समुद्रमेथी/बाटलीमेथी

Submitted by मनी on 7 August, 2012 - 21:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

एक मोठी काचेची बाटली, झाकण नको, पातळ कापड किंवा जाळी, जाड रबरबँड किंवा दोरा, २ टेस्पू मेथी, २ कप पाणी किंवा मोड आलेल्या मेथ्या ३-४ टेस्पून

क्रमवार पाककृती: 

दिनेशदांनी समुद्रमेथीची आठवण करून दिल्यापासून केव्हा ही मेथी उगवतेय आणि भाजी बनवतेय असं झालं होतं, तेव्हा मी थोड्या मेथ्या कॉस्टकोच्या पालकाच्या डब्यात माती टाकून पेरल्या होत्या, त्याही छान झाल्या होत्या. मग एक jar sprouting ची पोस्ट माझ्या चेपुवर आली आणि म्हटलं एकदा करून तर बघूया आणि ते इतकं मस्त जमलं की आता दर पंधरा दिवसांतून एकदा असतेच. एकदा उगवली की फ्रिजमध्ये ही बरेच दिवस टिकते. बिनमातीची आणि घरात खुपच छान उगते.

मी आधी मेथ्यांना उसळीसाठी मोड आणून घेतले होते तेच वापरले होते. एका बाटलीत मेथ्या टाकून त्या बाटलीला जाळीचा कापड बांधायचा. मग त्या बाटलीत पाणी टकून चकलीसारखं गोल-गोल फिरवायचं (Swirl) म्हणजे सगळ्या मेथ्यांना पाणी मिळेल, मग बाटली पलटून ते पाणी काढून टाकायचं...
हे दिवसातून दोनदा करायचं , एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, बाहेर फार उष्णता असेल तेव्हा दिवसातून चारदा करावे. किचन काउंटरवर उन्हाची तिरिप येत असेल तर तेथे ठेवावे पण खुप उन्हात ठेवू नये. ३-४ दिवसांत समुद्रमेथी किंवा बाटलीमेथी Lol तयार होते, फक्त जमिनीत येतात तेव्हढी मोठ्ठी पाने येणार नाहीत.
याची भाजी तर अतिशय छान लागली.

मेथी

हा फोटो या ब्लॉगवरून घेतला आहे, जार कसे ठेवावे ते दाखवण्यासाठी...http://adkjerseygirl.wordpress.com/

या मेथीच्या भाजीची कृती खालीलप्रमाणे;

२-३ मुठ भाजी
३-४ पाकळ्या लसूण
२ मिरच्या,
१ मध्यम बटाटा
१ मध्यम टोमॅटो
१ टेस्पून खवलेला नारळ
तेल, राई, जीरे

कृती:
तेलात लसुण, मिरची, राई-जीर्‍याची फोडणी करून घ्यावी.
त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा, मग त्यात टोमॅटो टाकून परतावा.
आता बटाटा बारिक चिरुन घालावा.
बटाटा नीट शिजला की चिरलेली मेथी घालावी. मिठ घालून झाकण ठेवून शिजवावे.
भाजी तयार आहे.

इथेच विद्याकने दिलेली घावणाची पाकृ
ताकात रवा १-२ तास भिजत घालायचा त्यात कांदा, हि.मिरची, मेथी, टोमॅटो,आले,कोथींबीर चिरुन टाकायची चवीपुरते मीठ्,साखर ,२-३ चमचे तेल टाकुन घावण (उत्तप्पे) टाकावे. तुम्हांला कितीही धन्यवाद दिले तरि अपुरेच पडतील.

रुनीने मुंबईला या भाजीच्या बेसन घालून केलेल्या, तेलावर जरा परतलेल्या वड्या खाल्ल्या होत्या.

ही भाजी नुसतीच परतून एव्हढी छान लागणार नाही बहुधा.

Happy Sprouting Happy

वाढणी/प्रमाण: 
१-२
माहितीचा स्रोत: 
Backyard Diva Blog
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसल्या भारी आहात तुम्ही सगळ्या...सिंडरेला मेथी अजून मोठी हवी असेल तर अजून १-२ दिवस पाणी शिंपडून ठेव. मंजूडी, आंबोळ्यांची कृती देशील कां? सारखी सारखी भाजी किती करणार? अगो तुझी मेथीपण सुपर्ब दिसतेय.
रुणू मला वाटतं मालदीवच्या वातावरणाचा प्रॉब्लेम असावा कां? मालदीवला बाकीच्या कडधान्यांना मोड पटकन येत असतील तर परत एक्दा ट्राय कर. दिनेशदांनी मेथीला मोड आणायची कृती दिलीये ती फॉलो कर मग मोड आले एक्दा की बाकी काहीही करावं लागणार नाही Happy
घरात ही मेथी वाढताना बघून तर ते "मन झूम उठना" हे एक्झॅटली काय असतं आणि ते कसं फील होतं हे समजलं Proud (जरा अती झालं पण तरीही... Happy )

मामी Lol

हो मनी. मी आता मालदीवची हवा आणि इथल्या मेथ्याच मुळी चांगल्या नाहीत ह्या निष्कर्षावर आलेय Wink
आज शेवटचा प्रयत्न पुन्हा करणार.
परत क्रमवार प्रश्नांची उत्तरे द्या पाहू कोणीतरी.

