प्रतिसादापुढे "संपादन" का दिसते?

Submitted by मदत_समिती on 6 July, 2011 - 12:41

प्रत्येकाला आपापल्या पोस्टी संपादित करायचा पर्याय दिसतो. इतरांच्या पोस्टीपुढे हा पर्याय दिसू शकत नाही कारण इतरांच्या पोस्टी संपादित करण्याचा अधिकार फक्त प्रशासकांकडे आहे. संपादनाचा दुवा वापरून आपण आपली पोस्ट बदलू शकता, अथवा लिहीलेला प्रतिसाद पुसून त्याऐवजी बदलीचा मजकूर लिहू शकता.

प्रतिसाद रिकामा ठेवल्यास

प्रतिसाद field is required.

अशा प्रकारे चूकदर्शक संदेश येतो.

अथवा रिकामी पोस्ट ठेउ शकता.>>> सहज रिकामी ठेवता येत नाही...(त्या साठी वेगळी पध्दत वापरावी लागते.). काही न लिहता प्रतिसाद दिल्यास 'प्रतिसाद' फिल्ड रिक्वायर्ड असा मेसेज येतो.

चातक धन्यवाद, वाक्ययोजना बदलली आहे.

निवडुंगः प्रशासकांना याबाबत नवीन मायबोली: असे सुधारता येईल या धाग्यावर कळवू शकता.

मदत_समिती

>>प्रतिसाद संपादन व्यतिरिक्त प्रतिसाद डिलीट चा ऑप्शन अ‍ॅड करता येईल का? <<

नको. च्यायला, मी तर म्हणीन "संपादन" चं बटनच काढुन टाका. धनुष्यातुन सुटलेला बाण आणि तोंडातुन निघालेला शब्द परत घेता येत नाहि, या धर्तीवर. जेणेकरुन सगळ्यांना डोकं थार्‍यावर ठेऊन लिहावं (प्रतिसाद द्यावा) लागेल; नाहितर लोकक्षोभाची तयारी ठेवावी. Happy

आपण दिलेले प्रतिसाद एकत्र बघता येतात का?

म्हणजे एखाद्या धाग्यावर मी बर्‍याचदा प्रतिसाद दिले असतील तर त्याच धाग्यावरचे सगळे 'माझे' प्रतिसाद एखाद्या टेबलमध्ये दिसतील का? एकाच धाग्याचे दिसत नसतील तर, किमान सगळ्या धाग्यांवरचे माझे प्रतिसाद 'तारीख आणि वेळे'नुसार क्रमाने दिसतील का?

<हा प्रश्न इथे योग्य आहे की 'नवीन मायबोली: असे सुधारता येईल' इथे?>

@नभ
ही सुविधा मायबोलीवर उपलब्ध नाही.

एखाद्या प्रतिसादास प्रतिसाद कसा देता येईल, जेणे करून प्रतिसाद देणार्या व्यक्तिस ते दिसावं....... कळवावे, धन्यवाद!
<<
<<
ज्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे असेल, त्या प्रतिसादातील काही मजकुर अथवा सदस्यनाम वरिल प्रमाणे कोट करावे आणि मग आपले उत्तर लिहावे.

धन्यवाद.
अधिक माहीती साठी इथे भेट द्या.

राज तुमचं सजेशन अ‍ॅप्रिशिएट झालं असलं तरिही संपादनाचं बटण उपयुक्त आहे.
कधी कधी शुद्धलेखनाच्या चुका, किंवा अतिरिक्त माहिती जर लेखात वाढवायची असेल तर त्याचा उपयोग होतो. त्यामुळे संपादनाचे बटण असावे हे माझं मत.

<< त्यामुळे संपादनाचे बटण असावे हे माझं मत.>> सहमत. [ अहो, आपण कांहींतरी चूकीचा शब्द लिहीला असं आठवल्यावर झोपेतून ऊठूनही ती चूक सुधारल्याशिवाय चैन पडत नाही ! ]

कथा पूर्ण झाली नाही व नंतर संपादित करुन वाढवली तर बदल केलेला वाचकांना कळेल का की कथा वाढवलेली आहे ते?

नवीन लेखनामध्ये तुमच्या लेखनाशेजारी लाल रंगात (बदलून) असं लिहून येतं जर तुम्ही संपादन हा पर्याय वापरून लेखन एडिट केलं असेल तर...

प्रकाशित लेखनाला प्रतिसाद किती मिळाला हे कसे कळते? वाचकांच्या प्रतिक्रिया लेखकापर्यंत कशा पोहोचतात?