फार खोलात न शिरता इथे खगोलशात्राशी संबंधीत काही त्रोटक factoids (सद्य आकलनानुसार) नियमीतपणे टाकायचा विचार आहे.
(१) विश्वाच्या मालमत्तेपासुन सुरुवात करु या: विश्वात पसरलेल्या दिर्घीका, त्यांचा व्याप व विश्वावे आकारमान वाढण्याचा वेग पहाता असे लक्षात येते की ५% पेक्षा कमी मालमत्ता दृष्य वस्तुमानात आहे (म्हणजे तुम्ही-आम्ही, ग्रह, तारे ई. थोडक्यात बॅरीऑन या प्रकारात मोडणारे कण - Baryonic matter). त्याच्या ५ पट वस्तुमान अदृष्य स्वरुपात (dark matter) असते, तर तब्बल 3/4 पसारा अदृष्य उर्जेच्या स्वरुपात असतो (dark energy). [८ जुलै २०१०]
(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]
(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]
(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]
अस्चिग, हत्तेरेकी! खुपच गाजा
अस्चिग, हत्तेरेकी! खुपच गाजा वाजा झाला होता बहुतेक ते न्युट्रिनोज जास्त वेगात प्रवास करु शकतात असं निष्कर्ष काढला तेव्हा.
स्नेहा, टेलेस्कोपचा आकार किती
स्नेहा, टेलेस्कोपचा आकार किती आहे? (भिंगाचा किंवा आरशाचा व्यास).
साधारण छोट्या दुर्बीणीतून पण शनीची कडी, गुरुचे चंद्र, शुक्राच्या कला व चंद्रावरील विवरे दिसतात (सध्या संध्याकाळी शुक्र व गुरू दोघेही पश्चीमेला सुंदर दर्शन देताहेत).
उत्तराबद्दल धन्यवाद,aschig
उत्तराबद्दल धन्यवाद,aschig .त्याच्यावर 60x/120x refractor telescope असे लिहिले आहे.
विद्युत-चुंबकीय बलामुळे तयार
विद्युत-चुंबकीय बलामुळे तयार झालेली सूर्यावरची प्लाझ्माची वावटळ
पुढच्या फेब. मधे पृथ्वीजवळ
पुढच्या फेब. मधे पृथ्वीजवळ येणारा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नाही!
http://blogs.discovermagazine.com/badastronomy/2012/03/04/no-asteroid-20...
अनेक खगोलशास्त्रीय गोष्टींचे
अनेक खगोलशास्त्रीय गोष्टींचे दुवे इथे पाहता येतीलः
http://asterisk.apod.com/index.php
फायनली द डेथ स्टार विझीटेथ
फायनली द डेथ स्टार विझीटेथ अवर सोलर सिस्टीमः
http://www.theregister.co.uk/2012/03/14/ufo_sphere_solar_eruption/
लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नाही!
लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नाही!
पण तो फार जवळ आला तर त्याचा काय परिणाम होईल? गुरुत्वाकर्षण, विद्युच्चुंबकीय वगैरे?
टायटॅनिक बुडण्याचे एक कारण, म्हणे, चंद्र जास्त जवळ आला, त्याचे गुरुत्वाकर्षण वाढले, नि त्यामुळे म्हणे 'तो' आईसबर्ग पाण्याच्या जास्त वर आला, वगैरे, वगैरे. तसे काही?
काहीही फरक पडणार नाही! ग =
काहीही फरक पडणार नाही!
ग = गमम/(र*र)
म म पेक्षा खूपच छोटा असल्याने फरक नगण्य - वेड्यांनाही कळणार नाही.
(म हे लघुग्रहाचे वस्तुमान, तर म हे पृथ्वीचे)
क्वेसार्सचा प्रकाश
क्वेसार्सचा प्रकाश वाकवणार्या दिर्घीकांबद्दल ऐकले असेल. आमच्या टीमने शोधलेले क्वेसार्स जे स्वतः इतरांचा प्रकाश वक्र करतातः
http://features.caltech.edu/features/336
आशीष, मध्यंतरी एकांच्या
आशीष, मध्यंतरी एकांच्या बोलण्यात Edge of universe असा विषय ऐकला. मी अजून शोधाशोध केली नाही, आळशीपणा करून तुलाच विचारते आहे.
