गेल्या दोनवर्षाप्रमाणेच याही वर्षी आमच्या ऑफिसमध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यदिन साजरा केला. पहिल्या वर्षी प्रत्येक टिमला एक एक राज्य दिले होते आणि त्या राज्याची संस्कृती सादर करावयाची होती. दुसर्या वर्षी प्रत्येक टिमला एक एक सण दिला होता आणि त्याचे सादरीकरण करावयाचे होते. यावर्षीही अशीच काही हटके थीम आम्ही घेतली होती आणि ती म्हणजे भारतातील ऐतिहासिक्/पुरातन वास्तु सादर करायची. यात आठ टिम होत्या आणि त्यातील एक एक टिमला ताजमहाल, लाल किला, सांची स्तूप, सुवर्णमंदिर, हावडा ब्रीज, महाराष्ट्रातील किल्ला, इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया अशी नावे आली होती. याच बरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातील एक नाट्य सादर करावयाचे होते. सर्वच टिमने अत्यंत कमी वेळात (फक्त ३ दिवसात) हा सारा देखावा (रोजचे काम सांभाळुन) सादर केला. यातील सगळी कलाकुसर ऑफिस कामाच्या तासानंतर केली आहे. ताजमहालचे सगळे डिटेल्स त्या टिमने रेडिमेड न आणता स्वत: केल्या आहेत.माझ्या टिमने लाल किल्ला उभारला होता. अशा तर्हेने गेल्या तीन वर्षाप्रमाणे यंदाही आमच्या ऑफिसात स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा झाला.
गेल्यावर्षीच्या फोटोंची लिंक इथे पहा.
आमचा लाल किल्ला
(यात थर्माकॉल विकत आणुन कटिंग करून ब्रशने रंगवला आहे. कुठेही स्प्रे पेंटिंग नाही. :-))
प्रचि ०१
प्रचि ०२
हावडा ब्रीज
(आईस्क्रीम स्टिकपासुन बनवलेला)
प्रचि ०३
प्रचि ०४
ताजमहाल
(सगळी कलाकृती टिम मेंबर्सनी हातानेच केली आहे.)
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
इंडिया गेट
प्रचि ०९
प्रचि १०
सांची स्तूप
प्रचि ११
प्रचि १२
गेटवे ऑफ इंडिया
प्रचि १३
सुवर्णमंदिर (अमृतसर)
प्रचि १४
किल्ला
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
लोकमान्य टिळक
प्रचि २१
झांशीची राणी
प्रचि २२
दांडी यात्रा
प्रचि २३
वा .....किति म स्त ...सगळे
वा .....किति म स्त ...सगळे तुझ्या सारखे हुशार आणि हौशी आहेत ...
सुंदर कल्पना आणि अप्रतिम सादरीकरण>>>++१११११
हौस आणि पेशन्सची कमाल आहे !!
हौस आणि पेशन्सची कमाल आहे !!
मस्त!
मस्त!
ज ब र द स्त..... बादवे कामं
ज ब र द स्त.....
बादवे कामं कधी करता ऑफिसमधली ?
भारी!!!!!!!!!!!!!!!!! तुमच्या
भारी!!!!!!!!!!!!!!!!!
तुमच्या ऑफिसमधली मंडळी भलतिच हौशी आनि उत्साही आहेत. खुप कौतुक वाटले
आणि मॅनेजमेंट चे ही कौतुक >> +१
आमच्या हापिसचा राक्षस गण आहे. >>>> +१
माझा रिझ्युमी ईमेल करते >>>> +१
काम कधी करता रे ?>>>> - १
टिळकांनासुद्धा राज्याभिषेकात सामील करून घेतले. >>> लय भारी!
कलाकारांना तर द्यायचीच आहे पण
कलाकारांना तर द्यायचीच आहे पण व्यवस्थापनाला पण दाद द्यावीशी वाटतेय.
व्वा. एक से एक
व्वा. एक से एक कलाकृती.
स्वतंत्र भारताचा विजय असो
वा मस्तच कलाकृती आणि कल्पना
वा मस्तच कलाकृती आणि कल्पना
वा झक्कास.. ग्रेट ऑफिस,
वा झक्कास.. ग्रेट ऑफिस, ग्रेट पीपल गुड...
Creativity at its
Creativity at its Best
सर्वांना _/\_
हॅट्स ऑफ यार ! तुमच्या
हॅट्स ऑफ यार !
तुमच्या ऑफीसमधल्या सर्व कलावंतांचं तर कौतुक आहेच पण असे उपक्रम राबवणार्या व्यवस्थापनालाही मानाचा मुजरा !
सर्वच कलाकृती अप्रतिम !
