Submitted by मृदुला on 31 July, 2012 - 10:26
कोर्सेराच्या लिसनिंग टू वर्ल्ड म्यूझिक या कोर्सविषयीच्या गप्पा. इथे आपल्या असाइनमेन्ट्स, शंका आणि अनुभवांची चर्चा करावी. महत्त्वाची माहिती या धाग्याच्या मजकूरात वेळोवेळी वाढवली जाईल.
पूर्वपीठीका: संयुक्ताच्या विविध उपक्रमांमध्ये, चर्चांमध्ये 'पुढे' शिकण्याबद्दल बोलणे नेहमी होत असते. अशाच गप्पांमधून कोर्सेराची माहिती पुढे आली. पुढे शिकण्याच्या वेगवेगळ्या पर्यांयांविषयी माहिती आईला शाळेत जायचंय या धाग्यात एकत्र केलेली आहे.
--
हा धागा सार्वजनिक व वाहता आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
बायांनो, असाईनमेन्ट वीक ३
बायांनो, असाईनमेन्ट वीक ३ मधील सबमिशनच्या प्रश्नाचे उत्तर कोणी लिहिलेय का तुमच्या पैकी? मला तो प्रश्न सोडवायला कठीण जात आहे.
अरुंधती, मी काल लेक्चर्स
अरुंधती, मी काल लेक्चर्स ऐकायला सुरुवात केलीये. ते दोन विद्यार्थी चर्चा करतात त्यात ज्यावर ते पहिले काही/बरिच मिनिटे बोललात, तो म्युझिक पीस कोणता? नंतर उल्लेख करतात तो त्या बाईचा, राईट? जो इथे सापडेलः http://www.youtube.com/watch?v=qNFSB4PnVPI
मी असाईनमेंट बद्दल सांगते, आज रात्री/ उद्या सकाळी स्काईप मला जमू शकेल ..
बाय द वे, फाईनमन बद्दल आधी वाचला नसशील तर एक लेख मायबोली वर आहे:
http://www.maayboli.com/node/19018
अनू, थँक्स गं! तुझ्या सकाळी /
अनू, थँक्स गं! तुझ्या सकाळी / माझ्या रात्री मला स्कायपावर जमू शकेल उद्या. बोलूचयात.
सर्वात पहिली व्हिडियो आहे त्यात तुवाच्या इमेजेस आणि थ्रोट सिंगिंग चे नमुने आहेत :
http://www.youtube.com/watch?v=vY_5eOFBOys
विली नेल्सनबरोबर कोंगार ओल ओडर ची जी 'वेस्टर्नाईझ्ड' क्लिप आहे : कोंगुरेईची, त्याबद्दल ते टीका करताहेत बघ : Back Tuva Future - http://www.youtube.com/watch?v=aoR23_308Q4
Female Mongolian Throat Singer - http://www.youtube.com/watch?v=qNFSB4PnVPI
मला जो निबंध लिहायला सांगितलाय तो लिहिताना जाम प्रॉब्लेम येतोय. अजिबात अॅनॅलिटिकल वाटत नाहीये मी जे काय लिहिलंय ते! :|
आजपासून पिग्मी म्यूझिक! त्या
आजपासून पिग्मी म्यूझिक! त्या प्रीत्यर्थ काल गॉड्स मस्ट बी क्रेझी चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. लै हसले.
पीअर असाईनमेन्ट चेक करताना यावेळचे अनुभव गमतीशीर. एका/की ने ६ -८ ओळींचा निबंध लिहिलेला, ज्यातील बहुतांश वाक्ये प्रश्नार्थक. शेवटपर्यंत लेखकाला नेमके काय म्हणायचेय याचा पत्त्याच नाही! ३ असाईनमेन्ट्स खूपच सुरेख होत्या. पुन्हा पुन्हा वाचल्या अगदी.
नीधप व बाकीच्या, आता कोर्सेराच्या तुझ्या पानावर तुला 'असेसमेन्ट फीडबॅक' नावाची टॅब दिसेल डावीकडे. त्यात १ ल्या व दुसर्या आठवड्याच्या असाईनमेन्ट्समधील उत्कृष्ट उत्तरे, काय अपेक्षित आहे इ. ची पीडीएफ आहे. डाऊनलोड करता येतेय. त्यावरून अंदाज बांधता येईल.
