अवान्तर [२] : मनातलं :(२,३): २९ ऑगस्ट २०१२ : ध्यानचंद यांचा आज जन्म दिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन

Submitted by मी-भास्कर on 9 August, 2012 - 08:38

अवान्तर [२] : मनातलं : (२,३):
२९ ऑगस्ट २०१२ : ध्यानचंद यांचा आज जन्म दिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन

१५ ऑगस्ट १९३६ या दिवशी भारताच्या हॉकी संघाने म्युनिक येथे ऑलिंपिक्समध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम केल्याचे मी १५ ऑगस्ट २०१२ ला , १५ ऑगस्ट ची आणखी एक संस्मरणीय घटना म्हणून येथे लिहिले होते.
तो विक्रम करणारे संघाचे कर्णधार मेजर ध्यानचंद सोमेश्वरसिंह बैस यांचा आज जन्म दिवस, जो २९ ऑगस्ट १९९५ पासून तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणूनही साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी क्रीडाक्षेत्रातील खेलरत्न, अर्जुन आणी द्रोणाचार्य या निरनिराळ्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते.
ध्यानचंद यांचा थोडक्यात जीवनपट असा :
२९-८-१९०५ अलाहाबादेत जन्म
१९२२ सहावीपर्यंत शिकल्यावर शिपाई म्हणून सैन्यात भरती आणि हॉकीचा श्रीगणेशा.
१९२६ न्युझिलंड दौऱ्यात पहिला गोल नोंदवला.
१९२८ अमस्टरडॅम, १९३२ लॉस एंजेलिस, आणि १९३६ म्युनिक ऑलिंपिक्समध्ये मिळविलेल्या सुवर्णपदकाचे मुख्य शिल्पकार.
१९५६ सेनादलातून निवृत्ती. तत्पूर्वी मेजर केले गेले.
१९५६ पद्मभूषण पुरस्कार
२ डिसेंबर १९७९ कॅन्सरने निधन.
त्यांचे टपाल तिकिट निघाले आणि इतर गौरवहि त्यांना प्राप्त झाले. पण आजच्या खेळाडूंना जी आर्थिक स्थिरता मिळते ते भाग्य त्यांच्या वाट्याला आले नाही. आता निदान मरणोत्तर तरि भारतरत्नचे पहिले मानकरी होण्याचा आधिकार ध्यानचंद यांनाच मिळायला हवा.

तरूण वर्गासमोर आयडॉल म्हणून खरेतर ध्यानचंदांसारखे वीरच असायला हवेत.

***************************************************
अवान्तर [२] : मनातलं : (२): १५ ऑगस्ट २०१२ :
आज १५ ऑगस्ट २०१२ : भारताचा ६६ वा स्वातंत्र्यदिन
आजच्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य आजच वाचण्यात आले ते असे की बरोबर शहात्तर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९३६ या दिवशी भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा एक विजय ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हॉकी संघाने मिळवला.

