'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)

Submitted by लाजो on 18 June, 2012 - 20:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हे लोफ / मफिन्स लो कॅलरी, लो फॅट, हाय फायबर इ इ असे बहुगुणी आहेत Happy

BOM08.JPGकोरडे जिन्नस:

दीड कप कणिक,
एक कप रोल्ड ओट्स *
दीड टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा
३/४ कप ब्राऊन शुगर,
चिमुटभर मिठ (ऐच्छिक)
दालचिनी पावडर / वॅनिला इसेन्स - स्वादानुसार

ओले जिन्नस:

३/४ कप लो फॅट कनोला स्प्रेड / तेल
१ अंडे,
३/४ कप ते १ कप दूध / बटरमिल्क^^

इतर जिन्नस:

२ टेबलस्पून मध

--

पुढिलपैकी काहिही आवडेल ते - (ऐच्छिक)

३/४ कप पिकलेले केळे मॅश करुन / कुकिंग अॅपल / पेअर / अन्य फळं / सुकामेवा
पिकान्स / अक्रोड तुकडे
-----------

प्रमाण तक्ते

क्रमवार पाककृती: 

BOM05.JPGलोफ / मफिन्स :

१. सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सें ला तापत ठेवा. मफिन पॅन्स / लोफ पॅन्स ना ऑईल स्प्रे मारुन कणकेने डस्ट करुन घ्या. किंवा पेपर कप्स घालुन तयार ठेवा.

२. एका बोल मधे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करुन घ्या. यातच ड्रायफ्रुट्स / अक्रोड इ इ घालणार असाल तर मिसळा (व्हॅनिला इसेन्स वापरणार असाल तर तो वगळा).

३. दुसर्‍या मोठ्या बोल मधे ओले जिन्नस एकत्र करुन घ्या. (यात व्हॅनिला इसेन्स घाला).

४. आता ओल्या मिश्रणामधे हळु हळु कोरडे मिश्रण घाला. एकीकडे लाकडी चमच्याने / स्पॅट्युलाने मिश्रण हलकेच ढवळत रहा. असे सर्व कोरडे मिश्रण ओल्या मिश्रणात मिक्स्स करा. जास्त ढवळु नका.

५. ओले + कोरडे मिश्रण तयार झाले की यात मॅश्ड केळे / कुकिंग अॅपलचे तुकडे / पेअरचे तुकडे इ इ आपल्या आवडीप्रमाणे घाला आणि हलकेच ढवळून घ्या.

BOM01.JPG

६. तयार मफिन / लोफ पॅन्स मधे मिश्रण ओतुन २०-२५ मिनीटे बेक करा.

BOM02.JPGहनी सिरप:

७. एका छोट्या बोलमधे मध आणि २ चमचे उकळते पाणी मिक्स करा.

८. लोव्ज / मफिन्स गरम असतानाच त्यांना टूथपिक ने वर भोके पाडा आणि त्यावर हे हनी सिरप चमच्याने पसरा.

बनाना + हनी + दालचिनी लोव्ज

BOM04.JPGसफरचंद + अक्रोड मफिन्स

BOM07.JPG

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात ८ मिनी लोव्ज किंवा १२ स्टँडर्ड साईजचे मफिन्स होतात
अधिक टिपा: 

१. मुळ रेसिपी मधे सेल्फ रेसिंग फ्लार, साधी साखर, बटर, बटरमिल्क वापरले आहे.

२. * रोल्ड ओट्स (ओटमिल) पटकन शिजतात. जर साधे ओट्स असतिल तर ते कोमट दूधात थोडावेळ भिजत घाला.

३. ^ मी आमंड मिल्क वापरले आहे. फुलक्रिम / स्किम्ड / लो फॅट / सोया कुठल्याही प्रकारचे दूध चालेल.

४. साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. मी केळे घातले आहे म्हणून साखर कमी घेतली आहे. आणि फर्मली पॅक्ड ब्राऊन शुगर (बारीक आणि मऊ असते) वापरली आहे. मुळ रेसिपी मधे १ कप साखर वापरली आहे.

५. अर्ध्या मिश्रणात मी मॅश्ड केळे घालुन थोडे लोव्ज बनवले आणि उरलेल्यात सफरचंदाचे तुकडे घालुन थोडे मफिन्स बनवले आहेत.

