Submitted by वैवकु on 6 August, 2012 - 07:12
वास्तावाच्या भयाने विकारू नये
स्वप्नभोळ्या मनाने दुपारू नये
उत्तरे मागता.... उत्तरे मागती
प्रश्न त्या माणसांना विचारू नये
बाधले रोजचे हे उपोषण मला
वाटते देश आता सुधारू नये
जीवघेणे जिणे दुःखदेणी गझल
पेरणी या पिकांची दुबारू नये
तू स्वतःला असे 'मांड' की वैभवा
विठ्ठलाने विटेवर उभारू नये
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचा काफिया कुणी खाल्ला?
शेवटचा काफिया कुणी खाल्ला?
आला आला पुन्हा बाहेर आला.
आला आला पुन्हा बाहेर आला. छान.
खाल्ला होता तो 'तो'
खाल्ला होता तो 'तो' नव्हताच
ती रदीफ होती ...........:P
टायपिन्ग मिश्टेक होते कधीकधी ...........सॉरी!!(:राग:)
______________-
धन्स रे ऑर्फी..........:)
नेहमीप्रमाणे...........तुमचा
नेहमीप्रमाणे...........तुमचा विठ्ठल स्साला इथेही कडमडलाच आहे न चुकता !!:राग:
असो
ही गझल चान्गली आसूनही आपणास पूर्वीइतके प्रतिसाद का येत नाहीत याचे आत्मपरीक्षण करावे असे सान्गावे वाटते .
अर्थात तुम्ही माझे एक आवडते गझलकार आहात म्हणून मी सान्गतोय हे विसरू नये
असो , बकीची गझल बरी आहे आवडली .........!!
धन्यवाद
आपलाच
क्ष.य.ज्ञ.
क्ष.य.ज्ञ.जी ...........तुम्ह
क्ष.य.ज्ञ.जी

...........तुम्ही माझे एक आवडते गझलकार आहात म्हणून............>>>>>>>>>>>>:(
धन्यवाद !!
आत्मपरीक्षण करावे>>>>>>>>>>
अवश्य !!
पुनःश्च धन्यवाद !!
वैवकु उत्तरे मागता.... उत्तरे
वैवकु
उत्तरे मागता.... उत्तरे मागती
प्रश्न त्या माणसांना विचारू नये
हा शेर मस्त जमलाय.
धन्यवाद किरण क्षयज्ञजीन्च्या
धन्यवाद किरण
:
क्षयज्ञजीन्च्या प्रतिसादाने अन्तर्मुख झालोय मी ....
तुझे मनःपूर्वक आभार व्यक्त करूशकत नाहीये .............क्षमस्व मित्रा
आत्मपरीक्षण संपलं कि
आत्मपरीक्षण संपलं कि निवांत... घाई नाही.
आट्मपरीक्षण अधून मधून लिहीत
आट्मपरीक्षण अधून मधून लिहीत रहाणे. आम्हालाही अपडेटस मिळतील
नक्की .जरूर..........
नक्की .जरूर..........
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/12832
धन्यवाद मित्रा मी आत्ता भाजप
धन्यवाद
मित्रा मी आत्ता भाजप स्टाईलने आत्मपरीक्षण करणार होतो ...........अडवाणीजिन्सारखा एखादा ब्लॉग लिहावा म्हणत होतो .........
तू माझे डोळे उघडलेस मित्रा................ धन्स !!
अता मीही कॉन्ग्रेस स्टईलनेच आत्मपरीक्षण करीन .............:)
उत्तरे मागता.... उत्तरे
उत्तरे मागता.... उत्तरे मागती
प्रश्न त्या माणसांना विचारू नये >> मस्त आहे हा शेर!
बादले की बाधले?
हो हो बागेश्री बाधले असे
हो हो बागेश्री बाधले असे म्हणतात खरे पण बादले हेही बरोबराय !
बादले हा बाधलेचाच जरासा ग्राम्य अपभ्रन्श आहे
बादले या शब्दावर इतरही जणांच्या हरकती माझ्याकडे प्रत्यक्षरित्या पोचल्या आहेत
हा शब्द बदलण्याचा विचार मी करतो आहेच पण बादणे हा जो शब्द बोलाचालीत वापरतात ; असे मला पक्के माहीत आहे ते चुकीचेच आहे असे खात्रीने निष्पन्न झाले तर हा शब्द बदलून बाधले असाच बदल मी स्वीकारणार आहे
सूचने बद्दल आभारी आहे
धन्यवाद
छान आहे मस्त गझल.... उत्तरे
छान आहे मस्त गझल....
उत्तरे मागता.... उत्तरे मागती
प्रश्न त्या माणसांना विचारू नये
बादले रोजचे हे उपोषण मला
वाटते देश आता सुधारू नये
हे विशेष आवडले.