१९३६ सालचे ऑलीम्पिक खेळ जर्मनीत बर्लीनमध्ये साजरे झाले. त्यातील हॉकीचा अंतीम सामना भारत विरुद्ध (हॉकीतील बलाढ्य) जर्मनी असा झाला. त्यांचीच खेळपट्टी, त्यांचाच देश आणि त्यांचेच प्रेक्षक. शिवाय जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर आपल्या टीमला उत्तेजन देण्यासाठी स्वत: जातीने हजर होता.
पहिल्या अर्ध्या वेळाचा खेळ संपला, तेव्हा एका गोलने भारताची सरशी झालेली होती. जर्मनीची बलाढ्य टीम एकही गोल करू शकली नव्हती.
दुसऱ्या भागाच्या खेळाला सुरुवात झाली. परंतु आता भारतीय खेळाडू मैदानावर घसरून सटासट पडू लागले; कारण मधल्या वेळात जर्मन कोचने मैदानात सर्वत्र पाणी शिंपडण्याची व्यवस्था केली. भारतीय खेळाडू कॅनव्हासचे सामान्य दर्जाचे बूट घालून खेळत होते. त्यामुळे ओल्या मैदानात ते घसरू लागले. जर्मन खेळाडूंचे बूट उत्तम दर्जाचे होते त्यामुळे ओल्या मैदानाचा त्यांच्या खेळावर फारसा परिणाम होत नव्हता. सामना हातचा जाणार असे वाटू लागले.
पण त्यानंतर ध्यानचंद यांनी बूट काढून टाकले आणि अनवाणीच खेळायला सुरुवात केली. ध्यानचंदने जबरदस्त चढाई करून खेळाचा रंग पालटला. आठास एक असा सामना जिंकला. आठांपैकी तीन गोल तर ध्यानचंदनेच लगावले होते. सुवर्ण पदक हिंदुस्थानने खेचून आणले. आपल्या टीमचा पराभवाने संतापून हिटलर स्टेडीयममधून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ध्यानचंद यांना हिटलरने भेटीला बोलावले.
हिट्लर म्हणाला, ‘हे तरुण माणसा, तू हॉकी तर उत्तमच खेळतोस. तू जर्मन नागरिक हो. आमच्या बाजूने हॉकी खेळत जा. मी तुला जर्मन सैन्यात बडा अधिकारी बनवतो’. पण ध्यानचंद यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही. ध्यानचंदने पाठोपाठ तीन ऑलीम्पिक खेळांत (१९२८, १९३२ व १९३६) सुवर्णपदक भारताकडे खेचून आणले. तो भारतातर्फेच खेळत राहिला.

मनात आलं : पारतंत्र्याच्या काळात कुठल्याहि खास सुखसुविधा नसतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितित ध्यानचन्द, खाशाबा जाधवांच्या सारखी नररत्ने केवढे पराक्रम गाजवितात?
याउलट गेल्या ६५ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात खेळांना तुलनेने प्रचंड प्रोत्साहन असूनही नुकत्याच झालेल्या लंडन ऑलिंपिक्स (२०१२) मधील भारताची कामगिरी गौरवास्पद म्हणता येईल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने
>>ते सर्वांना ठणकाऊन सांगतील , " पहा, जनतेने मला दोषमुक्त केले आहे. बसा बों......! "<<
हे वाक्य आवडले.

"जनादेश" हा शब्द कुणी प्रचलित केला बरे?

(बुचकळ्यात पडलेला) इब्लिस.

सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास वय झालेल्या (निष्क्रीय) नेत्यांना रिटायर करा अशा मागण्या करणा-यांचे डोळे उघडणारा निकाल आहे हा.

याउलट गेल्या ६५ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात खेळांना तुलनेने प्रचंड प्रोत्साहन असूनही नुकत्याच झालेल्या लंडन ऑलिंपिक्स (२०१२) मधील भारताची कामगिरी गौरवास्पद म्हणता येईल का?<<

टाईम ट्र्यावल!
हा एकमेव इलाज तुमच्यासाठी आहे. जुन्या काळात जाऊन रहा. मज्जा येईल तुम्हाला. कारखाने वा पेट्रोलची वाहने नाहीत. धूर नाही. शुद्ध हवा. सकस गावराणी अन्नधान्ये. औषधांआभावी पटकीच्या साथीने मरणारी गावेच्या गावे. पाटीचे संडास. डोक्यावरून वाहिलेल्या टोपल्या.. कित्ती कित्ती म्हणून सांगू!!

रच्याकने.
१. स्वातंत्र्योत्तर काळातले 'डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स ऑफिसर्स', बेस्ट ऑफ ५ मधे १०वीच्या पोरांना मिळणारे स्पोर्ट्सचे गुण. कित्ती कित्ती प्रोत्साहन आहे खेळांना!
२.म्याटवरील कुस्ती अन लाल मातीतील कुस्ती यात फरक आहे, अन ग्रीकोरोमन स्टाईलने खेळणेही वेगले आहे.. त्यांनी केले ते उत्तम होतेच. म्हणून आज होते आहे ते कमअस्सल नव्हे.

