समुद्रमेथी/बाटलीमेथी

Submitted by मनी on 7 August, 2012 - 21:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

एक मोठी काचेची बाटली, झाकण नको, पातळ कापड किंवा जाळी, जाड रबरबँड किंवा दोरा, २ टेस्पू मेथी, २ कप पाणी किंवा मोड आलेल्या मेथ्या ३-४ टेस्पून

क्रमवार पाककृती: 

दिनेशदांनी समुद्रमेथीची आठवण करून दिल्यापासून केव्हा ही मेथी उगवतेय आणि भाजी बनवतेय असं झालं होतं, तेव्हा मी थोड्या मेथ्या कॉस्टकोच्या पालकाच्या डब्यात माती टाकून पेरल्या होत्या, त्याही छान झाल्या होत्या. मग एक jar sprouting ची पोस्ट माझ्या चेपुवर आली आणि म्हटलं एकदा करून तर बघूया आणि ते इतकं मस्त जमलं की आता दर पंधरा दिवसांतून एकदा असतेच. एकदा उगवली की फ्रिजमध्ये ही बरेच दिवस टिकते. बिनमातीची आणि घरात खुपच छान उगते.

मी आधी मेथ्यांना उसळीसाठी मोड आणून घेतले होते तेच वापरले होते. एका बाटलीत मेथ्या टाकून त्या बाटलीला जाळीचा कापड बांधायचा. मग त्या बाटलीत पाणी टकून चकलीसारखं गोल-गोल फिरवायचं (Swirl) म्हणजे सगळ्या मेथ्यांना पाणी मिळेल, मग बाटली पलटून ते पाणी काढून टाकायचं...
हे दिवसातून दोनदा करायचं , एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, बाहेर फार उष्णता असेल तेव्हा दिवसातून चारदा करावे. किचन काउंटरवर उन्हाची तिरिप येत असेल तर तेथे ठेवावे पण खुप उन्हात ठेवू नये. ३-४ दिवसांत समुद्रमेथी किंवा बाटलीमेथी Lol तयार होते, फक्त जमिनीत येतात तेव्हढी मोठ्ठी पाने येणार नाहीत.
याची भाजी तर अतिशय छान लागली.

मेथी

हा फोटो या ब्लॉगवरून घेतला आहे, जार कसे ठेवावे ते दाखवण्यासाठी...http://adkjerseygirl.wordpress.com/

या मेथीच्या भाजीची कृती खालीलप्रमाणे;

२-३ मुठ भाजी
३-४ पाकळ्या लसूण
२ मिरच्या,
१ मध्यम बटाटा
१ मध्यम टोमॅटो
१ टेस्पून खवलेला नारळ
तेल, राई, जीरे

कृती:
तेलात लसुण, मिरची, राई-जीर्‍याची फोडणी करून घ्यावी.
त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा, मग त्यात टोमॅटो टाकून परतावा.
आता बटाटा बारिक चिरुन घालावा.
बटाटा नीट शिजला की चिरलेली मेथी घालावी. मिठ घालून झाकण ठेवून शिजवावे.
भाजी तयार आहे.

इथेच विद्याकने दिलेली घावणाची पाकृ
ताकात रवा १-२ तास भिजत घालायचा त्यात कांदा, हि.मिरची, मेथी, टोमॅटो,आले,कोथींबीर चिरुन टाकायची चवीपुरते मीठ्,साखर ,२-३ चमचे तेल टाकुन घावण (उत्तप्पे) टाकावे. तुम्हांला कितीही धन्यवाद दिले तरि अपुरेच पडतील.

रुनीने मुंबईला या भाजीच्या बेसन घालून केलेल्या, तेलावर जरा परतलेल्या वड्या खाल्ल्या होत्या.

ही भाजी नुसतीच परतून एव्हढी छान लागणार नाही बहुधा.