BOM06.JPG

६. हनी सिरप घातले नाही तरी चालेल. त्याऐवजी केरॅमल / चॉकलेट टॉपिंग घालता येइल. पण मग ते लो कॅल नाही होणार Proud

७. असा एक लोफ 'ब्रेकफास्ट ऑन द गो' साठी बेस्ट Happy त्याबरोबर इन्स्युलेटेड कॅरीकप (थर्मॉस) मधे दूध घेतले तर आणखिनच उत्तम Happy

८. हेच मफिन्स दुपारच्या नाश्त्याला करायचे असतिल तर साखर, फळे न घालता किसलेले गाजर / कॅप्सिकम / कॉर्न आणि आलं लसुण पेस्ट / गरम मसाला / जिरे-मिरे / ओवा / इटालिअन हर्ब्ज, दूधाऐवजी बटरमिल्क आणि चविला मिठ घालुन सेवरी टाईप्स करता येतिल. यात आवडीप्रमाणे थोडे चिझ देखिल घालता येइल Happy सॉस बरोबर गरमागरम छान लागतिल Happy

माहितीचा स्रोत: 
मुळ बनाना ओट मफिन रेसिपी आणि त्यात मी केलेले पौष्टिक बदल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मंडळी Happy

@राजसी, बेकिंगसोडा मिळत नसेल तर बेकिंग पावडरचे प्रमाण दुप्पट घ्या. पण मग या मफिन्समधे आंबट जसे सफरचंद, पेअर,बटरमिल्क घालु नका. कारण आंबट पदार्थांनी बेपा चा इफेक्ट कमी होउन मफिन्स नीट फुलणार नाहित. आणि स्वादासाठी दालचिनी/व्हॅनिला यांचे प्रमाणे किंचित वाढवा कारण बेपा जास्त घातल्याने त्याचा थोडा वास येण्याची शक्यता आहे.

ताजी फळे, भाज्या न घालता हे मफिन्स केले (नट्स, सुकामेवा चालेल) तर फ्रिजबाहेर ४-५ दिवस सहज टिकतील. फ्रिज मधे आठवड्याच्या वरही टिकतिल. ताजी फळे असतिल तर २-३ दिवस बाहेर टिकायला काहिच हरकत नाही. अर्थात हे बाहेरच्या तापमानावर अवलंबुन आहे. आमच्याकडे सध्या खुप गार आहे त्यामुळे केळ्याचे मफिन्स फ्रिजशिवायच ५-६ दिवस बाहेर टिकले.

जास्त करुन ठेवले तर फ्रिझ देखिल करता येतिल. फ्रिझ करताना प्रत्येक मफिन प्लॅस्टिक रॅप मधे गुंडाळुन मग मोठ्या झिपलॉक बॅग मधे ठेवायचे, म्हणजे लागतिल तसे एक्/दोन मफिन बाहेर काढता येतिल. बाहेर काढुन थॉ करायचे किंवा मावे मधे किंचित गरम करायचे.

लाजो, कसले मस्त दिसतायत मफिन्स. रेसिपीही अगदी डिटेलमध्ये दिलेयस. Happy

>>> हेच मफिन्स दुपारच्या नाश्त्याला करायचे असतिल तर साखर, फळे न घालता किसलेले गाजर / कॅप्सिकम / कॉर्न आणि आलं लसुण पेस्ट / गरम मसाला / जिरे-मिरे / ओवा / इटालिअन हर्ब्ज, दूधाऐवजी बटरमिल्क आणि चविला मिठ घालुन सेवरी टाईप्स करता येतिल. यात आवडीप्रमाणे थोडे चिझ देखिल घालता येइल सॉस बरोबर गरमागरम छान लागतिल >>>>> ही अ‍ॅडिशन एकदमच आवडली.

इथे लिहायचे राहुनच गेले.

गेल्या रविवारी केले गं तुझे हेल्दी मफिन्स. ऑऑ वापरुन केले. बाकी सगळे वरचे प्रमाण. दुध कमी पडले म्हणुन अजुन एक अंडे वापरले. फळे अजिबात नव्हती त्यामुळे त्या भानगडीत पडले नाही. त्याऐवजी १ कप अक्रोड वापरले.

गोडीला जरा कमी वाटले. (साखरेबद्दल्ची टिप आता वाचली Happy ) साध्या पाण्यात मध पातळ करुन तो वरुन घातल्यावर गोडी बरोबर झाली. (उगीच गरम पाण्यात मध घालु नये इ.इ वाचल्यामुळे साध्या पाण्यातच घातला, तसा फरक काही पडला नाही).

मी वापरलेले ओट्स तुझ्या फोटोत दिसताहेत तसेच दिसत होते, पण मधुन मधुन कच्चट चव लागली मला. पुढच्या वेळेस थोडा वेळ भिजवुन वापरेन.

आता ते तिखट करुन पाहिन. ते जास्त आवडतील असे वाटतेय. हेही आवडलेच अर्थात. दुस-या दिवशीही तेवढेच नरम राहिलेले.