@इब्लिस | 16 August, 2012 - 07:30
टाईम ट्र्यावल!
हा एकमेव इलाज तुमच्यासाठी आहे. जुन्या काळात जाऊन रहा. मज्जा येईल तुम्हाला. कारखाने वा पेट्रोलची वाहने नाहीत. धूर नाही. शुद्ध हवा. सकस गावराणी अन्नधान्ये. औषधांआभावी पटकीच्या साथीने मरणारी गावेच्या गावे. पाटीचे संडास. डोक्यावरून वाहिलेल्या टोपल्या.. कित्ती कित्ती म्हणून सांगू!!<<
विरोधाभास दाखवण्यासाठी जुन्या काळातले एखादे उदाहरण दिले एवढ्यावरून मला 'जुन्या काळातील प्रत्येक गोष्टीचा समर्थक' सिद्ध करण्यासाठी जाणून बुजून विपर्यास करीत आहात.
'टाईम मशिन' च्या लेखकाला "औषधांआभावी पटकीच्या साथीने मरणारी गावेच्या गावे. पाटीचे संडास. डोक्यावरून वाहिलेल्या टोपल्या.. कित्ती कित्ती म्हणून सांगू" हे बघायची तीव्र इच्छा होती म्हणूनच त्याने ते पुस्तक लिहिले असेच तुमचे मत असावे.
धन्य आहात. कोपरापासून नमस्कार.

>> रच्याकने.
१. स्वातंत्र्योत्तर काळातले 'डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स ऑफिसर्स', बेस्ट ऑफ ५ मधे १०वीच्या पोरांना मिळणारे स्पोर्ट्सचे गुण. कित्ती कित्ती प्रोत्साहन आहे खेळांना!<<

शिवाय स्पोर्त स्कॉलरशिप्स, सरकारि/खाजगी नोकर्‍या, सवलती व अनेक तर्हेचे पुरस्कार आणखी कितितरी कसे नेमके विसरलात?

>>२.म्याटवरील कुस्ती अन लाल मातीतील कुस्ती यात फरक आहे, अन ग्रीकोरोमन स्टाईलने खेळणेही वेगले आहे.. त्यांनी केले ते उत्तम होतेच. <<

'म्याटवरील कुस्ती''च्या सरावाला वाव नसूनही खाशाबांनी केला ना पराक्रम? 'त्यांनी केले ते उत्तम होतेच''
हेच तर मी म्हणले आहे.

>>म्हणून आज होते आहे ते कमअस्सल नव्हे.<<

त्या काळाबरोबर सर्वंकश तुलना करता ते कम अस्सल च आहे.

त्यामुळे "याउलट गेल्या ६५ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात खेळांना तुलनेने प्रचंड प्रोत्साहन असूनही नुकत्याच झालेल्या लंडन ऑलिंपिक्स (२०१२) मधील भारताची कामगिरी गौरवास्पद म्हणता येईल काय?" हा माझा प्रश्न योग्यच आहे."

>>त्या काळाबरोबर सर्वंकश तुलना करता ते कम अस्सल च आहे.<<
आपण केलेली तुलना सर्वंकष नाही.

आपला दर्जा बदलतो तसा जगभरातील इतर खेळाडूंचाही बदलतो. गावच्या तालमीला एक म्याट विकत घेऊन द्यायला किती खर्च लागेल कल्पना आहे काय आपल्याला? इतर देशी संधी जास्त उपलब्ध झाल्या, अन जास्त वेगाने झाल्या.

असो.

खेळांना प्रोत्साहनाबाबतच्या त्या मुद्दा क्र.१ मधील माझ्या लिहिण्यातून खेळ या प्रकाराची किती भयंकर हेळसांड होते आहे हा उपहास तुमच्या लक्षात आलेला नाहिये Happy जाऊद्या इस्कटून सांगितले तर मजा जाईल त्यातली.

>>हे बघायची तीव्र इच्छा होती म्हणूनच त्याने ते पुस्तक लिहिले असेच तुमचे मत असावे.<<
त्या आधीचे शुद्ध हवा, सात्विक अन्न इ. दिसले नाही तुम्हाला. सिलेक्टिव्ह बघणे हा तुमचा प्राब्लेम आहे असे वाटते. म्हणून आजकालच्या भुक्कड, कमअस्सल भारतात रहाण्यापेक्षा वैभवशाली पूर्वजांच्या त्या सोनेरी भूतकाळात तुम्ही जाणे अधिक बरे, नाहीतरी तुम्ही त्यातच रमताहात असे वाटले, म्हणून टाईम ट्र्यावल सुचविले.