Happy Sprouting Happy

वाढणी/प्रमाण: 
१-२
माहितीचा स्रोत: 
Backyard Diva Blog
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला, हो. खरं तर गेल्या वेळी दिवसातून एकदाच धुतली होती ह्यावेळी दोनदा. बहुतेक इथल्या हवेला तितकं पाणी नकोय. दिवसातून एकदा पुरतं. नंतर बुरशी आलेला भाग काढून टाकून स्वच्छ धुवून मग बाटलीला कापड न बांधता नुसतीच ठेवली तर झाली. बुरशी नाही आली परत.
मेधा + १. मी हा प्रश्न विचारणारच होते. माझ्याकडेही दोन्ही वेळा कडू लागली मेथी. पण मनीने दिलेल्या पद्धतीने बटाटा-कांदा-टोमॅटो-लसूण घालून केल्याने छान लागली. नुसत्या मेथीची नाही करता येणार. दहीभात + भाजी फारच छान लागते Happy

अरे सहीच, इतके दिवस हा धाग उघडूनच नव्हता पाहिला. एकदम भन्नाट आयडीया आहे. लगेच करुन बघण्यात येईल. मी समुद्रमेथी पाहिलांदाच बघितली मुंबईला. मराठवाड्यात कधी ऐकले-पाहिले नव्हते, समुद्रच नाही तर समुद्रमेथी कुठून येणार. मुंबईला या भाजीच्या बेसन घालून केलेल्या, तेलावर जरा परतलेल्या वड्या खाल्ल्या होत्या. कोथिंबीर वडीपेक्षा वेगळी पण मस्त चव होती.

मी आधी मेथ्यांना उसळीसाठी आणून घेतले होते तेच वापरले होते. >>> मनी इथे मोड हा महत्वाचा शब्द घालायचा राहीलाय चुकून.

धन्यवाद रुनी, मी बदल केलाय... ही मेथी नुसती नाही करायची, भर्पूर कांदा, टॉमॅटो आणि बटाटा घालून्च करायची. एक बॅच कमी कडू आणि एक बॅच जास्त कडू कां बरे लागत असेल? मेथ्या सेमच होत्या कां?

अनु, बटाटा कच्चाच फोडणीत परतुन घ्याय्चा. पहील्या पानावर पाक्रु दिलीये, उद्या मूळ कृतीत टाकते.

मनी इथे मोड हा महत्वाचा शब्द घालायचा राहीलाय चुकून. >> आणि तो शब्द राहिल्याचं फळ आम्ही भोगलं आहे Lol

सिंडरेला, मेथी बाटलीतून बाहेर काढून दोनदा धुवायची का ?

ओके आता मेथीला पाने आल्यावर करुन बघुन सांगेन.
मेथीला मस्त मोठे (दुसर्‍या स्टेप प्रमाणे) मोड आले आहेत. ३ स्टेप प्रमाणे कधी दिसेल ह्याची वाट बघत आहे :).

विद्याक, पाकृबददल धन्यवाद, मला काहीतरी नवीन हवंच होतं.
रुणू , सॉरी गं... माझ्या नजरेतून सुटलं बहुतेक.
अनु, २-३ दिवस लागतील गं.

विद्याक, जेव्हढ्या पाकृ माहीत असतील त्या द्या ना...
हो ना शंभरी ओलांडली की Proud
मामी नक्की करुन बघा पण मुंबईत असाल तर उगाचच त्रास घेउ नका तिकडे ५-१० रुपयांत पुरुन उरेल एवढी मेथी मिळते Happy

मनु, आपण नेहमीची खिचडी करतो तशीच करायची. जिरे,हिंग फोडणीत कांदा परतुन घेउन त्यात हळद, गोडामसाला, लाल तिखट, अगदी थोडासा गरम मसाला, मीठ, गुळ, मेथी हे घालुन परतावे. शेवटी धुतलेला तांदुळ, पाणी घालुन खिचडी करावी. वरुन मस्त तुपाची धार सोडुन गरमागरम खावी. बरोबर लोणचे, पापड असेल तर अजुन छान. यात टोमॅटो टाकला तरी चालेल.
ईथे अशी मेथी मिळत नाही म्हणुन मी ईकडे मिळत असलेले alfalfa sprouts वापरुन वरील प्रमाणे खिचडी, घावण करते.