ओह ओके. अकु. धन्स गं.
ओह ओके. अकु. धन्स गं.
http://www.ted.com/talks/lang
http://www.ted.com/talks/lang/en/daphne_koller_what_we_re_learning_from_...
या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या
या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी जमातींचे संगीत! डेव्हिड हडसन, डिजरीडू, येथु यिन्दी, रॉकिंग फॉर राईट्स - ट्रीटी, ड्रीमटाईम स्टोरीज - रेनबो सर्पन्ट..... मज्जा टाईम!
कोर्सचा शेवटचा आठवडा.... मला
कोर्सचा शेवटचा आठवडा.... मला खरेच वाटले नव्हते की या कोर्सच्या निमित्ताने मी खोयसान (बोट्सवाना - नामिबियातील बुशमन) लोकांच्या नुम चाय हीलिंग ट्रान्स डान्स बद्दल इतकी माहिती वाचेन/ पाहेन / ऐकेन... किंवा तुवा/टुवा देशातील लोकांच्या शमन (मांत्रिक) हीलिंग संगीताबद्दल वाचेन... पिग्मींच्या इनिशिएशन राईट्स बद्दल माहिती जमा करेन... आता शेवटचा आठवडा क्यूबन संगीताचा आहे...
या घडीला रशियन रेडियो प्रोग्रॅम ऐकते आहे (रशियन भाषेतील - ज्यातील भाषा मला ओ नाम ठो कळत नाहीए) आणि तोही बोट्सवाना मधील खोयसान संगीताविषयी - कार्यक्रमात सान संगीताची काही सॅम्पल्स आहेत, त्यांसाठी! http://static.radar.lv/files/Muzprosvet_A010_2004.02.05_32kbps.mp3
अकु, तुझं फार्फार कौतुक वाटतं
अकु, तुझं फार्फार कौतुक वाटतं गं. खूप खूप अभिनंदन या कोर्सबद्दल
थँक्स चिन्नु! या कोर्सच्या
थँक्स चिन्नु! या कोर्सच्या निमित्ताने अनेक देशांतील सहाध्यायी मित्रमैत्रिणी पण मिळालेत! फेसबुकवरच्या स्टडी ग्रूपमध्ये जगातील विविध संगीताचे नमुने अतिशय उत्साहाने लोक शेअर करत आहेत. आपल्या देशाचे किंवा आपल्या खास आवडीचे संगीत, त्याबद्दलची माहिती शेअर करताना त्यांचा उत्साह खरेच कौतुक करण्यासारखा असतो.
nice! तुला इलईराजाचे भन्नाट
nice! तुला इलईराजाचे भन्नाट वाटरबेस्ड म्युझिक हवं असेल तर हे नक्की ऐक. http://www.youtube.com/watch?v=ESdJpj3jJbw ह्यात मध्येच पाण्याचा आवाज वापरलाय. (३:०३ च्या सुमारास). Enjoy!!
थँक्स गं!
थँक्स गं!
यूपेन विद्यापिठाच्या
यूपेन विद्यापिठाच्या वार्तापत्रकात या कोर्सविषयी आलेला लेख : http://www.upenn.edu/pennnews/current/2012-08-30/latest-news/embracing-w...
आता परीक्षा! जोई लविनो
आता परीक्षा!
जोई लविनो नावाच्या मुलाने कोर्सेराच्या या म्यूझिक कोर्सबद्दल गाणे रचून यूट्यूबवर अपलोड केले. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. अगदी कोर्सेराच्या संचालकांनीही अभिनंदन केले, इमेलमधून सर्वांना (३५०००+) पोचले. आता त्याने ते गाणे जगभर विखुरलेल्या इतर सहाध्यायांच्या सहाय्याने स्टुडियोत ध्वनिमुद्रित केले आहे.
आयट्यून्सवर पण गाणे उपलब्ध झाले आहे. गाण्याचे इंजिनियरिंग, मिक्सिंग, इफेक्ट्स ग्रॅमी विजेत्याने केले आहेत. एन्जॉय!