यात टाईम मशिन अन त्याच्या लेखकाचा काय संबंध? असे काही पुस्तक आहे हेही मला ठाऊक नाही.

शेवटी,
तुमचा प्रश्न योग्य की अयोग्य याच्याशी मी काहीही वक्तव्य केलेले नाही. अहो प्रश्न मलाही पडतात.
बाकी तुमच्या प्रश्नाचे उत्तर 'होय' असे आहे. आपली कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे.

>>इतर देशी संधी जास्त उपलब्ध झाल्या, अन जास्त वेगाने झाल्या. <<

हे शक्य आहे.
असेही असू शकते की तेवढ्याच वा त्याहूनही कमी संधि असूनही अधिक ध्येयनिष्ठा, अधिक मेहनत व अधिक एकाग्रता या जोरावर इतर खेळाडू पुढे गेले असतील. निव्वळ संधि, साधनसामुग्रि व उत्तेजन एवढ्याच गोष्टी विजय मिळायला पुरेशा नाहीत. त्याहीपलिकडे बर्‍याच गोष्टी आहेत. त्या कोणत्या? याचाच शोध त्या क्षेत्रातील जाणत्यांनी घ्यायला हवा. अल्पसंतुष्टता हा त्यापैकी एक असावा हे माझे मत.
>>म्हणून आजकालच्या भुक्कड, कमअस्सल भारतात रहाण्यापेक्षा वैभवशाली पूर्वजांच्या त्या सोनेरी भूतकाळात तुम्ही जाणे अधिक बरे, नाहीतरी तुम्ही त्यातच रमताहात असे वाटले <<

हा गैरसमज दूर झाल्यास मला आनंद होईल. पण गतइतिहास पाहाण्यात रस असणे याचा अर्थ त्याच काळात राहायला आवडते असा नाही. उलट मानवी कर्तृत्वाने घेतलेल्या भरारीचे यथार्थ दर्शन त्यामुळे होते.
खूप कर्तृत्ववान लोक खूपदा जुन्या आठवणीत रमतात. त्या आठवणी बहुदा प्रचंड त्रास, मेहनत व उपेक्षा यातून मार्ग कसा काढला यासंबंधी असतात. म्हणून त्यांना पुन्हा तसेच जगायचे आहे असा कोणीही काढीत नाही. कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करण्याची आपल्याला सवय आहे असे आताच मी म्हणणार नाही.

<<यात टाईम मशिन अन त्याच्या लेखकाचा काय संबंध? असे काही पुस्तक आहे हेही मला ठाऊक नाही.>>

घ्या........यांच्या बेसिक मधेच राडा आहे. आणि हे म्हणे डॉक्टर. Proud बीडचे का हो तुम्ही? Light 1 Biggrin Rofl Lol एवड पन म्हाइत नाई वो इब्लिसराव श्या!!

@इब्लिस
>>यात टाईम मशिन अन त्याच्या लेखकाचा काय संबंध? असे काही पुस्तक आहे हेही मला ठाऊक नाही.
<<
तुमच्या मुळच्या पोस्टित 'टाईम ट्र्यावल'' चा अगदी सुरुवातीसच उल्लेख आहे.

त्यावरून मला वाटले की टाईम ट्रॅव्हल वरील पुस्तक वा माहिती मुळे हा शब्द आपण वापरला असावा.
अर्थात त्यामुळे कांही फरक पडत नाही. मी तरी ते पुस्तक पूर्ण वाचलेले नाहीच. फक्त त्यातील मूळ कल्पना मला माहीत होती इतकेच.
एच जी वेल्स यांचे दि टाईम मशिन (फिक्षन) अशा पुस्तकाची मूळ कल्पना भविष्य काळात जाता येईल अशा मशीनची होती.
पन नंतर त्यावरून भविष्य व भुत काळात कोठेही भटकता येईल अशा मशिन्सवर लिहिले जाऊ लागले. सिनेमाही निघाले.
हे खरोखरच अवांतर.

