समुद्रमेथी/बाटलीमेथी

Submitted by मनी on 7 August, 2012 - 21:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

एक मोठी काचेची बाटली, झाकण नको, पातळ कापड किंवा जाळी, जाड रबरबँड किंवा दोरा, २ टेस्पू मेथी, २ कप पाणी किंवा मोड आलेल्या मेथ्या ३-४ टेस्पून

क्रमवार पाककृती: 

दिनेशदांनी समुद्रमेथीची आठवण करून दिल्यापासून केव्हा ही मेथी उगवतेय आणि भाजी बनवतेय असं झालं होतं, तेव्हा मी थोड्या मेथ्या कॉस्टकोच्या पालकाच्या डब्यात माती टाकून पेरल्या होत्या, त्याही छान झाल्या होत्या. मग एक jar sprouting ची पोस्ट माझ्या चेपुवर आली आणि म्हटलं एकदा करून तर बघूया आणि ते इतकं मस्त जमलं की आता दर पंधरा दिवसांतून एकदा असतेच. एकदा उगवली की फ्रिजमध्ये ही बरेच दिवस टिकते. बिनमातीची आणि घरात खुपच छान उगते.

मी आधी मेथ्यांना उसळीसाठी मोड आणून घेतले होते तेच वापरले होते. एका बाटलीत मेथ्या टाकून त्या बाटलीला जाळीचा कापड बांधायचा. मग त्या बाटलीत पाणी टकून चकलीसारखं गोल-गोल फिरवायचं (Swirl) म्हणजे सगळ्या मेथ्यांना पाणी मिळेल, मग बाटली पलटून ते पाणी काढून टाकायचं...
हे दिवसातून दोनदा करायचं , एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, बाहेर फार उष्णता असेल तेव्हा दिवसातून चारदा करावे. किचन काउंटरवर उन्हाची तिरिप येत असेल तर तेथे ठेवावे पण खुप उन्हात ठेवू नये. ३-४ दिवसांत समुद्रमेथी किंवा बाटलीमेथी Lol तयार होते, फक्त जमिनीत येतात तेव्हढी मोठ्ठी पाने येणार नाहीत.
याची भाजी तर अतिशय छान लागली.

मेथी

हा फोटो या ब्लॉगवरून घेतला आहे, जार कसे ठेवावे ते दाखवण्यासाठी...http://adkjerseygirl.wordpress.com/

या मेथीच्या भाजीची कृती खालीलप्रमाणे;

२-३ मुठ भाजी
३-४ पाकळ्या लसूण
२ मिरच्या,
१ मध्यम बटाटा
१ मध्यम टोमॅटो
१ टेस्पून खवलेला नारळ
तेल, राई, जीरे

कृती:
तेलात लसुण, मिरची, राई-जीर्‍याची फोडणी करून घ्यावी.
त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा, मग त्यात टोमॅटो टाकून परतावा.
आता बटाटा बारिक चिरुन घालावा.
बटाटा नीट शिजला की चिरलेली मेथी घालावी. मिठ घालून झाकण ठेवून शिजवावे.
भाजी तयार आहे.

इथेच विद्याकने दिलेली घावणाची पाकृ
ताकात रवा १-२ तास भिजत घालायचा त्यात कांदा, हि.मिरची, मेथी, टोमॅटो,आले,कोथींबीर चिरुन टाकायची चवीपुरते मीठ्,साखर ,२-३ चमचे तेल टाकुन घावण (उत्तप्पे) टाकावे. तुम्हांला कितीही धन्यवाद दिले तरि अपुरेच पडतील.

रुनीने मुंबईला या भाजीच्या बेसन घालून केलेल्या, तेलावर जरा परतलेल्या वड्या खाल्ल्या होत्या.

ही भाजी नुसतीच परतून एव्हढी छान लागणार नाही बहुधा.

Happy Sprouting Happy

वाढणी/प्रमाण: 
१-२
माहितीचा स्रोत: 
Backyard Diva Blog
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आलेत मोड. सिंडरेला म्हणते ते बरोबर आहे. अजुन ठेऊ नका. काय करणार्?...भाजी, खिचडी की उत्तपे/घावण?

Pages