हा कन्सेप्ट जरा सोप्या भाषेत सांगशील का? Is there really such a thing as edge? कशी ठरवली? मग what does universe expand in? म्हणजे त्या कडेच्या पलीकडे काय आहे म्हणायचं?
खास ईस्ट कोस्ट वाल्यांकरता
खास ईस्ट कोस्ट वाल्यांकरता (आज रात्रौ - उद्या पहाटे) :
http://io9.com/5894938/heres-how-to-catch-nasas-rocket+powered-light-sho...
> जे विश्व सध्या ज्ञात आहे (
> जे विश्व सध्या ज्ञात आहे ( बिग बँग मधून तयार झालेले) त्या पलिकडे ग्रह, तारे नाहीत का ?
किरण, बिग बँग ही सध्याची सर्वोत्कृष्ट थिअरी आहे. जे काही सर्व आहे ते त्यातुनच निर्मीलेले आहे, त्यामूळे, बाय डेफिनेशन, त्या पलीकडे काही नाही.
पण इतर काही संकल्पना आहेत ज्यात अनेक विश्वे असतात आणि आपल्या विश्वा पलिकडच्या विश्वांमधेही दिर्घीका आणि ओघाने ग्रह-तारे असणारच.
रच्याकने, बिग बँग मधून तयार झालेले तेवढेच ज्ञात असे का?
रच्याकने, बिग बँग मधून तयार
रच्याकने, बिग बँग मधून तयार झालेले तेवढेच ज्ञात असे का?
हे ही बरोबर.
आशिग धन्यवाद या
आशिग धन्यवाद या धाग्यासाठी.
वाचायला सुरु करतो..
भारी धागा. आधीचं वाचलं
भारी धागा.
आधीचं वाचलं नाहीये. पण इथून पुढे लक्ष ठेवणार.
पॅरलल युनिव्हर्स या
पॅरलल युनिव्हर्स या संकल्पनेबद्दल उडत उडत ऐकलं होतं. धागा वाचतोच आहे. पण इथं हा भाग आलेला नसेल तर कुनी प्रकाश टाकेल का ?
किरण, इथे तर माहिती मिळेलच पण
किरण, इथे तर माहिती मिळेलच पण बीबीसी एंटरटेनमेंट च्यानेलवरी डॉ हू म्हणून सिरीअल येते. त्यात हे पॅरलल युनिव्ह. फार वेळा वापरतात कथानकाचा भाग म्हणून.
अमा तुम्हाला त्रास द्यावा
अमा
तुम्हाला त्रास द्यावा लागेल मला. खूपशा शंका आहेत. अर्थात वेळ असेल तर.
.....दुर वर असणारा तारा मी
.....दुर वर असणारा तारा मी २०१२ साली बघतोय. पण खर तर तो तारा १००० वर्षापुर्वीच मृत्यु पावला आहे. त्याचा प्रकास माझ्या पर्यंत आता पोहचला. याचा अर्थ मी त्या तार्याचा भुतकाळ बघतोय..?
कालच्या ब्लू मूनबद्दल लिहायला
कालच्या ब्लू मूनबद्दल लिहायला हवे होतेत..
हो हो काल सुरेख ब्लू मून
हो हो काल सुरेख ब्लू मून होता. मी आज पाहिला ( आज इथे निरभ्र आकाश.) नेहरू सेंटर वरळी मुंबई येथील शोज आता सप्टेंबर च्या अखेरीस सुरू होतील. आपण सर्व मिळून जायचे का> ऑनलाइन बुकींग करता येते. ब्लू मून ही कल्पना फार पोएटिक असून त्या नावाचे आमचे एक अत्तर आहे. आणि तलतच्या गाण्यांची एक रेकॉर्ड पण होती.
किरण मला खगोल शास्त्रातले थोडेच समजते. धागाकर्त्यांचे ते फील्ड आहे. सर्व शंकांचे निराकरण तेच करणार.
> याचा अर्थ मी त्या तार्याचा
> याचा अर्थ मी त्या तार्याचा भुतकाळ बघतोय..?
हो, सुर्य पण आपण ५०० सेकंद इतिहासातलाच पाहतो. सुर्याचा स्फोट झाल्यावर पण तितका वेळ आपल्याला कळणार नाही. इथल्या ग्रिफीथ वेधशाळेचं नविनीकरण झाल्यावर पुनरुद्घाटनाच्यावेळी ७० वर्ष दुर असलेल्या तार्यावर दुर्बीण रोखण्यात आली - ग्रिफीथच्या मुळ उद्घाटनावेळी त्या तार्यापासुन निघालेला प्रकाश तेंव्हा पाहता येत होता.