खूप कर्तृत्ववान लोक खूपदा जुन्या आठवणीत रमतात. त्या आठवणी बहुदा प्रचंड त्रास, मेहनत व उपेक्षा यातून मार्ग कसा काढला यासंबंधी असतात. म्हणून त्यांना पुन्हा तसेच जगायचे आहे असा कोणीही काढीत नाही. कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करण्याची आपल्याला सवय आहे असे आताच मी म्हणणार नाही.<<<

भास्करा,
हा पार्ट तुम्ही मनापासून लिहिला आहात.
नॉस्टाल्जिया म्हणा, किंवा सिंहावलोकन किंवा अजून काही म्हणा, माणसाला गतकाळाच्या स्मृतींत रमायला आवडते. त्यात चुकीचे, किंवा वाईट काहीच नाहिये. इतिहास हा त्यातून शिकण्यासाठीच असतो, अन शिकून पुढे जाण्यासाठी.

आता, मी विपर्यास केला, किंवा सोप्या भाषेत, मी चिडचिड केली ती का? कारण म्हणजे, या लेखात मला प्युअर नॉस्टाल्जिआ नाहि हो मिळाला. तेवढाच असता, तर आनंदाने वाखाणला असता. त्या जुन्या आठवणींच्या तुलनेत आजची अचिव्हमेंट तुच्छ आहे हा जो सूर होता, त्यामुळे माझे प्रतिसाद होते.

प्रत्येक गोष्ट काँटेक्स्ट मधेच तोलली पाहिजे, अन काँटेक्स्ट्स सतत बदलत असतात, असे माझे मत आहे. बघा माझे म्हणणे पटते/उमजते आहे का?

टाईम ट्रॅव्हलबद्दल बोलायचे, तर यातली संकल्पना अशा आहेत:
1. The future is the result of N number of probabilities. It keeps changing every instance. That is why it is not possible to travel into the future. BUT one can travel back into the past.
2. Past always exists.
When I am with you, I can see you, because, the light reflected from your body is caught by my eyes and an image is formed on Retina. I can hear you because the sound you create is caught by my ears.
Since energy is not destroyed. light & sound keep on traveling into space. for infinite distances, at very low concentration maybe. So if one can travel at speed more than light, and has instruments to catch those 'reflections' that are traveling in space, one can see and experience all the history that has happened so far..
अजूनही काही इन्टरेस्टिंग कन्सेप्ट्स आहेत. वेल्सनी लिहिल्यानंतरचे बरेच आहे, अन वाचलेले आहे. पण ते अवांतर होतेय खूप. इतरत्र बोलू या त्याबद्दल.
असो.

(सायन्स फिक्शन फ्यान) इब्लिस.

@ शेळी | 16 August, 2012 - 15:56
अग्गो बाई.. आता ही कोण नवी बाई आली?
<<<

श्श्श्श्श!
सौ. आहेत त्या ~लाजलेला बाहुला~
हळू बोला. नाहीतर माझी धडगत नाही...

@इब्लिस
प्रत्येक गोष्ट काँटेक्स्ट मधेच तोलली पाहिजे, अन काँटेक्स्ट्स सतत बदलत असतात<<

सहमत. पण हे तत्व वापरले तरीही एकमत होईलच असे होणार नाही.
शिवाय आपल्या मनाचा नैसर्गिक कल सतत तुलना करण्याच असतो आणि (त्याचा अतिरेक केला नाही तर ) तो आवश्यकही असतो असे मला वाटते.
असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

एल.ओ.एल.
एकमत, सहमत इ. होण्याशी मला घेणे देणे नाही. Wink शेवटी सगळेच एकाच पार्टीत गेले तर रशिया नै का होणार? तुम्ही तुमचे चालू द्या, आम्ही आमचे चालू देतो.

सध्या इब्लिसीणबाई ओरडताहेत, 'जवळ-जवळ झोपायची वेळ झाली, अजून काय बडवत बसलात ते काम्प्यूटर चं डबडं?' म्हणून.. जरा शांत करून येतो तिला Wink

@इब्लिस | 16 August, 2012 - 21:25
'एल.ओ.एल.' <<
हा शॉर्ट फॉर्म कळला नाही.
>>सध्या इब्लिसीणबाई ओरडताहेत, 'जवळ-जवळ झोपायची वेळ झाली, अजून काय बडवत बसलात ते काम्प्यूटर चं डबडं?' म्हणून.. जरा शांत करून येतो तिला <<

हे सगळं व्हर्चुअल जगातलच असावं !