सह्ह्ही!!!!!!!! सगळेच फोटो
सह्ह्ही!!!!!!!! सगळेच फोटो
आहा! सर्वच कलाकृती व सर्वच
आहा! सर्वच कलाकृती व सर्वच टीम्स ना सलाम! कल्पना, सादरीकरण व त्या मागची राष्ट्रीय भावना अगदीच अनुकरणीय...
जल्ला तुझ्या ऑफीसचा नेहमीच
जल्ला तुझ्या ऑफीसचा नेहमीच हेवा वाटत आला आहे.. नि काम सांभाळून आवडीने या कलाकृती सादर केल्या आहेत हे फोटोंतून सहज कळते.. ज्यांनी अश्या कार्यक्रमाची युक्ती वापरली ते ग्रेटच.. सगळीकडे असा स्वातंत्र्यदिन साजरा झाला पाहिजे.. जय हिंद
धन्य आहात रे तुम्ही सर्व
धन्य आहात रे तुम्ही सर्व मंडळी - किती कल्पकता, किती मेहनती आणि सर्व एवढ्या हौसेने, उत्साहाने करता - खरंच कमाल आहे तुमची ___/\___
ही राज्याप्रमाणे सजावटीची
ही राज्याप्रमाणे सजावटीची कल्पना ज्यांची आहे त्यांच खास कौतुक....सगळीच राज्य छान सजवलीत ...मस्त
भन्नाट - कसली हौशी मंडळी आहात
भन्नाट - कसली हौशी मंडळी आहात तुम्ही....
च्यायला आमच्या हापीसात असला काहीच नाही...
श्या...जाम हेवा वाटतोय तुमचा....
लाल किल्ला सुरेख जमलाय....आणि ताजमहाल करणारे तर लई भारी कलाकार आहेत....
त्या मानानी सुवर्णमंदिर नाही जमला..पण काम सांभाळून केल्यामुळे जाम कौतुक
मस्त रे जबरी फोटु तुमच्या
मस्त रे जबरी फोटु
तुमच्या हाफिसात व्हॅकंसी हाय काय ?
मस्त रे सही आहे तूझ ऑफीस.
मस्त रे सही आहे तूझ ऑफीस. आवडल.
आवडलं रे, प्रचि , ऑफिस ...
आवडलं रे, प्रचि , ऑफिस ...
हावडा ब्रीज आणि ताज बेहद्द आवडले.
जिप्स्या.... अरे कहरच आहे
जिप्स्या.... अरे कहरच आहे तुझ्या हापिसात.. खरच मला पण जॉइन करावेसे वाटतेय तूझ्याबरोबर्....सर्वच कलाकृती झक्कास. हावडा ब्रिजचे जास्त कौतूक वाटले. तुझ्या ऑफिसमधील सर्व सहकार्यांचे अभिनंदन....
_/\_ धन्य ! किती उत्साही
_/\_ धन्य ! किती उत्साही आहात तुम्ही लोक्स!
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद ऑफिसमध्ये शेअर केले.
सुंदर प्रतिसादाबद्दल आम्हा सर्वांकडुन धन्यवाद!!!!
जिप्सी, एकदम जबरदस्त थिम !
जिप्सी, एकदम जबरदस्त थिम !
सहीच!!
सहीच!!
लायन रॉक्स
लायन रॉक्स
व्वा! सुंदर ! भन्नाट कलाकृती.
व्वा! सुंदर ! भन्नाट कलाकृती. जिप्स्या, तुझ्या ऑफिसमधल्या सर्वांचे खूप खूप कौतुक. ताजमहाल, तर १ नंबर. हावडा ब्रीज ,सांची स्तूप, लाल महाल पण मस्तच.
फारच सुन्दर. कल्पना आवडली,
फारच सुन्दर. कल्पना आवडली, वापरली तर चालेल का?
तुझ्या ऑफिसातले लोक जबरी
तुझ्या ऑफिसातले लोक जबरी आहेत. एवढ्या मस्त कलाकृती उभारल्यात आणि वर मस्त तय्यार होऊन त्या कलाकृतींना जीवंतपणाही बहाल केला. गेल्या दोन्-तीन वर्षातल्या तुझ्या ऑफिसातल्या धमाली पाहुन खुप कौतुक वाटतेय सगळ्यांचे....
रच्याकने, एका मर्द मराठ्याचा फोटो इथे का बरे टाकला गेला नाही?????????????
धन्यवाद लोक्स कल्पना आवडली,
धन्यवाद लोक्स
कल्पना आवडली, वापरली तर चालेल का?>>>>अगदी बिनधास्त
एका मर्द मराठ्याचा फोटो इथे का बरे टाकला गेला नाही?????????????>>>>;-)
Pages