कॉफि मफिन्सही करुन पाहिले. त्यात कणिक वापरली आणि म्हणुन बेकिंग सोडा घातला. सोडा थोडा जास्त झाला. मफिन्स सॉफ्ट झाले पण सोडा घशाला बसायला लागला.

दोन्ही रेसिप्या एकदम मस्त आहेत. आणि मफिन्स असल्याने एकदम सोप्प्या. ओले - कोरडे वेगवेगळे मिक्स करा आणि मग एकत्र मिक्स करा. केकसारखे फेटत बसायचे झंझट नाही.

हे मफिन्स मी आतापर्यंत तीन महिन्यात तीन वेळा केले. अगदी सोप्पी आणि टेस्टी पाकृ. एकच अडचण आहे - चव घेण्यातच सगळे मफिन्स संपून जातात. नंतर खायला उरतच नाहीत!

हे लोफ / मफिन्स लो कॅलरी, लो फॅट, हाय फायबर इ इ असे बहुगुणी आहेत>>>>>
१००% मान्य अतिशय आरोग्यपुर्ण. एक उत्तम पा.कु. दिल्याबद्दल आभार.

लाजो ..आत्ताच हे लोफ केळे,अक्रोड घालुन केले. वरुन हनी सिरप घातले. मस्त झाले आहेत. धन्यवाद.

लाजो ऑनलाईन आहेस का?

मफीन्स् करायचा विचार आहे पण ओट्स नेमके अर्धा कपच आहेत, कणिक घालू का मग प्रमाण व्यवस्थित करायला?

१/२ कप ओट्स चालतिल. कणिक नको वाढवुस.

दूध कदाचित किंचित कमी लागेल.. आधी १/२ कपच घाल आणि कन्सिस्टंसी चेक कर.. फार घट्ट वाटले तर चमचा चमचा दूध घालुन अ‍ॅडजस्ट कर.

लाजो, धन्यवाद! Happy

प्रायोगिक तत्वावर ०.५ कप ओट्स, कणिक पाऊण कपापेक्षा जास्त (पण दोन कपापेक्षा कमी), २ टीस्पून बेकींग पावडर आणि १.५ टीस्पून बेकींग सोडा, १ कप ब्राऊन शुगर, २ अंडी वापरून बघते .. बघू काय होतं ते .. Wink

रिझल्ट बरा झाला तर्सांगतेच नाहीतर मग माझा प्रयोग बिघडला .. Happy

अरे, नो वरीज Happy

पाऊणकप कणिक की १कप + पाऊण कप कणिक???

२ टीस्पून बेकींग पावडर आणि १.५ टीस्पून बेकींग सोडा<<< बेपा, बेसो थोडे जास्त वाटतय...

२ अंडी... १ बास होते या प्रमाणाला...

पण ट्राय करुन बघ आणि नक्की कळव व्हेरिएअशन कसे वर्क होते ते Happy

लाजो व्हेरिएशन ऑलमोस्ट सकेसफुल!

हो, कणिक १.७५ < मी घेतली तेव्हढी < २ कप्स् .. तुला शंका आली त्याप्रमाणे बेकींग सोडा किंचीत कमी चालला असता (१.५ ऐवजी १) पण आता आहे तशीही चव वाईट नाहीये .. Happy

मी हाताला लागेल तो सुकामेवा (अक्रोड, बेदाणे आणि क्रॅनबेरीज्) घातल्या आहेत .. गोडीला (एक कप ब्राऊन शुगर घालूनही) बेताचेच आहेत ..

छान आहे रेसिपी आणि सोपीही .. धन्यवाद! फोटो टाकते जमल्यास ..

आज मी ह्याचे तिखट व्हर्जन केले. कॅप्सिकम, गाजर, कॉर्न, मशरूम, आलं लसूण पेस्ट आणि चिली फ्लेक्स घातले. बेकिंग पावडर/ सोडा थोडा जास्त वाटला. पण चव एकदम झकास. धन्यवाद लाजो.

मफिन्स करुन बघितल्याबद्दल आणि आवडल्याची पोचपावती दिल्याबद्दल साधना, गौरी, दीपा, अनघा, पिन्कु, सशल आणि नीलमपरी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद Happy

@दीपा, तेल थोडे कमी घातले तर चालेल पण अगदीच कमी घातले तर मफिन्स कोरडे होतिल. तेला ऐवजी कनोला स्प्रेड वगैरे वापरुन बघु शकता Happy

@अदिती, बीना अंड्याचे मफिन्स मी करुन बघितलेले नाहित. पण कुठेयरी वाचले होते की अंड्याऐवजी दही वापरु शकतात...

Pages