मनी, माझ्या मेथीला मस्त मोड आले. मी बुधवारी मेथी पाण्यात भिजत टाकली . आणि गुरुवारी बाटलीत टाकली मोड आणायला , आज सोमवारी मस्त बोटाएवढे मोड आलेत. पहिले ३-४ दिवस मी बाटली बंद ओव्हन मधे ठेवली होती. कारण कुठल्याही बिया पेरल्या की त्या झाकुन ठेवतात म्हणजे त्याला चांगली पालवी फुटते असे म्हणतात. आज मात्र दिवसभर बाटली बाहेर किचन कांउन्टर वरच होती. अजुन २ दिवस बघते किती मोठे मोड होतात ते!
अजुन कुणाला शंका असतील तर ही लिंक पाहा.....
http://www.youtube.com/watch?v=eRwzQYq6dOs

माझा मेथी प्रयोग फसला...थोडी हिरवी पानं आली मग बुरशी...घरी मेथी करायच माझं स्वप्न कधी पूर्ण होणार देव जाणॅ...रेती झाली बाटली झाली Sad

खुप खुप थन्क्स . मलाहि हि मेथि खउप आवड्ते. प्रयोग नक्कि करुन बघ णारर. तुम्हांला कितीही धन्यवाद दिले तरि अपुरेच पडतील

हाय निकिता.. तू मुंबईत आहेस ना.. असं तुझ्या प्रोफाईल वरून कळलं..
एक सुचवते,भारतात मोड मेकर नावाचं प्लास्टिक चं डबल डेकर भांडं मिळतं.. एका भारतभेटीत मला कुणीतरी भेट म्हणून दिलं होतं धान्याला मोड आणायला अतिशय उपयोगी आहे ,शिवाय कसल्याही प्रकारची हवा असो , धान्य अजिबात चिकट होत नाही. अगदी कोरडं राहतं. एक्स्ट्रीम थंडीत मोड यायला उशीर झाला तरी काहीच फरक पडत नाही. धान्य चिकट नाही झालं तर बुरशी ही यायचा प्रश्न येत नाही. मेथ्यांना बराच वेळ लागतो मोड यायला.म्हणून या भांड्याचा उपयोग करून मोड आण आणी मग पुढची प्रोसेस कर.. Happy बघ उगवेल तुझी मेथी मस्तपैकी!!

मोड मेकर ............. का भाषेची मोड तोड उगाच? स्प्राउट मेकर म्हणा... मोड कार्यक असे त्याला नाव देऊ या ... खालच्या भागात पाणी घालून ठेवणे.... त्या आर्द्रतेवर मोड येतात .. २००--४०० रुला येते. http://www.suvaiarusuvai.com/2011/06/how-to-make-sprouts-using-sprout-ma...

भाषेची मोड तोड.. न्हाय गं काकांनी हेच नाव सांगितलं म्हणून तसच तोंडात बसलं.. माझ्या मोडमेकरला खाली पाणी बिणी काहीच घालावं लागत नाही.. उद्या फोटू टाकते..

मने, मी आज मेथी, बाटलीत बंद करून आलेय Proud
पहिलाच दिवस... मनिषा, तुझी फ्रिजमध्ये भाज्या ठेवतो, ती नेट लाच्वण्याची आयडिया भन्नाट वाटली, तशीच ठेवून आलेय.. पाहू प्रयोग कसा रंगतो ते Happy

मेथी चांगली आली. अजून काय करता येईल?
आमच्या इथे कोथिंबीर जुडी नाही मिळत. धणे असे होऊ शकतील का ?

Pages