Submitted by वैवकु on 6 August, 2012 - 07:12
वास्तावाच्या भयाने विकारू नये
स्वप्नभोळ्या मनाने दुपारू नये
उत्तरे मागता.... उत्तरे मागती
प्रश्न त्या माणसांना विचारू नये
बाधले रोजचे हे उपोषण मला
वाटते देश आता सुधारू नये
जीवघेणे जिणे दुःखदेणी गझल
पेरणी या पिकांची दुबारू नये
तू स्वतःला असे 'मांड' की वैभवा
विठ्ठलाने विटेवर उभारू नये
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह्ह्ह्ह्ह ! सुंदर गझल, हटके
वाह्ह्ह्ह्ह !
सुंदर गझल, हटके काफिये
जियो!
धन्यवाद
धन्यवाद सुप्रियाताई
तुमच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप नेहमीच लिहायला प्रेरित करते अन अजून उत्तम लिहायचे आहे ही जबाबदारीची जाणीवही करून देते
पुनश्च धन्यवाद
वैवकु
वैभवजी, खूप छान गझल. "बाधले
वैभवजी, खूप छान गझल.
"बाधले रोजचे हे उपोषण मला
वाटते देश आता सुधारू नये "
"जीवघेणे जिणे दुःखदेणी गझल
पेरणी या पिकांची दुबारू नये "
हे दोन शेर तर खूप आवडले.
मस्त आहे गझल ! वृत्त आणि
मस्त आहे गझल !
वृत्त आणि वृत्तीही आवडली !
गणेशजी , राजीवजी धन्यवाद
गणेशजी , राजीवजी धन्यवाद
म्हणे गणेशजी , राजीवजी
म्हणे गणेशजी , राजीवजी धन्यवाद. दुपारू नये म्हणजे काय करू नये रे वैभ्या? शब्दकोष समजतोस का स्वतःच्या बालबुद्धीला? वाटले देश आता सुधारू नये. एका भारतीयाने असे म्हणावे यातूनच देश का बिघडला हे समजेलच. द्पारू नये, संध्याकाळू नये. पोरकट आहेस का
परमआदरणीय मोहिनी देवीजी गझल
परमआदरणीय मोहिनी देवीजी
गझल आवडली नसल्यास क्षमस्व
त्यात काय क्षमस्व? आवड नावड
त्यात काय क्षमस्व? आवड नावड एकेकाची वेगवेगळी. पण तू खोटा नम्र झालास की राग येतो. पुढची गझल कधी?
पुढची गझल कधी?>>>>>> अत्ता
पुढची गझल कधी?>>>>>>
अत्ता ऑर्डर देवून ठेवा............दोनएक दिवस लागतील !!
दोनएक दिवस लागतील. इडलीचे पीठ
दोनएक दिवस लागतील. इडलीचे पीठ जणू. वेळेवारी सुधर वैभ्या, जगात करण्यासारखे खूप काही आहे.
करण्यासारखे खूप काही
करण्यासारखे खूप काही आहे.>>>>>>>>>
मान्य पण मला जे जमते तेच करतोय मी
अरे पण त्याचा आम्हाला का
अरे पण त्याचा आम्हाला का त्रास? तुला झोप येत नाही आणि गझलेलाही येत नाही हे ऐकून नाचत सुटायचे का आम्ही?
तो तुमचा प्रश्न आहे.........
तो तुमचा प्रश्न आहे.........
क्ष.य.ज्ञ.जी ...........तुम्ह
क्ष.य.ज्ञ.जी
...........तुम्ही माझे एक आवडते गझलकार आहात म्हणून............>>>>>>>>>>>>अरेरे अरेरे अरेरे
धन्यवाद !!
---------- या महाकविने गझला लिहील्यात का तरी? का क्ष.य.ज्ञ. उर्फ वैभूनेच लिहील्यात?