हे सगळं व्हर्चुअल जगातलच असावं !
<<
म्हणजे? तुम्ही काय रियल जगात मी-भास्कर आहात काय? एल.ओ.एल.

@इब्लिसीण बै,
जवळ जवळ झोपायची वेळ म्हणजे, almost sleeping time.
आता म्हातारी झालीस तू. जवळ कशाला झोपायला हवे गे? Wink

@इब्लिस | 17 August, 2012 - 18:11
>>@इब्लिसीण बै,
जवळ जवळ झोपायची वेळ म्हणजे, almost sleeping time......... <<
अति अवांतर चाललय हे!
ड्युआडी संस्थानात शेतीला मज्जाव केल्यापासुन कविता, गझला बरोबर इब्लिसीला अधिकाधिक चांगले दिवस येउ लागलेत हे मात्र खरे!

भगब, माकारे, ओएओ, माइपपूइ .
आमचे पण शॉर्ट फॉर्म्स. जमल्यास समजुन घ्या. दिवे घ्या वगैरे वगैरे निरर्थक बकवास पण घ्या.

मी-भास्कर,

भावना पोहोचल्या !!

२०१२ ऑलेंपिकः ईराण इथियोपीया जमैका पदक श्रेणी मध्ये बरेच वर आहेत भारता पेक्षा, भारताचा नं : ५५

भारत सरकार खेळाकडे कितपत लक्ष देतय हा वादा चा मुद्दा आहे पण इतरत्र काय चालल आहे हे पहाणे
तितकेच प्रत्ययकारी ठरेल !

२०१२ ऑलेंपिक या स्पर्धेत एक धाव पटूने भाग घेतला होता, तिच नाव टिंटु लुका जिला
स्वता: पी टी ऊषा प्रशिक्षण देत आहे. पी टी ऊषा ला ह्या टिंटु लुका कडून बर्याच अपेक्षा आहेत.

गेल्या १५ दिवसां पुर्वी झि न्यूज ने पी टी ऊषा ची मुलाखत दाखवली त्या दिवशी कळलेली माहिती
शेअर करत आहे.

पी टी ऊषा स्वता: एक प्रशिक्षण केंद्र चालवते ज्याचा पुर्ण खर्च इन्फोटेक ऊचलत आहे.
अशा प्रशिक्षण केंद्रात दर वर्षाला एका खेळाडूवर १.५ ते २ लाख रु खर्च येतो, आणि असे बरेचसे खेळाडू
पी टी ऊषा आज प्रशिक्षित करत आहे.

ह्याच पि टी ऊषाला जलंधर मध्ये भरलेल्या खेळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रवेश नाकारला होता. सुरक्षा कर्मी
लोकांनी, तिच्याकडे रितसर आंमत्रण असून सुद्धा !! त्या लोकांनी पिटी ऊ षाला ओळखलेच नाही. स्वता: च
ओळख पत्र असून सुधा तिला प्रवेश नाकारला त्यावरुन लक्षात येत की किती उदासीन लोक आहेत. ह्या स र्व
गदारोळावर क्रिडामंत्रालयाच अवाक्षर सुद्दा नव्हत. त्यावे़ळी ती टी व्ही वर दाखवलेली, रडत असताना, म्हणत
होती अशा लोंकासाठी मी जिवाच रान करून स्पर्धेत धावली होती. पण ते सर्व विसरून तीच पिटी ऊषा एका
ऊदयोन्मूख धावपटू साठी कष्ट घेताना बर वाटल.

हल्लीच (गेल्या ३-४ दिवसापुर्वी) क्रिडा मंत्रालया ने मेडल जिंकलेल्या खेळाडूचा सन्मान करण्यासाठी
आयोजीत कार्यक्रमाचा पार धुव्वा ऊडाला. कार्यक्रमाचे कसे आयोजन असू नये ह्याचच उदाहरण दिल !!