> ब्लू मून
ब्लू मून तसा काही वेगळा नसतो. केवळ एका इंग्रजी कॅलेंडर महिन्यात दोन पोर्णिमा आल्याने त्याला ते नाव. कोणत्याही पोर्णिमेचा चंद्र तसाच दिसणार (कविमनांची निराशा केल्याबद्दल माफी मागतो).
> पॅरलल युनिव्हर्स
पॅरलल युनिव्हर्स हे एक क्वांटम मेकॅनिकल इंटरेप्रेटेशन आहे. प्रत्येक क्षणी दोन नवी विश्व बनतात - एकात हे होते तर एकात ते (अतिशय वेस्टफूल पद्धत आहे). ज्या थिअरीज तपासता येणे शक्य नसते त्यांच्याकडे तशा टेस्ट्स कोणीतरी सांगेपर्यंत कानाडोळा केलेलाच बरा.
या विश्वात बसून त्या विश्वात
या विश्वात बसून त्या विश्वात काय चालले असेल ते कळू शकते का? कधी काही कारणाने या विश्वातल जड पदार्थ दुसर्या विश्वात जाउ शकेल का? जड पदार्थ नाही तरी विचार, लहरी इ. तरी? तसेच दोन्ही विश्वात मी ६९ वर्षाचाच असेन का? (दोन्ही कडे जिवंत असलो तर!)
दुसरे विश्व ५० वर्षे मागे असेल नि मला इथून तिथल्या मला संदेश पाठवता आला तर बरेच. काही काही सांगायचे आहे, ज्यायोगे त्याला आयुष्यात भरपूर सुख समाधान समृद्धि व किर्ती मिळेल?
http://www.wired.com/wiredsci
http://www.wired.com/wiredscience/2012/08/double-planet-double-star/
इतक्यातच दोन तार्यांभोवती फिरणारे दोन ग्रह सापडले. अशा अनेक गमतीजमती सापडत राहणार.
मधे एकानी एक छान खेळ बनवला - स्टेबल ग्रहमाला बनवण्याचा. पहा जमतय का.
न्युटचे दु:स्वप्न
http://william.hoza.us/newton/?planets=4&x0=500&y0=350&xv0=0.3&yv0=-4&m0...
(कविमनांची निराशा केल्याबद्दल
(कविमनांची निराशा केल्याबद्दल माफी मागतो).>> अरे कोई ना. मी फक्त सांस्क्रूतिक संदर्भ सांगितले. माहिती आणि फॅक्ट्स विन द डे एनिटाइम.
ते दोन तारे पॉश आहेत.
हिर्यांचा अजुन एक
हिर्यांचा अजुन एक ग्रहः
http://www.reuters.com/article/2012/10/11/us-space-diamond-planet-idUSBR...
याला खुष करायला बहुदा शनीची अंगठी घालावी लागणार (शनीला खुष करायला हिर्याची घालतात काही लोक त्याप्रमाणे)
प्रश्न - "आकाश रात्री इतके
प्रश्न - "आकाश रात्री इतके काळे का दिसते?"
-तुम्ही म्हणाल, काय भुक्कड प्रश्न आहे. सूर्य नसल्यामूळे काळे दिसते आणि बाकीचे ग्रह तारे आपल्यापासून दूर असल्यामूळे त्यांचा प्रकाश इतका पोचत नाही आणि त्यामूळे अजूनच अंधार वाटतो.
नक्की?
हे पहा -
http://www.youtube.com/watch?v=gxJ4M7tyLRE&list=PLED25F943F8D6081C&index...
चार तार्यांभोवती फिरणारा
चार तार्यांभोवती फिरणारा ग्रहः
http://www.wired.com/wiredscience/2012/10/planet-hunters-four-star/
सुर्यमालेबाहेरील सर्वात जवळचा
सुर्यमालेबाहेरील सर्वात जवळचा ग्रह केवळ ४ प्रकाशवर्षे दूर! पुढचे गटग तिथेच करुया ...
http://www.eso.org/public/news/eso1241/
Pages