क्ष.य.ज्ञ. याच्या नावे फक्त एक फालतू विडंबन आहे म्हणून म्हटले.
धन्यवाद
धन्यवाद सुधाकरराव

(प्रतिसादान्ची सन्ख्या एक ने वाढवल्याबद्दल!!;) )
केवळ प्रतिसादासाठीच लिखाण !
केवळ प्रतिसादासाठीच लिखाण ! ????? ----

केवळ प्रतिसादासाठीच लिखाण !
केवळ प्रतिसादासाठीच लिखाण ! ????? ----

केवळ प्रतिसादासाठीच लिखाण !
केवळ प्रतिसादासाठीच लिखाण ! ????? ---- छान महाभाग आहेस 'वैभू' .
आता एकूण प्रतिसादांची संख्या
आता एकूण प्रतिसादांची संख्या किती?

मस्त जमलीय गझल
मस्त जमलीय गझल
धन्यवद
धन्यवद स्वरूपजी
_______________________-
अवान्तर: ऑर्फी यार तू ४९ वर आउट झालास रे .........:( :
स्वरूपजीन्चा प्रतिसाद ५० व्वा निघाला माझा हा अत्ताचा ५१ व्वा आहे
अजूनच अवान्तर : मी प्रतिसादासाठी लेखन करत नाही. पण होय!!;............केलेले लेखन फक्त प्रतिसादासाठीच , 'प्रकाशित' मात्र करतो !!!

करावेच लागते बाबा .........काय करणार!!!(एक कटु सत्य!!):G
खुप सुंदर! आपल्या काव्यातला
खुप सुंदर!
आपल्या काव्यातला विठुमाऊलीचा ऊल्लेख विशेष आवडतो.
तू ४९ वर आउट
तू ४९ वर आउट
----------------------- म्हणजे शेवटचा नाबाद आणि जे प्रतिसाद देतच नाहीत ते तूझे राखीव फलंदाज असतील
तू ४९ वर आउट
तू ४९ वर आउट
----------------------- म्हणजे शेवटचा नाबाद आणि जे प्रतिसाद देतच नाहीत ते तूझे राखीव फलंदाज असतील
शब्दकोष समजतोस का स्वतःच्या
शब्दकोष समजतोस का स्वतःच्या बालबुद्धीला? वाटले देश आता सुधारू नये. एका भारतीयाने असे म्हणावे यातूनच देश का बिघडला हे समजेलच. द्पारू नये, संध्याकाळू नये. पोरकट आहेस का..

.......... सॉरी..सॉरी रे वैभू, .. पण तोंड दाबुन धरलं तरी खुप हसायला आलं.......हुश्श्श//////////
हि मोहीनी चांगलीच हात धुवून तुझ्या पाठी लागलेय. ..( कधी काय वेड वाकडं त नाय बोल्ला तिले?
)
धन्यवाद विभाग्रज जी
धन्यवाद विभाग्रज जी
उत्तरांचा शेर आवडला. (आणि
उत्तरांचा शेर आवडला.
(आणि मोहिनीचा प्रतिसादही! धमाल प्रतिसाद आहे!!)
धन्यवाद पुलस्तीजी ही गझल खूपच
धन्यवाद पुलस्तीजी

ही गझल खूपच खाली गेलेली .........आवर्जून कोणी वाचेल असे कधी वाटले नव्हते ............
पुनश्च धन्स
असाच लोभ असूद्या
आपला सदैव कृपाभिलाषी
वैवकु
काल सायंकाळी सह्जच हा उत्तरांचा शेर मनात घोळत होता सहसा माझे शेर मलाच फारसे आठवत नाहीत अनेकदा त्यातून आज हे असे कसे झाले यचा विचार करत होतो.....इकडे तुम्ही तो वाचला होता हे मला समजले असावे आपोआपच (सिक्ष्थ सेन्स की काय म्हणतात ते हेच बहुधा
Pages