@विवेक नाईक | 18 August, 2012 - 16:45
>>भावना पोहोचल्या !! <<
माहितीबद्दल धन्यवाद.
आपण भारतीय लोक फक्त नटनट्या, क्रिकेटपटू आणी सत्तेवरील नेत्यांनाच ओळखतो.
आपले सुरक्षाकर्मीहि भारतीयच ना?
इन्फोटेक आणि पीटी उषा यांचे काम नक्कीच प्रशंसेला पात्र आहे. एम्प्लोयमेन्ट वाढवायला क्रीडाखाते, कंत्राटे द्यायला स्टेडियम आणी नेत्यांना मिरविण्यासाठी उद्घाटने,गौरव्समारंभ लागत असतात. बाकी क्रीडास्पर्धांमध्ये काय कोणी हारणार कॉणी जिंकणार! त्याचे काय विशेष?

नाही, पण आता खायला सुरु करायला हवे .....

तुम्ही नाही खात १४ तारखेला??? अखंड हिंदुस्तानाची स्वप्ने बघता, मग तो प्रांत तुमच्या त्या स्वप्नातल्या भारतात नसतो का?? Proud

@विवेक नाईक
>>हल्लीच (गेल्या ३-४ दिवसापुर्वी) क्रिडा मंत्रालया ने मेडल जिंकलेल्या खेळाडूचा सन्मान करण्यासाठी
आयोजीत कार्यक्रमाचा पार धुव्वा ऊडाला. कार्यक्रमाचे कसे आयोजन असू नये ह्याचच उदाहरण दिल !!<<
जिथे १२० कोटी लोकांच्या, गेलि ६५ वर्षे स्वतंत्र असलेल्या देशाला एकही सुवर्णपदक मिळाले नाही आणि त्यामुळे त्या मंत्रालयाचाच एका अर्थी धुव्वा उडाला याचीदेखील खंत वाटलेली दिसत नाही तेथे त्यांच्या एखाद्या कार्यक्रमाचा धुव्वा उडाला याची कसलि आहे फिकिर?
तेथेही सत्कारमूर्तींपेक्षा सत्कारकर्त्यांना मिरवता यावे हा मंत्रालयाचा उद्देश सफल झाला म्हणजे सर्व काही पावले.
ऑलिंपिकचे काय घेऊन बसलात? कलमाडीबाबांसाठि आधी आणी नंतर 'सिबिआय नमः' करण्यात नव्हते का गुंतले सर्वजण? ते बाहेर आले नाहीत तर काय करायचित ती सुवर्णपदके?

@शेळी | 19 August, 2012 - 14:18
नाही, पण आता खायला सुरु करायला हवे ..... <<

सुरु करणारच आहात तर तुम्ही १४ ऑगस्टला शेळी असलात तरी मटण बिर्याणीवर ताव मारा
आणि १५ ऑगस्टला जिलब्या ! म्हणजे मग अखंड भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होईल आणी सर्वधर्म समभावही साधेल.

सुरु करणारच आहात तर तुम्ही १४ ऑगस्टला शेळी असलात तरी मटण बिर्याणीवर ताव मारा
आणि १५ ऑगस्टला जिलब्या ! म्हणजे मग अखंड भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होईल आणी सर्वधर्म समभावही साधेल.

अरेरेरेरे ...... म्हणजे जिलेबी म्हणजे हिंदु आणि बिर्यानी म्हनजे मुसलमान असा त्यांच्यावरही शिक्का मारलात की !!

शेळी

मी भास्कर यांना जिलेबी या शब्दाचा अर्थ सांगितलात का ? रूमाल हा शब्द त्यांना मध्यंतरी फारच झोंबला. रूमाल या शद्बाचा अर्थ भास्करांना द्यावा लागत असेल तर प्रत्येक शब्दाचे त्यांना समजेल असे अर्थ दिलेले उत्तम राहील ! एकेकाची कुवत असते त्याची प्रत्येकाला कल्पना असेलच असं नाही. समजावण्याचे प्रयत्न करून पाहीले खरे पण स्वतःच्या उपकरणांनीही त्यांची आग अजून विझलेली नाही असंच दिसतंय...:फिदी:

भाषाशुद्धी करा भास्करराव. जिलेबी, बिर्यानी असे उर्दू फारसी शब्द नका वापरु ...

जिलेबी - मधुर सुदर्शन
मटन बिर्यानी - मांसोदन

Proud

भास्करं/ भास्कराय मांसोदनं समर्पयामि | ( द्वितिया वापरतात की चतुर्थी ??? )

biry.jpg

Pages