Submitted by टकाटक on 18 August, 2012 - 07:15
सध्या सार्वजनिक गणपती वर्गणी गोळा करण्याचे काम जोरात चालु आहे पण वर्गणीच्या नावाखाली खुप गुन्डागर्दी चालु आहे ते योग्य नाही. वर्गणी ही आपल्या मनाप्रमाणे द्यायची असते हे लोक विसरलेले दिसतात; वर्गणी मागतात की खन्डणी हेच कळत नाही. शिकलेले लोक सुदधा अडाण्याप्रमाणे वागतात. दुस-यान्च्या आर्थिक परीस्थितीचा विचार करत नाहि. कमी वर्गणी दीली तर भान्डायला लागतात.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
टकाटक, थोडा मध्यमवर्गीय
टकाटक,
थोडा मध्यमवर्गीय भ्याडपणाचा सल्ला वाटेल पण .. जे काय मागतात ते देउन टाकायचे आणि मुव ऑन.
या लोकांचे कामच दुसर्याला उपद्रव देणे असते. समजा तुम्ही विरोध केलात तर तुम्हाला वेगवेगळ्या तर्हेने त्रास देण्यासाठी या लोकांकडे बराच वेळ आणि रीसोर्सेस असतात.
तुमचा मुद्दा १००% बरोबर आहे पण या लोकांकडे शक्ती आहे.. आणि तुम्हाला माहितच असेल शक्ती/सत्ता आणि शहाणपण याच्यात विजय कोणाचा होतो.
द्यावी लागणारी रक्कम शांत जीवन जगायला लागणारा टॅक्स समजायची.
सहमत आहे. मी या विषयावर एक
सहमत आहे.
मी या विषयावर एक लेख टाकला आहे तो पहा आणि बघा कोणी काही करु शकते का?
http://www.maayboli.com/node/37242
इथे पाहा. प्रतिक्रिया द्या.
.. आणि तुम्हाला माहितच असेल
.. आणि तुम्हाला माहितच असेल शक्ती/सत्ता आणि <<अरे तुम्हाला पुणेरी पाट्या माहित नाहीत का ??
घराच्या दरवाज्यावर रात्री सुद्धा उजेडात दिसेल अश्या पद्धतीने पाटी लावायची
" आम्ही कोणालाही, कोणात्याही कारणासाठी वर्गणी देत नाही, कृपया आपला अमुल्य वेळ इथे वाया घालवू नका, - क्षमस्व "
हा उपाय खोटा वाटत असेल तर जंगली महाराज रस्तावरील डिएसके यांच्या ऑफिस ला भेट द्या
धर्माच्या नावाखाली करणे
धर्माच्या नावाखाली करणे म्हणजे ते धर्माला अनुसरून आहे असे नव्हे.
धर्म म्हणा, की काही म्हणा, कारणे महत्वाची नाहीत. काहीतरी करून गुंडगिरी करणे हेच समाजातल्या लोकांचे काम असते, सगळ्या जगात!
इथे च्यायला, १०० कोटी लोकसंख्या! एकच टक्का वाईट लोक म्हंटले तरी इतर जगातल्या पाच सहा देशात मिळून जेव्हढे वाईट लोक नसतील एव्हढे वाइट लोक. बरे समाज म्हणजे - जाउ दे!
सहमत..!
सहमत..!
He barobar aahe ho pan
He barobar aahe ho pan chtya-mothya dukandarach kay kontahi mandalhache lok yetat dya vargani tihi magel tevadi nahi dili tar dhamaki dukan chalawayach nahi ka? Majalas ka? Devala dyayache aahet payse aahmala nahi, sari dadagiri ? He darvarshich? Kahi karata yet nahi
काही अपवाद वगळता बरीच मंडळे
काही अपवाद वगळता बरीच मंडळे चांगल्या रितिने गणेशोत्सव साजरा करतात,त्यामुळे आम्ही जी वर्गणी देतो ती माझे समाजासी काही कर्तव्य लागते म्हणून,खंडणी म्हणून नव्हे.