अगोदरचे वर्शन : http://www.youtube.com/watch?v=NwPzOCNwZqw
आताचे वर्शन : http://www.youtube.com/watch?v=mdU62ftxHmA
lyrics by Kim Foss Rosenstand, Denmark (Joey Lavino)
Other musicians (fellow study mates):
Engineered, mixed, effects by multiple GRAMMY® Winner Carlos Velazquez, Recorded in San Juan, Puerto Rico.
Piano by Emi Kishida, Recorded in Aichi, Japan.
& Guitarviol by Omar Borrego, Recorded at Omar Studio, Austin, TX, USA.
Produced by Emi Kishida, Carlos Velazquez, Omar Borrego & Joey Lavino.
Mandala Cover by Angélica Cid, Guanajuatu, Mexico
अरे वा! घरून ऐकेन.
अरे वा! घरून ऐकेन.
परीक्षेसाठीच्या अभ्यासाला शुभेच्छा.
मृदुला, शुभेच्छांचा उपयोग
मृदुला, शुभेच्छांचा उपयोग झाला गं! थँक्यू!! १०० पैकी ९८ गुण मिळाले.
या आणि कोर्सेराच्या दुसर्या
या आणि कोर्सेराच्या दुसर्या एका कोर्सबद्दल एका ऑटिस्टिक बॅचमेट मैत्रिणीने लिहिलेला तिचा अनुभव : http://voices.yahoo.com/coursera-key-higher-education-11733244.html?cat=70
>> १०० पैकी ९८ गुण अरे वा!
>> १०० पैकी ९८ गुण
अरे वा! उत्तम. (संपलासुद्धा इतक्यात?)
येस्स! ७ आठवड्यांचा कोर्स
येस्स! ७ आठवड्यांचा कोर्स होता गं! इतर लोकांनी आणखी कोणकोणत्या कोर्स मध्ये नाव नोंदवलंय. सध्या गेमिफिकेशन, वर्ल्ड हिस्टरी, सस्टेनेबिलिटी, अमेरिकन पोएट्री असे काही कोर्स सुरू होत आहेत. तांत्रिक, विज्ञान संबंधी तर आहेतच!
कोर्सेराचे लिसनिंग टू वर्ल्ड
कोर्सेराचे लिसनिंग टू वर्ल्ड म्यूझिक कोर्स पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक आज मिळाले! खूप वाट पाहिल्यानंतर, त्याबद्दल सहाध्यायींशी रकाने भरभरून भरपूर ऑनलाईन चर्चा केल्यावर मिळालेल्या सर्टिफिकेटाचा आनंद आगळा! त्यावर माझे पहिले नावच आहे फक्त. मग साक्षात्कार झाला की आपण रजिस्टर करताना पहिल्या नावाने केले होते, संपूर्ण नावाने नव्हे! आणि ज्या नावाने रजिस्टर केलेत तेच नाव सर्टिफिकेटावर दिसणार! असो. ९६.५५% मिळाल्याचा हा आनंद!
congrats! अरु
congrats! अरु
थँक्स चिन्नु!
थँक्स चिन्नु!
या महिन्याच्या पेनसिल्वेनिया
या महिन्याच्या पेनसिल्वेनिया युनि च्या आर्ट अॅन्ड सायन्स मासिकातील हा लिसनिंग टू वर्ल्ड म्यूझिक बद्दलचा खास लेख : https://www.sas.upenn.edu/news/song-heard-round-world
या कोर्समधील माझी सहाध्यायी व
या कोर्समधील माझी सहाध्यायी व आताची मैत्रीण रोशेल हिचे पेन न्यूजमधील वृत्त : http://www.upenn.edu/pennnews/news/online-courses-enable-penn-alumni-con...
सहीच अकु! हे बघ.
सहीच अकु!
हे बघ. http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/internet/Miriam-Makeba...
या गायिकेचं गाणं होतं ना याच कोर्समध्ये?
येस्स.
येस्स.
धन्य आहात अरुंधती. अभिनंदन.
धन्य आहात अरुंधती. अभिनंदन.