१. मेथ्यांचे कोरडे दाणे किती वेळ पाण्यात भिजवू ?

(पहिल्या वेळेला मी न भिजवताच सगळी प्रक्रिया चालू केली. मनीच्या विपुनंतर ती मध्येच थांबवली. दुसर्‍या वेळेला सकाळी मेथ्या पाण्यात घातल्या आणि (विसरून) दुसर्‍या दिवशी पाण्याबाहेर काढल्या. तोवर सगळं बुळबुळीत झालं होतं)

२. पाण्यातून काढल्यावर चाळणीत ठेवून मोड आणायचे ना ? रात्री चालणीत ठेवली तर सकाळपर्यंत मोड येतात का ?

पुढचं तर मनीने लिहिलंच आहे.

(दोन वेळेस "दाढी गेली वाया, पड माझ्या पाया" असं झाल्याने आता मातीविना मेथ्या हा लेकासमोर प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय ! :हाहा:)

मामी Rofl
मी वाल्या कोळी होते की काय ?
अजून पाप-पुण्याचा उद्धार व्हायच्य आत मेथ्यांचा नाद सोडलेला बरा. बाटली सोडा अभियान Lol

मनी, आंबोळ्यांची वेगळी अशी काही कृती नाही. घावन/ धिरडी/ आंबोळ्यांचे पीठ भिजवून त्यात अगदी बारीक चिरलेली समुद्रमेथी (पाने + देठं (मोड)) घालून मग नेहमीप्रमाणे घावन/ धिरडी/ आंबोळ्या घालायच्या आणि पहिली बाजू होताना त्यावर झाकण ठेवायचं. मग आंबोळी परतल्यावर झाकण ठेवायची आवश्यकता नाही.
Happy

रुणू, मेथ्या ५-६ तास भिजत घाल. सकाळी कामाला जाताना भिजत घस्तल्यास की संध्याकाळी आल्यावर चाळणीत उपस आणि मग काळ्या किंवा गडद रंगाच्या कापडात बांधून ठेव. मोठा ओव्हन असेल तर किंचित गरम कर किंबा उबदार ठिकाणी झाकून थेवून दे. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत मोड यायला हवेत.
maamee :))
Manjudi, mi nakki karun baghen amboLya. Thanks.

Mobile varun type karayche mhanje dimag ka dahi ban jata hai.

मामी.. Rofl
रुणू.. नाद सोडू नकोस बाटलीचा... Proud लगे रहो रुणूबाई!!!
अरे बाप्रे काल दिवसभरात विसरलेच ...जाऊन बघू दे माझी मेथी बाटलीत काय चाल्लंय ते... बा>>य...

भाजी खरच मस्त झाली होती. धन्यवाद मनी.
इथे पावसाळ्यात पाले भाज्या फारश्या मिळत नाहीत. तेव्हा ही भाजी करता येइल. परत धन्यवाद.

रुणू हसत नाहीये गा तुझ्यावर्..मी बी तुझ्यासारखीच एक हाय>> मेथीकी मारी ' हूँ Proud
नेट लावलेल्या बाटलीकडे नेटाने लक्ष देतेय..
एम ए च्या रिझल्टच्या वेळी पण इतकं टेन्शन आलं नवतं बाबा!!!
आता हीला पानं फुटतात का आमचा पेशंस.. Uhoh
इथे सब्र का फल पण मीठा नसून कडवा च मिळणारे.. चवीला हो!!! हीही!!!

मामी Rofl
रुणू, अग कर कर मस्त मोड येतात.
माझ्या लेकाने तर प्रत्येक दिवशी ती ती स्टेज स्वतः खाउन पाहिली व बापालापण खायला दिली.
त्यामुळे भिजलेले मेथी दाणे, मोड आलेले दाणे, लहान लहान पाने आलेले दाणे असे आत्तापर्यंत खाउन पहाणे झाले आहे Happy व मेथीच्या शत्रूपक्षातील बापाला "खा ना मस्त लागते" म्हणुन भरवुन पण झालेय Lol

माझ्या मेथीची वाट लागली. बुरशीचे स्पेसिमेन झाले त्याचे. Proud
रुणु, कितवा ट्राय?
मी परत मारावा का नाय या विचारात आहे.