माझी स्वतःची एकूण ३ गणेश
माझी स्वतःची एकूण ३ गणेश मंडळे आहेत.
घरी एक : म्हणजे कॉलनीचे. तिथे सगळी तरूण मुले आहेत, अन सगळी ओळखीचीच आहेत. कॉलनीतील बहुतेक कुटुंबे एकमेकांच्या ओळखीची आहेत, गणेशोत्सव सगळे मिळून साजरा करतात, वर्गणी स्वेच्छेने आहे.
प्रभागातील नगरसेवकाच्या मंडळाचा मी अॅडव्हायजर आहे.
अन व्यवसायाच्या एरियातही सहसचिव आहे.
धडा :
कोण रे तो? वर्गणी देत नाही म्हणतो?
हा सगळा निव्वळ मुर्खपणा आहे
हा सगळा निव्वळ मुर्खपणा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग केंव्हाच संपला आहे. आता म्हणजे अति झाले आहे. पेठ सोडल्यापासून हा त्रास जरा कमी झाला आहे. बाजीराव रोड वरचे मित्र अजूनही १० दिवस चक्क घराला टाळे ठोकून बाहेर राहायला जातात. पण कोणालाही बोलण्याची हिम्मत होत नाही. जिथे चांगला उत्सव चालू आहे तिथे वर्गणी मिळतेच. ह्याचे समर्थन होवूच शकत नाही.
पुणेरी पाटीची कल्पना आवडली.
पुणेरी पाटीची कल्पना आवडली.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग केंव्हाच संपला आहे. <<< खरे तर हा एक वेगळाच विषय होऊ शकेल. पण मला हे विधन पुर्णतः पटलेले नाही.
टकाटक - खरेतर प्रश्ण वैयक्तीक आहे, तुमच्या कडे किती मंडळे वर्गणी मागायला येतात, आणि तुमच्या घरी वर्गणी मागायला येतात की तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी
मुळात गल्लोगल्ली दहीहंडी आणि
मुळात गल्लोगल्ली दहीहंडी आणि गणपती याच्या मी विरोधात आहे. एकमत करून एका ठराविक एरियात एक गणपती एक दहीहंडी बसवावी. खरंतर एक गाव एक गणपती हेच जास्ती योग्य आहे पण ती फारच आयडियल सिच्यूएशन होईल. म्हणून निदान इतकं तरी. माझ्या घराच्या रस्त्यावर मोजून १० मीटरच्या अंतरावर २ वेगवेगळ्या मंडळांच्या दहीहंडी होत्या.. त्यासाठी क्रेन मागवल्या होत्या शिवाय डॉल्बीचा दंगा होताच. त्यातूनही कुणाच्या डॉल्बीचा आवाज वरचढ याचीही स्पर्धा सुरू होती. हे सगळं आम्ही दिलेल्या वर्गणीच्या जीवावर.
आमची सोसायटी नविन आहे. दहीहंडीच्या आधी एक ग्रुप.. (कोणत्या एरियात/गल्लीत राहतो देव जाणे) वर्गणी मागायला आमच्या बिल्डींगीत घुसला होता. मी लिफ्टमधून बाहेर आले तेव्हा ते लोक माझ्या घराची बेल दाबून हैराण झाले होते. (माझ्या घराला बाहेर कडी कोयंडा नसल्याने कुलुप व्हिजिबल नसते) आणि शेजारच्या घराकडे वळले होते. ते लोक शेजारी बिझी होते तोवर मी लॅच उघडून घरात... नंतर त्यांनी ४ वेळा बेल वाजवूनही मी दार उघडलं नाही. घरात शिरताना मी शेजार्यांशी चाललेला संवाद ऐकला त्यात 'एकशे एक ची पावती फाडतो काका, कमीत कमी तितकी तरी द्याविच लागेल.' एकशे एक प्रमाणे किती घरं ही लोक फिरत असतील, नक्की किती रक्कम गोळा करतात? ती कुठे खर्च करतात? याचा हिशेब आपण कधी पाहतो? देतो आणि रिकामे होतो. आमची सोसायटी अस्तित्वात नव्हती तेव्हा पैसे कुठुन गोळा करत होते? दहीहंडी एकवेळ ठिक आहे पण गणपतीत डॉल्बी का लागतो?
