उत्तम तंदूरी चिकन मिळाण्याची ठिकाणे

Submitted by भानुप्रिया on 17 August, 2012 - 08:56

माबो वरील सर्व खवय्यांना मझा साष्टांग प्रणाम!

पुण्यात सर्वोत्तम तंदूर चिकन कुठे मिळतं हे जाणून घेण्यासाठी हा धागा आहे!

सर्वांत वाईट कुठे मिळतं हे ही अवश्य सांगावे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैद्राबादी अन्नात तंदुरी नाही.

तंदुरी खायचे तर दिल्ली ट्रिप करा लोक्स. कुरेशी मस्त आहे. माझ्या ननंदे कडे एक घरीच बनविलेला कोळश्याचा तंदूर आणि मॅरिनेट वगैरे ची रेसिपी आहे. शोधून लिहीते इथे.

मामी, हयदराबादी स्पाईसची काही आउटलेट्स पुण्यामध्ये आहेत. चेन्स आहेत वाटते. त्यामुळे मॅक सारखी स्टॅन्दर्ड रेसिपीज असाव्यात व ऑथेंटिक हैद्राबादी बिर्याणी असावी म्हणून लोक फसतात्.पण फारच बेचव मामला. कुठले वैशिष्ट्य नाही. त्यामूले हैद्राबादी बिर्याणी ही अशीच असेल असे वाटून हैद्राबादचे नाव बदनाम होते ना ! इव्हन हैद्राबादची प्याराडाईजची फारच सपक वाटली. तांदळाची क्वालिटी मात्र उत्तम होती. फार मसालेही नव्हते. मग ती अशीच असते का? पुण्यातली ब्ल्ञू नाईलमधली तर अजिबातच तिखट नसते. चक्क पांचटच असते. की मूळ बिर्याणीच फिकी असते?

प्रचंड अनुमोदन बाजो.

मला इथे(पुण्यात ) काही अपवाद वगळता ब-याच हॉटेल्समधे चिकन खाल्ल्यावर, हे नक्की चिकनच का? अशी शंका छळत राहते. Uhoh

पौड रोडला (?) ते हैद्राबाद बिर्याणी हाऊस का असेच काही नाव असलेले हॉटेल आहे,
एकदम बंडल चव
पुरेपुर कोल्हापूर बंडल
मासेमारी अगदीच बंडल (मोठे घर पोकळ वासा :राग:)

कलिंगा आवडले, हार्वेस्ट क्लब पण चांगले आहे इथे दोन्हीकडे तंदुरी डिश चांगल्या मिळाल्या.

मराठवाडा कुठे आहे?

बाफ चे नाव बदलून पुण्यातील समिष खादाडी असे करायला लागणार बहुतेक Happy

बार्बेक्यु नेशन पण चांगले आहे

हैद्रावाद स्पाईस आहे ते . कर्वे रोडला रांका ज्वेलर,आनन्द ज्युस बार च्या आसपास.
पुरेपूर कोल्हापूरही तसेच. कोल्हापूरबद्दल गैरसमज व्हावा असे. क्वांटीटीच्या बाबतीत तर सगळेच इतके चिक्कू की बस. त्यापेक्षा रस्त्यावर्च्या ढाब्यावर क्वांटीटीच्या बाबतीत कंजूषपणा होत नाही.

>>मासेमारी अगदीच बंड>>>> अगदी, अगदी. सोलकढी गोड असते. एक बोंबील फ्राय सोडले तर फारसे काही आवडले नाही तिथे.

हैद्राबाद स्पाइस इथे (एकदाच) जेवून मला आणि माझ्या मित्रांना विषबाधा झाली होती. त्यानंतर तिथली पायरी चढलेलो नाही.
चारकोल पिटच्या तंदुरी चिकनबद्दल फार ऐकलं होतं. पण तिथलाही अनुभाव फारसा चांगला नाही. ब्लू नाइलचाही हाच अनुभव.

कमला नेहरू उद्यानासमोर कासा लोलो आहे..तिथली भाजलेली कोंबडी म हा न असते. लेबनीज पद्धतीची.

तंदुरी नाही रे, चिकन धनगरी का काय पार्सल आणल होतं, मासेमारी मधे तर चिकन करी च्या नावाखाली प्रिकुक चिकन दिलं होतं, भाकरी बहुतेक कधीतरी करुन ठेवलेली ओव्हनमधे गरम करुन दिली होती. घामेजलेली होती भाव उगाच अवाच्या सवा, अँबियन्स अन अमुक ढमुक्च्या नावाखाली.

अम्मि, विषय आता तंदूरी वरून जनरल सामिष भोजनाकडे वळला आहे....
>> अरेरे तीन पानात पूण्यातले तंदूरी खाण्याची ठिकाणं संपली.

