंदूर (आणि एकूण नॉन-व्हेजच) अगदी ब्येष्ट मिळते.
असो. विषयांतर झाले.
आप लोग लगे रहो Happy

विशेषत सदाशिव पेठ भागात....कोंबडीचा हकनाक बळी गेल्यासारखा वाटतो ते चिकन खाताना >>> +१, तंदुर चिकन खायला सदाशिवपेठ हे कॉम्बो कैच्याकैच आहे. Proud Lol

बोरावके छान असतं. पण माझा अनुभव तिथं जेवून आलं की पोट नक्की बिघडतं Sad
मिर्च मसाला मस्तच.
रच्याकने माझ्या घरचा पत्ता कोणाला नाही आठवला? हां बहुदा इथल्या कोणी खालं नाहीये माझ्या हातचं Wink

ऑलिव्हिया (कर्वे रोड)
बांबू हाऊस (इथलं फिश तंदूरदेखिल उत्तम)
मिर्च मसाला (शनिवार, रविवार सोडून)

>>ही तीर्थ क्षेत्रे नक्की कुठे आहेत? ऑलिव्हिया तर कर्वे रोडच्या जवळ राहात असूनही जाम लक्षात येत नाहीये...:अओ:

ऑलिव्हिया >> पौड फाटा सोडून कर्वे रस्त्याने (कर्वे पुतळ्याकडे येताना) उजव्या बाजूला.
बांबू हाऊस>> कॉर्पोरेशनकडून जे एम कडे जाणार्‍या रस्त्याने येताना उजव्या बाजूला.
मिर्च मसाला >> कर्वे रस्त्यावरून वारजेकडे जाताना (उजव्या बाजूला) पुरेपूर कोल्हापूरच्या शेजारी.

Pages