हाणा त्या सगळ्या सहज मोडवाल्या काकवांना. आणि आम्हाला मोड आलेल्या मेथ्यांचा रोजचा कार्यानुभव आहे तरीबी..
Proud

या>>हू!!! माझ्या मेथ्यांना हिरवी पाने आली व्यवस्थित.. फोटू काढलेत परत्येक स्टेज चे मंडळी!!
(हातचं लिखाण उरकून टाकीनच मेथीचे फोटो)
रोज चार पाच दिवस नवर्‍याला बाटलीतली जादू दाखवत होते..
पानं फुटल्यावर खरोखरी मला(सुद्धा) आश्चर्य मिश्रीत आनंदाच्या उकळ्या वगैरे फुटल्या ..
आज प्रेमाने भाजी ही केली.. अती बारीक कापल्यामुळे कि काय जरा मिळून आली होती..पण चव मस्त झाली होती
नवर्‍याला डब्यात दिली होती..
तो घरी आल्यावर मी उत्साहाने विचारले कि भाजी कशी झाली होती??
हाय रे दैवा!!! त्याला डबा संपेपर्यन्त कळलंच नाही कसची भाजीये ती!!!
त्याने चक्क 'वांग्या चं भरीत' समजून खाल्ली होती!!!
घरी येऊन सस्पेंस समजला Angry Uhoh Rofl

वर्षुनील,
>>त्याने चक्क 'वांग्या चं भरीत' समजून खाल्ली होती!>><< Rofl

तुम्ही एक अशक्य सुगरण आहात असे समजा व खुष रहा. Happy ( मजाक करतेय)

दुसरी बॅच तयार आहे. आज पुन्हा थालिपीठंच केली. चांगली अर्धी वाटी मेथ्या भिजत घातल्या होत्या त्यामुळे भरपूर मेथी झाली आहे Happy

ंमोनाली, व्वा ... तुझ्या मुलालाही मेथी आवडली. मला खुप छान वाटतंय सगळ्यांचे अनुभव वाचून. ते एक-एक पान बघून खरंच आनंदाच्या उकळ्याच फुटतात. दिल गार्डन गार्डन होतं अगदी.

वांग्याचं भरीत Rofl
रुणु, कितवा ट्राय? >> दोन फसले. दोन्ही वेळा बुरशी. तिसर्‍या वेळेस करायची अजून हिम्मत नाही झाली.

(रैना, मारू नकोस मला....पण तुझी पण मेथी फसली हे वाचून मला असुरी आनंद झालाय....मी एकटीच नसल्याचा Wink Lol
जाऊ दे, आपण कधी भेटलोच तर आधी बिनमातीची मेथी उगवायचा सामूहिक प्रयत्न करू या...)

रुणुझुणू, रैना आपण समै Wink ह्यावेळी माझ्याही मेथीला थोडी बुरशी आलीय. तरीही काल मी हलक्या हातने स्वच्छ चोळून धुवून फडकं न बांधताच थोडी पसरुन ठेवलीय. मेथीला मोड यायला फारच वेळ लागतोय. एकूण प्रोसेस आठ दिवसांची होते. पण चव भलतीच आवडलीय सगळ्यांनाच घरात आणि मेथी नीट मिळतही नाही बाजारात. त्यामुळे हिंमत हारणार नाही Happy
वर्षु, भरतात कसूरी मेथी घातली होतीस का ? असे तरी विचारले का Lol

मागच्या मंगळवारी संध्याकाळी भिजत घातली होती मेथी. आज सकाळ पर्यंत वर डिश ड्रेनर मधे बाटल्या ठेवलेला फोटो आहे तशी झाली आहे. मी एक टेबलस्पून मेथी घातली होती. आता पुढच्या वेळेस जरा जास्त घालून पाहीन.

काल संध्याकाळी केली ही भाजी - जरा कडवट चव लागली . असे का झाले असेल ? मुंबैत मिळायची ती मेथी कधी कडवट लागत नसे .

वा ! मनुताई, किती छान माहिती दिलीत. ही अशी मेथी माझी खुपच आवडीची. गेले १५ वर्ष खाल्ली नव्हती. आताच मेथी भिजत घातली. मेथीला मोड आले कि पहिल्यांदा त्याचे घावण करणार आणि खाणार.
मी याचे घावण असे करायची...ताकात रवा १-२ तास भिजत घालायचा त्यात कांदा, हि.मिरची, मेथी, टोमॅटो,आले,कोथींबीर चिरुन टाकायची चवीपुरते मीठ्,साखर ,२-३ चमचे तेल टाकुन घावण (उत्तप्पे) टाकावे. तुम्हांला कितीही धन्यवाद दिले तरि अपुरेच पडतील.

>> बुरशी.
+१
टाकून दिली.
अगो, आपल्याकडच्या हवेमुळे बुरशी येत असेल का?

>>वांग्याचं भरीत
(थक्क स्मायली!)

Pages