मी साफ तोंडावर सांगते मी कोणत्याही धार्मिक कामासाठी किंवा कसल्याच कामासाठी वर्गणी वगैरे देत नाही म्हणून.
>>मी साफ तोंडावर सांगते मी
>>मी साफ तोंडावर सांगते मी कोणत्याही धार्मिक कामासाठी किंवा कसल्याच कामासाठी वर्गणी वगैरे देत नाही म्हणून.
हे बाकी छान करता.
नाही तर काय. मी तर वाट्टेल ती
नाही तर काय. मी तर वाट्टेल ती कारणं काढून वर्गणी मागणारे पाहिले आहेत.
स्_सा :- बरीच मन्डळी येतात
स्_सा :- बरीच मन्डळी येतात घरी. हे पार्क ते पार्क , कमर्शीयल अपार्टमेन्ट वाले , जुने गावकरी म्हणणारे, त्रुतियपन्थी , अमुक मन्डळ, तमुक मन्डळ प्रत्येकाला किमान ५०० रु हवे असतात. कुठुन देणार मध्यमवर्गीय नोकरदार माणुस. आपली मौज मजा ते लोकाकडुन पैसे मागुन का करतात. आम्ही ही घरी २ वेळा गणपती बसवतो पण दुस-यान्च्या पैश्यावर नाही. एकदा सप्टेन्बर महिन्यात आणि एकदा माघि गणपती पण धा॑गडधि॑गा न घालता. आमचे पार्क वाले मात्र ५ दिवसात मौज मजा करणार, पार्ट्या झोडणार, विसर्जनाच्या दिवशी स्वतःला आणि त्या॑च्या नातेवाइका॑ना टी - शर्टस वाटणार, झोक जाइपर्यन्त दारु पिणार , डोल्बी साउन्ड लावुन अश्लिल गाण्या॑वर किळ्सवाणे नाचणार. एकमेका॑वर दारु उडवणार अशी कामे करतात. आणि दुस्-या॑चे पैसे उडवणार. बाकी ठिकाणी सुद्धा सारखीच परिस्थिति आहे.
तमुक मन्डळ प्रत्येकाला किमान
तमुक मन्डळ प्रत्येकाला किमान ५०० रु हवे असतात. << बापरे !! ५००/- रुपये म्हणजे जरा अतीच होतय.
तुम्ही सोसायटीत रहात असाल तर...
-प्रथम वैयक्तीक पावती देणे बंद करा. ती वर्गणी एकदम जवळच्या मंडळाला एकत्रीत द्या बाकिच्या मंडळांना आमचा तुमचा काही संबंध नाही हे सांगावेच लागेल
-सोसायटीच्या गेटवर / वाचता येईल अश्या ठिकाणी नोटीस लावाच
-तरीही वर्गणी मागायला जर कोणी आलेच तर आम्ही आमची वर्गणी सोसायटी मधे जमा करतो, तुम्ही सोसायटीच्या अधिकार्यांकडून ती घ्या.
(पुर्वी मी आमच्या मंडळाची वर्गणी गोळा करण्यासाठी बाजूच्या सोसायटी मधे जायचो आधी प्रत्तेक घरात वर्गणी मागायचो ३००-४०० रुपये जमायचे. पण नंतर त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने प्रत्तेकाच्या घरी वर्गणी न मागता सोसायटीच्या नावे २५१ रुपायाची पावती करण्यास सांगीतले आणि त्यांनी ती रक्कम लगेच दिलीही.)
असच व्हायला हव॑ , पण ऐकतय
असच व्हायला हव॑ , पण ऐकतय कोण?