धन्स योगुली बर्याच
धन्स योगुली
बर्याच दिवसान्नी दिसतेय्स इकडे गझलेच्या धाग्यावर
असो बरे वाटले ........
धन्स अगेन
वैभव खूपच वेगळे
वैभव खूपच वेगळे शब्द्योजन.
जीवघेणे जिणे दुःखदेणी गझल
पेरणी या पिकांची दुबारू नये
आर्त दु:खभाव.
भारतीताई मनःपूर्वक धन्यवाद
भारतीताई मनःपूर्वक धन्यवाद
वास्तावाच्या भयाने विकारून
वास्तावाच्या भयाने विकारून ये
स्वप्नभोळ्या मनाने दुपारून ये!
वावावा!
दुपारून येणे आवडले.
जीवघेणे जिणे दुःखदेणी
जीवघेणे जिणे दुःखदेणी गझल
पेरणी या पिकांची दुबारू नये>>>>>>>>>>> वा वा
तू स्वतःला असे 'मांड' की वैभवा
विठ्ठलाने विटेवर उभारू नये>>>>>>> काय उभारु नये?( नीट कळले नाही .. म्हणून ) की विट्ठलाने वीट सोडावी ? (विटेवर उभे राहू नये ) अशा अर्थाने "उभारू" घेतला आहे .
मस्तच
वा वा वैवकु.. मस्तच! मस्ताय
वा वा वैवकु.. मस्तच!
मस्ताय व्रुत्त एकदम! ... न रहावून एक शेर केलाच हो..
वाटले की असे ही घडावे कधी
तू पहावे वळुन.. मी पुकारु नये !
वा वा ! आवडलीच केतन वाटले की
वा वा ! आवडलीच
केतन
वाटले की असे ही घडावे कधी
तू पहावे वळुन.. मी पुकारु नये !
आहाहा! मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त
इब्लिसराव आभारी आहे देसले
इब्लिसराव आभारी आहे
देसले साहेब मनःपूर्वक आभार ,आपण लावलेला अर्थ बरोबर आहे एकदम !
रिया धन्स !
नानुभौ: पर्फेक्ट ..........खूप आवडला तुमचा शेर .....बहोत बढिया!!!........ धन्यवाद !!
दोनदा सेव्ह झाल्यामुळे हा
दोनदा सेव्ह झाल्यामुळे हा प्र. का. टा. आ.
खतरनाक !! शब्दप्रयोगही
खतरनाक !!
शब्दप्रयोगही भन्नाट !!
धन्स........... @मितवा !!
धन्स........... @मितवा !!
उत्तरे मागता.... उत्तरे
उत्तरे मागता.... उत्तरे मागती
प्रश्न त्या माणसांना विचारू नय..
व्वा...
बादले रोजचे हे उपोषण मला
वाटते देश आता सुधारू नये ..
इथे मी बाधले असे वाचले...शेर आवडला..
छान गझल..
शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद फाटक साहेब
मनःपूर्वक धन्यवाद फाटक साहेब
छान गझल.. सारेच शेर
छान गझल.. सारेच शेर चांगलेत.
बादले खटकले. ग्राम्य अपभ्रंश पूर्ण गझलेचा बाज तसा असल्यास वापरावा. कन्सिस्टन्सी रहात नाही नाहीतर. आणि वाचकांची राईड स्मूद होत नाही.
आणि मक्त्यातला रदीफ ("उभारू") जरी मला सोलापूरमुळे खटकला नसला तरी "माणसे उभी रहातात आणि गुढी उभारतात" हे स्वतः अनेकदा ऐकून घेतल्यामुळे जाणवला. (म्हणून सांगितले.)
बाकी छान.
धन्यवाद संघमित्रा आपला
धन्यवाद संघमित्रा
आपला प्रतिसाद आवडला
खासकरून ...".वाचकांची राईड स्मूद होत नाही". हा मुद्दा पटला !!
'बादले' ऐवजी 'बाधले 'हा सर्वमान्य बदल स्वीकारत आहे
माणसे उभी रहातात आणि गुढी उभारतात" >>>>>हो हेही बरोबर आहेच
पण आमच्याकडे पंढरपुरात अशा वाक्यरचना करतात ............
उदा :
१ ) इथं का उभारलाय्स ?
=इथे का उभा राहिला आहेस?
२) चल चल.! .... राड्याच्या ठिकाणी असं जास्ती उभारू ने
चल चल !....राड्याच्या ठिकाणी (जिथे काही भांडण / हाणामारी किंवा गडबड झाली आहे तिथे ) असे जास्त वेळ उभे राहू नये
आपल्या प्रतिसादासाठी पुनश्च मन:पूर्वक आभार !!
-वैवकु
Pages