चिकन धनगरी का काय पार्सल आणल होतं >> आता मटण धनगरी घेऊन बघ.. Happy कोणत्या पुरेपुर मधून आणलेलस..?

लवंगी मिरची कोल्हापूरची भारी आहे
>>
कुठे आहे ते? अर्धवट माहिती देण्यास सक्त मनाई आहे Happy

पुरेपूर कोल्हापूर श्यामली म्हणते ते मेहेन्दळे ग्यारेज एरियात आहे. नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जातानाच्या सिग्नलवरून हिरवा सिग्नल झाल्यावर उजवीकडे वळावे Happy व २०० -२५० मीटर जावे. पण युसलेसच आहे.
चिनूक्स शाकाहारी आहे ना?:अओ:

अभिषेक हॉटेल, पुरेपूर कोल्हापूरकडून सरळ सिटिप्राइडच्या दिशेने आल्यास निंबाळकरांच्या हॉटेलाच्या आधी उजव्या हाताला आहे. लवंगी मिरची कोल्हापूरची आणि कोस्टल शॅक अशी दोन खाद्यगृहं शेजारीशेजारी आहेत. दोन्हीही मस्त. कोस्टल शॅकचे मासे जबरी असतात.

मी शाकाहारी? Uhoh

लवंगी मिरची, बहुतेक करिश्मा सोसायटीकडून डाविकडे वळतो त्या रस्त्याला लगेच आहे. याच रस्त्याला पुढे हे पुरेपुर, जाणकार प्रकाश टाकतीलच

चिनुक्स, शाकाहारी असो नाहीतर मांसाहारी, त्यामुळे तो देतोय त्या माहितीत काय फरक पडणार आहे का Uhoh माहिती देतोय ती घ्यावी की, उगाच काय Proud Light 1

अम्मि, विषय आता तंदूरी वरून जनरल सामिष भोजनाकडे वळला आहे....
>>>>> चांगलच आहे ना मग!!

कमला नेहरू उद्यानासमोर कासा लोलो आहे..तिथली भाजलेली कोंबडी म हा न असते. लेबनीज पद्धतीची >>>> चिनुक्स, ह्या डिशचं नाव काय?

अय्या आम्ही कधीकधी कमला नेहरू पार्क समोर भेळ खाल्ली आहे फक्त. आणि छोटी खेळणी नेहमी घेते मी. ते घडी घालायचा सिनेमा, गॉगल, उड्यामारनारे माकड इत्यादी. हे चिकन कधी तरी खाल्ले पाहिजे.

आमच्याकडे तर वेंकीज चिकन चे ब्रँड अँबेसॅडर आहेत एकेक.

वेंकीज पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या समोर... त्यांचे सगळे फ्रोजन प्रॉडक्ट्स ही मिळतात.. बरीच आउटलेट्स आहेत.

अभिषेक शुद्ध शाकाहारी आहे ना?>>> बाजो,अभिषेक शुध्द शाकाहारीच्या समोर जुनं अभिषेक रेस्टो कम बार पण आहे..

शनि-रविवार दोन दिवसात हा धागा फारच धावला आहे की. अर्थात हाती माहिती फारच कमी लागली आहे. Happy पुण्यात चांगलं तंदुर चिकन मिळण्याची ठिकाणं इतकी कमी आहेत का?

वर कोणी चांगल्या बिर्याणी बद्दल विचारलं होतं ना. या सगळ्या नंबर्सवर किलोमधे मुस्लीम/हैद्राबादी दम
बिर्याणी मिळते. घरी पार्टी असेल किंवा वन डे आउटिंगला न्यायची असेल तर फारच मस्त प्रकार. १ किलोमधे ८-१० लोक खातात. फोन केल्यापासुन २-३ तासात बिर्याणी तयार असते.
Gazi caterers 26860148 / 9422515943 / 9823173469 फातिमा नगर
A-1 Caterers 26342459 / 26333325 / 9371030110 साळुंके विहार रोड
F J Caterers 26342425/26352896 - 26855577 कॅम्प & वानवडी

बंजो + १ ब्ल्यु नाइलची बिर्याणी बंडल.

प्रभात रोडवर पण एक बंगलो आहे. त्या मावशीपण अशी बिर्याणी देतात. मला है. बिर्याणी खायची सवय असल्यामुळे त्यांच्याकडची बिर्याणी फारशी आवडली नव्हती, पण आमचे गेस्टस प्रचंड खुश झाले होते. कोथरुडवासियांना जवळ म्हणुन ट्राय करायला हरकत नाही. नंबर शोधुन देइन.

Pages